हिंदू कोड बिल आणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर !!

२७ सप्टेंबर १९५१ साली स्वतंत्र भारताच्या नेहरूंच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळातून महिलांच्या हक्कांसाठी असलेले "हिंदू कोड बिल" पास न झाल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कायदे मंत्री पदावर लाथ मारली आणि राजीनामा दिला होता !!







मित्रानो आणी मैत्रिणीनो  २७ सप्टेंबर इतिहासातील 'स्वाभिमानी दिवस' याच दिवशी १९५१ साली स्वतंत्र भारताच्या नेहरूंच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कायदे मंत्री पदावर लाथ मारली आणि राजीनामा दिला होता याच दिवशी १९५१ साली भारताचे प्रधानमंत्री नेहरू यांनी डॉ. बाबासाहेबांनी अतिशय विचारपूर्वक आणि धाडसाने मांडलेले "हिंदू कोड बिल" बरखास्त केले. हे सर्व मान्य आहे कि हिंदू संस्कृतीत स्त्रियांचा दर्जा हा दुय्यम प्रतीचा आणि सामाजिक, राजकीय आणि आर्थिक अधिकार नाकारणारा होता. हिंदू धर्माच्या, स्त्रियांबद्दलच्या अनिष्ट रूढी आणि बंधने झुगारून देऊन स्त्री-पुरुष समानतेच्या आणि योग्य सन्मान मिळण्याच्या सोनेरी संधी ला भारत कायमचा मुकला होता.




 


डॉ. आंबेडकरांनी भारतीय स्त्रियांवर अनेक उपकार करून ठेवले आहेत. आज सुद्धा प्रसारमाध्यमे आणि स्त्रीवादी लेखक / लेखिका सोयीस्कररीत्या बाबासाहेबांच्या या एकहाती लढया बद्दल लिहित नाहीत. बाबासाहेबांना एक "राष्ट्र निर्माते" म्हणून न मानता फक्त दलित नेता असे भारतीय समाजावर कायमचे बिंबवण्याचे हे षड्यंत्र आहे. भारतीय स्त्रियांच्या जीवनात क्रांतिकारी बदल आणू पाहणा-या हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या कार्याची म्हणावी तशी दखल आपल्या भगिनीवर्गाने घेतलेली नाही.



 

ब्राह्मणी साहित्यात स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नाकारला आहे तसेच सती ची चाल , बाल विवाह आणि विधवा विवाह सारख्या प्रथा अतिशय चलाखीने बनउन स्त्रियांना संपत्ती मधून हद्दपार केले होते या बाबतचे काही पुरावे खाली देत आहे (संदर्भासह)-
 





१) अथर्व वेद - ६/११/३-

 

हे परमेश्वरा तू हा गर्भ बनवला आहेस, त्यातून मुलाचा जन्म होऊदे, स्त्री काय कुठेही जन्माला येईल.

 


२) अथर्व वेद - २/३/२३

 

हे वरा तू पुरुष जन्माला घाल.


 

३) शतपथ पुरण-

 

मुलाला जन्म देऊ न शकणारी स्त्री दुर्दैवी असते


 

४) रीग वेद- ८/३३/१७-

 

इंद्र म्हणाला : स्त्रियांना उपजतच कमी बुद्धिमता असते , ती ज्ञान ग्रहण करू शकत नाही

 


५) रीग वेद - १०/९५/१५-

 

स्त्रियांसोबत मैत्री करू नका त्यांचे हृदय तरस (लाकड्बाग्घा / hyena ) पेक्षा क्रूर / कपटी असते


 

६) यजुर वेद -- ६/५/८/२-

 

(तैतरीय संहिता )

 

स्त्रियांमध्ये कार्य शक्ती नसते म्हणून त्यांना संपत्ती मध्ये हिस्सा देऊ नये


 

७) शतपथ पुरण - (यजुर्वेदाचे प्रवचन )-

स्त्रिया / शुद्र / कुत्रा / कावळा हे सारखेच आहेत, त्यांच्यामध्ये असत्य, पाप आणि अज्ञान वाढत असते


 

८) मनुस्मृती - त्रिष्णा ९/९३-

कुठल्याही धार्मिक परंपरेतील समस्या असतील तर २४-३० वयोगटातील पुरुषाने ८-१२ वर्षाच्या मुलीशी लग्न करावे


 

९) मनुस्मृती- अति कार्माय ९/७७-

 

बेकार (काम धंदा नसलेला /lethargic), नशाबाज, आणि रोगी नवऱ्याची आज्ञा जी स्त्री मानणार नाही तिला ३ महिन्यासाठी जंगलात सोडून द्यावे आणि तिचे दागिने काढून घ्यावे

 


१०) मनुस्मृती- अशीला काम्व्रतो -- ५/१५७-

 

नवरा विकृत, बाहेख्याली, अनैतिक असला तरी पत्नी ने त्याची पूजा आणि सेवा करावी.

 

(काही उदाहरणे इतके विक्षिप्त आहेत कि इथे देऊ शकत नाही)

 


भारतीय परंपरेने स्त्रीला कायमच जोखडात ठेवले आहे. तिने बालपणी पित्याच्या, तरुणपणी पतीच्या आणि म्हातारपणी पुत्राच्या अधिपत्याखाली राहावे अशी व्यवस्था मनुस्मृतीने करून ठेवली.

 



In " The position of women in Hindu Civilization" Dr Babasaheb Writes"

 


"Though women is not married to man she was consider to be a property of entire family but she was not getting share out of property of her husband,Only sons could be successor to the property"


 


डॉ आंबेडकरयांनी  हिंदू कोड बिलाविषयी म्हटले होते की...




समाजातल्या वर्गावर्गातली असमानता, स्त्री-पुरुष यांच्यातली असमानता तशीच अस्पर्शित राहू देऊन, आर्थिक समस्यांशी निगडित कायदे संमत करीत जाणे म्हणजे आमच्या संविधानाची चेष्टा करणे आणि शेणाच्या ढिगाऱ्यावर राजमहाल बांधण्यासारखे होय. हिंदू कोड बिलाला मी हे महत्त्व देते. १९४७ पासून सतत ४ वर्षे १ महिना २६ दिवस बाबासाहेबांनी अविरत कष्ट करून हिंदू कोड बिल तयार केले होते. स्त्रियांना कायद्याने हक्क, दर्जा आणि प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे स्वप्न त्यांनी हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून पाहिले.



डॉ. आंबेडकरांनी मांडलेल्या हिंदू कोड बिलाविषयी जाणून घेऊया-

 



 


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आपण ओळखतो ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि दलितांचे कैवारी म्हणूनच. पण त्यांचे कर्तृत्व इतपतच मर्यादित नाही. डॉ. आंबेडकरांनी भारतीय स्त्रियांवर अनेक उपकार करून ठेवले आहेत. भारतीय स्त्रियांच्या जीवनात क्रांतिकारी बदल आणू पाहणा-या हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या कार्याची म्हणावी तशी दखल आपल्या भगिनीवर्गाने घेतलेली नाही.

 





स्वतंत्र भारताचे पहिले कायदे मंत्री म्हणून बाबासाहेबांची इच्छा होती कि तमाम स्त्रियांना या जाचक रूढी आणि परंपरा मधून मुक्त करावे आणि ते आपले कर्तव्य आहे असे समजून त्यांनी हिंदू कोड बिल बनवायला घेतले, १९४७ पासून सतत ४ वर्षे १ महिना २६ दिवस बाबासाहेबांनी अविरत कष्ट करून हिंदू कोड बिल तयार केले होते आणि २४ फेब्रुवारी १९४९ रोजी संसदेत मांडले. स्त्रियांना कायद्याने हक्क, दर्जा आणि प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे स्वप्न त्यांनी हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून पाहिले. हे बिल सात वेगवेगळ्या घटकांशी निगडित कायद्याचे कलमात रूपांतर करू पाहणारे होते. हे सात घटक खालीलप्रमाणे-

 

१. जी व्यक्ती मृत्युपत्र न करता मृत पावली असेल अशा मृत हिंदू व्यक्तीच्या (स्त्री आणि पुरुष दोघांच्याही) मालमत्तेच्या हक्कांबाबत.

 

२. मृताचा वारसदार ठरवण्याचा अधिकार

 

३. पोटगी

 

४. विवाह 


५ . घटस्फोट 


६. दत्तकविधान

 

७. अज्ञानत्व व पालकत्व.




 

हे सातही विषय स्त्रियांच्या दृष्टीने किती महत्त्वाचे आहेत हे वेगळे सांगायला नकोच ! भारतीय संविधान परिषदेने जात, धर्म किंवा लिंगभेद करून मानवप्राण्यात कायदा भेदाभेद करणार नाही, न्यायाच्या तराजूत सर्वांना एकाच मापात तोलले जाईल, अशी घोषणा करून स्वातंत्र्य व समता या तत्त्वांचा अंगीकार केलेला होता. या पार्श्वभूमीवर हिंदू स्त्रियांना त्याचे न्याय्य हक्क देण्यास विरोध झाला, हे अतिशय दुर्दैवी होते. या बिलातील घटस्फोट, द्विभार्या या कलमांना सनातनी मनोवृत्तीच्या विरोधकांनी प्रचंड विरोध केला.

 

या बिल द्वारे बाबासाहेबांनी एक-विवाह पद्धतीला कायदेशीर मान्यता, स्त्रियांना संपती मध्ये समान वाटा आणि सर्व कायदेशीर बाबींमध्ये समान संधीची तरतूद केली होती परंतु कडवे हिंदू नेते आणि विचारवंत यांना स्त्रियांना समान अधिकार देण्याची तयारी नव्हती. "हिंदू धर्मावरील आक्रमण" अशा प्रतिक्रिया देऊन अशा नेत्यांनी प्रखर विरोध केला होता. स्वतःला उदार मतवादी आणि पुरोगामी म्हणउन घेणाऱ्या राजेंद्र प्रसाद, वल्लभ पटेल आणि मदन मोहन मालवीय यांनी त्यांचे खरे रूप दाखऊन RSS शी हात मिळवून बाबासाहेबांना पराकोटीचा विरोध केला होता, ज्या स्त्री साठी बाबासाहेब इतकी मेहनत घेत होते ते बिल पारित होऊ नये म्हणून सरोजिनी नायडू उपोषण करणार होत्या. एक अस्पृश्य व्यक्ती हिंदू धर्मावर भाष्य करतोय म्हणून बरयाच तथाकथित हिंदू समाजाने बाबासाहेबंविषयी घृणास्पद प्रतिक्रिया दिल्या होत्या इतकेच काय बाबासाहेबांविरुद्ध देशद्रोही, हिंदू धर्माचा शत्रू अशा घोषणा देत मोर्चे काढले होते. सामाजिक एकता आणि बांधिलकी धाब्यावर बसउन कॉंग्रेस च्या मदतीने एक अस्पृश्य व्यक्तीमुळे " हिंदू खतरे " असे नाक्रासू हे हिंदू धर्माचे ठेकेदार काढत होते.


 

पिचक्या कण्याचे प्रधानमंत्री सामाजिक दबावाचे राजकारण करण्यात यशस्वी झाले आणि हे बिल संसदेतून बरखास्त करण्यात आले बाबासाहेबांनी त्या वेळच्या असलेल्या प्रबुद्ध वर्गातील लोकांना / प्रसार माध्यमान या बिलाच्या पाठी उभे राहण्यास आवाहन केले परंतु बाबासाहेबांच्या पाठीशी भक्कमपणे कुणी उभे राहू शकले नाही. समाजातील समानतेचे सकारात्मक बदल करण्याची बाबासाहेबांची इच्छा मातीमोल ठरली होती. प्रधानमंत्री नेहरुची कृत्याची बाबासाहेबांना चीड आली आणि दुख हि झाले आणि म्हणून बाबासाहेबांनी त्यांच्या कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला होता.... केवढे ते निस्वार्थी कार्य, केवढी ती महानता होती.

 




सुधारणेच्या युगात स्त्रियांना समान हक्क द्यायला तुम्ही विरोध का करताहात, असा सवाल डॉ. आंबेडकरांनी प्रतिगामी विरोधकांना २० सप्टेंबर १९२१ रोजी केला. हिंदू कोड बिल संमत व्हावे म्हणून बाबासाहेब एकटेच योद्ध्यासारखे लढले. पण दुर्दैवाने सत्र संपताना या बिलाची केवळ ४ कलमेच मंजूर झाली होती. यास्तव अत्यंत दु:खीकष्टी होऊन डॉ. आंबेडकरांनी २७ सप्टेंबर १९५१ रोजी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला. भारतीय स्त्रियांच्या हक्कांसाठी केवढा मोठा त्याग बाबासाहेबांनी केला! डॉ. आंबेडकरांनी हिंदू कोड बिल मंजूर करण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. मात्र डॉ. राजेंद्रप्रसाद, शंकराचार्य, ब्रह्मानंद सरस्वती, स्वामी करपात्री, डॉ. पट्टाभी सीतारामय्या या नेत्यांनी बाबासाहेबांचे प्रयत्न सफल होऊ दिले नाहीत. बाबासाहेबांनी भारतीय संविधान निर्मितीचे ऐतिहासिक कार्य केले आहे. ज्या तत्त्वांचा, मूल्यांचा त्यांनी संविधानात जोरदार पुरस्कार केला त्याच तत्त्वांना मूठमाती देणे त्यांच्यासारख्या विचारी नि विवेकनिष्ठ महापुरुषाला कसे शक्य होईल? म्हणूनच त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचे धाडस दाखवले.



हिंदू कोड बील लोकसभेत मंजूर झाले नाही म्हणून डॉ. बाबासाहेबांनी कायदे मंत्री पदावर लाथ मारून राजीनामा पंतप्रधान नेहरुंच्या तोंडावर फेकल्याचे भारतातील एकमेव उदाहरण आहे. त्याचवेळी हे विधेयक पास झाले असते तर आज भारत आज जगात महासत्ता म्हणून राहिला असता. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व भारतीय महिलांवर जे उपकाराचे कर्ज केले आहे त्याचे व्याज मरेपर्यंत न फिटणारे आहे. याची जाणीव खरचं किती महिलांना आहे ?? हेच मोठ गुढ आहे.



 

पण बाबासाहेबांचे कष्ट निरर्थक ठरले नाहीत. ज्या वारसा कायद्याला विरोध करण्यात आला होता तो बाजूला सारून प्रथम हिंदू विवाह कायदा हाती घेण्यात आला. हिंदू कोड बिलाचे चार वेगवेगळे भाग करून हे चारही कायदे वेगवेगळ्या वेळी नेहरूंनी मंजूर करून घेतले. १९५५-५६ मध्ये मंजूर झालेले चार हिंदू कायदे म्हणजे-

 

१) हिंदू विवाह कायदा.

 

२) हिंदू वारसाहक्क कायदा

 

३) हिंदू अज्ञान व पालकत्व कायदा

 

४) हिंदू दत्तक व पोटगी कायदा.

 



हे कायदे मंजूर होणे म्हणजे कायद्याच्या इतिहासातली एक क्रांतिकारक घटना होय. या कायद्यांनी भारतीय स्त्रियांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडण्यास सुरुवात झाली. या कायद्यांनी स्त्री-पुरुषांच्या दर्जात कायद्याने समानता प्रस्थापित केली.


 



बाबासाहेबांशी वैचारिक मतभेद असलेले आचार्य अत्रे म्हणतात…




 

आंबेडकरांचे ‘हिंदू कोड बिल’ जर मान्य झाले असते, तर हिंदु समाजातील सर्व भेद, अन्याय आणि विषमता नष्ट होऊन हिंदु समाज हा अत्यंत तेजस्वी आणि बलशाली झाला असता. आणि भारताच्या पाच हजार वर्षांच्या इतिहासात जी क्रांती आजपर्यंत कुणी घडवून आणली नाही ती घडून आली असती. पण दुदैव भारताचे! दुर्भांग्य हिंदुसमाजाचे! देवासारखा आंबेडकरांनी पुढे केलेला हात त्यांनी झिडकारला आणि स्वतःचा घात करुन घेतला. राजकर्त्यांनी बहिष्कारले, हिंदु समाजाने लाथाडले, तेव्हा अखेर स्वतःचा आणि आपल्या सात कोटी असहाय नि हीनदीन अनुयायांचा उध्दार करण्यासाठी त्यांना मानवजातीला संमतेचा, दयेचा आणि शांतीचा संदेश देणाऱ्या त्या परम कारुणिक भगवान बुध्दाला शरण जाण्यांवाचून गत्यंतर उरले नाही.

 

- आचार्य अत्रे.





डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व भारतीय महिलांवर जे उपकाराचे कर्ज केले आहे त्याचे व्याज मरेपर्यंत न फिटणारे आहे. यांची जाणीव खरचं किती महिलांना आहे?? हेच मोठ गुढ आहे असो... डॉ बाबासाहेब आंबेडकर भारताचे सगळ्यांत महान पुरुष आहे आणि राहतील !!

 


"अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकारा अंतर्गत... जनहितार्थ"




धन्यवाद- अमोल गायकवाड.



संदर्भ- समस्त भारतीय महिलांचे उद्धारकर्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर... त्यांनी तयार केलेल्या हिंदु कोड बिल या कायद्याचा ABP NEWS या वृत्तवाहिनीचा विशेष भाग नक्की बघाचं-  http://youtu.be/u3McPRRXhm8



लेखं संपादन- निलेश रजनी भास्कर कळसकर.

39 comments:

  1. खूप छान माहिती आपण सर्वांपर्यंत पोहचवली आहे.
    पुढील कार्यास शुभेच्छा....

    ReplyDelete
  2. या लेखामध्ये नेहरूंजी विषयी एक नकारात्मक भावना दिसून येते पण नेहरू जर या बिलाच्या विरोधात असते तर नंतर त्यांनी तुकड्या तुकड्यात का होईना पण हे बिल संमत केलेच नसते.बाबासाहेब एके ठिकाणी काँग्रेस ही एक धर्मशाळा आहे असे संबोधतात कारण काँग्रेसमध्ये डाव्या, उजव्या विचाराचे पुरोगामी प्रतिगामी धर्मनिरपेक्ष धर्माधं असे सर्व प्रकारचे लोक होते त्यामुळे सरकार आणि पक्षाचा प्रमुख म्हणून नेहरूजीनां समन्वयवादी भूमिका आणि आस्तेकदम धोरण स्वीकारणे आवश्यक होते.

    ReplyDelete
    Replies
    1. Vishal patange ji I am agree with you.If neharu was arthodox by nature, Indra wasn't so forward and bold

      Delete
  3. खूप छान माहिती........................Namo Budhdhay

    ReplyDelete
  4. खूप छान माहिती........................Namo Budhdhay

    ReplyDelete
  5. खूप छान या माहितीने आम्हाला अजून एक बाबासाहेब कळाले आभारी आहोत जय भिम

    ReplyDelete
  6. खूप छान माहिती

    ReplyDelete
  7. किती भंपकपणा लेखकाचा. कीव येते राव तुम्हा नवबौद्धांची !आंबेडकरांच्या नावाखाली आपला सुर्त ब्रामणद्वेष सतत ओकत राहणे ! तसंही तुम्हाला काय काम?

    वर लेखांत वेदांतले जे संदर्भ दिलेले आहेत ते इतके खोटे नि मनगढन्त आहेत की ते बघून तुनच्या वैचारिकदिवाळखोरीची मजा येते. असो.

    आता खालील संदर्भ वाचा नीट.

    स्त्रियांचा द्वेष काही प्रमाणांत खालील वाक्यांवरूनही सिद्ध होतो. पण ह्यांविषयी कुणीही कधीच काही बोलणार नाही.

    हे बघा बुद्धाचे स्त्रियांविषयीचे विचार 👇😷😷😷



    आता ह्यांचा लाडका बुद्ध तो स्त्रियांविषयी काय म्हणतो ते वाचा.

    👇👇👇


    भगवान गौतम बुद्ध हे स्त्रीला धर्मक्षेत्रातली कीड म्हणतात ! पुरावा घ्या ! चुल्लवग्ग - विनयपिटक - १०.०१.०३



    बुद्ध तर स्त्रीला संबुद्ध स्थिती प्राप्त होतच नाही असे स्पष्ट लिहिलंय. तिला मोक्षाचा अधिकारच नाही असे ते म्हणतात.



    "भिक्षुंनो, ज्याच्या हाती तलवार असेल त्याच्याशी बोला, पिशाच्चाबरोबर बोला, विषारी सापाबरोबर बसा, परंतु भिक्षुंनो एकट्या स्त्रीशी कधीही एकांतात गप्पा मारु नयेत"

    अंगुत्तरनिकाय - पांचवा निपात, विवरणवग्गो, मातापुत्तसुत्त ५.६.५


    "आनंदा, स्त्री वर्ग हा संतापी,इर्षाळु, मुर्ख, मत्सरी, बुद्धीहीन असतो."

    अंगुत्तरनिकाय - चक्कुतनिपाद


    "भिक्षुणीने भिक्षुला कधीही उपदेश, सल्लावजा सुचना करता कामा नये, पण भिक्षु तिला तसे करु शकतो."
    अंगुत्तरनिकाय - आठवा निपात, गौतमीवग्गो, गौतमीसुक्त !


    "स्त्रिया ह्या कधीच संबुद्ध होऊ शकत नाहीत.याची कणभरही शक्यता नाही. पुरुष मात्र संबुद्ध होऊ शकतो."

    अंगुत्तरनिकाय - एककनिपात, असंभव वग्ग, द्वितीयवर्ग १.१५.१

    "स्त्री कधीही चक्रवर्ती राजा बनण्याची कणभरही शक्यता नाही. पुरुष मात्र ते बनु शकतो .."

    तत्रैव ....


    घ्या बुद्धाचे स्त्रियांविषयीचे विचार !

    ReplyDelete
    Replies
    1. तुकारामजी चांगली माहिती दिली.परंतु बुध्दाच्या काळात लिपी नव्हती म्हणून त्यांची वचने जसे होईल तशी पाठ करुन ठेवली व नंतर लिहिण्याचा प्रयत्न झाला.वेदांचेही असेच आहे.धम्म संगिनी भरवून बुध्दाच्या नावावर जी खोटी वचने आहेत ती खपवली जात होती.बौद्ध धर्माला राजाश्रय असल्याने अनेक भोंदू बौद्ध धर्मात शिरले होते त्याचा हा प्रकार आहे.

      Delete
    2. Ass ast tr aaj hindu darm budh darma peksha jast pasarla asta. manache shlok sagu naka aani khoti mahaiti deu naka

      Delete
  8. बाबासाहेबांविषयी नितांत आदर तर आहेच. मी समग्र बाबासाहेब वाचले आहेत. पण तुमच्यासारखे स्वयंघोषित लोक मात्र सोयीस्कर तेवढं उचलून फक्त शिव्या घालण्यापूरते शहाणे.

    खोटं बोलायचे व तेही रेटून बोलायचं. व झाकून ठेवायचं ती गोष्ट तर वेगळीच. ह्याच हिंदु कोड बिलासाठी बाबासाहेबांनी मनुस्मृतीचाच आधार घेतला होता हे जगजाहीरय. बाबासाहेबांचे समग्र इंग्रजी वांग्मय खंड १४ जो दोन भागात आहे त्यात त्यांनी हा उल्लेख स्पष्टपणे केलाय. पण तुम्ही तो सोयीनुसार दडपणार. इतकंच काय तर ह्याच खंडाच्यावितीय भागांत आर्य समाजी विद्वान पंडित धर्मदेव विद्यामार्तंड ह्यांची लेखमाला आहे ज्यासाठी बाबासाहेबांनी त्यांस ५,००० रुपये त्याकाशी दिले होत् असे सोहनलाल शास्त्रींनी लिहून ठेवलंय.

    ते मात्र लपवून ठेवताहोय? किती रे भंपकपणा?

    ReplyDelete
    Replies
    1. Manusmruti cha adhar ghetla karan babasaheb he saglya ch vishyacha abhyas krun apl likhan krt hote ani manusmrutit stri hi sarvat bhrasht sangitli aahe te kahi khote nahi .

      Delete
  9. तुकाराम जी त्रिपिटक ही बुद्धाच्या महापरिनिर्वानानन्तर लहिल्या गेली होती। त्या काळी बौध्द भिक्खूंना जे बुढाचे वचन कंठस्थ होते,ते त्यांनी नन्तर लिहिन्याचा रुपात उतरविले होते। पण जरूरी नाही की त्यांनी बुद्धाचे वचन जसे च्या तसे उतरविले असेल। या करिताच बुद्धाने आधीच म्हटले होते की, तर्काच्या कसोटिवर खरे उत्तरल्याशिवाय कोणतेही ज्ञान स्वीकारु नका। म्हणून बाबासाहेब यांनी बौध्द धर्म ग्रंथातिल तोच भाग स्वीकारला जो बाबासाहेब यांच्या तर्काला खरा वाटला।

    म्हणुब तुम्ही दिलेल्या पुराव्यात काहीही अर्थ राहत नाही।

    ReplyDelete
  10. बाबासाहेब प्रज्ञावान होतेच यात शंका नाही. म्हणुनच तर घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष त्यांना बनवले. स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री त्यांना बनवले. त्यांना भारतरत्न दिला. तरीही नेहमीच गांधी नेहरू काँग्रेस यांना दोष देत राहाणे योग्य नाही. सरकार चालवत असताना सर्वकाही आपल्या मनासारखे होतेच असे नाही. शेवटी ते राजकारण आहे.
    मात्र एवढे नक्की की बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला बदल टप्प्याटप्प्याने का होईना नेहरूंनी काँग्रेसने केला आहे हे मान्य करायला हवे.

    ReplyDelete
  11. खूप छान या माहितीने आम्हाला अजून एक बाबासाहेब कळाले आभारी आहोत जय भिम

    ReplyDelete
  12. Khupch marmik ani mahtwachi mahiti dilit...striya na hi mahitich nahi..tymule khup andharat thevlay smajane babasahebana...striyana mahiti vhayla havi ki he Babasaheb hech khare shilpkar ahet...!

    ReplyDelete
  13. खूप छान माहिती। जय भीम

    ReplyDelete
  14. खूप छान माहिती आहे.परंतु आता एकमेकांवर दोष देण्यात वेळ घालविण्यापेक्षा डॉ.बाबासाहेबांचे विचार सर्व समाजात जाणे गरजेचे आहे.सर्वांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणे गरजेचे आहे.

    ReplyDelete
  15. खुप छान. बाबासाहेब आंबेडकरांनी जे हिंदू कोड बिल हिंदू महिला साठी एवढे कष्ट करून लिहिले याची जाणीव महिलांनाही असावी.महिला कोणत्याही धर्माच्या असोत त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा आदर करायला पाहिजे.
    जयभीम

    ReplyDelete
  16. खुप छान माहिती. हे ही तितकेच खरे आहे की बाबासाहेबांनी मांडलेले बील लगेच पास झाले असते तर आज भारत महासत्ता देश म्हणून ओळखला गेला असता.

    ReplyDelete
  17. यह एक अच्छी जानकारी है

    ReplyDelete
  18. Bhodh darmat moksh kutehi nahi aani goutam budhani banavlelya saghat strila pravesh hota ya agodar ass tevha kadich ghadal navt. var eka murkhani dilelya mahitala kahich arth nahi

    ReplyDelete
  19. Kharch babasahebanche karya anmol ahe

    ReplyDelete
  20. Fule-Shahu-Ambedkar karya mahan ahe. Khup Mahan Ahe. We can't imagine how were they faced challenges at that time.. Pan Apan samjane na 21 vya shatkat sudhha jat-Pat ajun dokyat gheun basloy. Mi personally tar jat-pat manat nahi.. Vyakti che vichar baghto Ani tharvato kharach ti vyakti mahan ahe ka nahi... V4 Uchha astil tarach Manus Uchha.,

    ReplyDelete
  21. मला गर्व च नाही तर माज आहे जय भीम वाला असल्याचा ......जय भीम

    ReplyDelete
  22. लिखाणातील कांही गोष्टी न पटण्यासारख्या आहेत

    ReplyDelete
  23. Khup chan lekh lihila ahe tyamule khup gosti mahit zalya. Thank you

    ReplyDelete
  24. खूप खूप खूपच छान माहिती दिली तुम्ही. त्या बद्दल मनापासून हार्दिक शुभेच्छा तुम्हांला.

    ReplyDelete
  25. मला कोणी माहिती देईल का कि,आंबेडकर ह्यांचे हिंदू कोड बिल हे फक्त हिंदू वर्गा साठी होते कि सर्व जाती धर्मातील लोकांकरिता लागू होते ?

    ReplyDelete
  26. मला कोणी माहिती देईल का कि,आंबेडकर ह्यांचे हिंदू कोड बिल हे फक्त हिंदू वर्गा साठी होते कि सर्व जाती धर्मातील लोकांकरिता लागू होते ?

    ReplyDelete

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...