आरक्षण आणी छरत्रपती शाहू महाराज !!

आरक्षण आणी छत्रपती शाहू महाराज !!

 

 






मागासलेल्या लोकांना सवलती देण्यामागे छत्रपती शाहू महाराजांचा कोणता दृष्टीकोन होता ? केवळ तात्विक नाही? एका मित्राने त्यांना हा प्रश्न विचारला होता उत्तर देण्याऐवजी महाराज त्यांना घोड्याच्या पागेत घेऊन गेले. तिथे त्यांनी चंदी आणण्यास सांगून सर्व जमीनभर पसरून टाकली.त्याबरोबर सशक्त तल्लख घोडी पुढे धावत आली व त्यांनी सर्व हरभरे फस्त केले. लुळी पांगळी अशक्त घोडी मागेच राहिली. त्यांना काही मिळाले नाही. हे प्रत्यक्ष उदाहरण दाखवून महाराज आपल्या मित्राला म्हणाले, जी हुशार सशक्त घोडी होती तिनेच सर्व हरभरे फस्त केले आणि गरीब बिचारी उपाशी राहिली. यासाठी त्यांना तोबऱ्यातून चारावे लागते. त्याच प्रमाणे मागासलेल्या समाजाला पुढे आणण्यासाठी जादा सवलती नको का द्यायला ???



 


हि व्यावहारिक भूमिका आजही समाजाला पटवून देण्याची आवश्यकता संपलेली नाही मागासलेल्या समाजाला द्यावयाच्या सोयी, सवलती हा महाराजांचा वात्सल्याचा एक भाग होता. पित्याला आपली सारी मुले सारखीच. पण त्यातही अशक्त, दुबळ्या मुलाकडे तो विशेष लक्ष देतो; आणि सशक्तांनी अन्याय करू नये म्हणून जरब लावतो, असे दृश्य येथे दिसते. त्याच बरोबर अशक्तांनी सशक्त व्हावे आणि मग बरोबरीच्या नात्याने वागावे, लढावे यावरही त्यांचा कटाक्ष होता. आपल्यात पात्रता न आणता फुकट श्रीमंत व्हावे अशी इच्छा बाळगणाऱ्या ऐतखाऊ लोकांची पिढी त्यांना निर्माण करायची नव्हती. आपल्या प्रजेला जीवनाच्या झगड्यासाठी लागणारी शक्ती, प्रेरणा देणे हे क्रांतिसूर्य जोतीराव फुले यांचे धोरण व जे पुढे बोधिसत्व बाबासाहेबांनी आपल्या चळवळीत ठेवले होते तेच धोरण महाराजांनी आपल्या जीवनात उतरविले होते. ते राजे होते या नात्याने त्यांना काही सत्ता आणि अधिकार जरूर होते व ते त्यांनी यशस्वीरीत्या वापरले.



 


अनेक समाजसुधारकांनाही समाज जागृत नसल्याने समाजाशी झगडण्यात वैचारिक पातळीवर भर द्यावा लागतो. परिवर्तनाला, मतपरिवर्तनाला अतिरिक्त महत्व द्यावे लागते. नाहीतर क्रांतिसूर्य जोतीराव फुले, बोधिसत्व बाबासाहेब यांच्या प्रमाणे आपल्या ऐन उमेदीची वर्षे लोकांच्या विरोधाची धार बोथट करण्यात व्यर्थ घालवावी लागतात. राजा हा जनतेचा विश्वस्थ असून जनतेच्या वतीने राज्य करत असतो. आणि याच भावनेने त्यांनी राज्य केले. सत्तेला चिकटून राहणे हे त्यांचे उद्धिष्ट नव्हते.  शाहू महाराजानी एके ठिकाणी म्हटले आहे "माझ्या प्रजेची योग्यता वाढवून त्यांच्या हाती सर्व अधिकार सोपवून माझ्या खर्चापुरती ठराविक रक्कम पेन्शन दाखल घेऊन मी केव्हा मोकळा होईन असे मला झाले आहे. लोकांनी स्वमतानुसार राज्यकारभार करावा हि लोकशाहीची कल्पना त्यांना अभिप्रेत होती. आणि लोकशाहीचा मूलाधार म्हणजेच लोकशिक्षण हे त्यांनी ओळखले होते. आपल्या भारताची लोकशाहीवर आधारलेली घटना ज्या नरोत्तमाने बनविली तिचे बीज महाराजांच्या वरील विचारात दिसून येते.




लेखं- Vivek Ghatavilkar.


No comments:

Post a Comment

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...