मागास प्रवर्ग युवक/ युवतींना मोटार वाहन चालक/ वाहक (कंडक्टर) प्रशिक्षणासाठी पाठविणे !!

मागास प्रवर्ग युवक/ युवतींना मोटार वाहन चालक/ वाहक (कंडक्टर)  प्रशिक्षणासाठी पाठविणे !!






 

सरकारी जीआर-

  
विजाभ-२००८/ प्र.क्र.२१३/मावक-३,दिनांक२३जुलै, २००९
 
विजाभ-२००८/प्र.क्र.२१३/मावक-३,दिनांक ३० जुलै,२००९

  
 

योजनेचा उद्देश्य-

  
बेरोजगारांना स्वयंरोजगारांच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी एक भाग म्हणून राज्यातील अनुसूचित जाती, नवबौध्द तसेच अनुसूचित जमातीच्या तरूण/ तरूणींना वाहन चालक वाहन प्रशिक्षण देण्याचा निर्णय शासन निर्णय दि ४.२.२००८ नुसार घेण्यात आलेला आहे. त्या धर्तीवर विमुक्त जाती, भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्गाच्या तरूण/ तरूणींना सदरची योजना वरील शासन निर्णयानुसार सन २००९-१० पासून लागू करण्यात आलेली आहे.

  
 

योजनेचा अटी-


  
१) लाभार्थी विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील असावा.

  
२) हलके वाहन चालक प्रशिक्षणासाठी लाभार्थाचे शैक्षणिक पात्रता किमान इ ८ वी पास असावी.

  
३) अवजड मोटार वाहन चालक प्रशिक्षणासाठी शैक्षणिक पात्रता किमान इ ८ वी पास असावी.

  
४) वाहक (कंडक्टर) प्रशिक्षणासाठी लाभार्थाचे शैक्षणिक पात्रता किमान इ १० वी पास असावी.

  
 


लाभार्थीचे लाभाचे स्वरूप-

 

१ प्रशिक्षणाचा प्रकार - हलके मोटार वाहन चालक प्रशिक्षण , प्रशिक्षण कालावधी - ४० दिवस  ,  मंजूर दर रु.३५२०/-
  
 

२ प्रशिक्षणाचा प्रकार - अवजड मोटार वाहन चालक प्रशिक्षण , प्रशिक्षण कालावधी - ४० दिवस , मंजूर दर रु.४१००/-
  
 

३ प्रशिक्षणाचा प्रकार - वाहक (कंडक्टर) प्रशिक्षण , प्रशिक्षण कालावधी - ८ दिवस ,  मंजूर दर रु.१६४५/-

  
 

प्रशिक्षण कालावधी प्रशिक्षण केंद्राच्या मुख्यालयाच्या ठिकाणी राहणारे स्थानिक प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण केंद्राच्या मुख्याल्याचा ठिकाणी राहणारे स्थानिक प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण संस्थेचा वसतिगृहात राहत नसल्यास मोटार वाहन चालक प्रशिक्षणार्थी रु.३००/- वाहक प्रशिक्षणार्थीस रु.१५०/- प्रशिक्षण काळात विद्यावेतन दिले जाते.

  
 

सदरची योजना राज्यामध्ये मे. रमेश मोटार ड्राईव्हिंग स्कूल जळगांव यांच्यामार्फत राबविली जाते.
  
 

 

संपर्क:- विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी (संबंधित जिल्हा)



धन्यवाद- महाराष्ट्र सरकार समाजकल्याण विभाग.




तुमचाच मित्र- निलेश रजनी भास्कर कळसकर(सोबत प्रबोधन टीम)

https://www.facebook.com/nilesh.kalaskar2?ref=tn_tnmn

No comments:

Post a Comment

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...