समाज परिवर्तनासाठी धाडसी निर्णय !!

समाज परिवर्तनासाठी धाडसी निर्णय !!

 






माढा ता. मराठा सेवा संघाचे ता.उपाध्यक्ष शिवश्री दिनेश जगदाळे यांचे वडिल दादासो जगदाळे याचे दि. ५ सप्टेंबर रोजी निधन झाले. शिवधर्माच्या आचरणाचा भाग म्हणून... काल दि. ७ रोजी सर्व कर्मकांडाना फाटा देवून तिसर्या दिवशी सुतक फेडले... आपल्या वडिलाच्या हाडांची राख शिवश्री दिनेश जगदाळे जी नी आपल्या स्वतःच्या शेतात विसर्जित केली. वडीलांची आठवण म्हणुन आपल्या घराच्या अंगणात घरातील सदस्यांनी नविन पाच फळांची झाडे लावली. जगदाळे बंधूचा हा धाडसी निर्णय निश्चितच मराठा सेवा संघाच्या पदाधिकार्याना अन्  समाज परिवर्तनवादी मार्गदर्शक ठरेल.


 

शिवश्री दिनेश जगदाळे यांनी सांगितले... राखं नदीत टाकल्यामुळे नदी प्रदूषण होते... तर मी त्याऐवजी राखं खड्डयात टाकून त्यात झाड लावले या उपक्रमामुळे नदी प्रदूषणही थांबते व वृक्षसंवर्धनही होते... आपल्या पूर्वजांची स्मृती म्हणून ती रोपे मनापासून जोपासली जातात... खरचं मनाला... समाजाला उन्नत करणाऱ्या या उपक्रमाला मानवता धर्माची आज गरज आहे.

 



अजून आपण फोटोत बघू शकतात... ज्या स्त्रियांना इथल्या पुरुषसत्ताक व्यवस्थेने... मनुस्मृतीने मुलभूत अधिकार नाकारले त्या स्त्रियांनीच रक्षा हातात घेऊन जमिनीत रोपे लावली...


 

शिवश्री दिनेश जगदाळे जी.... संपूर्ण महाराष्ट्र मराठा सेवा संघ/संभाजी ब्रिगेड/ वीर भगतसिंग विद्यार्थी परीषद, डॉ.पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद / भारत मुक्ती मोर्चा/ मुस्लीम ब्रिगेड आणी प्रबोधन.. समाज परिवर्तन घडू आणणारे तरुण-तरुणी त्यांच्या दुःखात सहभागी आहे.


 


नोट- आम्ही कोणत्याही संघटनेत काम करत नाही... त्यामुळे वाचकांनी आपल्या पेज अथवा पेजप्रमुखाबद्दल गैरसमज करू नये... जे चागलां समाजउपयोगी निर्णय घेतात त्या सर्व परिवर्तनवादी लोकांच्या मागे आमचे "प्रबोधन टीम" आहे. आम्ही वाईट ला वाईट म्हणत असतो आणी चांगल्या गोष्टीचे आवर्जुन कौतुक देखील करत असतो.


 



शिवश्री दिनेश जगदाळे जी....  आपल्या धाडसी निर्णयाला आमच्या 'प्रबोधन' परिवाराकडून  सलाम  !!



लेखं- सुनील चौधरी सर.

No comments:

Post a Comment

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...