"पंढरीचा पांडुरंग म्हणजे भगवान बुद्धाचेच प्रतिक होय !!"

पंढरीचा पांडुरंग म्हणजे भगवान बुद्धाचेच प्रतिक होय !!


 


तथागत बुद्धाला वैष्णव धर्मात महत्वाचे स्थान आहे. बुद्धाच्या विचारांचा एकेकाळी संपूर्णतः बौद्धमय असणार्या भारतात इतका प्रचंड प्रभाव होता कि, तो संपवताना नाकी नऊ आलेल्या सनातन्यांना त्याला अखेर विष्णूंचा एक अवतार म्हणून त्याची स्तुती गावी लागली. अर्थात बुद्धाने स्वत:हा आपण कधीच देव व देवाचा प्रेषित असल्याचे सांगितले नाही. त्याचा देव व अवतार या संकल्पनांनाच कडाडून विरोध होता हे सर्वश्रुत आहेच. परंतु बुद्धाला वैष्णवांनी आपलेसे करण्यामुळे बौद्ध तत्वज्ञान माणसांच्या आचरणातून हद्दपार होण्यास फार मदत झाली, कारण त्याला आता आत्मा, देव, पुनर्जन्म याची एक किनार लाभली होती.
 


पंढरीचा विठू हा मुळात एक बोधिसत्व असतानाही तो वैष्णवांचा ठेवा मानला गेला. वारकरी संप्रदाय उदयास आला, त्यात विठूला स्थान मिळाले पण बुद्ध मात्र मागे पडत गेला. विठूच्या माध्यमात ठेवला गेलेला बुद्ध मात्र त्यांस दिसला नाही. असे असले तरी आपल्या बऱ्याच संतांना तो दिसला होता. संत श्री तुकाराम, संत नामदेव, संत कुंभार, संत जनाबाई , संत बहिणाबाई इ. संतांना तो पंढरीच्या पांडुरगांत दिसत होता त्यांनी अभ्यासांती त्याला ओळखले होते. त्यांनी विठूच्याअतिल बुद्ध लोकांपर्यंत पोहोचवण्यास सुरुवातही केली होती. त्यापैकी एक...


संत एकनाथ महाराज आपल्या अभंगात म्हणतात...

 



लोक देखोनि उन्मत दारांनी आसका |
न बोले बौद्ध रूपे ठेविले जधनी हात ||
नववा वेसे स्थिर रूप तथा नाम बौद्ध रूप |
संत तया दारी! निष्ठान्टती निरंतरी ||


 


संत नामदेव, तुकोबांनाही तो बुद्धच वाटतो...

 



बौद्ध अवतार माझिया उदृष्ट | मौन मुखे निष्टा धरियेली ||
मध्ये झाले मौन देव बीज ध्यानी | बौद्ध ते म्हणोनी नावे रूप ||

 



तुकोबाच्या शिष्यां संत बहिणाबाई आपल्या अभंगात म्हणतात...





कलयुगी बौध्द रुप धरी हरी । तुकोबा शरीर प्रकटला ।।


संत बहिणाबाई म्हणतात सध्याच्या युगात संत तुकोबारायाच्या शरीरात बुध्दाने प्रवेश केला आहे.  म्हणजेच संत तुकोबा हे बुध्दांच्याच विचारांचे पाईक होते. त्यांच्या वाणीतून बौध्द विचारधारा प्रकट होत होती.




संत नामदेव म्हणतात...

 



"धर्म लोपला अधर्म जाहला हे तू न पाहसी |
या लागी बौद्ध रूपे पंढरी नांदसी ||"

 

संत नामदेव बौद्ध अवतरावीशयी आपले विचार मांडतात...


 गोकुळी अवतारू सोळा सहस्त्रावरू ।
आपण योगेश्वरु बौद्ध रुपी ॥
व्रतभंगासाठी बौद्ध अवतार ।
झाला दिगंबर अवनिये ।
ऐसा कष्टी होऊनी बौद्ध राहिलासी ॥


संत नामदेवांची शिष्या जनाई म्हणतात- 




होऊनिया कृष्ण कंस वधियेला । आता बुद्ध झाला सखा माझा ॥



विठ्ठलाला उद्देशून रचलेला जनाईचा अभंग विठ्ठल व भगवान बुद्ध यांच्यातील एकत्व दर्शविते.



संत चोखामेळा आपल्या एका अभंगात म्हणतात....



क्रमक्रोध वैरी |  त्याची दवडावे बाहेरी ||

आशा तृष्णा वासना थोरी | पीडिती हरी सर्वदा ||
 



आशा, तृष्णा, वासना हे दु:खाचे मुळ कारण आहे. हे चोखोबांना सांगणारा हरी बुद्धाशिवाय दुसरा कुणी असू शकेल काय..?? अनेक संतांच्या अभंगात बुद्धतत्वज्ञानाची फार मोठी भरमार पाहायला मिळते.

 


आता जर विठ्ठलाची पारंपारिक नावे पाहू.....
 



पद्मपुराणातील विट्ठलावरील एक श्लोक पाहू-
 



"विदा ज्ञानेन ठान शून्यान लाती गृव्हाती च स्वायम |
तस्मात विठ्ठल म नामात्वाम, धायास्व मुनीश्वर ||


 


विठ्ठल म्हणजे विदा = म्हणजे ज्ञानाने, ठान= म्हणजे अडाणी लोकांना, पतितांना, अपराध्यांना, लाती म्हणजे जवळ करतो. आपल्या असीम ज्ञानाने अगदी अडाणी लोकांपासून ते अंगुलीमाल सारख्या अपराधी डाकुलाही जवळ करणारा विठ्ठल बुद्ध नाही तर आणि कोण असू शकेल काय..??

 


आता पंढरी या शब्दाकडे आपण वळू...


"पंढरीचे विठ्ठल मंदिर हे प्राचीन बुद्ध विहार आहे. "पंढरपूरचे विठ्ठल मंदिर बौद्ध विहार असल्याची साक्ष देते. मंदिराच्या सभामंडपात दगडी खांबावर ध्यानस्थ बुद्धाच्या कोरीव मूर्ती आढळतात. पंढरी हा शब्द पंडूहरी या शब्दाचा अपभ्रंश आहे. पंडू किंवा पांडू म्हणे दु:खः आणि हरी म्हणजे हरण करणारा.  तसेच पुंडलिक हा हरिक शब्दाचा अपभ्रंश होऊन तो अलिक असा झाला. याचा अर्थ देखील दु:खाचे हरण करणारा असे होतो. दुख निवारणावर जगात सर्व प्रथम तोड सांगणारा बुद्धाशिवाय दुसरा कोण असू शकतो काय..??
 



भगवान पांडुरंग जर बुद्ध आहेत तर, मग रुक्मिणी देवी कोण??


पंढरीत पांडूरंगाचे मंदीर व रुक्मिणी मंदीर पृथक पृथक आहेत. दुसरे मंदीर बांधून व नंतर पुंडलिकाची काल्पनिक कहाणी रचून हा खरा इतिहास आहे. असे लोकांच्या मनावर ठसवण्यात आला आहे. त्यावेळेस समाज हा ब्राम्हणाखेरीज अज्ञान होता. रुक्मिणी ही कृष्णाची नामधारी बायको होती... जर पांडूरंग वैष्णव आहे तर रुक्मिनी पांडूरंगा सोबत का आहे ? ती तर कृष्णाची बायको आहे.
 



आता पांडुरंग पाहू....


पालीभाषेत पांडुरंग या शब्दाचा अर्थ 'पांढरे कमळ' असा होतो. म्हणजे ज्याने पांढरे कमळ धारण केले आहे असा तो. बौद्ध वांगमयत पांढर्या कमळाला अनन्य साधारण महत्व आहे हे बौद्ध अभ्यासकांना ठाऊकच आहे. आणि याला सबल पुरावा म्हणजे अजंठा येथील बुद्ध लेणी. या लेणीत एक चित्र पद्मपाणी बुद्धाचे आहे, ज्याने पांढरे कमळ हाती घेतले आहे. या मूर्तीशी पंढरीच्या विठ्ठलाची मूर्ती खूप मेळ खाते. त्याच्या चेहऱ्याशी पद्मपाणी बुद्धाचा चेहरा पूर्णपणे मेळ खातो यापेक्षा अधिक भक्कम पुरावा तो कोणता असावा..??

 


बुद्धाची पहिली ध्म्मसभा आषाढी पौर्णिमेला झाली होती. पुढे भीक्खू संघाची स्थापना झाली. दरवर्षी याच काळात भिक्खू वर्षावास मानतात. या वर्षावसाला आषाढी पौर्णिमेपासून सुरुवात होते, याच काळात पंढरपुरात देखील पांडुरंगाची मोठी यात्रा भरते हा निव्वळ योगायोग नव्हे.

 


डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या अनेक भाषणांतून हेच म्हणत आलेत ते म्हणतात...




"पंढरपुरची मूर्ती वास्तवात बुद्ध मुर्तीही आहे. यावर मी एक प्रबंध लिहित आहे. जो कि पुण्याच्या संशोधन मंडळापुढे वाचला जाईल. पांडुरंग हा शब्द पुंडरीक या शब्दापासून उत्पन्न झालेला आहे. पांढर्या कमळास पाली भाषेत पांडुरंग म्हणतात, याचा अर्थ पांडुरंग दूसरा तिसरा कुणी नसून बुद्ध आहे"


"Who is Pandurang" हा शोध निबंध बाबासाहेबांनी मार्च १९५५ मध्ये लोणावळा येथे लिहावयास घेतला होता. विषय प्रवेश त्यांनी लिहिला होता. हे हस्तलिखित आजही पि. ई. सोसायटीच्या संग्रहात उपलब्ध आहे.


 

ह.भ.प.नितिन पिसाळ,किर्तनकार देखील सांगतात...

 

पांडुरंग हा बौध्दच आहे.
 


 


श्री. एस.आर. कुलकर्णी यांनी मराठी संत व कवींची सह्त्य समीक्षा केली आहे. ते म्हणतात...

  
"मंदिरातील खांबांवर ध्यानी बुद्धाच्या आकृत्या आहेत.हे दुसरे तिसरे काही नसून बुद्धाचे प्राचीन विहार आहे."
 



सुप्रसिद्ध पाश्चात्य पंडित जॉन विल्सन आपल्या " मेमोयार ऑन दि केव्ह टेंपल " ह्या ग्रंथात म्हणतात...



"पंढरीचे विठ्ठल मंदिर हे प्राचीन बुद्ध विहार आहे." पंढरपूरचे विठ्ठल मंदिर बौद्ध विहार असल्याची साक्ष देतो. मंदिराच्या सभामंडपात दगडी खांबावर ध्यानस्थ बुद्धाच्या कोरीव मूर्ती आढळतात. जेंव्हा कोणताही मनुष्य वारकरी संप्रदायात प्रवेश करतो तेंव्हा त्याला १)मी प्राण्यांची हिंसा करणार नाही. २)मी चोरी करणार नाही. ३)मी व्यभिचार किंवा परस्त्रीगमन करणार नाही. ४) मी खोटे बोलणार नाही. 5)मी दारू पिणार नाही; अशी शपथ घ्यावी लागते. हि शपथच तर बौद्धांचे पंचशील किंवा सदाचरणाचे पाच नियम आहेत .बुद्ध धम्माप्रवेश करताना हीच शपथ सर्वप्रथम घ्यावी लागते. त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायातील लोक निदान पंढरपूर पुरते तरी जातीचे बंधन म्हणजे उच्चनीच भेदभाव व स्पृश्यास्पृश्य भेद मानीत नाहीत. जातीभेद नष्ट करणे हा तथागतांच्या शिकवणीचा एक महत्वाचा भाग आहे.



पंढरपूरची यात्रा आषाढी पौर्णिमेला भरते. बुद्धधम्मात आषाढी पौणिमेला जास्त महत्व दिले जाते, कारण त्या दिवशी तथागतांनी पंचवर्गीय भिक्खुंना आपले पहिले प्रवचन देऊन धर्मचक्रप्रवर्तन केले. बुधवारच्या दिवशी पंढरपूर सोडू नये असे म्हणतात. बुद्धाचा आणि पंढरपूरचा संबंध असल्याशिवाय अशी प्रथा पडणे शक्य नाही. विठ्ठल पितांबरधारी आहे म्हणजे पिवळे वस्त्र धारण करणारा आहे. बौध्द भिक्खुंसाठी आणि स्वतःसाठी पिवळे वस्त्र धारण करण्याचा नियम तथागतांनी केला होता .




बुद्ध विष्णूच्या अवताराचं प्रश्न  विष्णूचे चोविस वतार आहेत त्यापैकी फक्त दहाच वतारांना महत्व आहे. तसेच विष्णूचे सहस्र नावे आहेत. त्या चोविस वतारात व सहस्र नावात ना पांडूरंग हे नाव आहे. ना विठ्ठल हे नाव आहे. पण बौध्द पाली भाषेच्या ग्रंथांमध्ये पुंडलिक, पुंडरीक या शब्दाचा अर्थ पांढरेकमळ होतो. आणि कमळालाच पाली मध्ये पांडूरंग म्हणतात. बुध्दाच्या जगात अशा अनेक मूर्त्या आहेत की बुध्द हा कमळावर बसलेला आहे. हिंदूच्या प्रत्येक देवांच्या हाती हत्यारे आहेत पांडूरंगाच्या नाही.  पांढरया कमळावर बसलेली बुध्द मूर्ती अजिंठा लेणीत आहे हे एक प्रमाण ठरते.



डॉ. बी. जी. जावळे , Tirupati Balaji was A Buddhist Shrine (K. Jamanadas) या आपल्या पुस्तकांत म्हणतात...



पंढरीचा पांडुरंग बोधिसत्व होता.




श्री .वासुदेव गोविंद आपटे आपल्या ग्रंथात म्हणतात-


"विठोबाची मूर्तीव खडकावर कोरलेल्या बौध्दमूर्ति,यांच्या स्वरूपातील सादृश व विठोबा-रुखमाई यांची पृथक पृथक मंदिरे आणि गोपाळकाल्याच्यावेळी जातिभेदाला मिळणारा फाटा या गोष्टी ब्राह्मणधर्मी सांप्रदायिक पद्धतीला सोडून आहेत. यावरून तेही क्षेत्र मुळचे बौद्धांचे असावे व बौध्द धर्माच ऱ्हास झाल्यावर ब्राम्हणधर्माने त्या मुळच्या बौद्ध पद्धतीचा आपल्या धर्मात समावेश करुन घेतला असावा असे दिसते.



मित्र-मैत्रिणीनो, पांडुरंगाच्या मूर्तीकडे नीट पाहिलेत तर काही गोष्टी लक्षात येतील. कि त्याचे डोळे हे ध्यानी बुद्धासारखे बंद आहेत. कान बुद्धासारखे खांद्यावर रुळणारे लांब आहे, कपाळ विशाल आहे. इतर देवांसारखे त्यांनी हातात कोणतेही शास्त्र, आयुध धरलेले नाही, त्याला चार हात नाहीत, तो आपले दोन कमलहस्त आपल्या कमरेवर ठेऊन उभा आहे. तसे करून जणू तो जगाला आपल्या लेकरांना, उपासकांना म्हणजेच वारकऱ्यांना अहिंसेचा संदेश देत आहे. तो प्रसन्न हसतो आहे. हि अहिंसक शांत मूर्तीच त्याच्या बोधीसात्वाच, बुद्धात्वाच प्रतिक आहे. बौद्ध विहाराचे हिंदू धार्मिक स्थळात रुपांतर केल्याचे हे एक उदाहरण झाले. महाराष्ट्रात अशी अनेक उदाहरणे देत येतील. एकंदर संतांची चळवळ ही तथागत बुध्दाला अभिप्रेत न्याय,स्वातंत्र्य,समता आणि बंधुता या मूल्यावर आधारीत समाज व्यवस्था निर्माण करणारी होती.


 
तेव्हा या मूर्तीतील, त्या अहिंसक, करुणावादी जाती-धर्माच्या भिंती तोंडून सर्व लोकांना आपलेसे करणाऱ्या, समतेची शिकवण देणाऱ्या बोधीसत्वास, बुद्धास, पांडुरंगास मी त्रिवार नमन करतो.

 



पुंडलिकाचा विजय असो !!



संदर्भ - 

  

१ महाराष्ट्रातील बुद्ध धम्माचा इतिहास (मा .शं.मोरे )

२ Tirupati Balaji was A Buddhist Shrine(K.Jamanadas)


लेखं- गौरव गायकवाड(सोबत प्रबोधन टीम)

124 comments:

  1. चित्र आणि शिल्प या माध्यमातून विठ्ठल हा बुद्ध असल्याची धारणा प्रकट होते. दीर्घकालपर्यंत पंचांगांच्या मुखपृष्ठावर दशावताराची चित्रे छापत. या चित्रात नवव्या अवताराच्या स्थानी विठ्ठलाचे चित्र छापलेले असते. या चित्रावर बुद्ध असे नावही आढळते.
    दशावतारात बुद्धाच्या जागी विठ्ठल असलेली दोन शिल्पे आढळतात १. तासगाव येथे गणेशमंदिराच्या गोपुरावर आढळते. २. कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराच्या प्राकारातील एका ओवरीत आढळते.
    विठ्ठलाच्या बौद्धात्वाचे पुरावे :
    १. पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या सभामंडपात दगडी खांबावर ध्यानस्त बुद्धाच्या कोरीव मूर्ती आढळतात.
    २.विठ्ठलाचा इतिहास कोठेच दिसत नाही. रामाचा रामायणात, कृष्णाचा भागवत पुराणात किंवा महाभारतात; मग विठ्ठलाचा इतिहास का आढळत नाही?
    ३.विठ्ठल मूर्ती एकटीच का? शेजारी कोणीच स्त्री नसून तो एकटाच विटेवर उभा आहे. रुक्मिणी (?) विठ्ठलाच्या शेजारी नसून दुसऱ्याच मंदिरात आहे. संन्याशाचे (श्रमण) स्त्री असणे असंभवनीय होय. विठ्ठल हा एकटाच असल्याने बुद्ध असणे संभवनीय आहे.
    ४.विठ्ठलाचा हात कमरेवर , हातात शस्त्र नाही.
    ५.मूर्तीचे सूक्ष्म अवलोकन केले तर तीत बुद्धत्वाच्या खुणा दिसतात. विठ्ठलाचे कान सुद्धा बुद्धासारखे लांब दिसतात. विठ्ठल पितांबरधारी आहे. बौद्ध श्रामाणांची वस्त्रे ‘पीत’ असतात.
    ६.वारकरी (मूळ शब्द्द वारीकारी) ह्या संप्रदायात प्रवेश करतो तेंव्हा त्याला (तुळशीची माळ घालताना) शपथ घ्यावी लागते. हि शपथ म्हणजे बुद्धाचे पंचशील (सदाचाराचे पाच नियम) होय. १) मी प्राण्याची हिंसा करणार नाही. २) मी चोरी करणार नाही. ३) मी व्यभिचार करणार नाही. ४) मी खोटे बोलणार नाही आणि ५) मी अपेयपान करणार नाही, हे ते पाच नियम होत.
    पंढरीच्या वारीला निदान पंढरपुरापुरते स्पृश्य-अस्पृश्य भेद विसरून एकत्र गोळा होतात. चातुर्मासात वारी हे वैदिक संप्रदायाप्रमाणे अयोग्य होय. बुद्ध हा जातिभेदा विरुद्ध होता. जातीव्यवस्ता व अस्पृश्यताविरोध हे बौद्धधर्माचे एक महत्वाचे वैशिष्ट्य आहे.
    पंढरपूरचा विठ्ठल बुद्धच आहे, अशी महाराष्ट्रात परंपरा आहे. विठ्ठल शब्दाची व्युत्पत्ती पुढीलप्रमाणे होय. विट + ठल. विट हा मराठी तर ठल हा पाली शब्द्द आहे. ठल या पाली शब्दाचा अर्थ स्थळ असा आहे. विट आहे स्थळ ज्याचे तो विठ्ठल. सम्राट अशोकाने बुद्धाची ८४ हजार देवळे बांधली, त्यापैकी हे एक मंदिर असावे. सुप्रशिद्ध पाश्चात्य पंडित जॉन विल्सन यांनी आपल्या “ Memoir of the Cave Temple” या ग्रंथात हे मंदिर बुद्ध मंदिर असल्याचे म्हटले आहे (धर्मपद, अ रा कुलकर्णी या ग्रंथाचे परिशिष्ठ पाहावे). म्हणजेच पंढरपूरचा विठ्ठल हा शैव वा वैष्णव आहे असे म्हणणे चुकीचे ठरणारे आहे.

    सौजन्य: अलोक चोपडे

    ReplyDelete
    Replies
    1. अतिशय सुंदर माहीती आहे

      Delete
    2. इतिहास लपवतात हे मनुवादी लोक

      Delete
    3. शात्रशुद्ध खऱ्या इतिहासाची अतिशय तार्किक माहिती👌

      Delete
    4. Very nice article great information thanks thanks thanks

      Delete
    5. धन्यवाद, खूपच वाचनीय माहिती मिळाली.वाचतच रहावी असे वाटत होते.मला एक प्रसंग सागावासा वाटतो...माझ्या मुलागा पेपरमध्ये आलेला विठ्ठलाचा फोटो पाहून म्हणाला, मम्मी, हे तर बुद्धच दिसतात!मी शाँक झाले अभ्यासाचे त्याचे वय नसताना केवळ फोटो साधर्म्य त्याला कळाले. खरा इतिहास जगासमोर आलाच पाहिजे.

      Delete
    6. धन्यवाद, खूपच वाचनीय माहिती मिळाली.वाचतच रहावी असे वाटत होते.मला एक प्रसंग सागावासा वाटतो...माझ्या मुलागा पेपरमध्ये आलेला विठ्ठलाचा फोटो पाहून म्हणाला, मम्मी, हे तर बुद्धच दिसतात!मी शाँक झाले अभ्यासाचे त्याचे वय नसताना केवळ फोटो साधर्म्य त्याला कळाले. खरा इतिहास जगासमोर आलाच पाहिजे.

      Delete
    7. अतिशय छान पद्धतीने विषय पटवून देण्यात आणि भ्रमनिरास करण्याचा चांगला प्रयत्न केला. जिथे बध्द हा शब्द असताना त्याला तोडून बुद्ध किंवा बाउद्ध हा शब्द टाकून पूर्ण भ्रमनिरास केलंय. बघायच्च असेल मूळ ग्रंथ वाचा त्यात बध्द हाच शब्द दिसेल आणि बध्द म्हणजे कशाशिही ज्याचा संबंध येत नाही(काम, क्रोध,लोभ, भय) म्हणजे अलिप्त असतो आणि सर्वश्रेष्ठ आहे असा तो विठ्ठल. तास जर बघायला गेलं तर भगवान महविरांची पण मूर्ती बुद्ध यांच्यासारखे दिसते मग काय तुम्ही तेच म्हणाला की ते महावीर नसून बुद्ध हेच आहे. एकतर देव न मानणारे तुम्ही कशाला लोकांना भ्रमात टाकताय हेच म्हणतोय खऱ्या गोष्टी मांडायला शिका आणि विनंती आहे बुद्ध ह्यांच्याकडून तरी काहीतरी शिकान निदान!

      Delete
  2. Very informative, proofs indicate that the vitthal temple at Pandharpur is Buddhist temple.

    ReplyDelete
  3. Dr. Ambedkar ka sanshodanpar kahi bat
    Khud hi sabse bada proof hai.
    Dr. Amberdkar means knowledge of symbol, Vishv Pitamah hai.

    ReplyDelete
  4. Proof karne k awala aur kaam bhi kya hai bahi.. Bas ab yahi karna baki hai.. Yeh aisa hai yeh waisa hai.. Yeh hamara hi hai.. Khud ki majburi ko anjam dene ki liye aisa sab chalata hi jayega.. Q.. 🚫

    ReplyDelete
    Replies
    1. Majboori nahi hai bhai...
      tum jaisi gandi soch rakhne walo ko pata chale ki andha shraddha kya hai yehi batana chahte hai hum....

      Delete
  5. Replies
    1. So nice & very important information available for read
      Thank u very much

      Delete
  6. चांगली माहिती मिळाली.
    आभारी आहे.

    ReplyDelete
  7. फार चांगला विनोद आहे, एवढं तरी नशीब म्हणावं लागेल की ह्या साहेबांची नजर व्हेटिकन सिटी किंवा मक्का वर नाही पडली नाहीतर हे क्राईस्ट ला पण बुद्ध आणि संग ए असवद ला विहार ठरवून मोकळे होतील,

    ReplyDelete
    Replies
    1. येशू हा बौद्ध
      भीक्षु होता ,
      संदभ हवा असल्यास संपर्क करावा,
      8055691424

      Delete
    2. हे ही खरे आहे.. त्यांच्या आयुष्यातला सोळा वर्षांचा कालखंड गायब आहे.. त्या सोळा वर्षात ते भारतात बूध्द धम्माच्या सानिध्यात होते आणि त्यानी जाणीवपूर्वक ही बाब सर्वापासून लपवून ठेवली...

      Delete
    3. अरे केळ्या सर्व काही अभ्यासाअंतीच लिहीलेले आहे. हे सर्व मुद्दे कोणालाच खोडून काढता येणार नाहीत. तुमच्या मेंदूवर अंधश्रद्धेची पट्टी बांधली गेलीय ना च्यामुळे तुम्हाला या जन्मात तरी ते कळायचं नाही.

      Delete
    4. अडाणी लोकांनी काही कमेंट केली तरी इतिहास पुसला जाणार नाही...

      Delete
    5. हा चांगला विनोद खोडून काढायचा असेल तर इतिहासिक किंवा पुरातत्त्वीय तुम्ही द्या म्हणजे आम्ही पण ह्या विनोदावर हसू

      Delete
  8. फार चांगला विनोद आहे, एवढं तरी नशीब म्हणावं लागेल की ह्या साहेबांची नजर व्हेटिकन सिटी किंवा मक्का वर नाही पडली नाहीतर हे क्राईस्ट ला पण बुद्ध आणि संग ए असवद ला विहार ठरवून मोकळे होतील,

    ReplyDelete
    Replies
    1. मग सांग ना भावा की विट्ठलाचा जन्म केव्हा झाला त्याच्या आई वडिलांचे नाव काय आणि केव्हा मृत्यु झाला सांग ना आहे का उत्तर आंधल्या बुद्धिच्या

      Delete
    2. विठ्ठल कृष्ण अवतारातील एक प्रसंग आहे, रुक्मिणी रुसून दिंडीर वनात आली तेव्हा भगवान तिला शोधत इकडे आले पण त्यापूर्वी पुंडलिक नावाच्या मातृपितृ भक्ताची कहाणी कानावर आली म्हणून रुक्मिणी शोधआधी ते पुंडलिकाच्या भेटीला आला

      Delete
    3. मानसिक विकृति और गुलाम लोगों के मुँह लगना तथा उत्तर देना महत्वपूर्ण नहीं हैं. जब मैने जाना की किसी की के प्रमाण ऐतिहासिक होने चाहिए और वो कैसे होते हैं तब ममै जागा और मसझ गया।

      Delete
    4. व्हॅटिकन सिटी सोड, आधी भरतातलच बघ ना भावा

      Delete
    5. विठ्ठलाचा जन्म व्हावा ते काही गौतम बुद्ध किव्वा आंबेडकर नाहीत साक्षात जगदपिता परम ब्रह्म श्री हरी नारायणांचे श्री कृष्णाचे अवतार आहेत. ते मनुष्याची उत्पत्ति करतात आणि विविध अवतारात अवतरीत होतात. आणि ज्या प्रमाणे ह्या ओव्या किव्वा अभंग आहेत जसे आपण श्री राम आणि रावण श्री कृष्ण आणि कंस असे चांगले व वाईट गोष्टी सांगण्यासाठी विशेषण देतो त्याच प्रमाणे संतांनी दिले आहेत. बुद्ध रूप अर्थात मौन साधलेले विशेषण सुद्धा समजत नसेल तर कमाल आहे ह्या लोकांची ज्यांनी हा मुद्दा धरला आहे . अश्या प्रकारे अनेक वारकरी संप्रदाय हिंदू लोकांची मन दुखवायचा ठेका घेतला आहे त्यांना फक्त विशेष पक्षाच्या मतांशी घेणं आहे

      Delete
  9. फार चांगला विनोद आहे, एवढं तरी नशीब म्हणावं लागेल की ह्या साहेबांची नजर व्हेटिकन सिटी किंवा मक्का वर नाही पडली नाहीतर हे क्राईस्ट ला पण बुद्ध आणि संग ए असवद ला विहार ठरवून मोकळे होतील,

    ReplyDelete
    Replies
    1. तुमच्या डोक भरमिस्ट झालं आहे , तुम्हाला खरा इतिहास माहीत नाही त्यामुळे तुम्ही काय बोलणार आम्हाला माहीत आहे
      असा द्वेष करणे बंद करा , खरा इतिहास स्वीकारा

      Delete
    2. Thanks for information 🙏

      Delete
    3. Je virodh krtat, tyana thoda tri buddhi cha vapr karayachi garaj ahe.

      Delete
  10. सर्वमान्य माहिती आहे, कोणाची जळफळाट होण्याचे कारण नाही

    ReplyDelete
  11. उगाच स्वतःचीच जळफळाट करून घेण्यापेक्षा सत्य स्विकारावे,मनाला शांतता लाभेल. संपूर्ण जगात आंबेडकरांच नाव घेतले जाते त्यांनी देशाची राज्यघटना लिहिली आहे, आणि तेही बौद्ध आहेत हा पण विनोदच आहे का ?

    ReplyDelete
    Replies
    1. कोणी सांगितलं होतं लिहायला बे
      ते बौद्ध आहेत तर का डोक्यावर घेऊन नाचू का
      उगाच मनाचे बंगले बांधत सुटलाय काहीपन

      आम्ही हिंदू आहोत
      आणि आम्हाला गर्व आहे त्याचा

      Delete
    2. Ks aahe Na bhava aapn changlya gosti Kru shkt nahi tr dusryni jya changlya gosti samaja sathi kelyat tyacha apman krnyapeksha respect krayla shik.

      Delete
  12. पांडूरंग हे बूध्दच आहेत यात कूठलेही दूमत नाही...

    ReplyDelete
  13. It was hidden from people to keep their wrong business safe.. we people accept it very easily....

    ReplyDelete
  14. 2000 varsha pasun lok je vichar mantat te nantar satya vatu lagate.. Mul etihas visartat aani kuni sangitala te tyanchya pachni vachtach kshani Kasa Patel.. Vel Aani dnyan Donhi goshti dene aavshyak aahe.. Adhnyan hech sarv karnach Mul ahe
    Nice information

    ReplyDelete
  15. I dont understand but what is a relation between ambedkar people and Buddha.jyanni baudha dharma swikarla tyanchyat ekahi gun nahiye buddhancha ugach buddhanch nav kharab karu naka. Adhi gun angi aana buddhanche. Buddhanni ahinsela pratham sthan dil adhi shakahari bana khare gun angat aana....and for ur kind information
    Buddhane kadhich bauddha shabd vaparla nahi tyanni Buddha shabd vaprla Buddha mhanje sant.

    ReplyDelete
    Replies
    1. Ho kharch ....baabasahebanni dhamma dikshechya mhanje eak divas agodar mhatl hot ki mi sang sanghagn sharanang mhannar nahi. .karn bhikku sanghane anyayacha pratikar kela nahi mhanun ....babasahebanna abhi abhipret samaj nirman hotoy. Manun ghabru naka. ..

      Delete
    2. Buddh, Tathagat hi tyanchya followers ne dilele naav Aahe premane. Ani tyacha Arthat Dnyani asa hoto.hi gosht khari aahe Ki tyani swatahla kontich upadhi lavun ghetli in fact swatahla dev manla nahi. Te tya goshticha virodhat hote. Ani rahila Prashna vegetarian honyacha Buddhani tyanchya followers LA asa Kadhi updesh kela nahi Ki konihi non-veg khau naka. Jar tumhi vachala tr tyavelch follower jeva Dikshatan Sathi Jayche teva Buddhani sangitla Tumchya pudhyat je vadhlay Te tumhi khau shakta te nivdnyacha kahi garaj nahi tyane laalsa vadhte. Ani Prashna dusra tyanchya Sarkh bhartache sagle baudh he ashtangik margacha niyamane palan kartat ha fact Aahe

      Delete
  16. सगळ्या पुराव्यानिशी खूपच छान माहिती आहे. याचा जास्त प्रसार झाला पाहिजे यामुळे खरा इतिहास कळून येईल व बहुजन बुद्धाचा मार्ग अवलंबतील.

    ReplyDelete
  17. पुरावे आहेत साक्ष ,2500 वर्षा पूर्वी भारतात कोणतेही मंदिर अस्तित्वात नव्हतं.बुद्धा च्या जन्म भारतात झाला.एक महान महात्मा ते होऊन गेले.सम्राट अशोकाच्या राज्यात अफगाणिस्तान,पाकिस्तान,भारत,नेपाळ,बांग्लादेश, म्यानमार ह्या सगळ्या देशात फक्त बुद्ध विहारच होती।एकट्या भारतात 23000 च्या वर बुद्ध विहार अस्तित्वात होती.मग आता ती गेली कुठे?कार्ले येथील जिवंत बुद्ध विहाराला शेंदूर लावून एकविरा च मंदिर केलाय ,किती मूर्खपणा आहे हा सगळा ह्या लोकांचा।कोणाला काही शँका असेल तर प्रबोधनकार ठाकरे च पुस्तक वाचावे।

    ReplyDelete
    Replies
    1. Ye bala tula Buddha pun sanghto Ani Ambedkar pun sanghto fakt number Ani purna naav send kar

      Delete
  18. पंडरपुरचा विठ्ठल हा पुडंलिक आहे. पुडंलिक हा बुध्द आहे. हे सत्य आहे.

    ReplyDelete
  19. जर बौद्ध धर्म मूर्तिपूजा मानत नाहीत तर बुद्ध विहार बांधले? किंवा विठ्ठल ही मूर्ती बुद्धाची आहे हा विषयच कालबाह्य होतो.


    शिवाय इतिहास नाही असे कोण म्हणते? पुंडलीकाच्या भक्तीसाठी विठ्ठल विटेवर उभा राहिला नि तो दुसरा तिसरा कोणी नसून भगवान श्रीकृष्ण आहे आणि भक्तासाठी इकडेच उभ्या राहिलेल्या विठ्ठलावर रुसली म्हणून वेगळ्या ठिकाणी मंदिर आहे.

    आणि सगळ्यांच्या माहितीसाठी भगवान बुद्ध जे हिंदू धर्म नववा अवतार मानतो नि गौतम बुद्ध जे तथागत आहेत ज्यांनी कधीच हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्माची स्थापना वगैरे कधीच सांगितले नाही ते हेच मुळी वेगवेगळे आहेत.
    भगवान बुद्ध -
    वर्ण - ब्राम्हण
    जन्मस्थान - कीटक देश (गया)
    जन्म तिथी - पौष शुक्ल पक्ष सप्तमी
    काळ - कलियुगाच्या आरंभापासून १००० वर्षा नंतर (भगवान बुद्ध यांचे वडील "जीन" यांचा काळ)

    गौतम बुद्ध
    वर्ण - इक्ष्वाकु वंशीय, क्षत्रिय
    जन्मस्थान - लुंबिनी, नेपाळ
    जन्मतिथी - वैशाख पोर्णिमा
    काळ - कलियुगाच्या आरंभापासून २७०० वर्षे नंतर.
    यावरून या दोन व्यक्ति भिन्न आहेत हे स्पष्ट दिसून येते.

    यावरून सगळा विषयच मोकळा होऊन जातो9

    ReplyDelete
    Replies
    1. Very funny. Two buddha story. Proof n evdiance needed.

      Delete
    2. Very ignorant cooment poor Evidence .AArcheologist claim that Vitthal idol resemble to Goutam budhha .

      Delete
    3. Are da babasaheb che who is pandurang vacha karana ki diwali San that Dana pandhars deshawn purta maryadit she pan bapachi jayant 150 hung jasat deshat hotel yavarun vicar kar baba kiti vidavan hote Jay bhim Jay buddha Jay bharat

      Delete
    4. Vaa bhava tu tar navin buddha lach janm dilas, grate, kiv yete tuza abhyasu vrutti chi hahaha

      Delete
    5. Vaa bhava tu tar navin buddha lach janm dilas, grate, kiv yete tuza abhyasu vrutti chi hahaha

      Delete
    6. अगदी खोटं बोललात सर..... बौद्ध धर्मच नाही मनलात तुम्ही ।।
      आणि आत्ता पण बौद्ध धर्म नाही पण मनलो असतो तुम्ही पण इतिहास पुरावे देते आहे की ।। आणि हिंदू धर्म सोडून तर ते बौद्ध बनले आणि हिंदू च असते तर ते संस्कृत याऐवजी पाली भाषा नाही निवडली असती

      Delete
  20. Mahiti pahije,👌👌👌👌👌

    ReplyDelete
  21. Mahiti pahije,👌👌👌👌👌

    ReplyDelete
  22. ऐतिहासिक सत्य आहे

    ReplyDelete
  23. अतिशय चांगली आणि खरी माहिती...👌

    ReplyDelete
  24. Majhya sarv bandhavano please aadhi vachan kara abhyas kara nivval bhakar katha var vishwas naka thevu.
    Jo khara itihas ahe jyala purave ahet tyavar vishwas theva.
    Bhagwan Buddha he asamanya pan manav hote. Sarv jag tyanna mante.
    Tyanchya nantar tyanche vichar, updesh prasar karnyasathi anek rahane vichare bandhu.
    Pan tyanchya virodhkani tya vicharanchi tasech murtinche chukichya paddhatine hindukaran keley.
    Tevha moklya manane satya shiksha.
    बुद्धम सरनं गच्छामि

    ReplyDelete
  25. PLEASE RENAME THE BOOK TITLE AS PANDHARICHA PANDURANG,BECAUSE AS PER THE NAME OF BOOK NO ONE( OF OTHER CAST) READ THIS BOOK.
    YOUR EFFORTS ARE SUCESSFUL.

    ReplyDelete
  26. Pandharpur cha vitthal ha buddha aahe, he siddha zale aahe.

    ReplyDelete
  27. सत्य कधीच बदलत नाही

    ReplyDelete
  28. सत्य कधीच बदलत नाही

    ReplyDelete
  29. khari mahit dile budhancha murty n leni nshat kraych prytn virodhak krt alet pn stya he smor yetch n dev jr astil tr ata avtar ka nahi ghet etky mulinvr atyachar hotat, shetkari atmhtya krta tr. shikshn gheun andhsrdhevr vishawas ks thevtat lok..These are true proofs .thanks for d information

    ReplyDelete
  30. Hmmmm lokana dev pahije je ki kadhi astitvat nvte pn tyana budhh nko samrat ashok nko tevdhech nhitr ambedkar nko he nhi tr nhi pn jya savidhana mul sgle samantene jagtat te savidhan pn nko

    ReplyDelete
    Replies
    1. काय लिहिले आहे संविधानात मला जरा कळेल का

      Delete
  31. Very True..
    Bhat has written and put forth totally wrong history..

    ReplyDelete
  32. इथे कोण्ही हिंदू आहे का

    ReplyDelete
  33. वरील लेखात ज्या संत रचनांचा संदर्भ देण्यात आला त्यात बौद्ध असा शब्दप्रयोग केलाय संतांनी.बौद्ध=मौनी किंवा न बोलणार असा अर्थ होतो.त्यामुळेच बौद्ध आणि बुद्ध ह्या भिन्न संकल्पना आहेत.संदर्भ देताना आधी त्याचा नीट अभ्यास करावा.

    ReplyDelete
  34. Great but some people not Accepted

    ReplyDelete
  35. Replies
    1. पांडुरंग आणि बुद्ध यांच्याकडे पाहुन मनाला अलौकिक शांती मिळते.आणि त्यांनी संपूर्ण मानवजातीला एक आनंदी जीवनाचा..शांतीपूर्ण जीवनाचा मार्ग भक्तीच्या आणि विपश्यना सारख्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभूतीद्वारे दाखवून दिला.

      Delete
  36. पांडुरंग आणि बौध्ध यांच्या मुर्तीत साम्य जरुर दिसुन येते जसे पितांबर ,समाधी अवस्थेतील मुख कमल, निशस्त्र कर किंवा सदाचाराचे पाच नियम वारकरी सांप्रादयातही तसेच आहे असो यांच्या दर्शनाने अलौकीक आनंद भक्तांना ,अनुयायांना अनुभवयास मिलतो...!!!!

    ReplyDelete
  37. पांडुरंग आणि बौध्ध यांच्या मुर्तीत साम्य जरुर दिसुन येते जसे पितांबर ,समाधी अवस्थेतील मुख कमल, निशस्त्र कर किंवा सदाचाराचे पाच नियम वारकरी सांप्रादयातही तसेच आहे असो यांच्या दर्शनाने अलौकीक आनंद भक्तांना ,अनुयायांना अनुभवयास मिलतो...!!!!

    ReplyDelete
  38. जाऊ द्या ना ज्यांना कळले आहे त्यांनी बुद्ध म्हणा ज्यांना विठ्ठल वाटतो त्यांची पूजा करा फक्त पंचशील पाळा मागे के होते त्यापेक्षा आता काय होतंय हे बघ एक गोष्ट मान्य करा की एवढे प्रभावी बुद्धत्व संपवण्यात ब्राह्मणांना यश आले,लोकांना सत्य आवडत नाही मनोरंजन व लढाया आवडतात ब्राह्मण तेच करतात लोकांना भडकवणे व लढाया लावणे वाईट वाटते लोक बुद्धाला का मान्य करत नाही इथे सगळीकडे बुद्धाचे आहे कोणतेही प्राचीन मंदिर बघा कुठेही खोदा

    ReplyDelete
    Replies
    1. सध्या त्या ब्राम्हणांची काम तुम्ही बौद्ध लोक करत आहात

      Delete
  39. पंढरपूरच्या मंदिराच्या खांबांवर आजही बुद्धमुर्ती कोरलेल्या दिसतात.

    ReplyDelete
  40. Thanks!for Information Sir! Absolutely true History!🙏NAMO BUDDHAY🙏

    ReplyDelete
  41. Nice information... needs to be spreaded very carefully with out revolution

    ReplyDelete
  42. Bharat Desh Ha Buddha mule odkhala Jato. Satty kadhihi Nasht Hou Shakat Nahi.

    ReplyDelete
  43. विठ्ठल बुध्द असण्यात.... काहीच तथ्य नाही

    बुध्द हा आज सारखा सामुदायीक धर्म नव्हता ...ती ऐक वैचारीक स्थीती आहे. जो त्या स्थीतीपर्यत पोहचतो तो बुध्द ... हींदु ही पण आपली सांस्कृतीक प्रांतीय ओळख आहे आणी या मधे तर खुप विचार अन दर्शने आणी मते आहेत..
    बुध्दांनी मांडलेले विचार पुर्वीपासुन या हींदसंस्कृतीत(सिंधु) थोड्या बहोत प्रणमाणात अस्तीत्वात होते ...बुध्दांनी निश्चितच सर्व दर्शनाचा आणी विचारांचा ,मतांचा अभ्यास करुन ऐक नवे दर्शन निर्माण केले...
    त्यांनी माणवी मुल्य जपणार्‍या विचारांना महत्व दीले आणी त्यातच मणुष्य जिवणाचे सार्थक आहे असे त्यांनी सांगीतले...

    सांगायचे ऐवढेच हींदु, बुध्द ,जैन हे आता सारखे सामुदायीक धर्म नसुन विचार आचार आहेत...
    यात विचारांची देवान घेवान पण दीसुन येते... बुध्दाचा आदर संत यासाठीच करतात... तसेच लेण्या आणी मंदीराकडे बघुन पण हे लक्षात येते... बुध्द जैन लेण्या मधे गजलक्ष्मी ,यक्ष,देवता यांचे शिल्पे सर्रास दीसतात...
    मध्यकालीन सर्व राजे महाराजे तर सर्व मतांचा आदर करणारे आणी सरंक्षण देणारे होते...

    आता विठ्ठल हे बुध्द आहेत असा जो प्रचार करण्यात येतो त्यात काहीही तथ्य नाही ..
    विठ्ठलाच्या डोक्यावर लिंग स्थापीत दीसते ,गळ्यात कोस्तुभमनी,कानात कुंडले ,हातात चक्र आणी शंख आहे...
    बुध्द अलंकार घालत नव्हते हे आपण जाणतोच..

    संतानी विठ्ठलाचे वर्णन काही ठीकाणी बुध्दरुप असे केले याचा अर्थ शांत आणी संयमी रुप बुध्दासारखे आहे असे होते...
    काही संतानी बुध्दावर अभंग पण केलेत ते अवतार स्वरुपावरुन ,विठ्ठलाला बुध्द माणुन नाही..
    विठ्ठल ही क्षेत्रपाल देवता आहे ती कधी शैवाची आराध्य होती असे वाटते नंतर ती विष्णुरुप माणन्यात आली ..
    जे काहीही असो पण विठ्ठल मुर्ती ही बुध्दमुर्ती नाही हे सत्य..

    नमो बुध्दाय
    जय हरी विठ्ठल

    — मोहन ठाकरे देशमुख

    ReplyDelete
    Replies
    1. Tu prabodhankar thakre haynch book vach ok

      Delete
  44. विठ्ठल बुध्द असण्यात.... काहीच तथ्य नाही

    बुध्द हा आज सारखा सामुदायीक धर्म नव्हता ...ती ऐक वैचारीक स्थीती आहे. जो त्या स्थीतीपर्यत पोहचतो तो बुध्द ... हींदु ही पण आपली सांस्कृतीक प्रांतीय ओळख आहे आणी या मधे तर खुप विचार अन दर्शने आणी मते आहेत..
    बुध्दांनी मांडलेले विचार पुर्वीपासुन या हींदसंस्कृतीत(सिंधु) थोड्या बहोत प्रणमाणात अस्तीत्वात होते ...बुध्दांनी निश्चितच सर्व दर्शनाचा आणी विचारांचा ,मतांचा अभ्यास करुन ऐक नवे दर्शन निर्माण केले...
    त्यांनी माणवी मुल्य जपणार्‍या विचारांना महत्व दीले आणी त्यातच मणुष्य जिवणाचे सार्थक आहे असे त्यांनी सांगीतले...

    सांगायचे ऐवढेच हींदु, बुध्द ,जैन हे आता सारखे सामुदायीक धर्म नसुन विचार आचार आहेत...
    यात विचारांची देवान घेवान पण दीसुन येते... बुध्दाचा आदर संत यासाठीच करतात... तसेच लेण्या आणी मंदीराकडे बघुन पण हे लक्षात येते... बुध्द जैन लेण्या मधे गजलक्ष्मी ,यक्ष,देवता यांचे शिल्पे सर्रास दीसतात...
    मध्यकालीन सर्व राजे महाराजे तर सर्व मतांचा आदर करणारे आणी सरंक्षण देणारे होते...

    आता विठ्ठल हे बुध्द आहेत असा जो प्रचार करण्यात येतो त्यात काहीही तथ्य नाही ..
    विठ्ठलाच्या डोक्यावर लिंग स्थापीत दीसते ,गळ्यात कोस्तुभमनी,कानात कुंडले ,हातात चक्र आणी शंख आहे...
    बुध्द अलंकार घालत नव्हते हे आपण जाणतोच..

    संतानी विठ्ठलाचे वर्णन काही ठीकाणी बुध्दरुप असे केले याचा अर्थ शांत आणी संयमी रुप बुध्दासारखे आहे असे होते...
    काही संतानी बुध्दावर अभंग पण केलेत ते अवतार स्वरुपावरुन ,विठ्ठलाला बुध्द माणुन नाही..
    विठ्ठल ही क्षेत्रपाल देवता आहे ती कधी शैवाची आराध्य होती असे वाटते नंतर ती विष्णुरुप माणन्यात आली ..
    जे काहीही असो पण विठ्ठल मुर्ती ही बुध्दमुर्ती नाही हे सत्य..

    नमो बुध्दाय
    जय हरी विठ्ठल

    — मोहन ठाकरे देशमुख

    ReplyDelete
  45. Thanks for sharing true information

    ReplyDelete
  46. Thanks for sharing true information

    ReplyDelete
  47. जे १५००००० लोक पंढरपूरला जातात त्यांना हे दाखवण्याचे धाडस करण्याची हिंमत कोणाकडेही नाही.

    ReplyDelete
  48. Kutryano amchyavr kdhi trust kel ahe ka tumhi

    ReplyDelete
  49. Vikroot Mendooooo

    ReplyDelete
  50. Siddharth ya navachya manushyacha nahi tethe sambandh jodat aahet...

    ReplyDelete
  51. उद्या म्हणतील ओसामा बिन लादेन व हिटलर हे बौध्द होते म्हणून 😂😂😂😂😂😂.
    सगळी चुतीया गीरी चालली आहे.गौतम बुद्ध हे विष्णूचा नववा अवतार आहे.व ते श्री विष्णू नी अवतार घेतला आहे.जर बुध्द हे विष्णूचे अवतार आहेत मग ते हिंदु धर्माचे आहेत.

    ReplyDelete
    Replies
    1. Buddhaani avatari sankalpana dhudkavli buddh he tyaveli ektech ase hote jyani he lokansamor mandla Ki Hya jagat daivi shakti aani avatari shakti asa kahich nahi hi srushti Sarv manav nirmit Ani nisarga nirmit aahe tumhi ashtangik marg jar vachal tar tyacha pahilach marg Aahe ki samyak drushti Mhanje nisarga virodhi gosht ghadte Hya goshtivar vishvas thevu Naye. Jar tumhi madhyamika philosophy of Buddhism vachal tar Buddhani asa sangitla jo paryant ekhadi gosht tumhi jagrut pane Ani ughad dolyane anubhvat nahi toparynt kontyach goshtivar vishwas theu naka Ani asa hi sangitla majya goshtivar Prashna vicharayla tumhala adhikar Aahe asa Hindu ekunach avatar tumhi kiti jagrut pane baghitle hyacha purava dyava aani siddha karav ki Vishnu cha avatar buddh aahe. Buddhane tyanchyach philosophy var Prashna vicharnyachi mubha diliye asa Hindu dharmat Dur Dur var disat nahi Itke Buddha Democratic Ani liberal vicharache hote mala vishnucha asa ektari prasang Sangun siddha karava

      Delete
  52. हजारो अभंग आहेत सदर संतसज्जन मंडळींचे, त्यातून एखाद अभंग घेऊन त्यातील एका शब्दाचा हवा तो अर्थ न लावता त्याचा संपूर्ण अर्थ लावुन निरूपण द्यावे, बुद्ध पूजनीय आहेतच जसे विठ्ठल भगवान,आपल्या लेखातून भेदाभेद होईल असे लेखच नसावेत.सत्यासत्यता पडताळण्यासाठी सखोल शास्त्रीय अभ्यास ऐतिहासिक पुराव्यानिशी व्हावा हीच अपेक्षा.
    बाकी आपला उपक्रम स्तुत्य आहे, प्रबोधन आवश्यक आहेच परंतु त्यातून सामाजिक तेढ निर्माण होऊ न देता प्रबोधनच व्हावे, तुझा धर्म श्रेष्ठ की माझा अशी स्पर्धा न होता कोणता धर्म कुणी आचरावा हा खाजगी विषयच असावा. शेवटी धर्मपालन हा खाजगी विषयच असावा.
    कुणाच्या भावना दुखावल्या असल्यास क्षमस्व.

    ReplyDelete
    Replies
    1. बरोबर आहे
      तुम्ही आमच्या धर्मात लुडबुड करतातच का .
      अजूनही दुसऱ्याच खाजवायची सवय गेली नाही तुमची .सगळ तुम्हाला आमच्यासारखच पाहिजे ग्रंथ आमचे विचारसरणी आमची फक्त नाव बदलून सगळी विद्या तुमची होत नसते .
      अरे तुमचा उगमच हिंदू धर्मातून आहे. आणि हिंदू धर्म एवढा सहिष्णू आहे की तो अजूनही तुम्हाला सांभाळून घेतोय.
      सगळ copy paste च करा तुम्ही नुसते अजून काय काम नाय तुम्हाला ,आरक्षणच्या नावावर नोकऱ्या मिळवायच्या आणि अशे रिकामटवाळ उद्योग करत बसा .
      आमचे सर्वच संतवचने copy मारा आता.
      आमच्या संतांची वाणी ही त्यांची स्वतःची होती.
      आता तर आमचे देव पण तुमच्यात covert करून घ्या भिकारीचानो

      Delete
    2. आधी भाषा सुधर तुझी. तुझे देव तुलाच ठेव. कोण कुणा वर अतिक्रमण करतय हे बघायचंच असेल तर एकदा बुद्ध लेण्यांना भेट दे म्हणजे कळेल कोण अतिक्रमण करतय ते चोरीचे धंदे आजही चालूच आहेत. आणि तुझ्या लिखाणातूनच तुझ्या इतिहासातील अभ्यासाचा अंदाज येतोय.

      Delete
  53. इतिहासात अनेक वेळा स्वताच्या फायद्यासाठी अडानी लोकांची फसवणूक केली गेली.त्याची अजून बरीच उदाहरणे आहेत.पण आपण आपल्या मुलांना एका योग्य ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणुन ठेवले.

    ReplyDelete
  54. Please jati vad naka karu konachi vacha konala pan naka deu manuskichya dharmane jaga aani jagu dya

    ReplyDelete
  55. खरा इतिहास मान्य केला पाहिजे सत्य लपविता येत नाही



    ReplyDelete
  56. Budhha kadihi vitewar ubha nahi aani kamrewar tyache haath nahit

    ReplyDelete
  57. Pandharpoor cha pandurang chya hati shankh aahe ...Gautam budhha ne kadi shankh vajawla hota ka ? Disli murti ki bolayacha Gautam budhaa..... Jee murti Afganistanat hoti tee nahi wachivta aali ...aani ethe hushari dhakwaychi

    ReplyDelete
  58. तुम्ही संतांचा ऐक अभंग घेतला असे अनेक अभंग आहेत ज्यात ते बुद्धाला हरि चा अवतार मानतात ते का नाही मानत मग....जेव्हडे तुमच्या फिव्हर मध्ये आहे तेव्हड घायचा आणि बाकी सोडायचं आत्ता त्या संतना तुम्ही खरे मानता मग तेच संत राम कृष्ण हरि ला पण मानतात त्यावर तर तुफान अभंग आहेत...मग ते पन अभंग mana...an जर नसाल मानत तर ते अभंग पन नका मानू ज्यात बुद्ध उल्लेख आहे ...मुळात यावरून तर हे सिद्ध होतय की बुद्ध हे विष्णू अवतार आहेत
    Tnx हे सिद्ध केल्या बद्दल

    ReplyDelete
    Replies
    1. बुद्ध हे कोणत्याच देवाचे अवतार वगैरे नुसतं भ्रम असून बाकी काहीही नाहीय....

      Delete
  59. अतिशय छान माहिती आहे, हे फक्त अभ्यासू लोकांना समजणार, अंधश्रद्धेला चिटकून बसलेल्या लोकांना नाही कळणार, त्यांना समजावणे शक्य नाही, त्यांना समजण्यात आपला वेळ खर्च करू नका. आपण प्रबुद्ध आहोत म्हणुन आपण हे सत्य माहिती असूनही शांत आहोत. बुद्ध नाही तर विठ्ठल विठ्ठल करून त्यांना शांती भेटत असेल तर उत्तमच आहे. पण हे सर्व अशोक कालीन कोरीव विहार आहेत हे सत्य कोण बदलू शकत नाही, अभ्यास करा, संशोधन करा, मग त्यांचा स्विकार करा.

    ReplyDelete
  60. जगाला युद्ध नाही तर बुद्ध हवे आहेत.....

    ReplyDelete
  61. Namo budhay...💙महत्वाची माहिती मिळली

    ReplyDelete
  62. संपूर्ण गावात आत्ता ही माहिती देणार मी

    ReplyDelete
  63. नमो बुद्धाय...🙏

    ReplyDelete
  64. खरंच खूप छान माहिती दिली बुद्धाचा इतिहास किती जरी लपवण्याचा प्रयत्न केला तरी तो मिटणार नाही हे मात्र नक्की आहे 🙏🙏

    ReplyDelete
  65. एवढं जर खरं वाटत असेल तुम्हाला तर येवढंच उत्तर द्या की श्री विठ्ठल मूर्ती ही बुद्ध मूर्ती आहे तर मग त्या मूर्तीच्या हातात शंख,कमळ,कमरेला पितांबर, गळयात कौस्तुभ मणी, कानात मकर आकार कुंडल कसे काय आहे अजून अश्या खूप गोष्टी आहेत दाखवण्या सारख्या पण फक्त ह्याच उत्तर सांगा मग आम्ही पण मानतो की खरच ती एक बुद्ध मूर्ती आहे . उत्तर द्या लवकर वाट बघतोय

    ReplyDelete

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...