बाबांचा समतेचा रथ मागे नेवू नका !!

बाबांचा समतेचा रथ मागे नेवू नका !!





आज सकाळची गोष्ट मी घरात टीवी बघत होतो. अचानक आमच्या दाराची बेल वाजली मी दार उघडले बघितले तर... माझ्या कॉलनी मधल्या रस्ते झाडणाऱ्या २ मावशी होत्या... ते मला म्हणाल्या बंटी(माझे टोपणनाव बंटी आहे) 'भादी'साठी गहू आण.... मी म्हटलो मावशी कसली भादी.... कसले गहू???? त्यांनी कपाळावर हात मारला आणी म्हणाल्या तुझ्या आई ला बोलव... मी माझ्या आई ला आवाज दिलां... ते माझ्या आई ला म्हणाले ताई 'भादी'साठी गहू दया... माझी आई म्हणाली आणते गहू... माझ्या आई ने घरातून गहू आणले त्यांना दिले... माझ्या मनात अनेक प्रश्न येवू लागले... मी त्या मावशीसमोर माझ्या आई ला म्हणालो हे भादी काय असते?? आई म्हणाली यांच्या जाती मध्ये सण असतो भादी... या सणाला ते गहूचे पीठ उकळून गहूच्या पीठाचे दिवे तयार करतात आणी ते दिवे खीर सोबत खातात. मग मी आई ला म्हणालो हा संण मी पहिल्यांदा ऐकलां... त्या मावशी मला म्हणाल्या भाऊ हा सण 'महार' जातीत असतो... 'महार' शब्द ऐकलां आणी मला खूप वाईट वाटले... मी त्या मावशी ला म्हणालो मावशी आता तुम्ही हिंदु नाही हो....  बाबासाहेबांनी तुम्हांला बुद्धाचा इतकां सुंदर धम्म दिलां आहे... मग ही लाचारी का?? त्या मला उत्तर न देतां मावशी माझ्या घरातून निघून गेल्या.....


 


खरचं मला खूप वाईट वाटलं... घरात आल्यावर माझ्या आई ने पण मला रागावले... ती म्हणाली ज्याला त्याला काय शहाणपणा शिकवतो तू... मी म्हणालो अगं बाबासाहेबांनी इतकां संघर्ष करून यां मावशीला समस्त दीन.. दलितांना स्वालंबी माणुस म्हणून जगण्याचे अधिकार दिले मग अशी लाचारी का??? माझ्या मम्मी ने प्रश्नाचे उत्तर दिले नाही...



 

'भादी'सणाची भाकडकथा-



खूप खूप वर्षापूर्वी महार लोक गावाची अनेक कामे करून द्यायचे व त्या बदली त्याना जोहार म्हणून काही तुटपुंजा मोबदला मिळायचा. त्याकाळी महारवाडा गावाच्या बाहेर असायचा व ब्राम्ह्मण लोक महारवाड्यात येत नसत. पैश्याची अडचण म्हणून त्यांना खायला मटन मिळत नव्हते. एके दिवशी ब्राम्ह्मण लोकांची गाय महार वाड्यात आली. सर्व महार लोकांनी ती गाय पकडली व तिला मारून टाकले व तिचे मटन सर्वांनी आपापसात वाटून घेतले. प्रत्येकाच्या घरांत मटन शिजत होते. कातड्याची विल्हेवाट लावायला गेले व ते पुरून टाकले. गावात जसे महार होते तसे चांभार सुध्दा होते. ते पुरलेले कातडे त्या चांभाराने त्याच्या फायद्यासाठी म्हणजे चप्पल बूट बनविण्यासाठी काढून घेतले. ते काढतांना एका ब्राम्हणाने बघितले व ते शेजारच्या ब्राम्हणाच्या गाईचे आहे हे ओळखले व गावात बोंबाबोंब केली. सर्व गावातील लोक लाठ्या, काठ्या आणी कु-हाडी घेऊन त्या चांभाराला मारायला गेले. त्या चांभाराने वास्तविक गाय कोणी मारली हे बघितले नव्हते तरी महार लोकांचे हे कृत्य आहे म्हणून त्याने सांगितले.

 


सर्व मोर्चा महारवाड्यात गेला. ब्राम्हण संतापून विचारू लागले. पण महार सांगायला तयार नव्हते की आम्ही गाय मारली म्हणून. ब्राम्हण म्हणाले तुमच्या चुलींवर काय शिजत आहे. महार म्हणाले आज आमचा भादिचा सण आहे. महार लोकांना वाटले ब्राम्हण लोक थोडेच चुलीवर बघणार आहेत. पण ब्राम्हणांनी चुलीवरील भांडे उतरवून बघितले तर तेथे खरोखर गाईचे मटन नव्हते.... तेव्हा एक चमत्कार झाला त्या मटनाचा पीठाचा रोडगा म्हणजे... मटणाचा पिठाचा गोळा तयार झाला. म्हणजे गव्हाच्या पिठाचे हाडाच्या आकाराचे तुकडे भादी काहीतरी होते. तो दिवस भाद्रपद महिन्याचा होता. म्हणून "भादी" हा सण साजरा करतात. हा सण जळगाव(खान्देश) भागात जास्त प्रमाणात साजरा केला जातो. घरो-घरी धान्याची भीक मागून हा संण साजरा केला जातो.

 


येथे अशी कल्पना आहे की गाईच्या मासाचे व हाडाचे रुपांतर भादी मध्ये झाले, त्यामुळे महार लोकांचे प्राण वाचले तेव्हा पासून भादी हा सण महार लोकांमध्ये साजरा केला जातो. मला आता त्याने सांगितलेले आठवत नाही पण पोळ्याच्या सणाच्या पाचव्या किंवा सातव्या दिवशी भाद्रपद महिन्यात भादि हा सण येतो.

 


तसेच तेव्हापासून चांभार व महार लोकांचे एकमेकांशी पटत नाही अशी आख्यायिका आहे असे म्हणतात. हल्लीच्या काळात शिष्यवृत्तीसाठी बौध्द लोक सरकार बरोबर भांडतात आणि त्याचा फायदा चांभार लोक घेतात असे आढळून येते. धम्मदीक्षेच्यावेळी चांभार लोकांनी बौध्द धम्म स्वीकारला नाही हा राग बौध्द लोकांमध्ये दिसून येतो.(धन्यवाद- श्रीराम पवार सर)


 

 

बाबासाहेबांनी सांगितलेला हा विचार संदेश....





 

"या देशात उच्च-नीच कोणत्याही व्यक्तिच्या बरोबरीने अन्न, वस्र आणि निवारा मिळविण्याचा तुमचा जन्मसिध्द हक्क आहे. सन्मानाचे जीवन लाभावे असे जर तुम्हाला मनापासून वाटत असेल तर तुम्ही स्वावलंबाची कास धरा, तोच तुमचा त्राता आहे". (डॉ. बाबासाहेब आंबेडकर)











 


"जातप्रथेच्या तटबंद्यावर उघड उघड हल्ला करण्यासाठी अस्पृश्यांनी शिक्षण घेतलेच पाहिजे. डुकरासारखे आपले पोट भरण्यासाठी जगु नका. परंतु सांस्कृतिक विकासासाठी मानवी प्राणी म्हणुन जगा". (डॉ.बाबासाहेब आंबेडकर)




 

शेवटी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा अखेरचा संदेश,

 





 

"एके दिवशी ते नानकचंद रत्तूंना म्हणाले, "माझ्या लोकांना सांगा की मी जे काही केले आहे ते मी अत्यंत हालअपेष्टा सोसून आणि आयुष्यभर दुःख भोगून आणि माझ्या विरोधाकांशी लढून मिळविले आहे. महत् प्रयासाने हा काफिला जेथे दिसतो तेथे आणून ठेवला आहे. मार्गात कितीही अडचणी आल्या आणि संकटे आली तरी तो काफिला आता मागे फिरता काम नये. जर माझ्या सहकाऱ्यांना तो काफिला पुढे नेता येत नसेल , तर त्यांनी तो तेथेच ठेवावा, पण काही झाले तरी तो मागे नेता काम नये, हाच माझ्या लोकांना संदेश आहे"


 

प्रिय मित्र-मैत्रिणीनो बाबांचा हा समतेचा रथ मागे नेवू नका ही कळकळीची विनंती !!


 
जय भीम , जय भारत !!



लेखं- निलेश रजनी भास्कर कळसकर, जळगाव, खान्देश(सोबत प्रबोधन टीम)


No comments:

Post a Comment

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...