मुलींनी हरतालिकेचे व्रत आचरणात आणावे !!
सकाळी सकाळी आई ही पोथी वाचीत बसली होती, आणि मी अंगावर पांघरून घेऊन ती कान देऊन ऐकत होतो... कथा ऐकल्यानंतर मला त्या दैवत कथेचा गाभा कोणत्यातरी अनामिक स्त्रीवादी व्यक्तीने रचला असावा असच वाटल... पुढे जशी या लोक-कथांमध्ये भर पडत जाते तशी ती पडली असावी आणि त्याचा गाभा दडवण्यासाठी हे लिंग पूजेच खूळ त्यात घुसडल असाव... जेणे करून कर्मकांडात या व्रतातील गाभाच लक्षात येऊ नये. ती कथा मोठी गंमतीशीर आहे.
राजा प्रजापती याला एक मुलगी असते पार्वती.... प्रजापती हा राजा लोकांचा राजा म्हणजेच उच्च जात-वर्ण आणि वर्ग, मोठा संपत्तिवान..... आपल्या मुळीच लग्न direct तो देवांच्या रक्षणकर्ता विष्णूशी ठरवतो ते पण पोरीला न विचारता..... पण पार्वतीच प्रेम असत शंकरावर... शंकर म्हणजे तोच म्हसन वाटेत राहणारा...म्हसंजोगी आणि त्याचे सगळे दोस्त म्हणजे मरिआइ, म्हसोबा, वेताळ, भैरोबा सगळे आदिवासी लोक आणि भटके विमुक्त...
पार्वतीने प्रजापतीला ठणकावून सांगितलं "पप्पा, आपल पिरीम हाय शंकर्यावर... उगाच बळजबरी लगीन नका लाऊ माझ कुनाबी संगी" बाप भडकला " पोरी ही आपल्या घरची रीत नव्ह ( म्हणजे जातीची रीत नव्ह) मी सांगण त्याच्याशी गपगुमान लगीन कर... त्या म्हसन जोग्यात काय बघितलस...अंगाला राख लावून बसतोय नुस्ता...त्यो विष्णू बघ लय श्रीमंत हाय...राणी वाणी ठेवील तुला..."
"पर पप्पा त्याच लगीन झालाय ना लक्ष्मि संग..."
"मग काय झाल लय बायका करायची रीतच हाय आपली आणि त्याच्या कड home dept पण हाय... इज्जत का सवाल हाय बेटी..."
"नाय पप्पा माझ लव हाय शंकर्यावर... मी त्याच्याशीच लगीन करणार"
"पोरी सांगून टीवतो लय पर फुताल्यात तुला...गंग्या हिला खोलीत डांबून ठेव आणि लक्ष ठिव रात दिस ... काय बिलीनदार कार्टी जन्माला आयीला माझ्या पोटाला"
कोंडून ठेवलेली पार्वती रात्री गंग्या झोपलेला पाहून खिस्कून घेते... मैत्रिणीकडे जाऊन तिला म्हणते " एक request आहे मला जंगला पर्यंत सोड तिथून मी जाते वेतालाबरोबर शंकराकड... ती पण तयार होते... रात्री त्या जंगलाकड निघतात... जंगलाच्या बाहेर वेताळ थांबलेला असतो वाट पाहत ( अय... येडा समाजाला का वेताळ कस कळल ती येउन राहिली म्हणून... भाऊ आणि ताई असले प्रश्न आम्हासनी लहानपणापासून पडायाले पण अजून मलेच उत्तर नाही मिळाले ते तुले काय सांगणार...) तो एकदम dashing मध्ये फटफटी काढून थेट शंकराकडे पार्वतीला घेऊन जातो आणि मग त्याचं लगीन होते आणि इकडे सकाळी प्रजापतीला कळत कि पोरगी पळून गेली....
"तू आमच्या साठी मेलीस आजपासून" ( the end )
साला कथेचा कोर लय आवडला आपल्या... आंतरजातीय विवाह करा... विरोध असेल तर पळून जावून करा... पण करा...जाती अंतच विजय असो !!
माझ्या मैत्रिणी या व्रतातील कर्मकांड बाजूला ठेऊन या गाभ्याला आचरणात आणतील का असा माझा सवाल आहे...
No comments:
Post a Comment
धन्यवाद !!