खरा शिक्षक दिन २८ नोव्हेंबर !!
आज आपण डॉ. राधाकृष्णन यांचा ५ सप्टेंबर हा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा करतो पण हा दिवस लोकउत्सवाच्या रुपाने साजरा होत नाही तर शासकीय पातळीवर साजरा होतो. ज्या महापुरुषांनी परिवर्तनाचे प्रामाणिक कार्य केले आहे त्यांचेच उत्सव लोकउत्सवाच्या रुपाने साजरे होतात... डॉ. राधाकृष्णन यांचा जन्मदिन आपण शिक्षकदिन म्हणून साजरा करतो हा प्रश्न आपण आपल्याला विचारला नाही पण आता मानसिक गुलामगिरिच्या एक एक श्रृंखला तुटत आहेत गुलामगिरीची असंख्य प्रतिक आता लवकरच संपणार आहेत पण त्यासाठी गरज आहे अभ्यासाची विचारांची आणि प्रबोधनाची.... बहुजनांच्या शिक्षणाचे आद्यजनक राष्ट्रपिता जोतीराव फुले की डॉ. राधाकृष्णन ?
राष्ट्रपिता जोतीराव फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ साली झाला. तर डॉ.राधाकृष्णन यांचा जन्म २० सप्टेंबर १८८७ रोजी झाला ५ सप्टेंबर १८८८ हा दिवस चुकीचा आहे... असे डॉ. राधाकृष्णन यांचे चिरंजीव सर्वपल्ली गोपाल हे नमूद करतात (संदर्भ - as Radhakrishnana a Biography -Page 10) म्हणजे जोतीराव फुले यांच्यापेक्षा डॉ. राधाकृष्णन हे ६० वर्षांनी लहान होते... जोतीराव फुले यांनी १८४८ साली देशातील पहिली सर्वांच्या मुलींसाठी शाळा सुरु केलि... १८५२ साली बहुजन मुलांसाठी शाळा सुरु केली म्हणजे डॉ.राधाकृष्णन यांच्या जन्माच्या अगोदर ४० वर्षापूर्वी राष्ट्रपिता जोतीराव फुले यांनी देशातील पहिली शाळा सुरु केलि.... म्हणजे जोतीराव फुले हेच भारतीय शिक्षणाचे आद्याजनक आहेत हे निर्विवाद सत्य होते.... जोतीराव फुले यांनी शाळा सुरु करण्यापूर्वी या देशात बहुजनांसाठी कोणीही शाळा सुरु केलि नाही... राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांच्यामुलेच भारतीयांना शिक्षणाची संधि मिळाली.... शिक्षणाचा महत्व सांगणारे अत्यंत हृदयस्पर्शी विचार भारतात प्रथम जोतीराव फुले यांनी मांडले...
शिक्षणाअभावी देशातील बहुजनांची कशी वाईट अवस्था झालेली आहे... याचे विदारक चित्र प्रथम जोतीराव फुले यांनी मांडले आणि एका वर्षातच २० शाळा सुरु केल्या यावेळी डॉ. राधाकृष्णन यांचा तिर्थारुपांचा ही जन्म झाला नव्हता... तेंव्हाच जोतीराव फुले यांनी देशात शाळा सुरु केल्या होत्या.... डॉ. राधाकृष्णन यांनी जन्मानंतर देखिल देशात बहुजनांसाठी एकही शाळा सुरु केलि नाही म्हणजे बहुजनांच्या शिक्षणाशी डॉ. राधाकृष्णन यांचा अजिबात संबंध नाही बहुजनाना शिक्षणापासून वंचीत ठेवाण्यासाठी सनातनी लोकांनी अनेक कपटकारस्थाने केली अनेक ग्रंथाद्वारे बहुजनांच्या व स्त्रियांच्या शिक्षणावर सनातनी लोकांनी बंदी घातली हजारो वर्षांची ही बंदी मोडून जोतीराव फुले यांनी बहुजनंना शिक्षणाची दालने खुली केलीत.
राष्ट्रपिता जोतीराव फुले यांनी सामाजिक परिवर्तानासाठी शाळा सुरु केली पण शाळा सुरु करण्यास ब्राम्हण लोकांचा कड़क विरोध होता.. त्यामुळे शिक्षक मिळने देखील शक्य नव्हते तेंव्हा त्यांनी स्वतः हातात खडू घेउन मुलांना शिकविले अत्यंत तळमळीने शिकविनार्या फुले यांना कोणीही वेतन दिले नाही... गोर-गरीब, अस्पृश्य, अनाथ, भुकेलेल्या मुलांना स्वतः गोळा करून त्यांनी मोफत शिकविले... यासाठी त्या काळात त्यांना कोणीही अनुदान, सादिलखर्च, वेतनवाढ इ. दिली नाही.... त्यांनी गोर-गरिबांना मोफत पण आनंदाने शिकविले या पाठीमागे त्यांची किती तळमळ होती हे आपल्या लक्षात आले असेलच.
डॉ. राधाकृष्णन यांनी बहुजनांसाठी विनावेतन तर सोडाच पण वेतन घेउन देखिल शिकविले नाही... याउलट भरपूर पागार घेउन फक्त उच्चभ्रू समाजाच्या मुलांना शिकविले.... उच्चभ्रू समाजाच्या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी ते मद्रास, हैद्राबाद, कलकत्ता, बनारस इ. विद्यापिठात गेले... पण एकाही खेड्यात जाउन बहुजनांच्या मुला-मुलींना शिकविले नाही....
राष्ट्रपिता जोतीराव फुले यांनी हंटर आयोगाला प्राथमिक शिक्षक सक्तीचे आणि मोफत करण्यासाठी धारेवर धरले -
भारतीयांना शिक्षण देण्यासाठी इंग्रज सरकारने १८८२ साली सर विल्यम हंटर यांचे अध्यक्षतेखाली भारतीय शिक्षक आयोग निर्माण केला यालाच हंटर आयोग असे म्हणतात... सर हंटर महाराष्ट्रात आले तेंव्हा पुणे येथील एम्.एम्.कुंटे यांना बहुजनंना शिक्षणाची गरज नाही असे हंटर यांनी सांगितले... तेंव्हा १९ ओक्टोबर १८८२ रोजी राष्ट्रपिता जोतीराव फुले यांनी हंटर यांची भेट घेतली व एक निवेदन दिले त्यामध्ये जोतीराव फुले म्हणतात की बहुजनांच्या मुलांना वयाच्या १२ व्या वर्षापर्यंत प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत द्यावे. सरकारला मिळणांरा महसूल बहुजनांचा आहे या मह्सुलावर ब्राम्हण शिक्षण घेतात पण बहुजनांना शिक्षण घेण्यास विरोध करतात हे कटुसत्य जोतीराव फुले यांनी हंटर आयोगाच्या निदर्शनास आणून दिले... गोर-गरीब, कष्टकारी, कामकारी,शेतकरी,यांच्या मुलांना शिक्षण मिलावे यासाठी इंग्रज सरकारला जोतीराव फुले यांनी धारेवर धरले... असे काम डॉ. राधाकृष्णन यांनी कधीच केले नाही. राष्ट्रपिता जोतीराव फुले यांनी स्वतःची मिळकत शिक्षणांसाठी खर्च केली. डॉ. राधाकृष्णन यांनी पी.एच .डी. चा प्रबंध चोरून स्वत:च्या नावावर प्रकाशित केला. त्या विरुद्ध १९३० साली कलकत्ता हायकोर्टात खटला चालला होता. त्यांच्या नावाने शिक्षक दिन साजरा करणे हा देशाचा, शिक्षण क्षेत्राचा अपमान आहे.
जोतीराव फुले यांनी रात्रं दिन अखंड श्रम करून पैसा उभा केला ते नामवंत बांधकाम तद्न्य होते खडकवासला धरण, कात्रज घाट, पुण्यातील, अनेक पुल, छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनल(मुंबई)इ. बांधकामे केलि... त्यातून मिळालेल्या पैश्यातुन बहुजनांसाठी शाळा काढल्या. त्यांनी स्वतःचा विचार केला असता तर टाटा, बिर्ला, अंबानी पेक्षा तात्या श्रीमंत झाले असते. पण त्यांनी गरीब बहुजनंना श्रीमंत करण्यासाठी आयुष्य व पैसा मुला मुलींच्या शिक्षणासाठी खर्च केला. व्यक्तिगत हित, हौस, सुख दूर सारून जोतीराव फुले आणि त्यांच्या सौभाग्यवती क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी बहुजनांच्या मुला मुलींना शिक्षण देण्यासाठी शाळा सुरु केल्या.... बहुजनांना शिक्षण मिळाल्याशिवाय हजारो वर्षांची गुलामगिरी संपणार नाही यासाठी जोतीराव फुले यांनी स्वखार्चाने शाळा सुरु केल्या म्हणजे निस्वार्थपणे जोतीराव तथा तात्यांनी शाळा सुरु केल्या. डॉ.राधाकृष्णन यांनी स्वतःच्या मिळकतिचा एक रुपयादेखिल बहुजनांच्या शिक्षणांसाठी खर्च केला नाही. देशातील ज्वलंत समस्या निवारण्यासाठी जोतीरावनि सनातनी ब्राम्हणसमाजाविरुद्ध निर्भयपणे लढा दिला.
जोतीराव यांनी बालविवाह ला कडाडून विरोध केला तर राधाकृष्णन यांनी स्वतःच्या मुलींची लग्ने त्यांचा विचार न करता ११ ते १६ वर्षी केली त्यांच्या मुलीने नवर्या मुलाला साधे पाहिले देखिल नव्हते.... म्हणजे संपूर्ण जगात तत्वज्ञानावर व्याख्याने देणार्या, अमेरिका, इंग्लण्ड, रशिया इ. राष्ट्रात प्रदीर्घ वास्तव केलेले असताना देखिल स्वतःच्या मुलींचे त्यांनी बालपणीच विवाह केले... विवाह्बाबत ते म्हणतात की लग्न ही स्वर्गात ठरवली जातात म्हणजे ते किती सनातनी प्रतिगामी विचारांचे होते ते... पण जोतीराव यांनी या प्रथेविरुद्ध आवाज उठविला. डॉ. राधाकृष्णन यांनी वैदिक परंपरेचे उदात्तीकरण करणारे साहित्य लिहिले. डॉ.राधाकृष्णन यांनी पुस्तकातून मनुवाद जपला. तर राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांचे साहित्य बहुजन हिताचे आहे. समाज उपयोगाचे आहे. डॉ. राधाकृष्णन यांचे चिरंजीव सर्वपल्ली गोपाल यांनी "राधाकृष्ण अ बायोग्राफी" या ग्रंथात डॉ. राधाकृष्णन हे कसे स्त्री शिक्षण विरोधी होते याचे विवेचन केले आहे. डॉ. राधाकृष्णन हे मुलीचा जन्म हा सेवेसाठी असतो या मताचे होते. प्रथम मुलीसाठी शाळा काढणारे क्रांतिबा फुले होत.
जोतीराव फुले यांनी सावित्रीमाईना कधीही स्त्री म्हणून गौण लेखले नाही याउलट त्यांना प्रेरणा दिली... त्यांचा आदर केला त्यांच्यावर विश्वास ठेवला... जोतीराव यांनी व्यक्तिमत्व विकासासाठी सर्व प्रकारे मदत केलि जोतीराव सावित्रीमाई यांना नेहमी अहो-काहो असे आदराने बोलत असत... राधाकृष्णन यांनी मात्र त्यांच्या पत्नी शिवकम्मू यांना स्वातंत्र दिले नाही त्यांना शिकविले नाही म्हनुनच त्यांचे व्यक्तिमत्व कोमेजुन गेले... स्त्री शिक्षणासाठी एकही पाउल राधाकृष्णन यांनी उचलले नाही.... जोतीराव यांनी स्वतःच्या पत्नीला स्वातंत्र व् शिक्षण तर दिलच पण देशातील सर्व जातिधर्माच्या मुलींना शिक्षण दिले, म्हणून त्यांच्या शाळेत शिकणारी मातंग समाजातील विद्यार्थिनी कु.मुक्ता साळवेही धर्माबाबत अप्रतिम निबंध लिहू शकली... जोतीराव यांच्या स्त्रिस्वातंत्र्याचे हे फल आहे तर डॉ. राधाकृष्णन यांचे मात्र स्त्रियांबाबताचे विचार हे खालच्या पातळीवरचे होते... स्त्रियांमध्ये दुःख सहन करण्याची क्षमता जास्त असते सेवावृत्ति हीच स्त्रियांची मूळ प्रवृत्ति आहे... असे म्हणण्यामागे मला नाही वाटत की त्यांना स्त्रियांबद्दल काही सहानभूति होती ते यामागे स्त्रियांना गुलाम ठेवणे हाच हेतु त्यांचा आहे.
राष्ट्रपिता ज्योतीराव फुले v/s सर्वपल्ली डॉ. राधाकृष्णन !
१. फुले यांचा जन्म - १ १ एप्रील १८२७.
१. राधाकृष्णन यांचा जन्म - ५ सप्टेंबर १८८८.
२. फुले यांचासर्वपल्लींच्या ४० वर्ष आधी शिक्षण चळवळीस प्रारंभ (१८४८).
२. राधाकृष्णन राष्ट्रपिता फुले याच्यापेक्षा साठ वर्षाने लहान.
३. फुले यांनी चार वर्षात २० शाळा सुरु केल्या (त्यावेळी राधाकृष्णन यांच्या वडीलांचाही जन्म नव्हता. १८४८ -१८५१) शिक्षणाचे महत्व पटवून दिले, व त्यांच्यासाठी शाळा काढल्या.
३. राधाकृष्णन यांनीएकही शाळा सुरु केली नाही.
४. फुले यांनी विनावेतन (मोफत) बहुजनांना व स्त्रियांना शिकविले.
४. राधाकृष्णन वेतन घेऊनही बहुजनांना शिकवले नाही.
५. फुले यांनी बहुजनांना स्वत:चे पैसे खर्च करुन शिकवले.
५. राधाकृष्णन यांनी ब्राम्हणांना भरपुर पगार घेऊन शिकवले.
तरी आपण सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा करणार की शिक्षणाचे महत्व समजावून सांगणारे व स्वखर्चाने शाळा काढून शिक्षणाचा प्रचार व प्रसार करणारे राष्ट्रपिता ज्योतीराव फुले यांचा स्मृतिदिन शिक्षक दिन म्हणून साजरा करणार याचा सद्सद् विवेकबुध्दी जागृत ठेवून विचार करा व निर्यय घ्या मित्रांनो... मैत्रिणीनो... मित्रानो-मैत्रिणीनो तुम्हीच विचार करा कि खरा शिक्षक दिन कोणता राधाकृष्णन यांचा जन्मदिन ५ सप्टेंबर कि राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांचा स्मृतीदिन २८ नोव्हेंबर ??
I agree with the writer's opinion 👍👍👍👍
ReplyDelete