बालगंधर्व यांना घडवणारे छत्रपति शाहू महाराज !!

बालगंधर्व यांना घडवणारे छत्रपति शाहू महाराज !!

 



 


एके दिवशी छत्रपति शाहू महाराज निवांत सोन्तलेच्या कैम्प वर आरामत बसले होते अणि अप्पा शास्त्री नावाचे एक आजोबा आपल्या नातावाला घेउन शाहू महाराजांकडे आले.


 


शाहू महाराजाना मुजरा केला आणि सांगितल महाराज हा माझा नातू आहे याच नाव नारायण राजहंस महाराज याचा आवाज खुप सुंदर आहे याचा आवाज खुप गोड आहे... महाराज आपण यांचे एकदा तरी गायन ऐकावे शाहू महाराज म्हटले ठीक आहे हरकत नाही महाराजांनी त्या पोराला समोर बसवलं आणी सांगितल बाळ गायन सुरु कर या छोट्याश्या पोराने गायन करायला सुरुवात केली... ते छोटस पोरग आपल्या गोड आवाजामध्ये  गायन सुरु करायला लागलं. या पोराचां आवाज इतका गोड आणि इतका अवीट एवढां सुंदर  होता की शाहू महाराज मंत्रमुग्ध झाले आणि बऱ्याच वेळाणी त्या पोराचं गायन संपल अणि गायन संपल्यावर ते पोरगां उठून उभा राहिल आणि शाहू महाराज मंत्रमुग्ध झाले शाहू महाराजांनी त्या पोराच गायन ऐकलं शाहू महाराज अतिशय आनंदित झाले.


 


शाहू महाराजनी आवाज दिला अरे बाळ नारायण ये इकडे... पण पोरगां जागचां हलेना... जसां उभा अहे तसां उभाच पुन्हा शाहू महाराजनी आवाज दीला... अरे नारायण तुझा आवाज खुप गोड आहे खुप सुंदर आहे बेटा ये माझ्या जवळ ये तरी... पण हा  पोरगां जांगचां काही हलेना. त्यावेळी त्या पोरांचे आजोबा जवळ आले आणि महाराजांना सांगितल...  महाराज या पोराचां आवाज खुप गोड आहे पण महाराज हा पोरगां एका कानांनी बहिरा आहे. या पोराला ऐकायला कमी येतं... महाराज हा पोरगां बहिरा आहे... हे ऐकून शाहू महाराजांना खुप मोठ दुःख झालं. महाराजांच्या मनातील सत्यशोधक माणुस जागां झालां. शाहू महाराजांनी त्या पोरालां जवळ घेतलं. गाडीत बसवलं आणि मिरजेला नेलं मिराजेतल्या मिशन हॉस्पिटलमध्ये नेलं... तिथल्या डॉक्टर ढेर यांच्याकडे उपचार करुण घेतले अणि त्या पोरालां नाट्यश्रुष्टीमधे प्रवेश मिळवून दिला आणि पुढे हाच नारायण राजहंस महाराष्ट्राचा बालगंधर्व झाला.


 




कर्तुत्व बालगंधर्वाचं असलं तरी पाठीवर हात आणि पाठीवर थाप राजश्री छत्रपती शाहू महाराजांची होती. आज त्या बालगंधर्वाच्या कर्तुत्वाबद्दल आम्हाला दुमत नहीं पण वाईट याचं वाटत बालगंधर्वाचं नाव घेणाऱ्यांना छत्रपती शाहू महाराज आठवत नाही. कधीतरी त्यानी शाहू महाराजांचा विचार केला पाहिजे. बहुजनांचा राजा समतेचा राजा माणुसकीचा धर्म जागवनारा राजा. सर्वना सामान वागणूक देणारा राजा म्हणजे छत्रपती राजश्री शाहू महाराज होय.


 


संदर्भ - छत्रपती शाहूमहाराज चरित्र , लेखक- जयसिगराव पवार सर.

 



लेखं- शिव व्याख्याते यशवंत गोसावी.



 


नोट- शिव व्याख्याते यशवंत गोसावी यांचे विचार रोज वाचण्यासाठी पुढील लिंक ओपन करून पेज लाईक करा. https://www.facebook.com/Mulukh.Maidani.Tof?refid=13&ref=stream

No comments:

Post a Comment

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...