रामासामी पेरियार: दक्षिणेतील महात्मा फुले !!

रामासामी पेरियार... दक्षिणेतील महात्मा फुले !!

 

 




इरोड वेंकट नायकर रामासामी यांचा जन्म  तामिळनाडू मधील इरोड या गावी १७ सप्टेंबर १८७९ रोजी झाला. यांना  पेरियार (म्हणजे तमिळ मध्ये अर्थ सम्मानित व्यक्ति) या नावे पण ओळखतात. एके काळी हे तमिलनाडु मधील प्रमुख राजनेता होते. यांनी  जस्टिस पार्टी स्थापना केली. या पार्टीचे मुख्य उद्दिष्ट रुढ़िवादी हिंदुत्वाचा विरोध करणे हे होते. हिन्दी मध्ये अनिवार्य शिक्षण याला पण पेरीयर रामासामीनी विरोध केलां. भारतीय तथा विशेषकरूण दक्षिण भारतीय समाजाचे शोषित वर्गातील लोकांची स्थिति सुधारण्याचे यांनी प्रयत्न केले.


 


देशाच्या स्वातंत्र्य पूर्व राजकारणावर उत्तर भारतीय ब्राम्हण समाज, हिंदू महासभा, रा.स्व.संघ या गटाचे  अधिपत्य होते. ब्राम्हीण व जमीनदारांच्या दाता पक्षाचे नाव होते भारतीय राष्ट्रीय कांग्रेस हे. एकूणच ब्राम्हणी व भांडवलवादी मानसिकतेच्या वृत्तीचा वावर या कांग्रेसी संघटनेत होता. अशा वातावरणात दक्षिण भारतात (विशेषता: तामिळनाडू व केरळ) रामासामी पेरियार यांनी ब्राम्हणी मनोवृत्तीला आवाहन देण्याचे कार्य केले. आर्यप्रणित ब्राम्हणी वर्चस्व व ते टिकवून ठेवण्यासाठी धडपडणारे कांग्रेसमधील कट्टर हिंदुवादी यांना उत्क्रांत  होवू न देण्याचे सारे श्रेय रामासामी पेरियार यांना जाते. द्रविडी समाज हा गणप्रधान समाज होता परंतु आर्याच्या वर्णाश्रम संस्कृतीने गणसंस्कृतीवर मात केली होती. परंतु खोलवर रुजलेल्या द्रविडीयन संस्कृतीला ब्राम्हणी वर्चस्व कधीही मान्य झाले नव्हते. त्यामुळे उत्तरेकडून आलेल्या आर्य संस्कृती विरुध्द द्रविडांनी दंड थोपटले.

 




१९२९ साली पेरियार यांनी स्वाभिमानी चळवळीची ( Self Respect movement ) स्थापना केली. त्यांनी तामिळ व उपेक्षित समाजाला ब्राम्हणी वर्चस्ववादाच्या विरोधात संघटीत केले. त्यांनी वेगवेगळया मंदिरांना भेटी देवून मंदिरातील शोषणाचे शास्त्र समजून घेत त्यांनी स्त्रीची व मागासवर्गीय समाजाची होणारी सांस्कृतिक पिळवणूक समजून घेतली. त्यांच्या मनाने हिंदुत्व व जातीव्यवस्था याचे विषम मर्म जाणले होते.

 



रामासामी पेरियार हे १९१९ सालापासून तामिळनाडू कांग्रेसचे सक्रीय सदस्य व नेते होते. कांग्रेस मध्ये सद्सदविवेक बुद्धीने जागृत असलेले लोक असावेत अशी त्यांची भावना होती. म.गांधी यांनी ज्या वृक्षापासून ताडी निर्माण होते ती झाडे तोडण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनानुसार रामासामी पेरियार यांनी ५०० नारळांची झाडे आपले नुकसान न बघता तोडून टाकली होती. परंतु त्यांना पुढे पुढे कांग्रेस मधील ब्राम्हणांचे प्रस्थ, त्यांचा वर्णवर्चस्ववाद व गांधीनी चातुरवर्ण्य वर्णाश्रम पध्दतीचे केलेले समर्थन हे त्यांना मुळीच आवडले नाही. त्यांनी हिंदू धर्मातील सामाजिक विषमता व स्त्री अत्याचाराविरोधात तामिळनाडू कांग्रेसचे तिरुनेलवेली येथे  १९२० साली भरलेल्या अधिवेशनात ठराव पास करण्यासाठी मांडायचा  होता परंतु सी. श्रीनिवास अयंगार यांनी तो मांडू दिला नाही. त्यानंतर १९२१ ला तंजावर, १९२२ ला तिरुपूर येथील अधिवेशनात तीच ती पुनरावृत्ती झाली. १९२३ ला सालेम येथे झालेल्या कांग्रेस परिषदेत ठरावाचा  पराभव  करण्यात आला. त्या नंतर १९२४ ला तीरुवन्नामलाई व १९२५ ला थिरू येथील अधिवेशनात तो ठराव पुन्हा मांडू दिला नाही. कांग्रेसमधील सी. राजगोपालाचारी, सी.श्रीनिवास अयंगार, मुदलीयार व पि. वरदाजुलू नायडू या ब्राम्हण नेत्यांनी केलेला विरोध पेरियार यांना मुळीच आवडला नाही व त्यांनी तामिळनाडू मध्ये कॉग्रेसलाच आव्हान देण्याचे  ठरविले.

 





रामासामी १९२५ ला “मद्रास कॉंग्रेस प्रेसिडेंसी” चे सचिव होते. तेव्हा गांधींनी त्यांना वसतिगृहाची पाहणी करण्याची जबाबदारी दिली. त्यानंतर रामासामींनी वसतिगृहाची पाहणी केली तेव्हा त्यांना खालील गोष्टी आढळून आल्या.

 



(१) ब्राम्हण विद्यार्थ्यांसाठी – ब्राम्हण आचारी
 


(२) ब्राम्हणेत्तर विध्यार्थ्यांसाठी – ब्राम्हणेत्तर आचारी

 




तेव्हा रामासामींना हि गोष्ट खटकली व त्यांनी तत्काळ गांधीजींना याबद्दल कळविले. त्यात पेरियार रामासामी गांधीजींना म्हणाले “गांधीजी, मी सरकारी पैशावर हा जातिवाद पोसू देणार नाही.” तेव्हा गांधीजी म्हणाले “हा आपला कार्यक्रम नाही.” तर मग गांधीजींना नेमका कोणत कार्यक्रम हवा होता..? अर्थात जातिवाद पोसू देण्याचा. त्याच क्षणी रामासामी यांनी आपल्या सचिव पदाचा राजीनामा दिला व भाकीत केले “अशीच कॉंग्रेस वागत राहिली तर भारत देशात डेमॉक्रॉसी ऐवजी ब्राम्हणक्रॅशी येईल.”


 



रामासामी पेरियार यांनी स्वाभिमानी चळवळीच्या माध्यमातून जातीयवाद, अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी जागोजागी मेळावे घेतले. १९२९ झालेल्या मेळाव्यात समाज व्यवस्थेवरील ब्राम्हणांचे नेतृत्व झुगारण्यात आले तर इरोड येथे १९३० ला झालेल्या अधिवेशनात मागासवर्ग समाजाने देव, मंदिरे व पुरोहित वर्गावर पैसे न उधळण्याचे आवाहन करण्यात आले. जन्म, मृत्यू व लग्न या सारख्या आयोजित करण्यात येना-या कार्यक्रमात समजत नसलेल्या संस्कृत भाषेतून कोणतेही मंत्र न उच्चारण्याचे ठरविण्यात आले होते. पेरियार यांनी १९२८ ला स्थापण केलेल्या जस्टीस पार्टीचे नामांतरन १९४४ साली द्रविड कझागन असे करून या पक्षाद्वारे मागास समाजाला न्याय देण्याचे प्रयत्न केले. 

पेरियार रामासामी यांनी तमिळनाडूतील ब्राम्हणेत्तर समाजात समाजजागृती कशी केली होती-

 




 


ब्राम्हणेत्तर समाजाची जागृती करण्यासाठी ते गळ्यात ढोल अडकावायचे व ढोलाच्या दोन्ही बाजूला देवीदेवतांची चित्रे चिटकावयाचे व त्या चिटकवलेल्या देवी-देवतांच्या फोटोला पायातील बूट व चप्पलांनी बडवायचे. ते असे यासाठी करायचे कि, आपल्या बहुजन समाजावर देवी-देवतांचा फार मोठा पगडा आहे. ब्राम्हणांनी बहुजनांच्या मनात देवी-देवतांची फार मोठी भीती निर्माण केली आहे. हा खरा दहशतवाद आहे आणि हा दहशतवाद ब्राम्हणांनी जाणीवपूर्वक निर्माण केलेला आहे.

 


जर देवाला मानले नाही, देवाची पूजा केली नाही, देवाचा नवस फेडला नाही, देवाला नारळ फोडला नाही, देवाला उदबत्ती लावली नाही, देवाच्या पाया पडले नाही..... तर देव कोपतो, रागावतो, शाप देतो आणि मग आपले वाटोळे होते, आपला सत्यानाश होतो, आपल्यावर आपत्ती कोसळते, आपल्यावर संकट येते. अशा ब्राम्हणांनी थापा मारल्या आणि त्या आपल्या अज्ञानी लोकांना खऱ्या वाटल्या. हा खरा दहशतवाद आहे. तो दहशतवाद घालविण्यासाठी त्यांनी देवी-देवतांना चपलांनी बडविण्याचा कार्यक्रम केला.

 

त्यानंतर रामासामी हे देवी-देवतांना हातगाड्यांवर ठेवायचे तो हातगाडा चेन्नईच्या चौकात आणायचे व त्या हातगाड्यावरील एका-एका देवी-देवताला पायातील पायातानाने बडवायचे व बडवतांना लोकांना सांगायचे “हा तुमचा राम, मी ह्याला चपलेने बडवतो आहे. तो राम स्वतःला वाचवू शकत नाही. तर मग तुम्हाला कसे वाचवू शकेल ?” रामाचा नंबर झाला कि, दुसऱ्या देवाला पायातील जोड्याने बडवायचे. हे देवी-देवता आपले रक्षण करतील, आपल्याला वाचवतील, आपल्या मदतीला धावून येतील अशा भ्रामक कल्पनेतून बहुजनांना बाहेर काढण्यासाठी अशाप्रकार रामासामी यांनी समाज जागृतीचे कार्य केले.

 


रामसामी आपल्या भाषणात लोकांना विचारायचे “जर साप आणि ब्राम्हण एकाच वेळी दिसला तर तुम्ही कोणाला माराल?” लोक उत्तर द्यायचे “सापाला” त्यावर रामासामी म्हणत “सापाला बिलकुल मारू नका.” तेव्हा लोक विचारायचे, “मग कोणाला मारायचे?” त्यावर रामासामी लोकांना सांगायचे, “सापाला सोडून द्या आणि ब्राम्हणाला ठेचून मारा.” लोक विचारायचे “का?” त्यावर रामसामी सांगायचे “साप चावला तर माणूस मारतो आणि ब्राम्हण डसला तर पिढ्या न पिढ्या बरबाद होतात.”
 


पेरियार यांच्या मते रामायण हे ब्राम्हण पुरोहितशाही वर्गाने निर्माण केलेली वर्णाश्रम व जातीव्यवस्था भारतीय समाजावर लादण्याच्या व्यापक कार्यक्रमाचे प्रतिक आहे. त्यामुळे याचा विरोध करण्यासाठी ते तामिळनाडूतील शहरात फिरून चौकाचौकात लोकांच्या घोळक्यासमोर रामाच्या प्रतिमेला जोड्याने मारत असत. ते रामाला स्त्रीवर अनन्वित अत्याचार करणारा नराधम मानत असत. रामाने सीतेच्या चारित्र्यावर लावलेला आरोप, सीतेला परत जंगलात सोडण्याचे त्याचे दुष्यकृत्य. रामाचे हे कृत्य स्वत:च्या बुद्धीचा वापर करून विचार करण्यारास मुळीच पटणार नाही. रामाने  लक्ष्मण याच्या हस्ते शूर्पणखेच्या चेह-याचे केलेले विद्रुपीकरण व त्या रागातून रावणाने केलेले सीतेचे अपहरण तरीही सीतेला परिपूर्ण आपल्या ताब्यात ठेवूनही तिच्या शरीराला स्पर्शही  न करणारा रावण. रावणाचे हे स्त्री सन्मानाचे चारित्र्य व कृतीसत्य आजच्या भारतीय स्त्रिस व तरुण वर्गास का उमगत नाही?. रावण इतका चारित्र्य संपन्न असूनही भारतीय स्त्री रावणाचा द्वेष व विरोध का करते?. त्यामुळे तरुण व स्त्रि वर्गास विचारावेसे वाटते कि, तुम्ही कधीपर्यंत पोथ्यातील खोट्या समजुतीमध्ये गुरफटून राहणार आहात?. कधीपर्यंत रामाच्या दुष्कृत्याला पुण्यकर्म व रावणाच्या सत्कार्याला दुष्यकृत्य समजणार आहात?.

 



पेरियार हे दक्षिणेतील महात्मा ज्योतिबा फुले होते. म्हणून समस्त स्त्रियांना आवाहन करावेसे वाटते कि, तुमच्या स्वातंत्र्यासाठी झटणाऱ्या रामासामी पेरियार सारख्या महापुरुषांचा तुम्ही सत्कार व सन्मान करणार आहात कि नाही?. आपल्या डोळ्यावरील सनातनी धर्माचा पापुद्रा हटविल्याशिवाय तुम्हाला ते शक्यही नाही. अश्या या महामानवाचा मृत्यु २४ डिसेंबर १९७३ रोजी झाला.


 


आज १७ सप्टेंबर भारतातील सत्यशोधक क्रांतिकारी समाजसेवक, राजनेता इरोड वेंकट नायकर रामासामी यांची जयंती त्यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन !!




 


संदर्भ-  http://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0

 



लेखं- बापू राऊत सर.


No comments:

Post a Comment

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...