प्रबोधन परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे...
मित्र-मैत्रिणीनो, तुमचा हा "प्रबोधन ब्लॉग" केवळ.... ब्लॉग नव्हे ही एक 'इ-चळवळ' म्हणू शकता... आजवर फेसबुक वर... आम्ही समाजातील, धर्मांतील काही अनिष्ठ प्रथांवर कडाडून टीका केली, जनजागृती घडवून आणण्यास हातभार लावला आणि त्याला जसा विरोध त्यापेक्षा जास्त पटीने पाठिंबाही लाभला.या चळवळीत आजवर केवळ धार्मिक गोष्टींवर टीका न करता आम्ही खोटा इतिहास, स्त्री-भ्रुण हत्या, मुली व स्त्रियांवर होणारे लैंगिक शोषण, तसेच समाजातील इतरही बर्याच गोष्टींवर आम्ही कडाडून हल्ला तर केलाच पण त्यासोबत लोक या जुनाट चिखलातून वर येउन आधुनिक विचारधारेचं, आधुनिक जगताचं बोट धरून कसे चालतील याची काळजी घेतली.
"प्रबोधन......" च्या वाचकांनो आपला ब्लॉग व ब्लॉगचे सर्व Admins हे कोणत्याही पक्ष, संस्था वा ब्रिगेड शी संबंधित नसून आम्ही सर्वजण स्वतंत्र आहोत. इथे मांडले जाणारे सर्वच विचार स्वभ्यासातून, त्यांची पूर्णतः छाननी करून टाकले जातात ना कि कोणाच्या कॉपी-पेस्ट मधून उचलले जातात..!! ज्याचा उद्देश पूर्वीपासून ते आजपर्यंत केवळ खरा इतिहास लोकांसमोर यावा.. दैवाच्या, कर्मकांडांच्या आहारी लोकांनी न जाता स्वशक्तिवर, स्वकर्तृत्वावर लोकांनी विश्वास ठेऊन त्याप्रमाणे आचरण करावे हाच होता आणि इथून पुढेही असेल.. त्याचप्रमाणे इथे व्यक्त झालेल्या कोणत्याही लेख वा विचारांसंबंधी, त्याच्या सत्यतेविषयी कोणतीही शंका आल्यास आम्ही ती लगेच काढून टाकतो किंवा त्यात योग्य ते बदल करतो, त्यामुळे त्याच्या सत्यतेविषयी खात्री बाळगावी.
आज काही महाशय व फेसबुक पेजेस सुद्धा आमच्या हेतूविषयी शंका उत्पन्न करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. अर्थात लोकप्रवाहाच्या विरोधात मत प्रदर्शित करणाऱ्या प्रत्येकास असा विरोध 'बदल नको असलेल्या' शक्तींकडून होत आलाय याला आम्ही अपवाद कसे असणार..?? उलट आज दाखल घेतली जातेय, आणि आम्हाला येणाऱ्या समर्थनार्थ फोनकोल्स वरून समाजाला, आजच्या तरुण पिढीला बदल हवाय असे दिसताना पाहून आम्हाला होणारा आनंद शब्दांत व्यक्त होईल असा नाही.
मित्र-मैत्रिणीनो, प्रबोधन टीममधील आम्ही सर्वजण आपल्यासारखेच तरुण आहोत. आमचे लेख वाचून बऱ्याच जणांचा आम्ही फार वयस्कर आहोत कि काय..?? असा गैरसमज होत असतो. डॉ. आशिष, गौरव, निलेश व जयंत आम्ही सर्व तर सारख्याच वयाचे म्हणजे अजून पंचविशीही पार न केलेले तरुण आहोत, पण तरुण असे विचार करू शकत नाहीत काय..?? आज तरुणांनीच "जे चालत आलंय ते तसंच चालू दे" असे म्हटले तर समाजात, सामाजिक मानसिकतेत बदल कधीच घडणार नाही आणि याच विचारांनी आम्ही समविचारी मित्र एकत्र आलो नि हे पेज सुरु केले.. आम्हीही तितकेच करिअरला महत्व देतो जितके कि तुम्ही देत आहात.. दैनंदिन कामकाजातून वेळात वेळ काढून आम्ही आपल्या समोर सत्य ठेवत असतो, ज्याकरिता आपला पाठींबा हवा आहे. आम्हांला आमचे आदरणीय Admin कुसुमताई आणि जितेंद्रदादा यांचे देखील वेलो-वेळी मार्गदर्शन मिळत असते.
प्रेम-बिम यांसारख्या वेळखाऊ गोष्टींना अंशत: तिलांजली देऊन जेव्हा मी प्रबोधनाची वाट धरली तेव्हा धर्मातील काही कालबाह्य रूढी-परंपरा व खोटा इतिहास यांवर प्रसंगी जहाल शब्दांत टिका केली, तेव्हा प्रथमत: आमचे बंधू निलेश कळसकर यांच्यांप्रमाणे मला(गौरव) वाटायचे कि मी कोणाच्या भावना तर दुखावत नाही ना..?? शेवटी आम्हीही भारतीयच ना..?? 'भावनेचा' विचार आडवा येणारच..!!
पण ज्याप्रमाणे हे दुखणार हे माहित असूनही एखादा डॉक्टर पेशंटला तो बरा व्हावा म्हणून इंजेक्शन टोचतो, तेच आम्हीही करतोय.. जसं इंजेक्शन घेतल्यावर दुखलं म्हणून डॉक्टरच्या नावाने लोक बोटं मोडतात, तसेच आमच्या नावाने बोटं मोडणार्यांची संख्या कमी नाही.पण बरं व्हायचं असेल तर हे प्रबोधनरूपी व सत्यरूपी इंजेक्शन घ्यावचं लागेल.. अर्थात त्यानंतर ते टोचलं म्हणून शिव्या घालायच्या कि बरे झालो म्हणून आनंदी व्हायचं हे सर्वस्वी आमच्या 'सामाजिक पेशंट' वर अवलंबून आहे.
मित्र-मैत्रिणीनो, आम्ही समाजसेवा करत नाही आम्हाला कुणी समाजसेवक असं संबोधू नये आम्ही समाज प्रबोधन करतो समाजसेवेमध्ये आणि समाज प्रबोधनामध्ये मुलभूत असां फरक असतो. भिकाऱ्याला भीक देणे ही समाजसेवा असते तर भिकाऱ्याला भीक मागायची वेळच येवू नये अशी व्यवस्था निर्माण करणे हे समाज प्रबोधनाचे काम असते
प्रबोधन या विचारमंचावरून आम्ही जे काही सांगतो ते तुम्ही तंतोतंत खरे आहे असं माना असां आमचा आग्रह नाही ते तुम्ही सगळं मनात ठेवा आणि आम्हाला चांगलच म्हणा असाही आग्रह नाही जे आम्ही सांगतो जे आम्ही मांडतो ते पुराव्यानिशी मांडतो ते सत्याच्या आधारावर मांडतो ते इतिहासाच्या पुराव्यावरून मांडत असतो तर त्याच्यावर तुम्ही फक्त विचार करावा आणि विचारांती तुम्हांला जे योग्य वाटेल तो तुम्ही निर्णय घ्यावा असां आमचा सर्व वाचकांना सल्ला आहे.
लोकं आम्हाला असं म्हणतात तुम्ही ब्राम्हणांना शिव्या देतात मी असं सांगेल भारताचा इतिहास हा शोषणव्यवस्थेचा इतिहास आहे. आणि या शोषणव्यवस्थेमध्ये शोषक वर्ग हा ब्राम्हण आहे. त्याला आम्ही जवाबदार नाही. आणि ब्राम्हणांला ब्राम्हण नाही म्हण्याच तर काय म्हणायचं ?? हा माझा तुम्हांला प्रश्न आहे. अनेक वेळा अनेक स्त्री-पुरुषांशी जाती व्यवस्थेवर चर्चा करताना ब्राह्मणी आणि अब्राह्मणी असे शब्द येतात तेव्हा हे "पुरोगामी" सदरात मोडणारे लोक तुम्ही जातीयवादी आहात असा आरोप करतात किंवा मग जाती व्यवस्थेत केवळ ब्राह्मनांचेच वर्चस्व आहे का ? असे विचारतात काही लोक खोडसाळपणे विचारतात तर काही लोकांना या संकल्पनांचा अर्थच माहित नसतो... जाती व्यवस्थेवर चर्चा करीत असताना ते या संकल्पनांना जातीच्याच अंगाने घेतात पण या संकल्पना जातीवाचक नसून ऐतिहासिक समाजशास्त्रीय संकल्पना आहेत एकूण जातिव्यवस्थेतील अधिसत्ता लक्षात घेता या प्रवृत्तीदर्शक आहेत. कॉ. शरद पाटील या संकल्पनांचे अर्थ पुढील प्रमाणे विशद करतात...
१. ब्राह्मणी प्रवृत्ती - जी जात-वर्ग-स्त्रीदास्य विचारांचे समर्थन करते आणि त्यात सुधारणा घडवून आणू इच्छिते.
२. अब्राह्मणी प्रवृत्ती - जी जात-वर्ग-स्त्रीदास्य विरोधातील विचारसरणी असून पर्यायी समानतेच्या तत्वाची पाठराखण आणि मांडणी करत असते.
वरील प्रवृत्ती या केवळ आपण ज्या जातीत जन्माला आलो आहोत म्हणून निर्माण होत नाहीत तर आपण कोणता ऐतिहासिक वारसा स्वीकारतो त्यावर अवलंबून आहे. वरील संकल्पनांचा अधिक विस्तार करण्याला अधिक वाव आहे कारण त्यातच त्याचे क्रांतीकारकात्व सामावलेले आहे.
हा ब्लॉग वैज्ञानिक दृष्टीकोण समोर ठेऊन बनवण्यात आलेला आहे. आपल्या समाजात चालणार्या अनिष्ट परंपरा, चालीरीती, कुप्रथां, अंधश्रद्धा,या सर्व गोष्टीवर आपल्या समूहात कडकडून हल्ला केला जाईल. आपल्याला चर्चेमधून वैचारिक मंथन करायचे आहे. आमचा उद्देश कुणाच्याही धर्माविरुद्ध नाही तर विकृती व अंधश्रद्धेविरुध्द आहे. इथे असणारा प्रत्येक जन हा फक्त आणि फक्त भारतीय आहे आणि त्याने भारताचा आदर केला पाहिजे !!
छत्रपति शिवाजी महाराज, म. फुले , प्रबोधनकार ठाकरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, गाडगे बाबा, संत कबीर' संत तुकाराम, महर्षी कर्वे यांसारख्या महापुरुषांच्या अस्सल विचारांनी प्रेरित होऊन जनप्रबोधनाचा गाडा हाकणाऱ्या आम्हा सारथ्यांना आपली अशीच साथ हवीये.. आम्ही आमचे म्हणणे निर्भीडपणे मांडत आलोय आणि मांडत राहू, आपली साथ.... आशीर्वाद असेच सोबत राहोत हीच प्रार्थना...!!
प्रबोधन फेसबुक पेज-
https://www.facebook.com/prabodhanteem
प्रिय मित्र-मैत्रिणीनो तुम्ही आपल्या तक्रारी, आपले अभिप्राय आम्हाला nilesh.kalskar53@gmail.com या इ-मेल पत्त्यांवर कळवू शकतात.
"प्रबोधन- जगाला घडवण्याआधी स्वतःला घडवूया !!"
संपादक मंडळ -
१ जितेंद्र माने.
२ कुसुम भोईर.
३ डॉ आशिष तांबे.
४ अभिषेक ठमके.
५ जयंत निकम.
६ निलेश कळसकर.
आपल्या ब्लॉगचे वेब डेव्हलपर-
अभिषेक ठमके.
Great Work...keep it up...am vry much impressed after seeing ur blog...!!
ReplyDeletenice dosto ! mi kay madat karu ka?
ReplyDeleteThis is really a noble cause. I've also started my long journey on this path.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteGreat job which is doing by prabodhan team. We want also like this types of persons. We are also doing this type of work in social which name of banner is "SOCIAL EDUCATION MOVEMENT". We organises cadre camp. Now we are going to in print media soon... In next month i.e,26th Jan 2014, inauguration date from NAGPUR. So what u think about our banner & plz give reply. We waiting.....
ReplyDeleteसदर ब्लॉग मधले लेख खूपच फायदेशीर आणि सर्व गटातील व्यक्तींनी वाचण्यायोग्य आहेत. हि चळवळ सुरु केल्याबद्दल आभार. धन्यवाद अभिषेक ठमके आणि प्रबोधन परिवारातले अन्य सदस्य.
ReplyDeleteअत्यंत आवश्यक कार्य तुम्ही करत आहात.
ReplyDeleteभावी कार्यास शुभेच्छा.
प्रथमता हे ब्लाॅग तयार केल्याबद्दल संपादक मंडळाचे खुप खुप आभार.आजच्या या आधुनिक जगात बहुजन वर्गातील तरूणांचे माझे फिरवुन त्यांच्या हातात तलवार देण्याचे काम सुरु आहे.म्हणुन त्यांना खर्या इतिहासाची जाण करुन त्यांच्या हातात पेन देवुन क्रांती करण्याची गरज आहे.नाहीतर सुशिक्षित गुलामगिरी आल्याशिवाय राहणार नाही.आपल्या कार्याला मनापासून शुभेच्छा.क्रांतीकारी जय भिम 🙏🙏🙏
ReplyDeleteGreat work
ReplyDeleteJay Bhim.
ReplyDelete