'फेसबुक'वर ही शिष्टाचार पाळावेत !!
१) फेसबुक हे एक मुक्त विचारपीठ आहे... या ठिकाणी कुठलीही विषमता भारतीय मिडिया सारखी नाही. म्हणून फेसबुक वरही शिष्टाचार पाळावेत.
२) दुसऱ्याचे साहित्य कॉपी करतांना आपण खालचे फक्त दोन ओळीचे त्या लेखकाचे किंवा कवीचे नाव सोडून देणे (कॉपी न करणे) म्हणजे एक प्रकारची साहित्यिक चोरीच आहे. कॉपी करणारे मात्र निनावी साहित्य टाकण्यात धन्यता मानतात. आजपर्यंत प्रस्थापित व्यवस्थेने असेच अनेक आपले हिरे दाबले... प्रतिगामी व्यवस्थेपेक्षा साहित्य चोरी करणारे वेगळे काय करीत आहे ? म्हणून कृपया दुसऱ्याचे साहित्य घेतांना नावासहीत प्रकाशित करावे.फार तर लेखकाच्या खाली 'संकलक' म्हणून पोस्ट प्रकाशित करणारा नाव टाकू शकतो.
३) प्रतीगाम्यांना उत्तर जरूर द्यावे... पण जास्तवेळ प्रतीगाम्यांशी वादविवाद करण्यापेक्षा आपल्याच बांधवांचे प्रबोधन करणे योग्य राहील.. आपल्या बांधवांचे प्रबोधन करतांना तो कधीतरी परिवर्तन स्वीकारेल अशी आशा ठेवावी.
४) एखाद्या पुस्तकातील उतारा पोस्ट करतांना त्याचा संदर्भ द्यावा.
५) लिहितांना प्रतिक्रिया देतांना आपल्या फ्रेंड लिस्ट मध्ये महिला भगिनी आहेत याचे भान ठेवावे.
६) अश्लील वक्तव्ये करणाऱ्या मूर्खांना त्यांच्याच भाषेत उत्तरे देण्यापेक्षा Direct Block करावे.
टीप:- हे माझे वैयक्तिक मत आहे. कुणी सहमत असावेच असा आग्रह नाही. मला जे वाटले ते लिहिले. आपण आपले विचार व्यक्त करू शकता. प्रतिक्रियांचे स्वागत आहे.
No comments:
Post a Comment
धन्यवाद !!