तरूणी होणार लखपती, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले सुकन्या योजना मंजूर !!
०४ सप्टेंबर... लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रापासून ते राज्य सरकारपर्यंत सत्ताधार्यांनी योजना, अनुदान, प्रस्ताव मंजूर करण्याचा सपाटा लावलाय. गेल्या दोन वर्षांपासून रखडलेली क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले सुकन्या योजना अखेर मार्गी लागली आहे. राज्य मंत्रिमंडळाने महत्त्वपूर्ण अशा सुकन्या योजनेला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे राज्यातील दारिद्र्य रेषेखाली तरूणी आता लखपती होणार आहे. ही योजना १ जानेवारी २०१४ पासून अंमलात येणार आहे.
या योजनेसाठी राज्य सरकारनं ५७३ कोटींची तरतूद केलीय. या योजनेनुसार मुलगी जन्माला आल्यावर तिच्या नावे राज्य सरकार आयुर्विमा महामंडळात २१ हजार २०० रूपये तिच्या नावे गुंतवणार आणि ती १८ वर्षांची झाल्यानंतर तिला १ लाख रूपयाची मदत मिळणार आहे. ही योजना फक्त दारिद्र्य रेषेखाली कुटुंबांना लागू आहे. या पैशांतून तिला दरवर्षी इयत्ता नववी ते बारावी पर्यंत दर महिन्याला १०० रूपये शिष्यवृत्ती मिळणार आहे.
तसंच मुलगी अठरा वर्षाची होत नाही तोपर्यंत लग्न करू नये अशी अटही या योजनेत घालण्यात आलीय. जर मुलीच लग्न १८ च्या अगोदर केल्यास ही योजना मिळणार नाही अशी अट घालण्यात आलीय. ही योजना सध्या मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक आणि दिल्लीत राबवली जात आहे.
उद्दिष्ट-
१. स्त्रीभ्रूणहत्या रोखने
२. मुलीचे आरोग्य व शिक्षण सुधारणे
३. बालविवाह रोखणे.
४. भविष्यासाठी आर्थिक तरतूद करणे.
५. मुलीच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक द्रष्टीकोण आणने.
या योजनेतील महत्त्वाचे मुद्दे-
१) मुलगी जन्माला आल्यावर २१ हजार २००रुपये तिच्या नावे गुंतवणार.
२) मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर तिला १ लाख रुपये मिळणार
३) घरातली जबाबदार व्यक्ती गेली तर ७५ हजार रुपये देणार.
४) घरातली कमावती व्यक्ती अपंग झाल्यास ६० हजार रुपये देणार.
५) दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील मुलींसाठी ही योजना लागू .
६) पहिल्या दोन अपत्यांना ही योजना लागू.
७) दारिद्र्य रेषेखालील कुटुंबात वर्षाला सरासरी २ लाख ३० हजार मुली जन्माला येतात या योजनेसाठी राज्य सरकारनं ५७३ कोटींची तरतूद केलीय.
No comments:
Post a Comment
धन्यवाद !!