सत्यशोधक विवाह कसे करावे?

मित्रांनो..मैत्रिणिनो या देशातील पहिला सत्यशोधक विवाह म.फुलेंनी घडवुन आणला. पुरोहिताशिवाय लावलेला हा विवाह २५ डिसेंबर १८७३ रोजी पार पडला. वराचे नाव सीताराम जबाजी आल्हाट तर वधु राधा ही बजुबाई निंबणकरांची कन्या या विवाहाचा खर्च स्वत: सावित्रीमाईंनी केला. त्याकाळी त्यांना किती विरोध झाला असेल याची कल्पना न केलेलीच बरी. त्यांच्यावर खटला सुद्धा भरण्यात आला. मात्र जोती-सावित्री जराही डगमगले नाहीत. क्रांतीसुर्य व क्रांतीज्योतिच ते!

आजही सत्यशोधक विवाह ही काळाची गरज आहे. अतिशय साधी, सरळ व सोपी विवाह पद्धत आम्हाला म.फुलेंनी १९ व्या शतकातच दाखवुन दिली. आम्हा बहुजनांना ती आजही माहीती नाही, कळली नाही; वळली नाही... माहीती होऊ दिली नाही.

म. फुले म्हणतात,
''वधु-वराचे जातीस नीच, हलकट मानना-या धुर्त, कपटी आर्य-भटाची या कामी सावली सुद्धा पडु देऊ नये. म्हणजेच बामन, पुरोहित अर्थात, कर्मकांड गायब. म्हणजे देवकुंडी नको, मारोती नको.[पटत असेल तर]
आपल्या गावातील म.फुले, सावित्रीमाई फुलेंच्या पुतळयास अभिवादन करावे. अक्षदा धान्याऐवजी फुलांच्या पाकळ्या कराव्या. कारण मित्रांनो आपल्या देशात दरवर्षी जवळपास २५ कोटी लग्न होतात.प्रत्येक लग्नात सरसरी १० किलो धान्य आम्ही फेकतो.[करा हिशोब] एकीकडे अद्यापही काही लोक असे आहेत की, जे एक सांजी उपासी पोटी झोपतात.[करा विचार] मंगलष्टके म. फुलेंनी लिहिलेलीच म्हणावे. आर्थिक बळ असेल तर ती छापावी सोबत म.फुलेंचे विचार सुद्धा टाकता येतात.

वरमुलगा वधु मंडपात आल्यावर वर-वधुं सोबत त्यांचे आई वडील घेऊन सावित्रीमाई व म.फुलेंच्या फोटो प्रतिमांचे अभिवादन करावे. उपस्थितांना थोडावेळ म.फुलेंचे विचार सांगुन प्रबोधीत करावे. या नंतर वधु-वरांच्या मध्ये अंतरपाट धरुन म. फुलेंनी लिहिलेल्या सुंदर मंगलाष्टकांचे गायन करावे. म.फुलेंनी लिहीलेली शपथ वर-वधुस द्यावी. वर-वधुंनी एकमेकांच्या गळ्यात पुष्पमाळा घातल्यानंतर त्यांच्या वस्त्राची महासत्यगाठ बांधावी. सर्व उपस्थितांनी सत्यलग्न लावावे.

भोजनाचा सगे-सोयरे, मित्र परीवारांनी आनंद घ्यावा. दुसरे दिवशी वराकडे वरात पंगत [रिसेप्शन] देण्याची पद्धत आहे. त्यावेळी सुद्धा आपण फुले दांम्पत्यांच्या फोटो प्रतिमांचे अभिवादन करुन त्यांच्या जीवन कार्याविषयी थोडक्यात मार्गदर्शन केले तर अधिक उत्तम होईल. बाकी सर्व आनंद ईतर लग्नाप्रमाणे साजरा करावा.

मित्रांनो..मैत्रिणिनो, म.फुलेंचे विचार सांगायलाच कोणाची फारशी हिंम्मत होत नाही. त्यांच्या विचारावर प्रत्यक्ष कृती करणे किती कठीण आहे हे आपण समजु शकतो. तरी करु या सुरुवात होऊ या सत्यशोधक !!

Thank u.. Umesh Ghogale

2 comments:

  1. मंगलाष्टक कुठे आहे त

    ReplyDelete
  2. Mayur Gaikwad here 9699736803

    Can you what's app me the articles and your contact details

    ReplyDelete

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...