खेड्यातील तरुणाच्या ब्लॉगला पाऊण लाख भेटी !!

खेड्यातील तरुणाच्या ब्लॉगला पाऊण लाख भेटी !!

 




 

वाशीम - खेडेगावात इंटरनेटचा काय "ट' का "फ' माहीत असणार? खेड्यातील लोकांमध्ये कुठे आली एवढी प्रतिभा? अशा प्रश्‍नांना एका खेड्यातील तरुणाने आपल्या कामगिरीतून सडेतोड उत्तर दिले आहे. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी अभ्यासकांना सोय व्हावी, या गरजेपोटी या तरुणाने एक खास ब्लॉग तयार केला आहे. या "हटके' ब्लॉगवर सध्या "व्हिजिटर्स'च्या उड्या पडत असून, ही संख्या पाऊण लाखाच्या घरात आहे.




गोविंद महादेव उगले, असे या युवकाचे नाव असून, तो वाशीमपासून 15 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या काजळंबा या खेडेगावी राहतो. त्याचे शिक्षणही जेमतेम बीए! पण भावी अधिकाऱ्यांच्या सोयीसाठी त्याने तयार केलेला ब्लॉग सध्या चांगलाच फॉर्मात आहे.




http://estudyexam.blogspot.in/ असा त्याचा पत्ता आहे. स्पर्धा परीक्षेच्या सरावासाठी तब्बल तीस हजार प्रश्‍न, चालू घडामोडी, प्रत्येक जिल्हा, राज्य, देश, याबद्दलची इत्थंभूत माहिती आणि इतरही महत्त्वाच्या बाबींचा त्यात अंतर्भाव आहे. "चला, नोकरी मिळवू या!' या लिंकमधून स्टाफ सिलेक्‍शन कमिशन, पोलिस उपनिरीक्षक, विक्रीकर निरीक्षक आदींसह संघ व राज्य लोकसेवा आयोगाच्या विविध पदांची माहिती मिळते. याशिवाय "यशस्वितांच्या मनोगता'ची एक स्वतंत्र लिंक आहे. त्यामध्ये भारतीय प्रशासन सेवेतील भरत आंधळे (नाशिक), डॉ. सेना अग्रवाल, ललितालक्ष्मी व्यंकटरमणी यांची अत्यंत गाजलेली "कॅन आय डू इट?' ही व्हिडिओक्‍लिप, आयपीएस विश्‍वास नागरे-पाटील आणि वाशीमचे निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांची उमेदवारांना प्रेरित करणारी मनोगते आहेत. आपण केवळ अभ्यासकांसाठी शैक्षणिक दृष्टिकोन ठेवून हा ब्लॉग बनविलाय. त्यासाठी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांची प्रेरणा व मार्गदर्शन आहे, असेही त्याने सांगितले.




औरंगाबादच्या सरस्वती भुवन कॉलेजमधून गोविंदने कला शाखेची पदवी पूर्ण केली. त्यानंतर पुणे विद्यापीठात नेटवर्किंगचा कोर्स केला. या दरम्यान, सुप्रसिद्ध संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांचे व्याख्यान त्याच्या मनावर खोलवर रुजले. यातूनच माहिती तंत्रज्ञानाची आपल्या शिक्षणासोबत सांगड कशी घालता येईल, ही प्रेरणा मिळाल्याचे तो सांगतो. सध्या गोविंद "एमकेसीएल'मध्ये "ओऍसिस'चा मार्केटिंग मॅनेजर म्हणून कार्यरत आहे.




गोविंद महादेव उगले(Govind Ugale) भाऊ साऱ्या महाराष्ट्रातील तरुण मित्र-मैत्रिणीकडून आपले आभार मानतो आणी आपल्या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्या !!

 

 


 

लेखं- गजानन वाघ.


धन्यवाद- दै.सकाळ.




No comments:

Post a Comment

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...