बारामती तालुक्यात मुस्लीम समाजाचा सत्यशोधक विवाह... इतिहासात नोंद करणारी घटना !!
बारामती तालुक्यातील सोनवडी या गावातील सैय्यद कुटुंब मधील कन्या व हडपसर येथील शेख परिवारा मधील मुलाचा लग्न समारंभ बारामती मध्ये काही दिवसापूर्वी पार पडला, पुरोगामी विचारसरणी बघता मुलांसोबत मुलींना सुद्धा तेवढचं महत्वाचे आणी बरोबरीची जागा मिळावी म्हणून हा लग्न सोहऴा विशेष ठरला, लग्नाच्या ठिकाणी लग्नाच्या व्यासपीठावर मुलासोबत मुलगी सुद्धा असली पाहिजे त्या दोघांचे आई वडिलसुद्धा असले पाहिजे हा या मागचा हेतु होता, या संपूर्ण लग्नाचे नियोजन नवरी मुलीची बहिन कुमारी करिष्मा सैय्यद (कमिंस इंडिया कंपनीत मनेजर) या युवतीने केले. या विवाहासोहळ्याला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सुद्धा आवर्जून हजर होते.
मौलवीणी टाकलां सय्यद कुटुंबावर जो बहिष्कार-
मुस्लीम समाजातील पुरोगामी जोडप्याने पारंपारिक पद्धतीला फाटा देऊन स्त्रीला निकाह मध्ये योग्य सन्मान देऊन आधुनिक पद्धतीने निकाह काही दिवसाच्या पूर्वी केला होता. या निकाह मध्ये स्त्रीला पुरुषाच्या बरोबर स्थान देण्यात आले होते. सामान्य मुस्लीम समाजाने या निकाहला नावाजले सर्व समाजाला त्या निकाह ची कल्पना आवडली होती. पण बारामती मधील पुणे मधील सनातनी धर्मांध मौलवी काझी इतर कट्टरवादी मुस्लीम लोकांनी या निकाह ला इस्लाम विरोधी आहे अशी बोंब ठोकून सत्यशोधकी प्रमाणे निकाह करणाऱ्या दाम्पत्याला आणि त्याच्या कुटुंबियांना वाळीत टाकले आहे. त्यांच्या कुटुंबावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन हि केले आहे. हे कोण आहेत मौलवी यांना मुस्लीम समाजाच्या वतीने निर्णय घेण्याचा अधिकार कोणी दिला आहे ???
अत्यंत विकृत पद्धतीणे मुस्लीम समाजाला खड्यात घेऊन जाण्यासाठी हे नेहमी प्रयत्नशील राहतात.... बरेच मौलवी काझी हे बिहार यूपी आणि इतर भागातून आपल्या राज्यात येऊन लोकांना धार्मिक उपदेश देण्या ऐवजी धार्मिक द्वेष देणारे भाषणे ठोकून मुस्लीम समाजातील युवकांना दिशाभूल करण्याचे काम करतात. आता मुस्लीम समाजाने संघटीत होऊन या धर्मांध विकृत धर्मगुरुणां विरोध करण्यासाठी एकवटले पाहिजे. इस्लाम खतरे में.. है इस्रायल में अमेरिका में नेपाल चीन में मुस्लीम लोकांवर अन्याय होतोय हे सांगून येथील लोकांची माथी भडकावण्याचे प्रयत्न हे धर्मगुरू मौलवी वैगेरे करतात. समाजाला दिशा देण्याऐवजी ते समाजाला चुकीच्या मार्गाने घेऊन जातात. उद्या यांना थोडे पैसे आणि काही गोष्टी दिल्यातर ते मुस्लीम लोकांचे शिरकाण करण्यासाठी हि मदत करतील यांना मुस्लीम समाजाने योग्य धडा शिकवावा. सय्यद कुटुंबावर जो बहिष्कार टाकला आहे तो उडवून लावून बहिष्कार टाकणाऱ्या मौलवीना कट्टरवादी लोकांना योग्य धडा शिकवावा.परिवर्तन स्वीकारले तरच मुस्लीम समाज या जगत टिकेल नाही तर मुस्लीम समाजाला कोणतेही भवितव्य राहणार नाही.
No comments:
Post a Comment
धन्यवाद !!