दिल्ली बलात्कार केस मध्ये आरोपींना फाशी झाली यात आनंद मानण्यासारखे आहे का ??

दिल्ली बलात्कार केस मध्ये आरोपींना फाशी झाली यात आनंद मानण्यासारखे आहे का ??

 

 



 

दिल्ली बलात्कार केस मध्ये आरोपींना फाशी झाली... यात आनंद मानण्यासारखे आहे का....?? त्याने बलात्कार थांबतील का... ?? मुख्य म्हणजे ही फाशी फक्त बलात्काराकरिता नाही तर दुर्मिळ क्रूर घटना म्हणून आहे... क्रूर हत्येकरिता आहे....... मग नुसत्या बलात्काराच्या केसेसचं काय.....???


 


नुसत्या बलात्काराच्या घटनेतही अशीच जबर शिक्षा असायला हवी.... कारण तरच काही जरब आणि धाक बसू शकते, अन्यथा नाही.. मानवतावादी दृष्टीकोनातून फाशी सारख्या शिक्षा नक्कीच अघोरी वाटतात...परंतु त्या दिल्या नाहीत तर काळ सोकावतो....


 


एखाद्या नुसत्या बलात्काराच्या केसमध्ये हत्या नसली तरी त्या स्त्रीच्या स्वाभिमानाची हत्या आहे तिथं..... तिच्या शरीराला वस्तू म्हणून जबरदस्तीने वापरलं जातंय... त्याचे घाव तिच्या नुसत्या शरीरावरच नाही तर मनावर, अंतर्मनावर आयुष्यभराकरिता राहतात....... ते कधीच भरून येणार नाहीत.....स्त्रीला वस्तू समजण्याच्या या पुरुषी वृत्तीवर अंकुश बसवायचा तर जबर शिक्षेच्या दहशतीची आवश्यकता आहेच.......


 


परंतु आतापर्यंत जे संस्कार हजारो वर्षांपासून स्त्रियांवर, मुलींवर पद्धतशीरपणे, जाणूनबुजून करण्यात आले तसेच ते पुरुषांवर, मुलांवर होणं गरजेचं आहे..मुलगी महालातली असो नाहीतर झोपडीतली.... उच्चशिक्षित असो की अशिक्षित..... करिअरिस्ट असो की मजूर वर्गातली.... तिला सारखेच संस्कार या समाजाने केले... की तुझे शरीर महत्वाचं आहे.. ते लपव... रात्रीबेरात्री एकटी फिरू नकोस.. सांभाळून राहा... पुरुषांसमोर खाली मान घालून, नजर ढाळून, पदर सावरून चाल... आणि या गोष्टीत समाजातील कोणत्याही स्तरातील स्त्रियांना अपवाद केले नाही....


 


तर मग आज पुरुष देखील झोपडीतला असो की महालातला... अशिक्षित असो की सुशिक्षित...... साऱ्याच स्तरातील पुरुषांपर्यंत हा संदेश पोचायला हवा की स्त्रीचं शरीर ही तुमची मालमत्ता नाही... तुमच्या भावना चाळवत असतील, तर त्यावर नियंत्रण राखायला शिका.... तिचं शरीर पाहून भावना चाळवत असतील तर तिच्याकडे पाहू नका... स्त्रीचा आदर राखून नजर खाली घालून राहा तिच्यासमोर......


 


हे संस्कार त्यांच्यावरदेखील पद्धतशीरपणे लहानपणापासून घरी-दारी-शाळेत, साऱ्याच घटना, प्रसंग, निमित्त यांतून होत राहाणे गरजेचे आहे.... जर असं केलं नाही तर उद्या या दिल्लीतल्या मुलांप्रमाणेच तुम्हालाही शिक्षा होण्याच्या शक्यता आहेत... हे लहानपणापासून बिंबले पाहिजे....... सध्या छेडछाडीच्या प्रसंगातही तत्काळ कायदेशीर कारवाया व्हायला हव्यात... शिक्षा व्हायला हव्यात..........


 


थोडक्यात कायद्याचा धाक आणि सामाजिक संस्कार या दोन्हींची नितांत आवश्यकता आहे..तरच यासारख्या गोष्टींना आळा बसू शकतो.... काय बरोबर ना??  तुमचे विचार मांडा भारतीयानो !!


विचार- प्रा. अलका असरेकर ताई.


No comments:

Post a Comment

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...