जिवंतपणीच आई-वडिलांच्या सर्व इच्छा पूर्ण करने म्हणजेच खरे श्राध्द !!

जिवंतपणीच आई-वडिलांच्या सर्व इच्छा पूर्ण करने म्हणजेच खरे श्राध्द !!

 

 

मिठाईच्या दुकानात एक मित्र भेटला.  मला म्हटला : आज आईच श्राध्द आहे, आईला लाडू खूप आवडायचे म्हणून लाडू घ्यायला आलो. मला आश्चर्याचा धक्काच बसला, पाच मिनिटा पुर्वीच मी त्याच्या आईला मार्केटमध्ये भेटलो होतो . मी काही बोलणार तेवढ्यात, मित्राची आई हातात पिशवी घेवून इथे स्वत येवून पोहचली . मित्राला एक जोरदार थाप मारत मी विचारलं,

 



"भल्या माणसा , हि कसली चेष्टा करतोयस वेड्या , आई तर आहे तुझ्या बाजूला.."

 



मित्रानी आईच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवत जोर जोरात हसत म्हटला, अरे भाऊ, आईच्या मरणानंतर गायी वासरे नी कावळ्यांना लाडू खाऊ घालण्या एवजी मी आईला जिवंतपणी च तृप्त करू इच्छितो. त्याचे असे मत होते कि, "जिवंतपणीच आई-वडिलांच्या सर्व इच्छा पूर्ण करने म्हणजेच खरे श्राध्द". तो पुढे म्हटला , "आईला मधुमेह आहे, पण गोड खायला आवडते ,, म्हणून मी नेहमी फ्रीज मध्ये काही न काही ठेवून राखतो, जे जे तिला आवडत ते ते सर्व आणून ठेवतो, श्रद्धेनी लोक मंदिरात जातात , अगरबत्ती लावतात. मी पण लावतो ‘कासव छाप’ , आई झोपायला जायच्या आधी, मच्छर हाकलायला. सकाळी आई गीता वाचायला बसते नियमित, मी तिचा चष्मा साफ करून देतो, माझा असा समज आहे कि देवाचे फोटो साफ करत बसण्यापेक्षा, आईचा चष्मा साफ करण्यानी अधिकच पुण्य मिळेल" आणि मित्र त्याच्या आईसोबत निघून गेला, मी घरी येवून सुन्न मनानी पुन्हा पुन्हा त्याच गोष्टीचा विचार करत बसलो .

 



मित्राच्या भक्तीत मला जरा जास्तच तथ्य वाटल. रिती रिवाज म्हणून आपण श्राध्द करतो, पूर्वजांच्या नावानी पोटभर गोड धोड खातो, पण खरच ते त्यांच्यापर्यंत पोहचत नाही, एवढे निश्चित. अमेरिका आणि जपान सारख्या प्रगत देशात पण अशी टिफिन सेवा अजून तरी सुरु झालेली नाही. त्यांच्या जिवंतपणी, त्यांच्यावर दुर्लक्ष करणे, म्हणजे डोळे असून आंधळे होणे असे वाटते. खरे तर त्यांच्या उतार वयात आई वडिल , पैश्यापेक्षा प्रेम, आणि एक सच्चा आधार फक्त तुमच्यामध्ये शोधतात. आजच्या स्पर्धेच्या युगात मुलांवर खूप जबादारी आणि वेगवेगळ्या प्रकारचे तणाव असतात, याची त्यांनाही पुरे पूर जाणीव असते. पण तरीही जी मुले आई वडिलांची काळजी घेवू शकत नाही त्यांना देवही माफ करणार नाही. आज कितीतर वृद्धः माता पिता, कुटुंबियांकडून अवहेलना झेलतांना आपण पाहत असतो यावर 



कवी धर्मेश ची ओळ आहे...

 

''आधी माता मग पिता.. मग घेईन प्रभू नाम... मला नकोय दुसरे तीर्थ् धाम'' !!

 

पण आता, समाज बदललाय . लोकांची भाषा , वर्तवणूक , आणि जीवनशैलीवर पश्चिमेची सावली पडलीय .

 

(धन्यवाद- मुळ लेख - સુજલભાઈ પટેલ , मराठी अनुवाद : जयवंत पाटील बोरसे )



पितृपक्ष पंधारवडा सुरु झाला, आता जिकडे तिकडे या पंधरा दिवसात मृत पावलेल्या आई वडिलांना कावळयाच्या मार्फ़त जेवू घालण्याची आणि आत्मा शांत करण्याची पद्धत जिवंतपणी वडीलाना विचारले नाही, साभाळले नाही अणि मेल्यावर त्याना खाऊ घालणे म्हणजे निव्वळ खुळेपणा आहे.. खरे पाहता भित्रेपणा आहे बापाचा आत्मा भूत होउन मानगुटावर बसु नये किंवा अतृप्त राहू नये म्हणून केलेला उपद्व्याप !!





बरे श्राद्ध / पिंड दान करण्यासाठी पुरुष लागतो स्त्रियाना तो अधिकार नाही ...? आता आपन पुरानात काय सांगितले आहे ते पाहू ..


१) गरुड़ पुराण :- पुत्रा शिवाय मनुष्याला मुक्तता नाही. पितृ पक्षात मुलाकडून पिंड दान केले नाही तर आत्मा स्वर्गात जात नाही


२) मार्कंडेय पुराण :- घरातील मुख्य पुरुषाने आपले मृत पितर यांच्या सोबत भूत, देव अणि ब्राम्हण यानाही अन्न दिले पाहिजे अणि असे केले तर त्याला समृद्धि / निरोगी शरीर अणि शेवटी मोक्ष मिळतो.



मित्रानो, हे सर्व थोतांड आहे, आपले धंदे चालावेत म्हणून धर्ममर्तंडानी करून ठेवलेली घाण आहे. कृपा करून या सर्व प्रथा बंद करा... कावळा तुमचा निरोप घेउन तुमच्या मृत पितराकडे जात नाही की पितारांचा आत्मा कावळयात येत नाही... तुमच्या मनातील भीतीचा फायदा घेउन हे सर्व रचण्यात आले आहे.


जिवंत असतांना आईबापाला निट जेवण नाही, त्यांना कधी कधी तर सरळ वृद्धाश्रमाचा रस्ता दाखिवला जातो आणि ते मेल्यावर मात्र लोक प्रतिष्ठेसाठी जेवण घालतो, ब्राम्हणांला बोलावून मोठा विधी करतो आणि दक्षिणा देवून त्याला सिद्ध सामुग्री देतो.




पिंडदान (श्राद्ध) योग्य की अयोग्य ??







 


काही प्रश्न आपणांकडून उत्तर अपेक्षित-

 


१)आज आपले सर्वांचे पूर्वज पिंड खायला कावळे बनून येणार काय ??

 

२)भारतातील तमाम पूर्वज एकत्र आल्याने कावळ्यांची पृथ्वीवरील संख्या वाढेल काय ??

 

३)आपले पूर्वज कावळा होते काय ?? वाघ,सिंह कोणी नव्हते ??

 

४)आपल्या पुर्वाजापर्यंत आगारीत टाकण्यात आलेले अन्न.. बिडी.. सुपारी.. ­पान.... त्यांना मिळेल काय ??

 

५)बिडी.. सुपारी.. पान सुपारी आपण आगरीत टाकून आपल्या मुलांना कोणता मेसेज ./संदेश देत आहोत ??

 

६)शहरात काही वेळेस कावळे येतच नाही ...याबद्दल काय ??

 

७)हि प्रथा सुरु झाली त्यामागचा उद्देश काय ??

 



बघा संत कबीर  असे म्हणतात...



 

"जिंदा बापाको रोटी न खिलावे | मरे
बाप पाछातायो...,
मुठभर चावल दाबे धरके कौवा बाप बुलय्यो |
अनादी दुनया कैसी भजनबिना तारीयो ?||"


- संत कबीर.



 एकनाथ महाराज म्हणतात..





"जिता मायबापा न घालिती अन्न|
मेल्या प्रेतावरी करिती पिंडदान ||१||
पहा पहा संसारीचा कैसा आचारु |
जिता अबोला मा मेल्या उच्चारू ||२||
जित्या मायबापा न करिती नमन |
मेल्यामागे करिती मस्तक वपन ||३||
जित्या मायबापा धड्गोड नाही |
श्राद्धी तळण मळणपरवडी पाही ||४||
जित्या मायबापा गालीप्रदन |
मेल्या त्याचेनी नावे देती गोदान ||५||
जित्या मायबापा नेदी प्यायला पाणी |
मेल्या पितरालागी बैसती तर्पणी ||६||
प्याया पाणी न घालिती सासरा जिता |
पिंडापासी येती मग दंडवता ||७||
एका जनार्दनी कृपेचे तान्हे | विधी निषेध
दोन्ही आतळो नेदी माने||८||




संत तुकोबाराय असे म्हणतात...

 



भुके नाही अन्न |
मेल्यावरी पिंडदान ||
हे तो चाळवा चाळवि |
केले आपणची ठेवी ||



 



प्रिय मित्र-मैत्रिणीनो मेल्यानंतर अन्न वाया घालवण्यापेक्षा आपण आपल्या आईवडिलांना जिवंतपणी काहीच कमी पडू देऊ नका... पिंड दान करू नका ! मृत झालेल्या वाड-वडिलांची स्मृति जतन करा, त्यानी केलेल्या चांगल्या कामाचे अनुकरण करा... त्यांचे चांगले विचार आत्मसात करा.. हाच त्यांचा योग्य स्मृति दिन होऊ शकतो !
जिवंतपणी आपण आपल्या आई-वडिलांकडे दुर्लक्ष केल्यास आणि मेल्यानंतर अनेक पूजा-अर्चा आणि पिंडदान केल्यास काय उपयोग त्याचा ?? काय पंटतय ना.. !!




 
धन्यवाद- सुनील चौधरी, સુજલભાઈ પટેલ, जयवंत पाटील बोरसे, अमोल गायकवाड)


 

लेखं संपादन- निलेश रजनी भास्कर कळसकर(सोबत प्रबोधन टीम)

https://www.facebook.com/nilesh.kalaskar2


1 comment:

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...