अंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य देण्यासाठी योजना !!

अंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य देण्यासाठी योजना !!






सरकारी जीआर-
 

शासन निर्णय क्रमांक: युटीए-१०९३/४५५/प्र.क्र.२०३/मावक-२ दि. १२ जानेवारी १९९६
 


शासन निर्णय क्रमांक: सीबीसी-१०९८/प्र.क्र.१५१/मावक-५ दि.७ मे १९९९




योजनेचा उद्देश्य-

 

 


मागासवर्गीय व सवर्ण समाजामध्ये असणारी दरी कमी व्हावी. समाजातील जातीयता नष्ट व्हावी, म्हणून शासनामार्फत आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यात येते.




स्वरूप-


आंतरजातीय विवाहित दाम्पात्त्यास प्रोत्साहनपर रु. ५०,०००/- अर्थसहाय्याचा धनाकर्ष पती पत्नीच्या संयुक्त नावाने जमा करण्यात येतो.




अटी व शर्ती-


   
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती पैकी एक व्यक्ती आणि सवर्ण हिंदू, जैन, लिंगायत, बौद्ध, शीख यांपैकी दुसरी व्यक्ती असा विवाह करणे आवश्यक आहे.
   
 


अनुसूचित जाती जमातींमधील व विमुक्त जाती व भटक्या जमातींमधील अंतर प्रवार्गांमध्ये झालेल्या विवाहास अर्थसहाय्य द्येय आहे.
   
 


या योजनेचा लाभ एकदाच देण्यात येतो.
   
 


विवाह नोंदणीचा दाखला आवश्यक आहे.
   
 


वधू वरांचा शाळा सोडल्याचा दाखला आवश्यक आहे.
   
 


दिनांक १ फेब्रुवारी २०१० नंतर आंतरजातीय विवाह झालेल्या जोडप्यांनाच रु. ५०,०००/- इतके अनुदान लागू राहील.



संपर्क-


 

संबंधित जिल्ह्याचे समाज कल्याण अधिकारी (गट अ ), जिल्हा परिषद.




धन्यवाद- महाराष्ट्र सरकार समाजकल्याण विभाग 




तुमचाच मित्र- निलेश रजनी भास्कर कळसकर(सोबत प्रबोधन टीम)

No comments:

Post a Comment

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...