योजना क्र १-
"इयत्ता ५ वी ते ७ वी मध्ये शिकणाऱ्या महाराष्ट्रातील 'विजाभज' व 'विमाप्र' प्रवर्गाच्या मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना"!!
सरकारी जीआर-
शासन निर्णय क्रमांक: इसीबी - १०९४ / ३२०३८ / प्र.क्र. ९०/ मावक-२/ दि. १२ जानेवारी १९९६
शासन निर्णय क्रमांक : इसीबी - २००३/ प्र.क्र. ४१७/ मावक- २/ दि. १३ मार्च २००५
योजनेचा उद्देश्य-
१) मुलींमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी.
२) शिक्षणातील मुलींच्या गळतीचे प्रमाण कमी व्हावे
३) शिक्षणातील आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे.
योजनेच्या अटी-
१) विद्यार्थीनी विजाभज व विमाप्र प्रवर्गातील असावी
२) इयत्ता ५ वी ते १० वी मध्ये शिक्षण घेणारी असावी
३) उत्पन्नाची अट नाही.
४) लाभधारक मुलगी शासनमान्य संस्थेत नियमित शिकत असावी.
लाभाचे स्वरूप-
प्रती विद्यार्थीनी प्रतीमहा रु ६० प्रमाणे १० महिन्यासाठी रु ६०० शिष्यवृत्ती देण्यात येते.
संपर्क-
१) जिल्हा समाज कल्याण अधिकारी.
२) संबंधित शाळेचे मुख्याध्यापक/ प्राचार्य.
धन्यवाद- महाराष्ट्र सरकार समाजकल्याण विभाग
-----------------------------------------------------------------------
योजना क्र २-
"इयत्ता ८ ते १० वी मध्ये शिकणाऱ्या महाराष्ट्रातील 'विजाभज' व 'विमाप्र' प्रवर्गाच्या मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना"!!
सरकारी जीआर-
शासन निर्णय क्रमांक : इमाव २००३/ प्र. क्र.२०१/ मावक - ३ दि. २५ जुलै २००३
योजनेचा उद्देश-
१) मुलींमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करणे.
२) शिक्षणातील मुलींच्या गळतीचे प्रमाण कमी व्हावे.
३) शिक्षणासाठी पालकांना आर्थिक मदत होणे.
योजनेच्या अटी-
१) विद्यार्थीनी विजाभज/ विमाप्र प्रवर्गातील असावी.
२) विद्यार्थीनी इयत्ता ८ वी ते १०वी पर्यंतच्या वर्गात शिक्षण घेणारी असावी.
३) उत्पन्नाची अट नाही.
४) लाभधारक मुलगी शासनमान्य संस्थेत शिकत असावी.
५) विद्यार्थीनी पूर्ण वेळ शिक्षण घेणारी असावी.
लाभाचे स्वरुप-
१) प्रति विद्यार्थींनी प्रतिमहा रु १००/- प्रमाणे १० महिन्यांसाठी एकूण रु १०००/-.
संपर्क-
१) संबंधित जिल्ह्याचे विशेष समाज कल्याण जिल्हा अधिकारी.
२) संबंधित शाळेचे मुख्याध्यापक/ प्राचार्य.
धन्यवाद- महाराष्ट्र सरकार समाजकल्याण विभाग
तुमचाच मित्र- निलेश रजनी भास्कर कळसकर(सोबत प्रबोधन टीम)
https://www.facebook.com/nilesh.kalaskar2
No comments:
Post a Comment
धन्यवाद !!