तुले, मले, त्याले, तिले...

तुले, मले, त्याले, तिले...


तुले, मले, त्याले, तिले
सांगून गेले बा फुले
ऐक तू माझ्या भाई रे
संमेलन आपलं नाही रे

माझ्या गड्या आज त्यांनी
क्रुर परशू छापला
खूप खपू वर्षांपूर्वी
शंभुकाला रे कापला

शिवाजीच्या कपाळी
पायाने लावले टिळे
देवा-धर्माच्या नावे
मेंदूला लावले टाळे

मायाळू आपला बळी
त्यांनी गाडला पाताळी
नाही ऐकलीच कुणी
आपल्या तुक्याची हाळी

आता ऐक म्हणा त्यांना
आमुची भीम गर्जना
अण्णाभाऊंच्या गळ्यानं
गाऊ जिजाऊ वंदना

कवी - विकास वि. देशमुख (वाशीम)

No comments:

Post a Comment

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...