आपले आदर्श कोण ??

आपले आदर्श कोण ??

 
आत्ताच फेसबुकवर पोलिस इतिहासातील पहिला एन्काऊन्टर फेम मन्या सुर्वे या गुंडा संदर्भात दोन पोस्ट वाचल्या अन सुन्न झालो काही फेसबुकींचे प्रताप पाहून तोंडाला अक्षरशः फेस यायचेच बाकी राहिलेय.


मन्या सुर्वेला मन्या 'भाई' काय, पहिला हिंदु डॉन काय, आणि मराठी वाघ काय अशा एका पेक्षा एक विशेष नामांनी सन्मानीत करण्यात येत आहे देश संपत चालला आहे. आणि आम्ही नैतीकता चुलित घालून चंदेरी दुनियेत हरवत चाललो आहोत ???


जे आकर्षित वेस्टनात समोर येते त्यालाच आपण सत्य म्हणून डोक्यावर मिरवत असतो. अशा कपोलकल्पित सत्याने नंतर केवळ पश्चाताप करण्याची वेळ येते, आजची तरुणाई 'शिकली' आहे पण सामाजीक भान आणि देशाप्रती असावयाची निष्ठा, समजयाचा अभाव तिव्रतेने जाणवतो आहे.


मन्या सुर्वे सारखे गुंड हे त्या त्या वेळच्या परिस्थितीनुसार तयार झालेली बेकायदा पिलावळ, मुळची गुन्हेगारी प्रवृत्ती , मेह्नत आणि प्रतिभेचा अभाव , झटपट पैसा कमवून धनाढ्य होण्याचे स्वप्न एवढाच काय ते यांचे आयुष्य. लोकांच्या गाड्या चोरणे, कष्टाने साठवलेल्या लोकांच्या पैशावर डल्ला मारणे तरुण मुलांना चुकीच्या मार्गाला लाऊन आपापली जरब बसवणे हे काय ते यांचे कार्य कसलेही नितीमुल्य नसलेली फिल्म इंडस्ट्री आताशा बरीच धंदेवाईक झालेली दिसून येते, चांगले विषय नसणे, गंभीर विषय हाताळण्याची योग्यता नसणे, जास्तीत जास्त बटबटीत करून लोकांना आकर्षित करणे आणि बक्कळ पैसा कमावणे यामुळे सिनेइंडस्ट्री ची पत ढासळत चालली आहे.


लोकांना, विशेषतः तरुणांना सुपरपावर नायक असलेले चित्रपट पाहायला आवडते, अगदी लहानपाणापासून कार्टूनच्या माध्यमातून मुले अशीच अचाट शक्ती असलेले नायक पाहत आलेले असतात, परंतु अन्यायाच्या विरोधात लढणारा नायक बदलून कधी गुन्हेगार जगतातील सुप्रसिद्ध आणि कायदा सुव्यवस्था धाब्यावर ठेवून गब्बर झालेला कुप्रसिद्ध भाई , दादा , डॉन होतो हे त्यानाही काळत नाही. तरुण पिढीने अशा लोकांना आदर्श मानणे म्हणजे स्वतःचे अधःपतन आहे त्यानुसार समाजाचे आणि देशाचे नुकसान सुद्धा होत आहे.
 

आतापर्यंत गुडांवर आलेले चित्रपट-


हाजी मस्तान - अग्निपथ आणि वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई

वरदराजन - दयावान

मन्या सुर्वे - शूट आउट वडाळा

माया डोळस - शूट आउट लोखंडवाला

आता दाउद ला हिरो म्हणून प्रोजेक्ट केले नाही म्हणजे मिळवली....


वडाळा येथे १९८२मध्ये रॉबर मन्या सुर्वेचा खात्मा करणारे पोलिस अधिकारी इसाक बागवान यांनी ' शूट आऊट अॅट वडाळा ' हा सिनेमा म्हणजे निव्वळ बंडलबाजी असून , त्याचा सत्याशी काडीचाही संबंध नसल्याची तोफ डागली आहे. सिनेमाच्या निर्मात्याने त्या घटनाक्रमाबाबत माझ्याशी सविस्तर चर्चा केली होती. परंतु प्रत्यक्ष सिनेमात त्याचा विपर्यास केला असल्याचे त्यांनी सांगितले म्हटले आहे. अंडरवर्ल्डच्या मदतीने पोलिसांनी मन्याचा काटा काढला यात काहीच तथ्य नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.


सिनेमाच्या निर्मितीच्या आधी निर्माता संजय गुप्ता याने माझ्याशी संपर्क साधला. मी त्यांना तो संपूर्ण घटनाक्रम सांगितला. हा घटनाक्रम जसाच्या तसा दाखवण्याचे आश्वासन दिल्यानंतर मी या सिनेमाबाबत आपली हरकत नसल्याचे स्पष्ट केले. परंतु काही काळानंतर हा सिनेमा हुसैन झैदी यांच्या ' डोंगरी टू दुबई ' या पुस्तकावर बेतला असल्याचे गुप्ता यांनी मला सांगितले.


या सिनेमात बागवान यांची भूमिका अनिल कपूरने रंगवली आहे. सिनेमात अनेक चुकीचे तपशील दिले आहेत. सिनेमात मन्या सुर्वे हा दाऊद इब्राहीमसाठी काम करत असल्याचे दाखवण्यात आले आहे. मन्या स्मग्लर असल्याचे दाखवले आहे. साबीर इब्राहीम कासकरच्या खुनात त्याचा हात असल्याचेही ' शुट आऊट अॅट वडाळा ' मध्ये दिसते. यातली एकही गोष्ट खरी नाही. खुन्नसमध्ये पाकमोडीया स्ट्रीटवर येऊन मन्याने दाऊदला दम दिला यातही तथ्य नाही. मन्या दाऊदच्या संपर्कात कधीच नव्हता. त्याने कधीही तस्करी केली नाही. तो कधीही पाकमोडीया स्ट्रीटवर गेला नाही. अंडरवर्ल्डच्या मदतीने पोलिसांनी मन्याचा खात्मा केला , ही तर शुद्ध लोणकढी थाप असल्याचे बागवान यांनी सांगितले. त्यामुळे हा सिनेमा तथ्यावर आधारीत नसून त्याचा आपल्याशी काही संबध नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. (http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/18174279.cms)


एक आदर्श नागरीक घडविण्यात आपली शिक्षण व्यवस्थाही सपशेल अपयशी ठरली आहे मन्या सुर्वे सारखे कुविख्यात गुंड आजच्या तरुणाईचे आदर्श ठरु शकतात का ???


हा प्रश्न अस्वस्थ करणारा आहे....


असे आदर्श पुढे यायला लागले तर देश फार वर्षे टिकणार नाही हे फार काळजी करण्यासारखे आहे रस्त्यावरचे सडकछाप गुंड , टगे , मवाली , गँगस्टर , हे जर आजच्या तरुणाईचे आदर्श ठरणार असतील तर या देशाच्या सामाजीक स्वास्थ्याला अन देशाला अराजकेते पासून कुणीही वाचवू शकणार नाही गुंडांना आदर्श , हिरो वगैरे मानणार्‍यांची मानसिकता बलात्कार नाहीतर काय चमत्कार करणार ???


नाही तरी आपल्या राजकिय नेत्यांनी आपआपल्या सुसंस्कृतीचे दर्शन दाखवून महाराष्ट्राला उपकृत केलेले आहेच , BTW हि कोणती संस्कृती आहे ??


प्रिय भारतीय मित्र-मैत्रिणीनो दाउद इब्राईम , मन्या सुर्वे, माया डोळसचा कसला आदर्श ठेवताय.... त्यांचा मृत्यू कुत्र्यासारखा झाला आहे.... आदर्श ठेवायचा तर छत्रपती शिवराय , चंद्रशेखर आझाद , आई जिजाऊ , स्वामी विवेकानंद, सावित्रीमाई फुले , म.फुले , डॉ आंबेडकर , संत तुकाराम... भगतसिंग , राजगुरु , अश्फाकउल्ला, बिस्मील ,  आत्ताचे कॅ.सौरभ कालिया ,  मेजर उन्निकृष्णन या वाघांचा ठेवा. शहीद झालेत ते देशासाठी...ते ही हसत हसत... प्रिय भारतीय मित्र-मैत्रिणीनो यासारख्या अनेक संत... महापुरुषाचा आदर्श घ्या तरचं खरां बलशाली भारत निर्माण होईल.



लेखं- मिलिंद धुमाळे , अमोल गायकवाड.

संदर्भ - http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/18174279.cms


No comments:

Post a Comment

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...