क्रांतिसूर्याच्या गौरवाची सव्वाशे वर्षे !!
स्त्रीशिक्षण, बहुजनांचे सामाजिक हक्क, वंचितांना मानवाधिकार अंधश्रद्धा निर्मूलन, जातीय भेदाभेद अशा क्षेत्रात महान कार्य करणारे क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांना 'महात्मा' ही उपाधी ११ मे १८८८ रोजी देण्यात आली होती. त्या घटनेला आज १२५ वर्षे पूर्ण होत आहेत. विशेष म्हणजे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील बेलसरचे सुपुत्र रावबहादूर विठ्ठलराव कृष्णाजी वंडेकर यांनी जोतिरावांना 'महात्मा' उपाधी दिली होती. जोतिबा फुले यांच्या वयाची ६0 वर्षे व समाजकार्याची ४0 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांचे सहकारी रावबहादूर विठ्ठलराव वंडेकर, रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी जोतिरावांच्या कार्याचा गौरवपूर्ण सत्कार करण्याचे ठरविले.
रा.ब. वंडेकर यांनी १८८८च्या मेमध्ये मुंबईतील मांडवी कोळीवाड्यातील 'मुंबई देशस्थ मराठा ज्ञाती-धर्मसंस्था' या संस्थेच्या सभागृहात सत्कार समारंभ आयोजित केला. बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनाही वंडेकरांनी निमंत्रण दिले होते. जोतिरावांना हिदुस्थानचे 'बुकर टी. वॉशिंग्टन,' अशी पदवी द्यावी, असा निरोप सयाजीरावांनी वंडेकर यांना पाठवला होता. 'आपल्या उग्र तपस्येने महाराष्ट्रातील स्त्री-पुरुषांना मानवाधिकार मिळवून देणारे, त्यांच्यात चेतना व जागृती निर्माण करणारे जोतिराव फुले खरे 'महात्मा' आहेत. त्यांना 'महात्मा' ही उपाधी देणेच योग्य आहे,' असे वंडेकरांनी सांगितले; तसेच जनतेच्या वतीने जोतिरावांना 'महात्मा' ही उपाधी प्रदान करत असल्याचे जाहीर केले.
हे जगजाहीर झाले आहे की गांधींना महात्मा ही पदवी कुणीही दिलेली नाही, अथवा त्याची नोंद कुठेही नाही. तसेच लोकमान्य, स्वातंत्र्यवीर, हिंदू हृदय सम्राट इ. उपाधी अथवा पदव्या या जनतेने दिलेल्या नाहीत तर त्या त्या व्यक्तींनी स्वत:हून लावून घेतल्या आहेत. याला मात्र अपवाद आहे जोतिराव फुलेंचा. जोतिराव फुलेंना "महात्मा" ही उपाधी उस्फूर्तपणे जनतेने दिली होती व त्यासाठी भव्य महोत्सव घडवून आणला होता.
महात्मा ही उपाधी मोठे कार्य करणार्या माणसाला लावतात. पण महात्मा या शब्दात आत्मा हा शब्द असल्याने आणि आत्मा ही संकल्पनाच बौध्द लोक मानत नसल्याने आपण आत्मा हा शब्द बोलण्यातून अथवा लिहिण्यातून टाळावा. त्याऐवजी आपण बौध्दांनी महामानव, महानायक असे शब्द वापरावेत. जोतिबा फुलेंच्या बाबतीत तर क्रांतीबा, राष्ट्रपीता हे शब्द वापरावेत.
''जनसेवा हीच ईश्वरसेवा आहे. हजारो वर्षे ज्यांना अस्पृश्य मानले गेले. ज्यांना मानवाधिकारांपासून वंचित ठेवण्यात आले त्यांच्यासाठी काम करणे माझे कर्तव्य आहे,'' असे प्रतिपादन जोतिरावांनी त्या समारंभात केले होते. समाजसुधारक विठ्ठलराव वंडेकर शिक्षण व व्यवसायानिमित्त रावबहादूर वंडेकर यांचे कुटुंबीय मुंबईत स्थायिक झाले होते. वंडेकर जोतिरावांच्या सत्यशोधक चळवळीतील आघाडीचे कार्यकर्ते होते. बहुजनांच्या शिक्षण, कामगार, सामाजिक सुधारणांच्या क्षेत्रात त्यांनी बहुमोल कार्य केले.
''जनसेवा हीच ईश्वरसेवा आहे. हजारो वर्षे ज्यांना अस्पृश्य मानले गेले. ज्यांना मानवाधिकारांपासून वंचित ठेवण्यात आले त्यांच्यासाठी काम करणे माझे कर्तव्य आहे,'' असे प्रतिपादन जोतिरावांनी त्या समारंभात केले होते. समाजसुधारक विठ्ठलराव वंडेकर शिक्षण व व्यवसायानिमित्त रावबहादूर वंडेकर यांचे कुटुंबीय मुंबईत स्थायिक झाले होते. वंडेकर जोतिरावांच्या सत्यशोधक चळवळीतील आघाडीचे कार्यकर्ते होते. बहुजनांच्या शिक्षण, कामगार, सामाजिक सुधारणांच्या क्षेत्रात त्यांनी बहुमोल कार्य केले.
■ पुण्यात १८९५मध्ये झालेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात शेतकर्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी वंडेकरांनी शेतकर्याचा गवताचा २४ फुटी पुतळा उभारून आंदोलन केले होते. मुंबई महापालिकेचे सदस्य म्हणून त्यांनी २३ वर्षे काम पाहिले होते.
■ तसेच मुंबईत १८९३मध्ये झालेल्या जातीय दंगलीत शांतता प्रस्थापित करण्यातही मोलाची भूमिका बजावत राणीच्या बागेत ६0 हजार नागरिकांचा शांतता मेळावा घेतला होता.
No comments:
Post a Comment
धन्यवाद !!