६,५६९ भारतीय आहेत विदेशी तुरुंगांत !!

६,५६९ भारतीय आहेत विदेशी तुरुंगांत !!


आजच्या घडीला ६७ देशांमधील तुरुंगांमध्ये एकूण ६,५६९ भारतीय डांबले गेले असल्याचे माहिती अधिकारामध्ये उघड झाले आहे. केरळ मधल्या एका आरटीआय कार्यकर्त्याने परराष्ट्र खात्याकडे माहिती अधिकारांतर्गत केलेल्या चौकशीत ही बाब समोर आली आहे.

 

सगळ्यात जास्त भारतीय कैदी आखाती देशांमधील तुरुंगांमध्ये कैद असून यामध्ये सौदी अरेबिया (१६९१), कुवैत (११६१) व संयुक्त अरब अमिराती (१०१२) यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे दोन भारतीयांना ठार केल्याचा आरोप असणारे आणि वादाच्या भोव-यात सापडलेले नौसैनिक ज्या देशाचे आहेत त्या इटालीच्या तुरुंगांमध्येही तब्बल १२१ भारतीय गजाआड आहेत.

विदेशी तुरुंगांमध्ये बंदीवान असलेल्या भारतीय कैद्यांची आकडेवारी पुढीलप्रमाणे-

सौदी अरब - १६९१
कुवैत - ११६१
संयुक्त अरब अमिराती - १०१२
इंग्लंड - ४२६
बांग्लादेश - ६२
अफगाणिस्तान - २८
बहारिन - १८
नेपाळ - ३७७

याखेरीज इराण, इराक, अल्जेरिया, बेल्जियम व फ्रान्स या देशांमधील तुरुंगातही भारतीय कैदी डांबण्यात आले आहेत.



संदर्भ- http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNews-All.php?nid=MainEdition-1-1-03-05-2013-53493&ndate=2013-05-03&editionname=main

No comments:

Post a Comment

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...