उतारा.....!!!
शहरातल्या त्या व्यस्थ चौकात एका बाजूला कोळशाच्या रेघेने केलेल्या वर्तुळात एक ज्वारीची भाकर ....त्यावर टाचण्या टोचलेलं एक लिबू ... एक काळी कापडी बाहुली ....
हळद - कुंकू ....अन सात-आठ फुलांच्या पाकळ्या....
सकाळपासून पडल्यात ....गर्दीचा चौक ....प्रचंड वाहतूक ...वर्दळ ....पण येणारे - जाणारे ....समोर पडलेला उतारा पहिला की दचकून बाजूला व्हायचे....
उताऱ्यापासून अंतर राखून लांबून जायचे ...
प्रत्येकाच्या मनात दहशत जादू-टोण्याचा प्रकार असल्यानं जवळून...
वा ओलांडून गेल्यास बाधा तर होणार नाही ना ????
प्रत्येकाच्या मनात शंका !!!!!!!!!!!!
दुपारपर्यंत तो उतारा तसाच पडून होता ...
नंतर बाजूलाच असलेल्या कचराकुडीत पाठीवर प्लास्टीकची गोणी अन हातात लोखंडी आकडी घेऊन कचऱ्यातील आवश्यक मटेरिअल शोधणाऱ्या एका कृषकायेची नजर सहज चौकातल्या त्या उताऱ्यावर पडली...
अन म्ल्याण चेहऱ्यावर एक वेगळीच चमक तरळून गेली कुडीतून ती बाहेर आली ...
अन खजिनाच हाती लागल्या लगत पटकन त्या उताऱ्यातली भाकर उचलली ...
त्या बरोबरच लिंबूही उचलल अन कडेला येऊन फुटपाथवर बसली ....
लिंबाला टोचलेल्या सर्व टाचण्या कडून दणक्यात लिंबू फोडलं ...
भाकरीवर पिळला अन आधाश्यासारखी तुटून पडली...
तिच्या भुकेनं व्याकुळ झालेल्या जिवाला भूक शामविन्याशिवाय ईतर कशाचीच तमा
नव्हती...!!!
धन्यवाद - दै. संध्यानंद
No comments:
Post a Comment
धन्यवाद !!