लोकसंख्यावाढ !!
हे खरे आहे की, जगात धर्माच्या नावाखाली भ्रष्टाचार चालतो. आणि भारतीय उपखंडात तर जगातील सर्वात जास्त भ्रष्टाचार धर्माच्या नावाखालीच होतोय. भारताचा सर्वात मोठा प्रश्न हा लोकसंख्यावाढ आहे. याच्यामुळे आपल्याकडे फक्त संख्यात्मकता (Quantity) आहे, गुणात्मकता (Quality) नाही, सार्वजनिक बेशिस्तपणा(रांगेत उभे नसणे, रस्त्यावर घाण, कचरा करणे, थुंकणे), शिक्षणाचा अभाव, आरोग्याचा अभाव, कुटुंबाचे वंशवेल, वटवृक्ष, गोकुळ (संत तुकारामाच्या भाषेत लेकुरे उदंड झाली ) जमीनदारी, घराणेशाही वृत्ती , त्यानंतर, धर्म, जात, प्रांत, भाषा, वंश, काळे-गोरे असे भेद, स्त्री भ्रूण-हत्या , स्त्री उपभोगणे, बलात्कार ही सर्व कारणे लोकसंख्यावाढीशीच कारणीभूत आहेत,
दुसरे महत्वाचे कारण बहुसंख्य भारतीय सण आणि संस्कृत्ती ही निसर्गावर आधारित आहेत. आपल्या देशात प्रत्येकाला चांगल्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत असे म्हणतो जसे जमीन, घर, Block/Flat, बंगला, गाडी, Petrol, Computer, Mobile, वातानुकुलीत यंत्रे, कपडे, खाणे, आरोग्य, प्लास्टिक, वीज, उर्जा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पाणी. पण आपण प्रचंड लोकसंख्यावाढीमुळे निसर्गाची सर्वात जास्त हानी करतोय अगदी घाणेरड्या भाषेत सांगायचे तर निसर्गावर बलात्कार करतोय.….
आणि नंतर धर्म, जात, भाषा, प्रांत आणि खोट्या, बेगड्या संस्कृतीवर-इतिहासावर भांडत बसतोय, दंगली करतोय. आपले समूह group करून दुसऱ्या समूहावर भ्रष्टाचार किंवा आजच्या परिस्थितीला ते जबाबदार आहेत असे सांगतोय, स्वतःचे आत्मपरीक्षण करत नाही, तर पैसा, भौतिक सुख, अंधश्रद्धा अशा चमत्कारिक Rat -Race मध्ये आपण अडकलोय. निसर्ग याचे उट्टे भारतीय लोकांवर जरूर काढणार....
तो दिवस दूर नाही आता... सुक्याबरोबर ओले सुद्धा जळणार.… आपली स्वतःची वर्तणूक आणि दृष्टी सम्यक, उदारमतवादी असली पाहिजे आणि कमीत कमी निसर्गाची हानी होईल, सार्वजनिक शिस्त वाढेल आणि लोकसंख्या वाढ आटोक्यात येईल असे प्रयत्न झाले पाहिजेत.
अगदी चीन सारखे एका कुटुंबाला एक मुल असणे किंवा दुसरे मुल झाले तर त्या मुलांना आणि पालकांना कोठलीही सरकारी सवलत नसणे (त्याचा खर्च त्याच्या पालकांनीच करणे, इंधन, gas, शिक्षण, आरोग्य, नोकऱ्या यातील सवलती रद्द करणे, त्या पालकांना लोकप्रतिनिधी म्हणून प्रतिबंध असणे इत्यादी असे कायदे झाले पाहिजेत ). नाहीतरी सध्या सर्व पक्षीय बहुसंख्य लोकप्रतिनिधी जो पैसे खाण्याचा भ्रष्टाचार करत आहेत तो त्यांच्या भावी दहा पिढ्यांसाठीच करत आहेत. तो भ्रष्टाचारी वटवृक्ष किंवा ती भ्रष्ट विष-वंशवेल छाटून टाकलेलीच बरी... फ्रेंच राज्यक्रांतीसारखी.
ज्यांना वंश किंवा मुले नसतील त्यांनी अनाथ मुलांना दत्तक घेणे, तसेच विशेषतः मुलीना दत्तक घेणे. मुलगा म्हणजे वंशाचा दिवा असणे ही संकल्पनाच नाहीशी करणे, या गोष्टींचा प्रचार झाला पहिजे. या सर्व गोष्टी लोकसंख्या वाढीवर उपाय म्हणून करता येतील.
आपले मत काय??
No comments:
Post a Comment
धन्यवाद !!