* गांधी आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याच्या खंडातील फरक जाणून घ्या !!
* चित्र पहिले-
गांधीच्या साहित्याचे १०० खंड भारत सरकारने प्रकाशित केलेले आहेत. त्यांचा मराठी अनुवाद करण्याचा प्रकल्प महाराष्ट्र सरकारने हाती घेतला होता. ४० खंड प्रकाशित करुन तो बंद करण्यात आला. कारण त्या ग्रंथांची किंमत नाममात्र ठेऊनही ग्राहकच मिळेना. सरकारने हे संच शाळा, महाविद्यालये, विद्यापिठे यांना मोफत देण्याची योजना आखली परंतु प्रतिसाद शुन्य. आजही हे खंड निर्मिती खर्चाच्या फक्त एक टक्का भावातही घ्यायला कोणी तयार नाही. त्यामुळे सरकारची मोठी पंचायत झालेली आहे. ही पुस्तके रद्दीत घालता येत नाहीत आणि गोडावून्स अडकून पडलेली आहेत.(संदर्भ- http://
* चित्र दुसरे-
"डॉ. बाबासाहेब आंबेडकर - लेखन आणि भाषणे' या मालिकेतील खंड क्रमांक 22 (चित्रमय चरित्र) "डा. बाबासाहेब आंबेडकर चित्रमय चरित्र" हा ब्रुहत्खंड अवघ्या देशातुन इंग्रजी आवृत्तीला तर महाराष्ट्रातुन मराठी आवृत्तीला एवढा प्रतिसाद लाभला आहे, इतका कि प्रथम प्रकाशनानंतर या चित्रचरित्राच्या मराठी आवृत्तीच्या तीन हजार प्रती व इंग्रजी आवृत्तीच्या दोन हजार प्रती हातोहात संपल्या आहेत.
(संदर्भ- http://epaper.esakal.com/
डॉ. बाबासाहेबांचा विचार वैश्विक आहे. शंभरहून अधिक देशांतून या खंडांना मागणी येते. या खंडांच्या प्रती हातोहात संपतात त्यामुळे खंडाच्या किमान एक लाख प्रती छापाव्यात अशी सूचना भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांना केली; मात्र गेल्या काही वर्षांत या नेमलेल्या समित्यांचे काम पैशांअभावी खंडित झाले होते याचा उल्लेख भुजबळ यांनी केला. धर्माधर्मांतील झगडे, जातीय दंगली याला हे खंड चांगले औषध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वीजनिर्मिती, नद्याजोडणी प्रकल्प आदी विषयांवर बाबासाहेबांनी त्या काळात मांडलेल्या मतांवर भर दिला असता तर आज आपल्याला वीज आणि पाण्याचे संकट भेडसावले नसते असेही ते म्हणाले.
खंडांचे संपादक हरी नरके यांनी हे खंड सरकारला चांगला महसूल मिळवून देतात, त्यामुळे समित्यांचे बळकटीकरण करा, दरवर्षी आम्ही प्रत्येक समित्यांचे पाच ते दहा खंड तयार करून देऊ असा विश्वास व्यक्त केला.
"डॉ. बाबासाहेब आंबेडकर - लेखन आणि भाषणे' या मालिकेतील बर्याच खंडाच्या प्रति उपलब्ध नाहीत. त्याचे पुनमुर्द्रणही केलेले नाही. आगामी प्रकाशनाबाबतही सदस्य सचिव प्रा. अविनाश डोळस यांनी प्रकाशनाचा अद्याप निर्णय झालेला नसल्याचे माहिती अधिकारात स्पष्ट केले आहे. एका वर्षात किमान २ खंड प्रकाशित होणे अनिवार्य आहे. पण त्याची अंमलबजावणी शुन्य आहे. कुठलेही प्रकाशन न करता तब्बल ५० हजारांच्या वाढीव मानधनाची मागणी समितीतर्फे करण्यात आली. या प्रस्तावास मंजूरही करण्यात आले. आतापर्यंत प्रकाशित झालेले खंड वेबसाईटवर टाकण्याचा निर्णयही १३ मार्च, २००१ रोजी झाला. मात्र, ते झाले नाही. शिवाय प्रकाशन समितीच्या बैठकीचे नियमही पाळण्यात येत नाही. २२ ऑक्टोबर २००८ च्या बैठकीत डॉ. कासारे, डॉ. नितीन राऊत व एन. जी. कांबळे यासमिती सदस्यांनी पुढील चार खंड प्रकाशित करण्यास मंजुरी मागितली असता ती देण्यात आली नाही. भारतीय दलित पॅंथरने खंडाबाबत केलेल्या सूचनाही दुर्लक्षित करण्यात आल्या.
खंडाची मुद्रिते सदस्य सचिवाच्या कपाटात धूळ खात पडून आहेत. प्रा. डोळस हे समितीवर कार्यरत आहेत. त्यांच्या सदस्य सचिवपदाच्या कार्यकाळात एकही खंड प्रकाशित झालेला नाही. सदस्य सचिवांनी एका वर्षात किमान दोन खंडांचे प्रकाशन करणे अनिवार्य असल्याचे १९ नोव्हेंबर, २००९ च्या सरकारी निर्णयात स्पष्ट केले आहे.
हे असं विचित्र चित्र कसं आहे याचा शोध घेतल्यास असं लक्षात येतं की, बाबासाहेबांची जनता व आंबेडकरी समाज हे लिखान वाचून शहाणे होऊ नयेत म्हणून हा सर्व काँग्रेसचा आटापीटा चालला आहे. शिवाय बाबासाहेबांनी काँग्रेसला जळत्या घराची उपमा दिली होती हे काँग्रेस विसलेली दिसत नाही. नाही तर त्यांनी हे "डॉ. बाबासाहेब आंबेडकर - लेखन आणि भाषणे" या मालिकेतील राहिलेले खंड प्रकाशित केले असते. बर्याच खंडाच्या प्रति उपलब्ध नाहीत तर त्याचे पुनमुर्द्रणही केले असते.
नोट- या पोस्ट मध्ये आम्ही व्यक्ती तुलना केली नाही आम्ही साहित्यात्यातील फरक मांडला आहे !!
लेखं- श्रीराम पवार सर.
संदर्भ-
चित्र १(गांधी)- http://
चित्र २(डॉ बाबासाहेब आंबेडकर)-
http://epaper.esakal.com/
awesome. dr. babasaheb ambedker is greatest indian. there is no comparision between dr. babasahab ambedkar and gandhi. he was . he is. he will be greatest indian.
ReplyDelete