स्त्रियांची 'अस्पृश्यता' केव्हा नष्ट होणार…??

स्त्रियांची 'अस्पृश्यता' केव्हा नष्ट होणार…??


प्रत्येक जिवंत शरीरात मन हे असतेच; ते शरीराचा अविभाज्य घटक आहे. मग जेव्हा तुम्ही तुमच्या देवाला तुमच्या मनापासून (व अप्रत्यक्षरीत्या शरीरापासून) वेगळंच करू शकत नाही तर मग केवळ 'मासिक पाळी' आली म्हणून तेवढेच ४-५ दिवस घरात पूजा-अर्चा न करणे, दिवा-बत्ती न करणे व (काही घरांत) जिला पाळी चालू आहे त्या स्त्रीला स्पर्शही न करणे असले प्रकार करत बसण्यात अर्थ तो काय….??


त्या काळात स्त्रिया चुकुनही देवाचा मनातून जप करीत नाहीत काय?? जर मनच शरीरापासून वेगळे नसेल तर मग अशा वरवरच्या वेगळे राहण्याला अर्थ कसला..??


मानवाच्या शरीरधर्माचा, त्याच्या आवश्यक चक्राचा विटाळ कसा काय होऊ शकतो…?? केवळ परंपरेनुसार चालत आलेय म्हणून आपण किती दिवस स्त्रियांकडे अशा दुजाभावाने पाहणार आहोत..?? आम्ही या गोष्टींकडे धार्मिकतेने पाहण्यापेक्षा वैज्ञानिक अंगाने केव्हा पाहणार…??


संविधानाने जाती-जातींतील अस्पृश्यता नष्ट केली पण पुरुषी मनाच्या अहंकारातील हि स्त्रियांची 'अस्पृश्यता' केव्हा नष्ट होणार…??





स्त्री आणि पुरुष यांनी मिळून ही 'अस्पृश्यता' मिटवायला हवी.... बोला कोण ही 'अस्पृश्यता' मिटवायला तयार आहे ????
 
- गौरव गायकवाड(प्रबोधन टीम)

No comments:

Post a Comment

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...