पुरुषवाद घायल !!

 पुरुषवाद घायल !!


एक लड़का और एक लड़की की शादी हुई... दोनों बहुत खुश थे ! स्टेज पर फोटो सेशन शुरू हुआ ! दूल्हे ने अपने दोस्तों का परिचय साथ खड़ी अपनी साली से करवाया "ये है मेरी साली , आधी घरवाली" दोस्त ठहाका मारकर हंस दिए !!

 
दुल्हन मुस्कुराई और अपने देवर का परिचय अपनी सहेलियों से करवाया "ये हैं मेरे देवर..आधे पति परमेश्वर"  ये क्या हुआ ....?  अविश्वसनीय... अकल्पनीय ! भाई समान देवर के कान सुन्न हो गए! पति बेहोश होते-होते बचा !!

 
दूल्हे , दूल्हे के दोस्तों , रिश्तेदारों सहित सबके चेहरे से मुस्कान गायब हो गयी ! लक्ष्मन रेखा नाम का एक गमला अचानक स्टेज से नीचे टपक कर फूट गया ! स्त्री की मर्यादा नाम की हेलोजन लाईट भक्क से फ्यूज़ हो गयी !

 
थोड़ी देर बाद एक एम्बुलेंस तेज़ी से सड़कों पर भागती जा रही थी ! जिसमे दो स्ट्रेचर थे ! एक स्ट्रेचर पर भारतीय संस्कृति कोमा में पड़ी थी... शायद उसे अटैक पड़ गया था !

 
दुसरे स्ट्रेचर पर पुरुषवाद घायल अवस्था में पड़ा था ...  उसे किसी ने सर पर गहरी चोट मारी थी !
 
आसमान में अचानक एक तेज़ आवाज़ गूंजी.... भारत की सारी स्त्रियाँ एक साथ ठहाका मारकर हंस पड़ी थीं !
 

लेखं-  पल्लवी त्रिवेदी.


धन्यवाद- देव भिवसाने.


नक्षलवादी !!

नक्षलवादी !!


उद्विग्नतेची सगळी दारे जेव्हा उघडतात
व्यवस्थेच्या दगडी भिंतीशी
वेदनांची मुळे जेव्हा भिडून जातात
विषमतेच्या ज्वालामुखीशी
पोटाचे गणित जेव्हा जुळत नाही
अविरत गाळलेल्या घामाशी
चिंध्यांनी झाकू पाहिलेली लाजही जेव्हा
खादी..वर्दी..च्या गर्दीकडे गहाण पडते
तेव्हाच...

तेव्हाच मनाचा पक्षी बेभान होतो

रक्तलांच्छित संहाराला सज्ज होतो
अहिंसेचे जोखड झुगारून
एक नक्षलवादी जन्म घेतो !

गमवायला काही बाकीच नसते

अब्रू... पोट... जगणे व्यर्थ
ठिणगी एकच उरात उरते
चिरंतन मुक्तीचे गीत गाते !

कवी- तुषार नातू


मुलींचे वैरी !!

मुलींचे वैरी !!



वंशाला दिवा मुलगाच हवा, अशा जुनाट-राक्षसी अंधश्रध्देच्या विळख्यात अडकल्यानेच, भारतात दररोज हजारो मुलींची सामुहिक हत्याकांडे घडत आहेत, ही समाजाला लाजिरवाणी-शरमेची बाब होय! स्वातंत्र्यानंतरच्या 64 वर्षात देशाने कृषी, विज्ञान, उद्योगाच्या क्षेत्रात चौफेर प्रगती केली. गेल्या काही वर्षात देशाची जागतिक महासत्तेच्या दिशेने वाटचाल सुरू झाल्याचा डांगोरा पिटला जात आहे. प्रत्यक्षात मात्र सोळाव्या शतकातल्या जुनाट अंधश्रध्दांच्या विकृतीतून हा समाज बाहेर पडलेला नाही, हेच स्त्रीभ्रूण आणि मुलींच्या हत्यांच्या घटनांनी जगासमोर आले आहे. राजस्थानातल्या काही समाजात, जन्मजात बालिकेचा गळा घोटून किंवा तिला विष पाजून ठार मारायची अघोरी प्रथा अद्यापही अस्तित्वात आहे.


सोनोग्राफी यंत्राद्वारे गर्भवती महिलेची तपासणी करून गर्भजल चिकित्सेद्वारे स्त्रीचा भ्रूण असल्यास, तो काढून टाकायची शस्त्रक्रिया करणाऱ्या नराधम डॉक्टरांनी बीड जिल्ह्यात हैदोस घातला होता. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातही असे नरपशू डॉक्टर्स असल्याचे निष्पन्न झाले होते. सरकारने कडक कारवाई केल्यामुळे, स्त्रीभ्रूण हत्येचे हे बेकायदा प्रकार आता बंद झाले आहेत. पण जेव्हा जन्मदातेच मुलीच्या जीवावर उठतात तेव्हा मात्र, या अश्राप बाळाला वाचवणे कायद्याला-पोलिसांनाही अवघड ठरते.


नवजात अर्भकाने मरावे, यासाठीच त्याच्यावर विष प्रयोगाच्या घटना देशात तशा नव्या नाहीत. राजस्थानात, विशेषत: जैसलमेर जिल्ह्यात ही असली रानटी प्रथा अद्यापही अस्तित्वात आहे. या जिल्ह्यातल्या काही समाजात मुलगी जन्मल्यास, अवघ्या काही तासांच्या आतच तिचा गळा घोटून खून केला जातो. या अर्भकाच्या पार्थिवाची घाईगडबडीने विल्हेवाटही लावली जाते. या राज्यात दररोज अडीच हजार नवजात बालिकांचे बळी जात असावेत, असा अंदाज आहे. या राज्यात केंद्र सरकारची जननी सुरक्षा योजना अंमलात आली. सरकारी रुग्णालयात प्रसूत होणाऱ्या मातेला चौदाशे रुपयांचे अनुदान मिळायला लागले. ते मिळवायसाठी सरकारी रुग्णालयात प्रसुतीसाठी येणाऱ्या गर्भवती महिलांची संख्या वाढली. पण मुलीला घेवून घरी गेल्यावर मात्र नव्या जन्मलेल्या या बालिका बेपत्ता होत असल्याचे आढळून आले आहे. या जिल्ह्यात अत्यंत क्रूरपणे नवजात बालिकांचे बळी घेतले जातात.


इथल्या काही समाजात विवाहित स्त्रीला चार भिंतीच्या आतच जन्मभर कोंडून ठेवले जाते. तिला बाहेर फिरू दिले जात नाही. ती बाहेर गेल्यास, सतत ती घुंगट ओढूनच असते. तिचा चेहराही कुणाला दिसत नाही. गर्भवती महिला तर घराच्या बाहेरच पडत नाहीत. गावातल्याच सुईणीकडून या महिलांची परंपरागत पध्दतीने प्रसुती होते. मुलगी जन्मली असल्यास, त्या अर्भकाने रडायसाठी तोंड उघडताच त्याच्या इवल्याशा मुखात आईच्या दुधाऐवजी अफूतून विष दिले जाते. काही वेळा अर्भकाच्या मुखात मातीचा तोबरा भरला जातो. श्वास गुदमरून हे बालक तडफडून जीव सोडते. पण त्याच्या आई-वडिलांना आणि घरच्यांना मायेचा पाझर फुटत नाही. या बालिकेला फुलासारखे जपावे, तिला मारू नये, असे या नराधमांना वाटत नाही. या बालिकेने प्राण सोडताच, काही वेळातच त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावली जाते. याच जिल्ह्यातल्या देवडा या पंचवीस हजार वस्तीच्या गावात गेल्या दहा वर्षात फक्त अठरा मुली जन्मल्याची सरकारी दप्तरात नोंद आहे. याचाच अर्थ या गावातल्या शेकडो बालिका, दुष्ट प्रथेच्या बळी ठरल्या, हे उघड आहे.


केंद्रीय महिला आणि बाल कल्याण मंत्री रेणुका चौधरी यांनी, गेल्या दहा वर्षात भारतात एक कोटी मुलींचे हत्याकांड झाल्याची कबुली संसदेतच दिली होती. राजस्थानात सन्माननीय मृत्यूच्या (ऑनर किलिंग) नावाखाली हजारो बालिकांची अशी हत्याकांडे घडतात. राज्य घटनेने स्त्री आणि पुरुषांना समान अधिकार आणि हक्क दिले असले तरी, मुलीला जन्मायचाच हक्क नाकारला जातो आणि जन्मल्यास तिचा जगायचा हक्क हिरावून घेतला जातो, हे सत्य आहे. वंशाला दिवा म्हणजे मुलगाच हवा, या वेड्या अंधश्रध्देतून भारतीय समाज मुक्त झाल्याशिवाय जन्मजात बालिकांना आणि गर्भातल्या स्त्रीभ्रूणांना न्याय मिळणार नाही.

 

लेखं- वासुदेव कुलकर्णी.


संदर्भ-  http://www.dainikaikya.com/20130521/5419198250662094378.htm


धन्यवाद- दै. ऐक्य



धर्म धर्म करणाऱ्या लोकांइतके सत्याचे आणि वास्तवाचे शत्रू कोणी नसतील !!

धर्म धर्म करणाऱ्या लोकांइतके सत्याचे आणि वास्तवाचे शत्रू कोणी नसतील !!



धर्म धर्म करणाऱ्या लोकांइतके सत्याचे आणि वास्तवाचे शत्रू कोणी नसतील. मग ते बायकांना नवऱ्याच्या चितेवर जिवंत जाळतील, नरबळी देऊन आपले राजमहाल आणि देवळे टिकाऊ करतील, कुणाला अस्पृश्य म्हणतील, कुणाला वाळीत टाकतील, काय वाटेल ते करतील. धर्म आणि पंथाच्या दुरभिमानातून माणसाचे रक्त सगळ्यात अधिक सांडलेले आहे; आणि या साऱ्या खटाटोपातून शेवटी नवे हुकूमशहाच उदयाला आलेले दिसतात.
 
- पु.लं.देशपांडे

संदर्भ- ’एक शुन्य मी’ या पुस्तकातुन.

महिलाओं ने अर्थी को कंधा दे की नई शुरुआत !!

महिलाओं ने अर्थी को कंधा दे की नई शुरुआत !!



स्थानीय परसो विगहा निवासी पत्रकार चन्द्रशेखर प्रसाद जी की १०७ वर्षीया मां  रेशमी देवी की मौत पर घर के महिलाओं ने पीढि़यों की परम्परा तोड़ शव को कंधा दिया. यहां शव को गांव में घुमाने की प्रथा कायम है. इस प्रथा को महिलाओं ने निभाकर पुरूषों को यह संदेश दिया कि चाहे सामान्य धार्मिक कार्य में हम पीछे नहीं रहने वाले हैं.

 

महिलाओं की इस साहस को देख पुरूष अचभित दिखे. मृतका की बेटी उषा देवी, सुमीत्रा देवी, बहु सुभा देवी, लक्ष्मी देवी आदि ने शव को कंधा दिया. आम तौर पर इस गांव में महिलाएं शव को कंधा नहीं देती है. यहां आम तौर पर महिलाएं देहरी भी नहीं लांघती है. इस कारण यह घटना चर्चा का विषय बना हुआ है.

 

इन सभी माता और बहनो को हमारे प्रबोधन परिवार की तरफ से सलाम. प्यारे दोस्तो स्त्री दुय्यम नही बल्की पुरषो समान है. नारीशक्ती को हमारा सलाम !!



संदर्भ-  http://www.jagran.com//bihar/shiekhpura-10423071.html


मनुस्मृती, पुराणे आणि देवळे या तीनच गोष्टीवर आज प्रत्येक भट जगत असतो !!

मनुस्मृती, पुराणे आणि देवळे या तीनच गोष्टीवर आज प्रत्येक भट जगत असतो !!


मनुस्मृती, पुराणे आणि देवळे असा तीन पेडी फास हिंदुसमाजांवर लटकाउन भिक्षुकशाही ब्राह्मणांनी आपल्या जातीच्या सावत्या सुभ्याचे सोवेळे वर्चस्व आजवर टिकउन धरलेले आहे. या मर्मावर कोणी घाव घातलाच एक जात सुधारक दुर्धारक भटे सापासारखी का फुसफुसतात, याचे अजून बर्याच बावळट शहान्यांना आणि भोळसट भटेतरांना मोठे आश्चर्य वाटते.

 
मनुस्मृती, पुराणे आणि देवळे या तीनच गोष्टीवर आज प्रत्येक भट जगत असतो. पण या तीनच गोष्टी म्हणजे अखिल भटेतर दुनियेच्या उरावर तीन प्राणघातक धोंडी आहेत. या तीन गोष्टी नष्ट करा, जाळून पोळून खाक करा कि भिक्षुकशाही रसातळाला गेलीच !
 

प्रदर्शनासाठी तिचा वाळवून ठेवलेला नमुनाही हाती लागणार नाही. पण हा सोन्याचा दिवस उगविण्यापुर्वी ब्राह्मणांनी या तीन महापातकांबद्दल भटेतरांच्या मनावर डागलेली धार्मिक पापपुण्याची मोहीम नाहीशी करणे फार कठीण काम आहे.

- प्रबोधनकार ठाकरे.


संदर्भ -'' देवेळाचा धर्म आणि धर्माची देवळे ''

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज याचा दुर्मिळ छायाचित्र !!

 

मित्र-मैत्रिणीनो हे दुर्मिळ छायाचित्र आहे २५०० व्या बुद्ध जयंतीचे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ही २५०० वी बुद्ध जयंती एकाच वेळी १००० गावांत साजरी केली होती.



बघा मित्र-मैत्रिणीनो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्यांनी लिहलेल्या "ग्रामगीता" या ग्रंथात तथागत बुद्धाविषयी काय लिहतात....(संदर्भ- ग्रामगीता पान न.81.)

हाती न घेता तलवार.... बुद्ध राज्य करी जगावर....

त्यासी कारण एक प्रचार..... प्रभावशाली !!

- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज



संदर्भ- ग्रामगीता पान न.81.




धन्यवाद- ग्रामगीता प्रबोधन (https://www.facebook.com/jaiguru1022)


डॉ. बाबासाहेब आंबेडकर : ग्रंथसूची

डॉ. बाबासाहेब आंबेडकर - ग्रंथसूची !!


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ग्रंथसंपदा :


१.     The Evolution of Provincial Finance in British India. - P.S. King & Co, London
२.     Castes in India : Their Mechanism, Genesis and Development - Indian Antiquary, May 1917
३.     A Review of Bertrand Russell's 'Principles of Social Reconstruction' - Journal of Indian Economic Society, March 1918.
४.     'Problem of the Rupee' - 'History of Indian Currency and Banking', May 1947.
५.     'Anohilation of Castes' - 15 May, 1936.
६.     'Thoughts on Pakistan' - 1940, Second revised edition was published under the title 'Pakistan or the Partition of India' in 1945
७.     'Ranade, Gandhi and Jinnah' - First published in book form in 1943.
८.     'What Congress and Gandhi have done to the untouchables' - June 1945.
९.     'Who were the Shudras?' - Thacker and Co. Bombay, 1946
१०.     'The Untouchables' - Amrit Book Co. New Delhi, October 1948.
११.     'Maharashtra as a Linguistic Province' - Thacker & Co. Bombay, 1948.
१२.     'The Buddha and His Dhamma' - 1957
१३.     Dr. Ambedkar's unpublished books published by Government of Maharashtra.
     

    Philosophy of Hinduism - 1987
    Buddha or Karl Marx
    Riddles in Hinduism
    Pali Grammar - 1998
    Pali Dictionary

१४.     ‘बुद्ध पूजा पाठ’ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर, १९५६.
१५.     पाकिस्तान अर्थात भारताची ङ्गाळणी - रघुवंश प्रकाशन पुणे, १९४०.
१६.     डॉ. आंबेडकर यांची पत्रे - संपादक : शंकरराव खरात, ठोकळ प्रकाशन पुणे, १९६१.
       

डॉ.बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे -

     
डॉ.बाबासाहेब आंबेडकर चरित्र-साधने प्रकाशन समिती, महाराष्ट्र शासन यांनी प्रकाशित केलेले खंड पुढीलप्रमाणे-

१७.     खंड-१ : भारतातील जाती आणि इतर ११ निबंध
१८.     खंड-२ : मुंबई विधीमंडळामध्ये डॉ.आंबेडकर
१९.     खंड-३ : हिंदुत्वाचे तत्त्वज्ञान
२०.     खंड-४ : हिंदूधर्मातील कूटप्रश्‍न
२१.     खंड-५ : अस्पृश्य आणि अस्पृश्यता
२२.     खंड-६ : रुपयाचा प्रश्‍न
२३.     खंड-७ : शुद्र पूर्वी कोण होते?
२४.     खंड-८ : पाकिस्तान
२५.     खंड-९ : गांधी आणि कॉंग्रेस यांनी अस्पृश्यांचे काय केले?
२६.     खंड-१०: मजूर मंत्री डॉ.बाबासाहेब आंबेडकर
२७.     खंड-११ : बुद्ध आणि त्यांचा धम्म
२८.     खंड-१२ : अप्रकाशित साहित्य
२९.     खंड-१३ : भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार, डॉ.बाबासाहेब आंबेडकर
३०.     खंड-१४ (दोन भागात) : हिंदू कोड बिल
३१.     खंड-१५ : कायदेमंत्री डॉ. आंबेडकर
३२.     खंड-१६ : पाली व्यकरण आणि शब्दकोश
३३.     खंड-१७ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची सामाजिक क्रांती - भाग १ ते ३
३४.     खंड-१८ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची भाषणे- भाग १ ते ३
३५.     खंड- १९ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता १९२०-१९२८
      (टीप- खंड १ ते १७ हे इंग्रंजी भाषेत तर खंड १८ व १९ हे मराठी भाषेत आहेत.)
३६.     थॉटस् ऑन लिंग्विस्टिक स्टेटस् (भाषिक राज्यांबाबतचे विचार) - अनुवाद वि. तु. जाधव, पुनर्मुद्रण - संजय कोचरेकर, पँथर प्रकाशन.

 बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर लिहिलेली पुस्तके -


१.     आंबेडकर यांचे राजकीय विचार - भ. द. देशपांडे, लोकवाङ्‌मय गृह प्रकाशन.
२.     आंबेडकरांच्या सामाजिक आणि राजकीय चळवळी - कृष्णा मेणसे, लोकवाङ्‌मय गृह प्रकाशन.
३.     डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहवासात - शंकरराव खरात, इंद्रायणी साहित्य.
४.     आंबेडकर - नलिनी पंडित, ग्रंथाली प्रकाशन.
५.     आंबेडकर आणि भारतीय राज्यघटना - डॉ. रावसाहेब कसबे, सुगावा प्रकाशन.
६.     आंबेडकर आणि मार्क्स - रावसाहेब कसबे, सुगावा प्रकाशन.
७.     डॉ. बाबासाहेब आंबेडकर - धनंजय कीर, पॉप्युलर प्रकाशन
८.     बाबासाहेब आंबेडकरांवरील संक्षिप्त संदर्भ सूची - धनंजय कीर.
९.     भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर - म. श्री. दीक्षित, स्नेहवर्धन प्रकाशन.
१०.     डॉ. आंबेडकरांचे अंतरंग- द. न. गोखले, मौज प्रकाशन.
११.     महाकवी डॉ. बाबासाहेब आंबेडकर - वामन निंबाळकर, प्रबोधन प्रकाशन.
१२.     आंबेडकरवाद : तत्त्व आणि व्यवहार - रावसाहेब कसबे, सुगावा प्रकाशन.
१३.     डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रेरणेचे साहित्य(अध्यक्षीय व इतर भाषणे) - संपादक : अडसूळ भाऊसाहेब, महाराष्ट्र बौद्ध साहित्य परिषद, मुंबई, १९७७.
१४.     सरस्वतीचा महान उपासक डॉ. बाबासाहेब आंबेडकर - अवचट पंडित काकासाहेब, सौभाग्य प्रकाशन, पुणे, १९९०.
१५.     डॉ. बाबासाहेब आणि आम्ही - आहेर अविनाश, मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे, १९९६.
१६.     माझी आत्मकथा - अनुवाद : राजेंद्र विठ्ठल रघुवंशी, रघुवंशी प्रकाशन, पुणे, १९९३.
१७.     हिंदू धर्माचे तत्त्वज्ञान - अनुवाद : गौतम शिंदे, मनोविकास प्रकाशन, मुंबई १९९८.
१८.     दलितांचे शिक्षण - अनुवाद : देवीदास घोडेस्वार, संपादक: प्रदीप गायकवाड, क्षितीज पब्लिकेशन, नागपूर, २००४.
१९.     आंबेडकर आणि मार्क्स - सुगावा प्रकाशन, पुणे, १९८५.
२०.     ज्ञानयोगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर - काळे वि. र. , वसंत बुक स्टॉल, मुंबई, २००४.
२१.     डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली घटनेची मीमांसा - अमृतमहोत्सव प्रकाशन, मुंबई, १९६६.
२२.     संसदपटू डॉ. बाबासाहेब आंबेडकर - बी.सी. कांबळे प्रकाशन, मुंबई, १९७२.
२३.     डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अखेरचे संसदीय विचार - बी. सी. कांबळे प्रकाशन, मुंबई, १९७३.
२४.     मनुस्मृती, स्त्रिया आणि डॉ. आंबेडकर - कांबळे सरोज, सावित्रीबाई ङ्गुले प्रकाशन, १९९९.
२५.     डॉ. आंबेडकर विचारमंथन, - कुबेर वा. ना., लोकवाङ्‌मयगृह प्रकाशन, मुंबई.
२६.     पत्रांच्या अंतरंगातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर - खरात माधवी, श्री समर्थ प्रकाशन, पुणे, २००१.
२७.     डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पत्रे - खरात, शंकरराव, श्री लेखन वाचन भांडार, पुणे, १९६१.
२८.     डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आत्मकथा - इंद्रायणी साहित्य, पुणे.
२९.     प्रबुद्ध - खेर भा. द., मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे, १९८९.
३०.     डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची समग्र भाषणे - क्षितीज पब्लिकेशन, नागपूर, २००२.
३१.     डॉ. आंबेडकर आर्थिक विचार आणि तत्त्वज्ञान - जाधव नरेंद्र, सुगावा प्रकाशन, पुणे, १९९२.
३२.     डॉ. बाबासाहेब आणि स्वातंत्र्य चळवळ - जाधव राजा आणि शहा जयंतीभाई, राजलक्ष्मी प्रकाशन, १९९४.
३३.     भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन, विचार, कार्य आणि परिणाम - यदुनाथ थत्ते, कौस्तुभ प्रकाशन, नागपूर, १९९४.
३४.     डॉ. बाबासाहेब आंबेडकर-नियोजन, जल व विद्युत विकास: भूमिका व योगदान - थोरात सुखदेव, अनुवाद : दांडगे, काकडे, भानुपते, सुगावा प्रकाशन, पुणे, २००५.
३५.     डॉ. बाबासाहेब आंबेडकर : मानवतेचे कैवारी, - देशपांडे रा.ह., अनुवाद : गोखले श्री. पु., नवभारत प्रकाशन संस्था, मुंबई.
३६.     डॉ. बाबासाहेब आंबेडकर गौरवग्रंथ - संपादक : दया पवार , महराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, १९९३.
३७.     भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर - संजय पाटील, निर्मल प्रकाशन, नांदेड, २००४.
३८.     डॉ. आंबेडकर आणि विनोद : एक शोध - दामोदर मोरे, ग्रंथाली प्रकाशन, मुंबई, १९९४.
३९.     डॉ. आंबेडकरांचे सामाजिक धोरण : एक अभ्यास - शेषराव मोरे, राजहंस प्रकाशन, पुणे, १९९८.
४०.     डॉ. आंबेडकर : एक चिंतन - मधु लिमये, अनुवाद : अमरेंद्र, नंदू धनेश्वर, रचना प्रकाशन, मुंबई.
४१.     प्रज्ञासूर्य - संपादक : शरणकुमार लिंबाळे, प्रचार प्रकाशन, कोल्हापूर, १९९१.
४२.     डॉ. आंबेडकर आणि त्यांचा धम्म - प्रभाकर वैद्य, शलाका प्रकाशन, १९८१.
४३.     भीमप्रेरणा : भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचे १०० मौलिक विचार - संपादक : अ.म. सहस्रबुद्धे, राजा प्रकाशन, मुंबई, १९९०.
४४.     संविधान सभेत डॉ. आंबेडकर - जयदेव गायकवाड, पद्मगंधा प्रकाशन.
४५.     डॉ. बाबासाहेब आंबेडकर - डॉ. सौ. अनुराधा गद्रे, मनोरमा प्रकाशन.
४६.     डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र - विजय जाधव, मनोरमा प्रकाशन.
४७.     बहुआयामी डॉ. बाबासाहेब आंबेडकर - प्रा. सुभाष गवई, ऋचा प्रकाशन.
४८.     ज्योतीराव, भीमराव - म. न. लोही, ऋचा प्रकाशन.
४९.     चंदनाला पुसा - डॉ. दा. स. गजघाटे, ऋचा प्रकाशन.
५०.     डॉ. बाबासाहेब आंबेडकर - सचिन खोब्रागडे, ऋचा प्रकाशन.
५१.     डॉ. बाबासाहेब आंबेडकर - नाना ढाकुलकर, ऋचा प्रकाशन.
५२.     गोष्टी बाबांच्या, बोल बाबांचे - कुलकर्णी रंगनाथ, १९९१.
५३.     विदर्भातील दलित चळवळीचा इतिहास - कोसारे एच. एल., ज्ञानदीप प्रकाशन, नागपूर.
५४.  डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (समग्र चरित्र) - एकूण खंड १५, खैरमोडे चांगदेव भवानराव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ. ( १ ते ९ खंड म.रा.साहित्य आणि संस्कृती मंडळाद्वारे प्रकाशित आणि खंड १० वा सुगावा प्रकाशन तर्ङ्गे प्रकाशित).
५५.     आंबेडकर भारत - भाग १ - बाबुराव बागुल, राजहंस प्रकाशन, पुणे.
५६.     आंबेडकर भारत - भाग २ - बाबुराव बागुल, सुगावा प्रकाशन, पुणे.
५७.     डॉ. बाबासाहेब आंबेडकर चित्रमय चरित्र - संपादक : धनंजय कीर, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, १९८१.
५८.     आठवणीतले बाबासाहेब, योगीराज बागुल.

पुणे येथे जेनरिक औषधे ९ ठिकाणी उपलब्ध !!

पुणे येथे जेनरिक औषधे ९ ठिकाणी उपलब्ध !!

   
महागड्या औषधांना पर्याय आणि स्वस्त ठरणारी जेनरिक औषधे पेशंटला सहज उपलब्ध व्हावीत , यासाठी पुणे शहरातील नऊ ठिकाणच्या औषध विक्रेत्यांनी पुढाकार घेतला आहे. ही औषधे या केमिस्टकडे आता सहज मिळणार आहेत.


पेशंटसाठी उपयुक्त ठरणारी जेनरिक औषधे विक्रीसाठी उपलब्ध असतील , असे या केमिस्टांनी इंडियन मेडिकल असोसिएशनला (आयएमए) कळविले आहे. डॉक्टरांनी पेशंटच्या मागणीनुसार जेनरिक औषधांची चिठ्ठी द्यावी , असे आवाहन आयएमएने केले आहे.


जेनरिक औषधे ही गुणवत्तापूर्ण असून ती पेशंटला परवडणारी आहेत. त्यामुळे पेशंटला ती सहज उपलब्ध व्हावी यासाठी शहरातील नऊ केमिस्टांनी त्यांच्याकडे जेनरिक औषधे विक्रीसाठी ठेवण्याचे मान्य केले आहे ,' अशी माहिती ' आयएमए ' च्या अध्यक्षा डॉ. माया तुळपुळे यांनी 'मटा' ला दिली.


पेशंटने त्यांच्याशी संबंधित फिजिशियन आणि जनरल प्रॅक्टिशनर्सना जेनरिक औषधे लिहून द्यावीत , अशी विनंती करावी , असेही त्यांनी स्पष्ट केले. ' जेनरिक औषधांची पेशंटकडून मागणी होत आहे. पण डॉक्टरांनी ' प्रिस्क्रिप्शन ' वर ही औषधे लिहून देणे अद्याप सुरू केले नाही. बहुतांश जेनरिक औषधे ही ब्रॅन्डेड औषधांपेक्षा ५० टक्के स्वस्त आहेत. त्यामुळे पेशंटचा फायदा होणार आहे. सहजासहजी ती औषधे मिळावीत यासाठी ती आम्ही उपलब्ध केली आहेत ,' असे निरंजन मेडिकोचे जयेश कासट यांनी सांगितले.

 


पुणे येथे जेनरिक औषधे मिळण्याची ठिकाणे-


१)  मित्र मेडिकल (मित्र मंडळ कॉलनी , पर्वती).

२)  अश्विनी मेडिकल (९८६ , शुक्रवार पेठ).

३)  गंगाधर मेडिकल (ओंकारेश्वर मंदिराजवळ , शनिवार पेठ).

४)  निरंजन मेडिको (५५६ , नारायण पेठ).

५)   लोकायतन (लॉ कॉलेज रस्ता , नळस्टॉपजवळ).

६)  राज मेडिकल (परिहार चौक , औंध).
७)  ताराचंद हॉस्पिटल (वैद्य नानल शास्त्री रस्ता , रास्ता पेठ).
८)  जनलोक मेडिकल्स (हमालनगर).
९)  एम. के. मेडिकल (पुणे विद्यापीठासमोर , गणेशखिंड रस्ता.).



पुणे शहरातील नऊ ठिकाणच्या औषध विक्रेत्यांनी घेतलेल्या या अभिनव उपक्रमाला साऱ्या भारताकडून मानाचा मुजरा !!



धन्यवाद-  म. टा. प्रतिनिधी , पुणे

संदर्भ- http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/19873648.cms

शहर स्वच्छ ठेवण्याची प्रतिज्ञा प्रशासनाला शिव्या न घालता स्वत:शीच करूया- संत गाडगेबाबा.

शहर स्वच्छ ठेवण्याची प्रतिज्ञा प्रशासनाला शिव्या न घालता स्वत:शीच करूया !!




स्वातंत्र्यपूर्व काळ होता तो. मुंबईतला एक नेहमीप्रमाणेच दिवस. लोक आपआपल्या कामात व्यस्त होते. रस्त्यावर मात्र कचऱ्याचा ढिग साचला होता. कुणाचंच त्याकडे लक्ष नव्हंत. दुर्गंधी सुटली होती पण लोक नाकाला रूमाल लावून ये-जा करत होते.


तेवढ्यात एक गोरागोमटा वृद्ध तिथे आला. आपल्या हातातल्या खराट्याने तो कचरा उचलू लागला. त्याच्या चेहर्यावर तेज अन् समाधान ओसंडून वहात होतं. येणाऱ्या जाणार्यांच लक्ष त्यानं वेधून घेतलं.


आपण केलेला कचरा एक वृद्ध उचलतोय हे पाहून लोकांच्या माना शरमेने खाली गेल्या आणि मग प्रत्येक जण झाडू घेऊन त्या वृद्धाच्या मदतीला धावला. काही वेळातच रस्ता चकाकू लागला.


तो वृद्ध लोकांना उद्देशून म्हणाला-''बाबांनो, तुम्ही एवढ्या मोठ्या शहरात रहाता पण इतकी अस्वच्छता तुम्हाला कशी चालते???  हे शहर आपलं घर नाही का??? जसं आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो तसा आपला परिसर पण साफ ठेवा म्हणजे प्लेगासारखे महारोग पसरणार नाहीत.


मी गावखेड्यातला माणूस पण एक गोष्ट सांगतो ध्यानात ठेवा रे बाबांनो, जिथे स्वच्छता असते तिथंच समृद्धी... सुख नांदते..'' ठिगळं लावलेल्या कपड्यातला एक अनोळखी माणूस पण त्याच्या तोंडून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द वेचायला लोकांनी गर्दी केली होती.


एव्हाना गर्दीतल्या एकाने त्याला ओळखलं आणि ''गाडगेबाबा..'' असं म्हणत तो त्यांच्या पाया पडायला गेला. पण तो खाली वाकताच त्याच्या पाठीवर हात मारून तो अवलिया तरातरा चालत निघून गेला.


आज शहरातला बकालपणा आणि गलिच्छपणा पाहून वाटतं कि आजही समाजाला गाडगेबाबांची गरज आहे. तेव्हा त्यांना आदर्श मानून आपलं शहर स्वच्छ ठेवण्याची प्रतिज्ञा प्रशासनाला शिव्या न घालता स्वत:शीच करूया तरच या महापुरूषाच्या कार्याला खरी श्रद्धांजली ठरेल !!


लेखं -गौरव गायकवाड(सोबत प्रबोधन टीम)

स्त्रियांना क्रूरपणाने वागविणेचे नाहीसे करावे किंवा त्यास प्रतिबंध करावा म्हणून केलेले नियम- छत्रपती शाहूमहाराज

स्त्रियांना क्रूरपणाने वागविणेचे नाहीसे करावे किंवा त्यास प्रतिबंध करावा म्हणून केलेले नियम -छत्रपती शाहूमहाराज


नियम करणेचे उद्देश-  इं. पी. कोडमध्ये ज्यासंबंधी सांगितलेले नाही, अशा प्रसंगी स्त्रियांना क्रूरपणाने वागविण्याबद्दल शिक्षा करण्याबाबत कायदा करणे योग्य आहे, असे दिसून आल्यावरून खालीलप्रमाणे कायदा करण्यात येत आहे.


१. कायद्याचे नाव, आरंभ आणि त्याची व्याप्ती-

या नियमांना ‘स्त्रियांना क्रूरपणाने वागविण्याचे बंद करण्याबद्दल नियम’ असे नाव दिले आहे. आणि तारीख 2 ऑगस्ट 1919 पासून ते अंमलात येतील. हे नियम करवीर संस्थानातील सर्व हिंदी प्रजेस लागू होतील. आणि रेसिडेंट साहेबांनी मंजूर केल्यास ते फ्युडेटरी जहागिरीनाही लागू होतील.


२. शब्दांच्या अर्थाचे कलम : विषयास अगर पूर्वापार संबंधास बाधा येत असेल तर, या नियमामध्ये पुढील शब्दांचा अर्थ पुढे लिहिल्याप्रमाणेकरणेचा आहे. म्हणजे -

(अ) ‘क्रूरपणाची वागणूक’ म्हणजे, तिच्या योगाने अयोग्य प्रकारची अनावश्यक शारीरिक दु:ख अगर पीडा उत्पन्न होते, अगर तिच्या योगाने प्रकृतीस इजा होणेसारखे मानसिक क्लेश होतात, अगर तिच्या योगाने प्रकृतीस शारीरिक अगर मानसिक मोठी इजा होण्यासारखी योग्य भीती उत्पन्न होते, ती वागणूक.

(ब) ‘तो’ हे सर्वनाम आणि विभक्ती लागून झालेले शब्द हे पुरुष अगर स्त्री कोणत्याही मनुष्याच्या अर्थाने योजिलेले आहेत.

(क) एकवचनाच्या शब्दात बहुवचनाचा समावेश होतो आणि बहुवचनामध्ये एकवचनाचा समावेश होतो.

(ड) ‘समजुतीचे वय’ म्हणजे 16 वर्षे.

(ई) या नियमात योजिलेले शब्द ज्यांची या कायद्यामध्ये व्याख्या केलेली नाही, परंतु इं. पी. कोड व क्रि. प्रो. कोड यात व्याख्या केलेली आहे, त्या शब्दांचे अर्थ त्या त्या कोडात सांगितल्याप्रमाणे आहेत असे समजावे.


बाब २ ) साधारण अपराध-


3. इं. पी. कोडाची कलमे 76 ते 106 (दोन्ही धरून) यांचा समावेश या नियमात केलेला आहे व ती कलमे या कायद्यात प्रत्यक्ष घातल्याप्रमाणे त्यांचा परिणाम समजणेचा आहे.


बाब ३) या नियमाखालील अपराध-


४.  जो कोणी समजुतीचे वयात आलेला असून पूर्वीचे व्याख्येत सांगितल्याप्रमाणे कोणाही स्त्रीशी आपखुशीने क्रूरपणाची वागणूक करील, तर त्यास दोहो प्रकारापैकी कोणत्याही एका प्रकारच्या कैदेची शिक्षा दिली पाहिजे, आणि ती कैद सहा महिन्यापर्यंत ठरविणेचे अखत्यार आहे किंवा त्यास दंडाचीही शिक्षा दिली पाहिजे आणि तो दंड 200 रुपयेपर्यंत करणेचा अखत्यार आहे किंवा दोन्ही शिक्षा दिल्या पाहिजेत. आणखी असेही ठरविण्यात येते की, ज्या स्त्रीस क्रूरपणाने वागविले ती स्त्री समजुतीने वयात आली नसेल तर ती शिक्षा दुप्पट करण्याचा अखत्यार आहे.
खुलासा- कैद दोन प्रकारची आहे. 1. सक्तमजुरीची, 2. साधी


उदाहरणे-

अ. आपली बायको राहत असलेल्या आपल्या घरी ‘अ’ हा आपखुशीने एका रखाऊ स्त्रीस आणतो, आणि आपल्या स्त्रीच्या इच्छेविरूद्ध आणि ती नको म्हणत असता, त्या रखाऊ स्त्रीस त्या घरी ठेवतो, आणि त्या योगे आपल्या स्त्रीच्या प्रकृतीवर शारीरिक अगर मानसिक मोठी इजा होईल अशी योग्य भीती उत्पन्न करतो.
‘अ’ हा या नियमान्वये अपराध केलेबद्दल गुन्हेगार आहे.

ब. ‘अ’चे धाकटे भावाची एक विधवा आहे. ती त्याच्या कुटुंबापैकी एक इसम आहे. तिला आपले ताब्यात ठेवणेसाठी ‘अ’ हा सतत दोन दिवस आणि दोन रात्री तिला मुद्दाम अन्नपाण्यावाचूनठेवतो किंवा तिला झोपू न दात उभी करतो. ‘अ’ हा या कायद्याप्रमाणे गुन्हेगार आहे.

क. ‘अ’ हा मुद्दाम बरेच दिवस आपल्या स्त्रीचा सहवास टाळतो किंवा तिची मुद्दाम अवहेलना करतो, आणि अशा टाळण्याने आणि अवहेलनेने तिच्या प्रकृतीस शारीरिक अगर मानसिक मोठी इजा होणेची योग्य भीती तो उत्पन्न करतो.
‘अ’ हा या नियमाप्रमाणे अपराध केल्याप्रमाणे गुन्हेगार आहे.

ड. ‘अ’ ही आपल्या सुनेस मुद्दाम अत्यंत उपमर्दक भाषा वापरून किंवा तिजवर थुंकून किंवा तिला रस्त्यावरून ओढून चारचौघात तिच्या मनाला धक्का देते आणि त्यायोगे तिच्या प्रकृतीस शारीरिक अगर मानसिक मोठी इजा होण्यास योग्य अशी भीती उत्पन्न करते.
‘अ’ ही या नियमान्वये अपराध केलेबद्दल गुन्हेगार आहे.

ई. ‘ब’ ही ‘अ’ची सावत्र आई आहे आणि ती ‘अ‘ वर अवलंबून आहे. तिच्या मनास दु:ख व्हावे म्हणून तिच्या समक्ष बुद्धिपरस्पर ‘अ’ हा तिचे मुलांना वाईट रितीने वागवितो, आणि असे करून ‘ब’च्या प्रकृतीस शारीरिक अगर मानसिक मोठी इजा होणेसारखी भीती उत्पन्न करतो.
‘अ’ हा या नियमान्वये अपराध केल्याबद्दल गुन्हेगार आहे.

फ. ‘अ’ हा आपल्या स्त्रीची, तिच्या पातिक्रत्यासंबंधी वारंवार आणि निराधार दूषणे देऊन, बेअदबी करतो, आणि त्या कारणावरून, तिच्याकडे दुर्लक्ष करून आणि तिला अर्धपोटी ठेवून, तिला इतक्या जुलुमाने वागवितो की, तिला वेड लागल्यासारखी भीती उत्पन्न होते.
‘अ’ हा या नियमान्वये गुन्हेगार आहे.


५. वरील शेवटचे नियमान्वये अपराध केल्याबद्दल एखाद्या इसमास शिक्षा झाली आणि पुन्हा त्याच नियमाखाली अपराध केल्याबद्दल पुन्हा तो गुन्हेगार ठरला तर त्यास दोहो प्रकारांपैकी कोणत्याही एका प्रकारचे कैदेची शिक्षा द्यावी आणि ती दोन वर्षेपर्यंत देणेचे अखत्यार आहे, शिवाय तो दंडासही पात्र आहे.


अ. या नियमान्वये अपराध केल्याबद्दल कोणा इसमाचा तपास अगर चौकशी चालू आहे, असे असता, त्याच इसमाविरूद्ध वरील नियमाखाली पुन्हा त्या इसमाने अपराध केला असेल तर त्या दुसर्या गुन्हय़ाबद्दलचीचौकशी चालू चौकशीचे वेळीच होईल. आणि त्यावर गुन्हा शाबीत झाल्यास तो जास्त शिक्षेस पात्र होईल.


ब. या नियमान्वये तपास अगर चौकशी चालू असता, त्यातील फिर्यादी आरोपींचे अंगावर चालून जाईल अगर त्याचा उपमर्द करील, तर अंगावर जाणे, अगर उपमर्द करणे, शाबीत झाल्यास, निकाल सांगणेच्या पूर्वी, केव्हाही फिर्यादीची फिर्याद काढून टाकण्यास पात्र होईल. फिर्याद काढून टाकण्यास अंगावर जाणे व उपमर्द करणे कोणत्या प्रकारचे पाहिजे, हे ठरवणे केवळ मूळ अपराधाचा तपास अगर चौकशी करणार्या कोर्टाचे मर्जीवर आहे.


६. साह्य करण्यासंबंधी इं. पी. कोडमध्ये जी कलमे व त्यांच्या व्याख्या आहेत, ती सर्व कलमे या कायद्याखालील अपराधांस साह्यास लागू आहेत.


बाब ४)


७. या कायद्याखालील सर्व गुन्हय़ांची चौकशी सेशन कोर्ट 1 ला अगर 2 रा वर्ग मॅजिस्ट्रेट यांनी करावी आणि ती प्रचलित क्रि. पो. कोडप्रमाणे करावी.


८. एखाद्या स्त्रीसंबंधाने जी वागणूक झाली असे म्हणणे असेल, ती वागणूक इं. पी. कोडाप्रमाणे अपराध होईल किंवा या कायद्याप्रमाणे अपराध होईल, याजबद्दल शंका येईल त्याप्रसंगी, आरोपीवर वैयक्तिक चार्ज करावा. परंतु इं. पी. कोडप्रमाणे त्या अपराधास जी शिक्षा सांगितली आहे त्यापेक्षा जास्त शिक्षेस तो पात्र होणार नाही.


९. या कायद्याखालील प्रत्येक अपराध हा नॉनकॉग्निजिबल आहे, जमिनीचा आहे व तो आपसात भागवता येईल.


१०. एखादे कज्ज्यातील अखेरचा निकाल होणेपूर्वी ‘यापुढे आपण फिर्यादीस क्रूरपणाने वागवणार नाही’ असे जर आरोपी कबूल करील तर कोर्टांनी ती फिर्याद निकालात काढून टाकावी आणि मर्जीस येईल तर 50 रुपयेपेक्षा जास्त नाही, अशी योग्य ती रक्कम त्या स्त्रीस आरोपींकडून देवविणेबद्दल हुकूम करावा.


११. या कायद्याचे धोरणास विरूद्ध नाहीत, अशा रितीने चालू क्रि. प्रो. कोडाची कलमे लागू आहेत असे समजावे.


हा कायदा करण्याचा उद्देश व त्याची कारणे-

अनुभवांती असे दिसून आले आहे की, पाश्चिमात्य शिक्षणाचा प्रसार फार मंद गतीने होत आहे, म्हणून हिंदुस्थानातील स्त्रियांची स्थिती सुधारणेचे कामी त्या शिक्षणाचा उपयोग व्हावा तितका होत नाही. हिंदुस्थानातील लोकांचे जे निरनिराळे समाज आहेत, त्यांच्या शास्त्रकारांनी हिंदू कुटुंबाचे पुढार्याना प्रसंगाविशेषी स्त्रियांना हलकेसे शासन करण्याची परवानगी दिलेली आहे. परंतु त्या परवानगीचा दुरुपयोग होऊन, स्त्रियांना वाटेल तशा वाईट रीतीने वगाविण्यात आपणाला सनातन कालाचा परवानाच मिळाला आहे, अशी पुरुषांची समूजत झालेली दिसते. याकरिता स्त्रियांना होत असलेल्या जाचांचे हे प्रकार इं. पी. कोडच्या मर्यादेत येऊ शकत नाहीत, अशा प्रकारच्या जाचांपासून होणार्या दुष्परिणामास आळा घालावा म्हणून, हे नियम करणे योग्य व अवश्य असल्याचे दिसून आले आहे.

क्रूरपणाची वागणूक कशाला म्हणावे हे ठरविण्यासाठी ज्या गोष्टी जरुरीच्या आहेत म्हणून आम्ही सांगितले आहे त्या गोष्टी मागासलेल्या वर्गाला आणि अशिक्षित समाजाला जास्त कडक आहेत, असे वाटण्याचा संभव आहे. परंतु शिक्षणाच्या सुपरिणामावरच केवळ आपण अवलंबून राहू लागलो तर स्त्रीवर्गाची स्थिती सुधारणेचे काम फारच मंद गतीने चालेल. शिक्षणाचा परिणाम लवकर घडून यावा, या हेतूसाठी मनुष्यास कायद्याचे दहशतीची मदत पाहिजे ही गोष्ट अगत्याची दिसून येत आहे. ‘सर्व गोष्टी रीतीप्रमाणे व क्रमाक्रमाने होतच आहेत, आपण त्यात हात घालणेचे कारण नाही’ हे तत्त्व फक्त उच्च प्रतीच्या सुधारलेल्या समाजालाच लागू पडणारे आहे. मागासलेल्या लोकांची सामाजिक सुधारणा घडवून आणण्याचे काम कायद्याची मदत घेतल्यावाचून केव्हाही होणार नाही. स्त्रियासंबंधी क्रूरपणाचे वागणुकीचे क्रित्येक प्रकार असे आहेत की, ते अपराध या शब्दाखाली येऊ शकत नाहीत आणि इं. पी. कोडचा अंमल त्यावर चालत नाही. मात्र ते प्रकार केव्हा केव्हा इतके दुष्ट प्रतीचे असतात की, त्यामुळे स्त्रीजातीला आपला जन्म केवळ कंटाळवाणा व भूभार आहे असे वाटू लागते. या गोष्टी लक्षात घेऊन ‘क्रूरपणाची वागणूक’ या शब्दाची व्याख्या आम्ही कशी तयार केली आहे की, त्यातून कोणत्याही प्रकारची वाईट वागणूक सुटून जाता कामा नये.


हेही आपण लक्षात ठेवले पाहिजे की, अत्यंत त्रासदायक आणि जुलमी वागणूक वरिष्ठ वर्गाचे लोकांत घडत असली, तरी तिच्याबद्दल केव्हाही तक्रार होत नाही. त्या चारचौघात येत नाहीत किंवा आणण्याचा प्रयत्नही केला जात नाही. म्हणून अशी सर्वसाधारण कसोटी आम्ही घालून दिलेली आहे की, त्या योगाने अत्यंत सुधारलेल्या समाजातील क्रूरपणाचे वागणुकीचे प्रकार आहेत, त्यांचाही यात समावेश करावा.


४ थ्या नियमाखाली काही उदाहरणे अशी घातली आहेत की, ती प्रकृतीवर शारीरिक अगर मानसिक मोठी इजा होणेची फक्त भीती आहे, याच कल्पनेवर रचलेली आहेत. त्या उदाहरणांचा हेतू असा की, ज्या प्रसंगी वाईट परिणाम प्रत्यक्ष घडून आला नाही, पण तो इतका समीप आहे की, त्यामुळे शारीरिक अगर मानसिक कायमची इजा होणेचा संभव आहे, अशा प्रकारांचा त्यात समावेश व्हावा. यातील तत्त्व इतकेच आहे की, कायद्याने दुष्ट परिणाम प्रत्यक्ष घडून येणेची वाट पाहत राहू नये, त्याचा आगाऊच प्रतिकार करावा.


या कायद्याने नवरा-बायकोसंबंधीच फक्त क्रूरपणाचे वागणुकीचा विचार केलेला आहे असे नाही. हे नियम असे केलेले आहेत की, स्त्रीजातीला कोणत्याही प्रसंगी जुलूम होत असला तरी त्याचा विचार या कायद्याने करण्यात यावा.



कोल्हापूर, ता. 29 जुलाई १९१९.
- छत्रपती शाहूमहाराज


धन्यवाद- किशोर बाभळे.

अमिताभ बच्चन कुटुंबाचे ज्योतिषी झोपतात १५ किलो सोन्याचा पलंगावर !!

अमिताभ बच्चन कुटुंबाचे ज्योतिषी झोपतात १५ किलो सोन्याचा पलंगावर !!

 
'त्यांचा' पलंग तब्बल १५ किलो सोन्यानं मढवलाय... अवतीभवतीच्या वस्तूही सोन्या-चांदीनं लखलखताहेत... शयनगृह सजवण्यासाठी जवळपास ५० किलोहून जास्त चांदी सहज वापरली असावी... या खोलीतलं एक चकाकणारं कपाट उघडलं तर कोट्यवधी रुपयांची रोकड डोळे दीपवून टाकते... आणि 'त्या' सोन्याच्या बेडवरची उशी उचलली तर १५ लाखांच्या करकरीत नोटा पाहून गरगरायला होतं...


कुण्या मुघल सम्राटाच्या आलिशान महालाचं हे वर्णन नाही किंवा कुण्या राजकुमाराची सूरस काल्पनिक गोष्टही आम्ही सांगत नाही आहोत. तर, बंगळुरूचे प्रसिद्ध ज्योतिषी चंद्रशेखर स्वामी यांच्या बेडरुममध्ये इन्कमटॅक्स अधिकाऱ्यांना जे 'वास्तुरंग' दिसले त्याचीच ही 'कुंडली'... अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या या सुपरहिट जोडीची पत्रिका ज्यांनी जुळवली, तेच हे चंद्रशेखर स्वामी... आयकर खात्याच्या धाडीनंतर त्यांच्या स्वतःच्या पत्रिकेतला 'मंगळ' 'वक्री' झाल्याचे संकेत मिळताहेत.


कर्नाटक निवडणुकीदरम्यान झालेल्या आर्थिक 'देवाण-घेवाण' प्रकरणी आयकर खात्यानं नुकतेच चंद्रशेखर स्वामी यांच्या घरावर छापे टाकले. रिअल इस्टेट क्षेत्रातील बडी असामी असलेले स्वामी मनी लॉण्डरिंगमध्येही चांगलेच सक्रिय असल्याचं बोललं जातं. इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांनाही हा संशय होताच. त्यामुळे त्यांनी १० कोटी रुपयांच्या स्वामींच्या बंगल्यावर धाड टाकली आणि त्यांच्यापुढे जणू अलिबाबाची गुहाच उघडली गेली.


इलेक्ट्रॉनिक गेटमधून आयकर अधिकाऱ्यांनी बंगल्यात प्रवेश करताच, त्यांना बीएमडब्ल्यू, लेक्सस आणि बीटल या महागड्या गाड्या दिसल्या. त्या पाहत-पाहतच ही मंडळी आत शिरली आणि तिथला राजेशाही थाट पाहून अवाक् झाली. स्वतः नेहमीच सोन्यानं मढलेल्या चंद्रशेखर स्वामींचा बंगला म्हणजे सोन्या-चांदीची खाणच होती. त्यांचा नुसता पलंगच १५ किलो सोन्याचा असल्याचं एका अधिकाऱ्यांनं सांगितलं. साधं बाथरुम सजवण्यासाठी त्यांनी तब्बल २ कोटी रुपये खर्च केलेत, तर कपाटात कोट्यवधींचं घबाड लपवलंय. सोन्या-चांदीची मोजदाद करायची तर 'पूज्य' मोजता मोजता आपली दमछाक होईल, असं सूत्रांनी सांगितलं.
राजकारण, उद्योग आणि सिनेसृष्टीत चंद्रशेखर स्वामींची मोठी पोच आहे. अमिताभ बच्चन यांचे बंधुराज अजिताभ यांनी त्यांची बिग बींशी ओळख करून दिली होती. तर, ज्योतिषाचा वारसा वडिलांकडूनच आलेला असल्यानं ऐश्वर्याचे कुटुंबीय त्यांना आधीपासूनच ओळखत होते. त्यामुळे अभिषेक-ऐश्वर्याची पत्रिका त्यांचीच जुळवली होती. त्यानंतर तर त्यांचं भाग्यच फळफळलं होतं. पण आता त्यांचे ग्रह फिरले आहेत.


चंद्रशेखर स्वामी यांच्या प्रेयसीच्या घरावरही आयकर खात्यानं छापा टाकला. तिथेही ८ कोटी रुपयांहून अधिक बेनामी संपत्ती सापडली आहे. त्यामुळे आता स्वामींची 'कुंडली' मांडायला आयकर अधिकाऱ्यांनी सुरुवात केलेय. एरवी लोकांचे ग्रह पाहून भविष्य सांगणाऱ्यां स्वामीजींना आता दिवसाढवळ्या 'तारे' दिसण्याची चिन्हं आहेत.


 
धन्यवाद- सुधीर चौधरी.

संदर्भ - http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/20025240.cms

असगर अली इंजिनियर यांच्या निधनाने आपण काय गमावले !!

असगर अली इंजिनियर यांच्या निधनाने आपण काय गमावले !!



असगर अली इंजिनियर यांच्या निधनाने आपण काय गमावले आहे, याची जाणीव त्यांचे विचार वाचताना यापुढे वेळोवळी होत राहील. इस्लामच्या सर्व छटांचा, सर्व पंथांचा अभ्यास करणाऱ्या असगरअलींनी समाजाची घडी आज अशी का दिसते आहे, याच्या उत्तरांचा शोधही नेहमीच घेतला. धर्म आणि आजच्या धारणा एकमेकांशी विसंगत आहेत, हे सत्य त्यांनी निर्भीडपणे मांडले. समाजधारणांतील दोष सुधारण्यासाठी चळवळही उभारली. अशा सक्रिय समाजहितैषी विद्वत्तेमुळेच स्वधर्मातून (दाऊदी बोहरा पंथातून) बहिष्कृत ठरलेल्या या धर्मसमीक्षकाने सुधारकी भूमिकेची मुळेही धर्मात कशी आहेत, हे दाखवून दिले. त्यांच्या विचारांची ही सारी वैशिष्टय़े दाखविणारे हे चिंतन..


स्त्रीवाद किंवा हिंदीतला 'नारीवाद' - हे सारे शब्द मुळात आपले शब्द नसून इंग्रजीतला 'फेमिनिझम' ही संकल्पनाच तद्दन पाश्चात्त्य आहे, असे अनेकांना वाटते. आम्ही 'इस्लामिक फेमिनिझम' याच नावाची एक कार्यशाळा घेतली होती, तेव्हा एका मौलानांनी तर आपण 'फेमिनिझम' वगैरे बिगरइस्लामी विषयांवर बोलणार नाही, या कारणासाठी भाषण करणेच नाकारले. वास्तविक, ही संज्ञा इस्लामी दृष्टिकोनाला खरोखरच आक्षेपार्ह वाटावी, असे काहीही अजिबात नाही. वास्तविक, स्त्रिया या जेव्हा पुरुषांच्या गुलामच समजल्या जात, त्यांना स्वतंत्र अस्तित्व आहे आणि त्याही समान हक्काने व समान प्रतिष्ठेने जगू शकतात असे कुणाला वाटत नव्हते, त्या काळात स्त्रियांच्या सबलीकरणाची व्यवस्था घडवू पाहणारा इस्लाम हा धर्म निर्माण झाला.



स्त्रीवाद तरी वेगळे काय म्हणतो? स्त्रीवादी चळवळ ही स्त्रीला पूर्णपणे मानव म्हणून जगण्यासाठी बळ देऊ पाहणारी चळवळ आहे. स्त्रीवादी लेखिका सिमॉन द बूव्हॉ हिनेदेखील 'सेकंड सेक्स' या पुस्तकातून स्त्रीवर लादला गेलेला दुय्यमपणाच नाकारला होता. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत पाश्चात्त्य देशांमधील स्त्रियांनादेखील समान वागणूक तर सोडाच, परंतु स्वतंत्र नागरिकाची प्रतिष्ठाही नव्हती, हे आपल्याला माहीत आहे. त्या (पाश्चात्त्य) देशांमध्ये १९३०च्या दशकापासून स्त्रियांनी आपले हक्क मागायला आणि मिळवायला सुरुवात केली, त्यामुळे त्या देशांतील ज्या कायद्यांनीच स्त्री-पुरुष भेद चालवला होता, त्या कायद्यांत हळूहळू बदल घडू लागले. मात्र पुरुषसत्ताक व्यवस्था त्याही वेळी या देशांत कायमच राहिली.



इस्लाममध्ये, कुराणाने स्त्रीला समान प्रतिष्ठेची वागणूक दिली असूनही मुस्लिमांनी ही स्त्री-पुरुष समानता स्वीकारलेली नाही. ही समानता स्वीकारण्यास राजी होण्यापासून मुस्लीम समाज फारच दूर राहिला. अरब संस्कृतीइतकी पुरुषसत्ताक, की समानता स्वीकारणे त्यांना जमलेच नाही.. मग स्त्रीची प्रतिष्ठा कमीच असली पाहिजे यासाठी अनेक हदिस (कुराणाज्ञा) बदलून टाकल्या गेल्या आणि पुढे अन्यही अनेक देशांतील मुस्लीम समाजांत कुराणातील वचनांचे सोयिस्कर अर्थ लावून तिला बंधनांमध्ये- म्हणजे कायम पुरुषावर अवलंबूनच- ठेवले गेले. 'सजदा' किंवा पायी लोटांगण घेणे याबद्दल कुराणातील वचन काहीही म्हणत असले, तरी स्त्रीने तिच्या पतीच्या पायी लोटांगणच घातले पाहिजे, यावर एकमत झाले. हे कुराणाशी पूर्णत: विसंगत होते, परंतु पर्वा कोण करतो? इस्लामी देशांतसुद्धा स्त्रीविषयक कायद्यांवर प्रभाव आहे तो कुराणाचा नसून पुरुषसत्ताक पद्धतीचाच. जेव्हा जेव्हा पुरुषसत्ताक पद्धती की कुराण असा प्रश्न आला असेल तेव्हा कुराण बाजूला पडले, म्हणजेच कुराणातील वचने एक तर अनादरपूर्वक गुंडाळूनच ठेवण्यात आली किंवा पुरुषसत्ताक पद्धती अबाधित राहील अशाच पद्धतीने कुराणवचनांचा अर्थ लावण्यात आला, हा इतिहास आहे.



या इतिहासापासून फारकत घेऊन, कुराणाचे मर्म ओळखण्याची वेळ आता आली आहे. परंतु हे कुराणाचे मर्म ओळखून जगण्याची इस्लामी जगाची तयारी नाही, असेच दिसते आहे. याहीपेक्षा वाईट म्हणजे, गरिबीमुळे आणि अज्ञानामुळे मुस्लीम स्त्रियांनाच, कुराणाने महिलांना काय हक्क दिलेले आहेत, त्याची जाणीवही उरलेली नाही. मुस्लीम स्त्रियांना त्यांच्याच धर्माने, त्यांच्याच धर्मग्रंथाने स्त्रीला दिलेल्या हक्कांची जाणीव आज करून देण्यासाठीची चळवळ सुरू झाली पाहिजे, अशी परिस्थिती आज आहे.



दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, इस्लामचा स्त्रीवाद आणि पाश्चात्त्यांचा स्त्रीवाद यांत काय फरक आहे.. म्हणजे फरक खरोखरच आहेत की काहीच फरक नाही? स्त्रीवादाला स्त्रियांच्या सबलीकरणाचे तत्त्वज्ञान मानले, तर फरक काहीही नाही. मात्र, ऐतिहासिकदृष्टय़ा इस्लामी जगातला स्त्रीवाद आणि पाश्चात्त्यांचा स्त्रीवाद आज भिन्न पातळय़ांवर दिसतील. इस्लामी देशांमध्ये किंवा इस्लामी समाजांमध्ये स्त्रीला तिच्या धर्मग्रंथाने दिलेले तिचे न्याय्य हक्क नाकारून पुरुषसत्ताक पद्धती स्त्रीला मध्ययुगीत दास्यामध्ये ठेवत आलेली आहे. याउलट पाश्चात्त्य समाजांतील कायद्यांनी स्त्रीला हक्क दिलेलेच नव्हते, ते भांडून मिळवण्यासाठी जी चळवळ उभी राहिली त्या संघर्षांलाच पाश्चात्त्य लोक 'स्त्रीवाद' समजतात.



स्त्रियांना हक्क मिळायला हवेत हा मुद्दा दोन्हीकडे समान असला, तरी इस्लामी आणि पाश्चात्त्य स्त्रीवादात काही लक्षणीय फरकही आहेत. 'सर्वाना सारखाच मान, सर्वाची प्रतिष्ठा समान' अशी समानता इस्लाममध्ये अंगभूत आहे. या मूल्यांशी तडजोड होऊ नये, असे इस्लामला अभिप्रेत आहे. मात्र, 'स्वातंत्र्य' या मूल्यावर जबाबदाऱ्यांची बंधने घालणेच इस्लाम पसंत करतो. पाश्चात्त्य समाजांमध्ये स्वातंत्र्य असे र्निबधयुक्त नसते, ते इतके मिळते की स्वातंत्र्याचेच रूपांतर स्वैराचारातही घडू शकते.. हा स्वैराचार करा, असे कायदा सांगत नसला तरी सामाजिक आणि सांस्कृतिक व्यवहारांत स्वैराचार हे स्वातंत्र्याचेच रूप असल्याचे समजून घेतले जाते. योनिशुचितेच्या कल्पना पाश्चात्त्य देशांमध्ये लयाला जाऊन समागम आनंदासाठी करण्याची कृती हाच अर्थ राहिला आणि प्रजननाची कृती म्हणून त्या कृतीला मिळणारे प्राधान्य संपुष्टात आले. दुसरीकडे, कुराण काही बुरखा वापरायला सांगत नाही. हिजाब हे अंगभर सैलसर वस्त्र किंवा नकाब हा चेहरा झाकणारा अडसर वापरण्याची सूचना कुराणाने केल्याचा समज सर्वदूर असला तरीही तसे नाही; परंतु कुराणाने स्त्रीपुरुषांच्या (दोघांच्याही) लैंगिक वर्तनावर अत्यंत कडक र्निबध घातले आहेत. लैंगिक सुख मिळवण्याचा हक्क स्त्री-पुरुषांना समान आहे- स्त्रीलादेखील पुरुषाइतकाच तो हक्क आहे- असे कुराण मानत असले, तरी लैंगिक सुख हे वैवाहिक चौकटीत राहूनच मिळवण्याचे बंधन कुराणाने घातले आहे. कोणतीही लैंगिक वर्तनाची कृती वैवाहिक जोडीदाराखेरीज अन्य कुणाशीही होऊच शकत नाही, विवाहबाह्य़ संबंध असताच नयेत, असे कुराण सांगते. इस्लाममध्ये संभोगाचा मूळ हेतू आनंद हा नसून तो प्रजननाचा मार्गच असल्याने हे पावित्र्य जपलेले आहे.



येथे आता एक मुद्दा भर देऊन सांगितला पाहिजे तो असा की, पुरुषसत्ताक पद्धतीत संभोग, लैंगिक वर्तन यांविषयीचे नेमनियम पुरुषांनीच ठरवलेले असतात. त्यामुळे इस्लामी समाजांतही पुरुषांनीच कुराणाचा असा अर्थ काढला की, पुरुषांची कामेच्छा अधिक असते आणि म्हणून त्यांना एकापेक्षा अधिक स्त्रिया (पत्नी) असण्याची मुभा असावी- याउलट स्त्री ही केवळ प्रतिसाद देणारी असल्याने तिने एकाच पतीवर समाधान मानावे. कुराणदृष्टय़ा हे (बहुपत्नीत्वाची मुभा देण्याचे समर्थन) खरे ठरत नाही.



याबाबत कुराणाचा दृष्टिकोनच मुळात निराळा आहे. कामेच्छा स्त्रीला अधिक की पुरुषाला यावर कुणी एकापेक्षा अधिक जोडीदार करावेत हे ठरवा, असे कुराण सांगत नाही. कुराणाच्या ४:३ आणि ४:१२९ या आयतींचा भर तर स्पष्टपणे एकाच वैवाहिक जोडीदाराशी एकनिष्ठा, यावरच आहे. बहुपत्नीत्वाचा उल्लेख कुराणात येतो, तो विधवाविवाहाचा आहे- विधवांना आणि त्यांच्या अनाथ मुलांना आधार द्यावा, यासाठी ही मुभा आहे. उलट एकपत्नीत्वाचा आदर्श पाळून पतीने आपल्या (पहिल्या) पत्नीला अशा (विधवा अथवा अनाथ महिलांना आधार देण्यासाठी केलेल्या, दुसऱ्या) विवाहाबाबत स्पष्ट कल्पना द्यावी आणि कधीही (पहिल्या पत्नीला) अंतर देऊ नये, तिला दुर्लक्षित सोडू नये, असेही बंधन कुराणाने (४:१२९) घातले आहे. याचा अर्थ असा होतो की, कुराणात कामपूर्तीचा हक्क महिलांनाही वादातीतपणे पुरुषांइतकाच दिला आहे. त्या हक्काबाबत तडजोड नाही, म्हणून विधवांना लग्नाची मुभा.



पाश्चात्त्य, भांडवलशाही देशांत स्त्रियांचे शोषण निराळय़ा पद्धतीने होताना आपण पाहतो. स्त्रीला तेथे भोग्य वस्तूच समजून तिची अर्धवस्त्रांकित पोस्टरे जाहीरपणे लावून, स्त्रीदेहाचा जणू बाजार मांडला जातो, हे दुर्दैवी आहे. त्याहीपेक्षा, ते स्त्रीचा (माणूस म्हणून) मान आणि प्रतिष्ठा या संकल्पनेशी विसंगत आहे. पाश्चात्त्य फेमिनिस्टांना हे आक्षेपार्ह वाटत नाही, उलट हेही स्त्रीचे स्वातंत्र्यच असा समज त्यांचा असतो. स्वातंत्र्याबद्दलच्या अशाच समजातून काही जणी (फार नव्हेत) तर वेश्याव्यवसायाचाही विचार 'स्त्री करू शकते असा एक चरितार्थाचा व्यवसाय' म्हणून करावा, असे म्हणू लागल्या आहेत. हा विचार मात्र स्त्रीवादाच्या इस्लामी संकल्पनेच्या विरोधात आहे.. ती इस्लामी संकल्पना म्हणजे, 'स्त्रीलाही पुरुषाइतकाच कामपूर्तीचा हक्क.'



समानतेची ही पातळी इस्लामने जाणली. त्यामुळेच असे दिसते की, स्त्रीवादाच्या पाश्चात्त्य संकल्पनांशी इस्लामच्या स्त्रीवादी संकल्पना काही प्रमाणात मिळत्या-जुळत्या असल्या, तरी त्यांत मोठा फरकही आहे. इस्लामी स्त्रीवादय़ांवर (स्त्री आणि पुरुषांवरही) बंधने आहेत, तशी ती पाश्चात्त्य स्त्रीवादय़ांवर नाहीत.


(इंजिनियर यांचे लेख त्यांनीच स्थापलेल्या 'सेंटर फॉर स्टडी ऑफ सोसायटी अँड सेक्युलरिझम' या संस्थेकडून ईमेलद्वारे काही पत्रकारांनाही पाठविले जात, त्यापैकी हा ७ जून २०११ रोजीच्या ईमेलमधील लेख. या संस्थेचा ईमेल- csss@mtnl.net.in)

धन्यवाद- लोकसत्ता.

संदर्भ- http://www.loksatta.com/vishesh-news/feminist-islam-113595/

छत्रपती संभाजीराजे !!


१४ मे छात्रवीर,रणमर्द, जगातील पहिले बाल साहीत्यिक, विद्वान पंडित, स्वराज्याचे रक्षणकर्ते, शिवस्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसलेयांच्या  जयंतीच्या हार्दिक-हार्दिक शुभेछा" !!


महाराष्ट्राचे पहिले युवराज आणि दुसरे छत्रपती, छत्रपती संभाजी राजे यांच्या जन्मोत्सव निमित्त माझा हा इतिहास संशोधित लेख-



१६७२ साली हिंदुस्तानात आलेल्या अबे कारे या फ्रेंच प्रवाशाने संभाजी राजांना प्रत्यक्ष पहिले होते. तो लिहितो हा युवराज लहान असला तरी धैर्यशील आणि आपल्या पित्याच्या कीर्तीस साजेल असाच शूर वीर आहे. शिवाजी महाराजासारख्या युद्धकुशल बापाबरोबर राहून तो युद्धकलेत तरबेज झालेला असून, चांगल्या वयोवृद्ध सेनापातीचीही बरोबरी तो करू शकेल इतका तो तयार आहे. या बाळराजाची सर्वत्र इतकी स्तुती केली जाते कि त्याच्या बापालाही त्याचा हेवा वाटत असेल !


असे होते शंभूराजे ! शिवरायांनी १६७० सालापासूनच युवराज म्हणून संभाजीला प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. राज्यकारभाराचा अनुभव यावा म्हणून शिवरायांनी जबाबदारीची कामे संभाजीस सांगण्यास सुरुवात केली (२ ६ जानेवारी १६७१) {पहा शिवचरित्र प्रदीप पृ ५२
}.


आबे करे पुढे म्हणतो (१६७२ मध्ये ) "शिवाजी राजांनी आपल्या सैन्याचे विभाग करून शेजारच्या सर्व शत्रूवर एकाच वेळी हल्ला चढवला आहे. शिवाजी राज्यांनी दहा हजार शूर अशा सैन्याचे नेतृत्व आपल्या ज्येष्ठ पुत्र संभाजीच्या ताब्यात दिला आहे. हा युवराज लहान असला तरी धैर्यशील आणि आपल्या पित्याच्या कीर्तीस साजेल असाच शूर वीर आहे. शिवाजी महाराजासारख्या युद्धकुशल बापाबरोबर राहून तो युद्धकलेत तरबेज झालेला असून, चांगल्या वयोवृद्ध सेनापातीचीही बरोबरी तो करू शकेल इतका तो तयार आहे. या बाळराजाची सर्वत्र स्तुती केली जाते. तो मजबूत बांध्याचा, अति रूपवान असा आहे. त्याचे सोदर्य आणि त्याचे पराक्रम हाच सैनिकांचे त्यांचे आकर्षण वाढवणारा मोठा गुण आहे. शिवरायानइतकेच त्यालाही त्याचे सैन्य मान देत असते. फरक इतकाच कि ह्या सैनिकांना संभाजीच्या नेतृत्वाखाली लढण्यात विशेष धन्यता वाटते. ते आपल्या कर्तबगारीचे सर्व श्रेय आपल्या छोट्या सेनापतीस (संभाजीस ) देतात. कोणीही कर्तबगारी दाखवलि कि संभाजी त्यांचे कौतुक करतो. त्यांच्यासमोर एखाद्याने शौर्य दाखवले कि संभाजी त्याला बक्षीस दिल्याशिवाय राहत नाही."


जगावे कसे हे आम्हाला छत्रपती शिवरायांनी शिकवले आणि मरावे कसे हे आम्हाला युवराज छत्रपती संभाजी राजांनी शिकवले! या पितापुत्र यांचे भारतीय इतिहासात अतिशय महत्वाचे असे स्थान आहे. असे असूनही स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीच्या इतिहासकारांनी संभाजी महाराजांना पूर्णपणे बदनाम केले परंतु सत्य हे सत्यच असते हे काळच दाखून देतो !



संभाजी राजांची दिल्ली काबीज करण्याची महत्वाकांशा-


छत्रपती संभाजी महाराजांनी दिल्ली वरही आक्रमण करून दिल्ली काबीज करण्याची योजना बनवली होती. जर संभाजी महाराज अजून ३० वर्षे जगले असते तर हे स्वप्नहि सत्यात उतरावले असते. औरंगजेब याचा पुत्र शेह्जादा अकबर हा संभाजीला शरण आला होता तो तब्बल आठ वर्षे संभाजी राज्यांच्या आश्रयाला होता यावरुण दिल्ली काही दूर नव्हती हेच दिसून येते.


दुर्दैवी मृत्यू-

असा हा शूर, पराक्रमी, देखना मराठ्याचा राजपुत्र महाराष्ट्राला लाभला हे आपले भाग्यच म्हणायचे. परंतु सनातन कर्मकांड स्वार्थी इतिहासकार आणि नाटक कारांनी त्यांचे हे खरे चित्र कधीच जनतेसमोर मांडले नाही हे त्यांचे दुर्दैव!


सर जदुनाथ सरकार या थोर इतिहासकाराने संभाजी राजांवर ब्राह्मणी शक्तींनी वांरवांर विषप्रयोग केला व त्यांना मारण्याचा प्रयत्न केला गेला असे म्हटलेआहे तसेच पोंडीचेरीचा समकालीन फ्रेंच गव्हर्नर मार्टिन यानेदेखील आपल्या रोजनिशीत संभाजी राजांच्या काही प्रमुख ब्राह्मणांनी मुघल अधिकाऱ्यांची संगनमत करून त्यांचा नाश घडवून आणला असे नमूद केले आहे. हे सर्व काही दुर्दैविच असे म्हणावे लागेल.



स्वराज्याच्या ह्या दुसर्या रणधुरंधर, राजबिंड्या वादळास माझा मानाचा मुजरा... __/\__


जय जय रौद्रशंभो !!



संदर्भ - House of Chatrapati Shivaji By Jadunath Sarkar.


लेखं- शंकर माने.

* गांधी आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याच्या खंडातील फरक जाणून घ्या !!

* गांधी आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याच्या खंडातील फरक जाणून घ्या !!



* चित्र पहिले-


गांधीच्या साहित्याचे १०० खंड भारत सरकारने प्रकाशित केलेले आहेत. त्यांचा मराठी अनुवाद करण्याचा प्रकल्प महाराष्ट्र सरकारने हाती घेतला होता. ४० खंड प्रकाशित करुन तो बंद करण्यात आला. कारण त्या ग्रंथांची किंमत नाममात्र ठेऊनही ग्राहकच मिळेना. सरकारने हे संच शाळा, महाविद्यालये, विद्यापिठे यांना मोफत देण्याची योजना आखली परंतु प्रतिसाद शुन्य. आजही हे खंड निर्मिती खर्चाच्या फक्त एक टक्का भावातही घ्यायला कोणी तयार नाही. त्यामुळे सरकारची मोठी पंचायत झालेली आहे. ही पुस्तके रद्दीत घालता येत नाहीत आणि गोडावून्स अडकून पडलेली आहेत.
(संदर्भ- http://harinarke.blogspot.in/2012/07/blog-post_02.html )


* चित्र दुसरे-


"डॉ. बाबासाहेब आंबेडकर - लेखन आणि भाषणे' या मालिकेतील खंड क्रमांक 22 (चित्रमय चरित्र) "डा. बाबासाहेब आंबेडकर चित्रमय चरित्र" हा ब्रुहत्खंड अवघ्या देशातुन इंग्रजी आवृत्तीला तर महाराष्ट्रातुन मराठी आवृत्तीला एवढा प्रतिसाद लाभला आहे, इतका कि प्रथम प्रकाशनानंतर या चित्रचरित्राच्या मराठी आवृत्तीच्या तीन हजार प्रती व इंग्रजी आवृत्तीच्या दोन हजार प्रती हातोहात संपल्या आहेत.
 
(संदर्भ- http://epaper.esakal.com/esakal/20100415/4689615568936382885.htm)

डॉ. बाबासाहेबांचा विचार वैश्‍विक आहे. शंभरहून अधिक देशांतून या खंडांना मागणी येते. या खंडांच्या प्रती हातोहात संपतात त्यामुळे खंडाच्या किमान एक लाख प्रती छापाव्यात अशी सूचना भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांना केली; मात्र गेल्या काही वर्षांत या नेमलेल्या समित्यांचे काम पैशांअभावी खंडित झाले होते याचा उल्लेख भुजबळ यांनी केला. धर्माधर्मांतील झगडे, जातीय दंगली याला हे खंड चांगले औषध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वीजनिर्मिती, नद्याजोडणी प्रकल्प आदी विषयांवर बाबासाहेबांनी त्या काळात मांडलेल्या मतांवर भर दिला असता तर आज आपल्याला वीज आणि पाण्याचे संकट भेडसावले नसते असेही ते म्हणाले.



खंडांचे संपादक हरी नरके यांनी हे खंड सरकारला चांगला महसूल मिळवून देतात, त्यामुळे समित्यांचे बळकटीकरण करा, दरवर्षी आम्ही प्रत्येक समित्यांचे पाच ते दहा खंड तयार करून देऊ असा विश्‍वास व्यक्त केला.



"डॉ. बाबासाहेब आंबेडकर - लेखन आणि भाषणे' या मालिकेतील बर्‍याच खंडाच्या प्रति उपलब्ध नाहीत. त्याचे पुनमुर्द्रणही केलेले नाही. आगामी प्रकाशनाबाबतही सदस्य सचिव प्रा. अविनाश डोळस यांनी प्रकाशनाचा अद्याप निर्णय झालेला नसल्याचे माहिती अधिकारात स्पष्ट केले आहे. एका वर्षात किमान २ खंड प्रकाशित होणे अनिवार्य आहे. पण त्याची अंमलबजावणी शुन्य आहे. कुठलेही प्रकाशन न करता तब्बल ५० हजारांच्या वाढीव मानधनाची मागणी समितीतर्फे करण्यात आली. या प्रस्तावास मंजूरही करण्यात आले. आतापर्यंत प्रकाशित झालेले खंड वेबसाईटवर टाकण्याचा निर्णयही १३ मार्च, २००१ रोजी झाला. मात्र, ते झाले नाही. शिवाय प्रकाशन समितीच्या बैठकीचे नियमही पाळण्यात येत नाही. २२ ऑक्टोबर २००८ च्या बैठकीत डॉ. कासारे, डॉ. नितीन राऊत व एन. जी. कांबळे यासमिती सदस्यांनी पुढील चार खंड प्रकाशित करण्यास मंजुरी मागितली असता ती देण्यात आली नाही. भारतीय दलित पॅंथरने खंडाबाबत केलेल्या सूचनाही दुर्लक्षित करण्यात आल्या.



खंडाची मुद्रिते सदस्य सचिवाच्या कपाटात धूळ खात पडून आहेत. प्रा. डोळस हे समितीवर कार्यरत आहेत. त्यांच्या सदस्य सचिवपदाच्या कार्यकाळात एकही खंड प्रकाशित झालेला नाही. सदस्य सचिवांनी एका वर्षात किमान दोन खंडांचे प्रकाशन करणे अनिवार्य असल्याचे १९ नोव्हेंबर, २००९ च्या सरकारी निर्णयात स्पष्ट केले आहे.



हे असं विचित्र चित्र कसं आहे याचा शोध घेतल्यास असं लक्षात येतं की, बाबासाहेबांची जनता व आंबेडकरी समाज हे लिखान वाचून शहाणे होऊ नयेत म्हणून हा सर्व काँग्रेसचा आटापीटा चालला आहे. शिवाय बाबासाहेबांनी काँग्रेसला जळत्या घराची उपमा दिली होती हे काँग्रेस विसलेली दिसत नाही. नाही तर त्यांनी हे "डॉ. बाबासाहेब आंबेडकर - लेखन आणि भाषणे" या मालिकेतील राहिलेले खंड प्रकाशित केले असते. बर्‍याच खंडाच्या प्रति उपलब्ध नाहीत तर त्याचे पुनमुर्द्रणही केले असते.

 
नोट- या पोस्ट मध्ये आम्ही व्यक्ती तुलना केली नाही आम्ही साहित्यात्यातील फरक मांडला आहे !!

लेखं- श्रीराम पवार सर.


संदर्भ-

चित्र १(गांधी)- http://harinarke.blogspot.in/2012/07/blog-post_02.html

 

चित्र २(डॉ बाबासाहेब आंबेडकर)-  
http://epaper.esakal.com/esakal/20100415/4689615568936382885.htm
 

सर्व मातांना येत्या मातॄदिनाच्या शुभेच्छा(१२ मे) !!

सर्व मातांना मातृदिनाच्या शुभेच्छा(१२ मे) !!



फोटो मधल्या व्यक्तीची आई जरी वृध्दाश्रमात असली तरी या व्यक्तीला आईला `मदर डे` निमित्त भेटायची ईच्छा आहे. हे ऐकून त्याच्या पत्नीचा संताप अनावर होतो आहे, तिच्या अंगाची लाही लाही होत आहे असे हे चित्र आहे. खरं म्हणजे घरची आर्थिक परिस्थिती चांगली असतांना आईला वृध्दाश्रमात ठेवणं हा एक प्रकारचा गुन्हाच, बरीच मुलं अशी आहेत ज्यांना `मदर डे` म्हणजे काय असतो हेच माहित नसतो, तो कधी येतो आणि कधी जातो हे सुध्दा माहित नसतं त्यांच्यासाठी ही पोस्ट...

'मदर्स डे' [मातृदिन]
दरवर्षी मे महिन्याचा दुसरा रविवार हा `मदर्स डे` म्हणून साजरा केला जातो. या वर्षी येत्या रविवारी म्हणजे दि. १२ मे २०१३ रोजी मदर्स डे येत आहे.


मदर्स डे ही खरतर पाश्चिमात्यांची कल्पना. सन १८७२ पासून अमेरिकेत मदर्स डे साजरा करण्याची पद्धत प्रचलित आहे. ज्युलिया हार्वे यांनी बोस्टनमध्ये शांतता प्रीत्यर्थ हा दिवस साजरा करण्याची प्रथा रूढ केली. इंग्लंडमध्ये "मदरिंग संडे" म्हणून सन १६०० च्या दरम्यान साजरा केला जात असल्याचा उल्लेख आढळतो. श्रीमंतांच्या घरी राहून चाकरी करणारी मुले या दिवशी आपल्या आईला भेटायला आपल्या स्वतःच्या घरी जात असत. तर ग्रीस मध्ये "रिया" नावाच्या जननाच्या देवतेच्या सन्मानार्थ मदर्स डे साजरा केला जातो. ख्रिस्ती धर्माच्या प्रसारानंतर युरोपमध्ये युरोपियनांची जीवनदात्री, रक्षणकर्ती अशा मदर चर्चला अभिवादन करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. सन १९०७ मध्ये अ‍ॅना जार्विस या महिलेने राष्ट्रीय स्तरावर हा दिवस साजरा केला जावा म्हणून फिलाडेल्फिया येथे खूप प्रयत्न केले आणि त्यानंतर मे महिन्याच्या दुसर्‍या रविवारी घरोघरी आपल्या आईच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा करण्याचे निश्चित करण्यात आले.

'मदर्स डे'. मातेला प्रणाम करण्याचा, तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. मुळात 'आई' ही संकल्पनाच अशी आहे, की तिच्यासाठी एखादा दिवस साजरा करणे ही औपचारिकता ठरेल. शिवाय ही संकल्पना इतकी व्यापक आहे, की तिची व्यापकताही मोजणे अवघड जावे.

भारतीय संस्कृतीतही आईचे महत्त्व अपार आहे. एखाद्या मोठ्या वृक्षाची मूळे जमिनीत दूरवर रूतलेली असतात, तशी आई आपल्या मनामनांत आतमध्ये खोल असते. ही मुळे आपल्या व्यक्तिमत्वाशी आत्मीयतेच्या, प्रेमाच्या बंधनांनी बांधलेली आहेत.

'आई' ही हृदयातून आलेली प्रेमळ साद आहे. आपल्या जीवनावर, अस्तित्वावर प्रेमळ विश्वासाची सावली आहे. जिथे फक्त प्रेमच मिळत असं विश्वातलं एकमेव स्थान म्हणजे आई. तिच्या पदराखाली वाटणारी सुरक्षितता दुसरीकडे कुठेही मिळत नाही. तिच्या मायेची उब जोपर्यंत मिळते तो पर्यंत जणू चिमणीच्या घरट्याचा भास होतो. आपल्या घासातला घास आपल्याला देणारी मूर्ती म्हणजे आई. असे म्हणतात, `जगातलं प्रत्येक कर्ज फेडले जाते पण मातृऋणातून कोणीच मुक्त होत नाही`.


आईच्या हाताची वरण-पोळी-भाजी आजच्या पिझ्झा बर्गरापेक्षा ही अधिक चवदार होती.

आपल्या मुलांना कोणत्याही परिस्थितीत वाढवायला जगातली प्रत्येक आई सक्षम आहे. या नंतर मनात एक विचार येतो. जिच्यामुळे आपण ह्या जगात येतो, आपल्या रडण्याची 'मूक' भाषा ओळखून जी आपल्याला लहानाचं मोठं करते, जिचा हात धरून आपण जग पाहायला शिकतो, जिच्या छत्रछायेत आम्ही वाढतो, जगाचा सामना करतो अशा देवतुल्य मूर्तीला आपण तिच्या उतारवयात यथायोग्य मानसन्मान देतो का? तिची योग्य काळजी घेतो का? तिच्या वयोमानाप्रमाणे हळूवार झालेल्या भावना जपायचा प्रयत्न करतो का? सर्व घरांचं सांगणं कठीण. पण बहूतांश घरात ही परिस्थिती सामान्य आहे. म्हातारे झालेले आई-बाप जड होतात, आपल्या व्यक्तिगत स्वातंत्र्यात त्यांची अडचण होते. त्यांची जगाचे अनुभव घेतलेली मत आपल्यासाठी निरूपयोगी ठरतं. का?

आम्ही लहान होतो त्यावेळी बालसुलभ प्रश्न विचारून आईला भंडवून सोडत होतो. आता ती उतारवयात आम्हाला विचारते. जेव्हा आम्ही चालणं शिकत होतो, आमची पावलं डगमगत होती. तेव्हा तिने सहर्ष आधार दिला. पण आम्ही आता तिच्या ''म्हातारपणाची काठी' बनत नाही. आम्हाला विविध पदार्थांचे स्वाद आवडत होते, पण आता आम्हाला तिच्या सरत्या वयाचे हट्ट पुरवायला कष्ट होतात. पाहिलं ना? परिस्थिती एक सारखीच आहे. फक्त जीवनाचे टप्पे वेगवेगळे आहेत. आधी आमचं बालपण होतं. आता तिचं आहे.

हे प्रश्न आजच्या दिवशी मांडण्याचं कारण एकच. कुणाकडूनही अशा प्रकारची चूक होत असेल तर आत्मनिरिक्षण करा. चिंतन करा आणि वेळ आहे तोपर्यंत स्वत:ला सावरा. ही सांजवात आहे. सरत्या तेलाच्या दिव्याला प्रेमाच्या हाताची सावली द्या. कारण त्यानंतर एकलेपणाचं उन आपल्याला झेलायचं आहे. ''आई'' ह्या मायेच्या हाकेला ''काय बाळा'' या उद्बोधनाला टिकवण्याचा प्रयत्न करा. आपलं काही चुकत असेल तर ते सहर्ष स्वीकार करा.

मातृदिन असा एक दिवसच का, ३६५ दिवस आपल्या हातात असतात. हे ३६५ दिवस (निदान जास्तीत जास्त) तिच्यासाठी काहीतरी करीत राहा. तिच्या कष्टांचे कौतुक करा, तिच्याशी दोन शब्द गोड बोला ती भरून पावेल. आईला आवश्यकता नसते मातृदिनाची. मुलांच्या मनातील भाव त्यांना शब्दाविना, कृतीविनाही जाणवत असतातच.

अहो आई ती आईच रहाणार. मातृदिन साजरा केल्याने वा न केल्याने तिचे प्रेम कमी होणारच नाहीये. मातृदिन साजरा करा अथवा करु नका... आई ती आईच !
सर्व मातांना येत्या मातृदिनाच्या शुभेच्छा !!


लेखं- श्रीराम पवार सर

क्रांतिसूर्याच्या गौरवाची सव्वाशे वर्षे !!

क्रांतिसूर्याच्या गौरवाची सव्वाशे वर्षे !!


स्त्रीशिक्षण, बहुजनांचे सामाजिक हक्क, वंचितांना मानवाधिकार अंधश्रद्धा निर्मूलन, जातीय भेदाभेद अशा क्षेत्रात महान कार्य करणारे क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांना 'महात्मा' ही उपाधी ११ मे १८८८ रोजी देण्यात आली होती. त्या घटनेला आज १२५ वर्षे पूर्ण होत आहेत. विशेष म्हणजे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील बेलसरचे सुपुत्र रावबहादूर विठ्ठलराव कृष्णाजी वंडेकर यांनी जोतिरावांना 'महात्मा' उपाधी दिली होती. जोतिबा फुले यांच्या वयाची ६0 वर्षे व समाजकार्याची ४0 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांचे सहकारी रावबहादूर विठ्ठलराव वंडेकर, रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी जोतिरावांच्या कार्याचा गौरवपूर्ण सत्कार करण्याचे ठरविले.

 
रा.ब. वंडेकर यांनी १८८८च्या मेमध्ये मुंबईतील मांडवी कोळीवाड्यातील 'मुंबई देशस्थ मराठा ज्ञाती-धर्मसंस्था' या संस्थेच्या सभागृहात सत्कार समारंभ आयोजित केला. बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनाही वंडेकरांनी निमंत्रण दिले होते. जोतिरावांना हिदुस्थानचे 'बुकर टी. वॉशिंग्टन,' अशी पदवी द्यावी, असा निरोप सयाजीरावांनी वंडेकर यांना पाठवला होता. 'आपल्या उग्र तपस्येने महाराष्ट्रातील स्त्री-पुरुषांना मानवाधिकार मिळवून देणारे, त्यांच्यात चेतना व जागृती निर्माण करणारे जोतिराव फुले खरे 'महात्मा' आहेत. त्यांना 'महात्मा' ही उपाधी देणेच योग्य आहे,' असे वंडेकरांनी सांगितले; तसेच जनतेच्या वतीने जोतिरावांना 'महात्मा' ही उपाधी प्रदान करत असल्याचे जाहीर केले.

 
हे जगजाहीर झाले आहे की गांधींना महात्मा ही पदवी कुणीही दिलेली नाही, अथवा त्याची नोंद कुठेही नाही. तसेच लोकमान्य, स्वातंत्र्यवीर, हिंदू हृदय सम्राट इ. उपाधी अथवा पदव्या या जनतेने दिलेल्या नाहीत तर त्या त्या व्यक्तींनी स्वत:हून लावून घेतल्या आहेत. याला मात्र अपवाद आहे जोतिराव फुलेंचा. जोतिराव फुलेंना "महात्मा" ही उपाधी उस्फूर्तपणे जनतेने दिली होती व त्यासाठी भव्य महोत्सव घडवून आणला होता.

 
महात्मा ही उपाधी मोठे कार्य करणार्‍या माणसाला लावतात. पण महात्मा या शब्दात आत्मा हा शब्द असल्याने आणि आत्मा ही संकल्पनाच बौध्द लोक मानत नसल्याने आपण आत्मा हा शब्द बोलण्यातून अथवा लिहिण्यातून टाळावा. त्याऐवजी आपण बौध्दांनी महामानव, महानायक असे शब्द वापरावेत. जोतिबा फुलेंच्या बाबतीत तर क्रांतीबा, राष्ट्रपीता हे शब्द वापरावेत.

''जनसेवा हीच ईश्‍वरसेवा आहे. हजारो वर्षे ज्यांना अस्पृश्य मानले गेले. ज्यांना मानवाधिकारांपासून वंचित ठेवण्यात आले त्यांच्यासाठी काम करणे माझे कर्तव्य आहे,'' असे प्रतिपादन जोतिरावांनी त्या समारंभात केले होते. समाजसुधारक विठ्ठलराव वंडेकर शिक्षण व व्यवसायानिमित्त रावबहादूर वंडेकर यांचे कुटुंबीय मुंबईत स्थायिक झाले होते. वंडेकर जोतिरावांच्या सत्यशोधक चळवळीतील आघाडीचे कार्यकर्ते होते. बहुजनांच्या शिक्षण, कामगार, सामाजिक सुधारणांच्या क्षेत्रात त्यांनी बहुमोल कार्य केले.
 

■ पुण्यात १८९५मध्ये झालेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात शेतकर्‍यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी वंडेकरांनी शेतकर्‍याचा गवताचा २४ फुटी पुतळा उभारून आंदोलन केले होते. मुंबई महापालिकेचे सदस्य म्हणून त्यांनी २३ वर्षे काम पाहिले होते.

 
■ तसेच मुंबईत १८९३मध्ये झालेल्या जातीय दंगलीत शांतता प्रस्थापित करण्यातही मोलाची भूमिका बजावत राणीच्या बागेत ६0 हजार नागरिकांचा शांतता मेळावा घेतला होता.

लेखं- श्रीराम पवार सर , प्रतिक कांबळे.


'मन्या सुर्वे' फेसबुकवरही त्याचीच चर्चा...

'मन्या सुर्वे' फेसबुकवरही त्याचीच चर्चा...


‘शूट आऊट ऍट वडाला’ हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे आणि ‘मन्या सुर्वे’ पुन्हा एकदा चर्चेत आला. मन्या सुर्वे हा महाराष्ट्रातील पहिला एन्कांऊटर झालेला गुंड आहे. मात्र सिनेमा आल्यानंतर मन्या सुर्वे या नावभोवतीच वलय निर्माण झाल्याचं दिसून येतयं. फेसबुक या सोशल नेटवर्किंग वेबसाईटवर मन्या सुर्वे यांच्या नावाने वेगवेगळ्या गोष्टी शेअर केलं जातं आहेत. त्याचे फोटो त्याच्याबद्दलची माहिती ही फेसबुकवर पाहायला मिळते आहे. ‘शूट आऊट ऍट वडाला’ या चित्रपटाच्या निमित्ताने मन्या सुर्वे घरोघरी पोहोचल आहे. या रियल स्टोरीने बॉक्स ऑफीसवर मात्र चांगलीच कमाई केली आहे.

मनोहर सुर्वे मूळचा रत्नागिरीच्या खेड्यातील तरुण मुंबईत येतो काय...? दादरच्या कीर्ती कॉलेजमधून डिग्री मिळवूनही तो अंडरवर्ल्डमध्ये जातो कसा... याचा प्रचार चित्रपटापेक्षा फेसबुकवरच अधिक सुरू आहे. मन्याचे जीवन सेल्युलॉईडवर पाहताना तो गुंड होता, गँगस्टर होता हे मराठी तरुण विसरत असून तो मराठी होता एवढाच मुद्दा त्यांच्या लक्षात राहत आहे... मग मन्या जर एन्काऊंटरमध्ये मारला गेला नसता तर तो उद्या दाऊद इब्राहिमलाही नडला असता अशा फुशारक्याही मारल्या जात आहेत.

मन्याला कुठल्याशा प्रकरणात सक्तमजुरी झाल्याने पुण्याच्या येरवडा तुरुंगात ठेवले होते. तेथे त्याने सुहास भाटकर ऊर्फ ‘पोत्या भाय’ याच्याशी ‘टसन’ घेऊन हाणामार्याय केल्या. नंतर त्याला घाबरून त्याची रवानगी रत्नागिरीला पोलीस करतात. नेमका हाच फायदा उचलत १४ नोव्हेंबर १९७९ साली पोलिसांच्या तावडीतून मन्या पळतो. तत्पूर्वी रत्नागिरीच्या तुरुंगातही तो उपोषणाचं हत्यार उपसून २० किलो वजन घटवितो आणि थेट मुंबईचा रस्ता धरतो.

मन्या मुंबईत धारावीचा शेख मुनीर व डोंबिवलीचा विष्णू पाटील यांची मदत घेऊन गँग स्थापतो. नंतर उदय शेट्टी त्यांना येऊन मिळतो. तुरुंगात ‘जेम्स हेडली चेस नॉव्हेल वगैरे वाचून तो... तशाच पद्धतीने दरोडे... टाकतो. गाड्या पळवितो. सायन-ट्रॉम्बेच्या कॅनरा बँकेत दरोडा टाकून १.६ लाख पळवितो. त्या काळात दाऊद आणि वरदराजन मुलांची भरती आपल्या कंपनीत करीत असतानाही मन्याने कधीही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष दाऊद इब्राहिमशी संधान बांधले नसल्याचे एका वरिष्ठ अधिकार्यांचे मत पुरेसं बोलकं आहे.

गँगस्टर मन्याच्या कारवायांनी त्रस्त झालेल्या मुंबई पोलिसांनी अखेर १२ जानेवारी १९८२ रोजी वडाळा जंक्शन आंबेडकर कॉलेजजवळ फिल्डिंग लावली. एका ब्युटीपार्लरमध्ये मैत्रिणीसोबत टॅक्सीतून उतरत असताना मन्याचे एन्काऊंटर झाले. एसीपी इसाक बागवान आणि राजा तांबट यांनी पाच बुलेट त्याच्या छातीत ठोकल्या आणि महाराष्ट्रातलं पहिलं एन्काऊंटर घडलं. नंतर १९८२ ते २००४ पोलीस चकमकीत ६२२ गँगस्टर मारले जातात, पण त्याची मुहूर्तमेढ मन्या रोवतो ! म्हणून मन्याला महत्त्व !

धन्यवाद- झी २४ तास

अंधश्रद्धेतून जाणार होता जुळ्या बहिणींचा जीव !!

अंधश्रद्धेतून जाणार होता जुळ्या बहिणींचा जीव !!


पनवेल तालुक्यातील औला गावात जन्माला आलेल्या सयामी जुळ्या मुलींची अंधश्रद्धेच्या पाशातून मुक्तता झाली असून, आता त्यांना वेगवेगळे करण्यासाठी वाडीया रुग्णालयातील डॉक्टरांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे.


पनवेल तालुक्यातील औला गावात जन्मलेल्या सयामी जुळ्या मुलींना गावकर्‍यांच्या मदतीने सोमवारी सकाळी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. हे प्रकरण किचकट असल्याने रुग्णालयाने पवार कुटुंबीयांना शालूला सायन रुग्णालयात हलवावे, असा सल्ला दिला होता. त्यानुसार, शालू व तिच्या दोन मुलींना सोमवारीच सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, अंधश्रद्धेचा पगडा असलेला शालूचा पती अरुणने मुंबईहून एका बीडमधल्या तांत्रिक-मांत्रिकाशी दूरध्वनीहून संवाद साधला. त्यानुसार या मुलींचा गुरुवारच्या अमावस्येच्या रात्री बळी द्यायचे ठरले. शालू आणि दोन्ही मुलींना घेऊन अरुणने सोमवारी पुन्हा गाव गाठले. मात्र, अरुणची ही संशयास्पद वागणूक गावकर्‍यांना खटकली. परिणामी, जागरूक गावकर्‍यांनी मुंबईतल्या ‘प्रथम’ या संस्थेशी संपर्क साधला.


‘प्रथम’च्या प्रतिनिधींनी जुळ्या मुलींचा जीव वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अरुण दोन्ही मुलींना घेऊन पसार होऊ नये म्हणून त्यांनी मंगळवारी रात्री पनवेल एसटी आगारामध्ये ‘सापळा’ रचला; शिवाय गावकर्‍यांनाही त्याच्यावर पाळत ठेवण्याची विनंती केली. या खबरदारीमुळे मुलींना घेऊन पळून जाण्याचा अरुणचा प्रयत्न फसला.

त्यानंतर ‘प्रथम’च्या सदस्यांनी आणि गावकर्‍यांनी अरुणचे दोन ते तीन तास समुपदेशन केले. हा ‘देवीचा कोप’ अथवा तत्सम घटना नाही, हे त्याला पटवून दिले. यामुळे शालूच्या जुळ्या मुलींचा जीव वाचला असून, संस्थेने त्या तिघींना बुधवारी परळमधील वाडीया रुग्णालयात दाखल केले आले. रुग्णालयाने आता जुळ्या मुलींची तपासणी सुरू केली आहे.


दोन आठवड्यांनंतर होणार शस्त्रक्रिया-

‘प्रथम’च्या सदस्यांनी पालकांचे समुपदेशन केल्याने या जुळ्या बहिणींचे प्राण वाचले. या दोघींच्या किडणीसह इतर अवयवांची तपासणी केल्या नंतरच दोन आठवड्यांनंतर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले.


जन्माला आलेल्या जुळ्या बाळांचे अवयव एकमेकांस चिकटकलेले असणे, असे अपवादात्मक होते. यावर आधुनिक शस्त्रक्रिया करून तोडगा काढता येतो. मात्र, यात फार कमी वेळेला यश येते. अंधश्रद्धेच्या आहारी जात अशा मुलांचा बळी देण्याच्या घटना घडत नाहीत. मात्र, असे होत असेल तर हा विज्ञानाचा पराभव आहे. ही एक जीवशास्त्रीय विकृती वगळता दुसरे काही नाही. - नरेंद्र दाभोळकर (संस्थापक, अंनिस)

 
जन्माला आलेल्या जुळ्या बाळांचे अवयव एकमेकांस चिकटकलेले असण्याचे प्रकार फार दुर्मीळ असतात. लाखो किंवा कोट्यवधीत असे एखादे प्रकरण होते. पोटाचा भाग एकमेकांना चिकटलेला असेल आणि तो केवळ त्वचेचा असेल तर शस्त्रक्रिया करताना फारसा त्रास होत नाही. मात्र, अनेकदा अशा शस्त्रक्रिया करताना अडचणी येतात. कारण, शस्त्रक्रियेनंतर दोघांपैकी कोणत्या एकाला वाचवायचे अथवा दोघांना वाचवणे शक्य आहे का? याचा सारासार विचार शल्यविशारद करीत असतात. त्यामुळे अशा शस्त्रक्रिया करताना सिटीस्कॅनसह इतर तपासण्या कराव्या लागतात. त्यानंतरच याबाबतचा निर्णय घेतला जातो.
 
- डॉ. अशोक राठोड (बालरोग तज्ज्ञ)


संदर्भ- http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNews-All.php?nid=MainEdition-1-1-10-05-2013-1e658&ndate=2013-05-10&editionname=main

माफी मागणार नाही:- शफीकुर्रहमान !!

माफी मागणार नाही:- शफीकुर्रहमान !!


बहुजन समाजवादी पक्षाच्या खासदारने संसदेमध्ये 'वंदे मातरम्' या भारताच्या राष्ट्रीय गीताचा अपमान केल्याची घटना बुधवारी घडली. मात्र 'वंदे मातरम्' इस्लामच्या विरोधी असल्याने मी ही कृती केली असून माफी मागणार नाही, वेळ आलीच तर पुन्हा असेच करीन, अशी दर्पोक्ती शफीकुर्रहमान बर्क यांनी केली.


बुधावारी सभागृहात 'वंदे मातरम्'ची धून वाजण्याची घोषणा झाल्यानंतर सर्व उपस्थित खासदार आपल्या जागेवर उभे राहिले. मात्र राष्ट्रीय गीत सुरु झाल्यानंतर बसपचे खासदार शफीकर्रहमान हे आपल्या जागेवरुन उठून सभागृहाच्या बाहेर गेले. ही गोष्ट अध्यक्ष मीरा कुमार यांच्या नजरेतून सुटली नाही. राष्ट्रीय गीत संपल्यानंतर जेव्हा शफीकुर्रहमान हे सभागृहात परतले तेव्हा मीरा कुमार यांनी त्यांना चांगलेच फैलावर घेतले. 'वंदे मातरम्' पूर्ण झाल्यावर मीरा कुमार यांनी एक खासदार सभागृहाबाहेर गेल्याचे लोकसभेला सांगितले. 'मी या गोष्टीची गंभीर दखल घेतली असून त्यांच्या या कृत्याचे स्पष्टीकरण द्यावे. तसेच अशी घटना पुन्हा होणार नाही याचीही त्या खासदाराने काळजी घ्यावी, अशी तंबीही कुमार यांनी शफीकर्रहमान यांना दिली.


आपल्या वागणूकीचे समर्थन करताना बर्क यांनी दिलेल्या स्पष्टीकरणामुळे हा गोंधळ अजूनच वाढला. सर्व खासदार आपआपल्या जागी उभे असताना सभागृह सोडणा-या बर्क यांनी 'वंदे मातरम्' हे इस्लाम विरोधात असून त्याला विरोध करण्यासाठी मी सभागृह सोडून गेल्याचे लोकसभेला सांगितले. तसेच या पुढे असा प्रसंग आल्यास 'आज मी जे केले तेच पुन्हा करेल', असेही बर्क यांनी सांगितले.


बर्क यांच्या या वागणूकीचा आणि स्पष्टीकरणाचा भारतीय जनता पक्षाने कठोर शब्दात निषेध केला. भाजपचे प्रवक्ते सैयद शहनवाज हुसैन यांनी लोकसभेतील सदस्यांना राष्ट्रीय गीताचा अपमान करण्याचा काहीही अधिकार नाही, असे मत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. लोकसभेच्या अध्यक्षांनी अशा खासदाराची कानउघाडणी करुन व्यक्त केलेली संताप योग्य असला तरी अशा प्रकारच्या घटनांमध्ये अध्यक्षांनी आणखी कठोर होण्याची गरज असल्याचेही हुसैन यांनी सांगितले.


राष्ट्रीय गीताचा अपमान केल्याबद्दल लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार, खासदार शफीकुर्रहमान बर्क यांना नोटीसही पाठवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र या प्रकरणाबद्दल बसपने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.


धार्मिक कट्टरता नेहमीच या देशाला हानिकारक ठरत आली आहे. ज्या देशाचे खासदार देशाच्या राष्ट्रगीतापेक्षा स्वतःच्या धर्माला महत्व देत असतील तेव्हा या देशात राष्ट्रीय एकात्मता कशी कायम राहणार ???


प्रिय मित्र-मैत्रिणीनो या खासदाराच्या कृतीबद्दल काय वाटते आपणास ???

नोट- सभ्य भाषेत आपले विचार मांडा असभ्य प्रतिक्रिया डीलीट केल्या जातील.


संदर्भ- http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/19969310.cms

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...