वधूची मिरवणूक..... बीदचे आकर्षण !!
जळगाव(खान्देश)जिल्ह्यातील यावल या तालुक्यातील घटना-
लग्नात वराची बीद हे काही नवीन नाही मात्र वधूची घोड्यावरून बीद हे यावलवासीयांनी(जळगाव ) आज प्रथमच अनुभवले. वधूची घोड्यावरून काढलेली बीद पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली.
जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील यांची एकुलती एक कन्या केतकीचा विवाह सोमवारी होत आहे. मुलीच्या लग्नाचा आनंद हा मुलाच्या लग्नाएवढाच असल्याने पाटील यांनी मुलीची घोड्यावरून मिरवणूक काढण्याचे ठरवले.
मुलगा अन् मुलगीमध्ये भेद का करायचा ?असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
खान्देशात काही गावांमध्ये बीद मिरवणूक काढण्याची प्रथा होती. मात्र काळानुरूप ती लोप पावत आहे. यावल येथे मात्र वधू-पित्याने मुलगा-मुलगी समानतेचा संदेश देत मिरवणूक काढली.
No comments:
Post a Comment
धन्यवाद !!