भारतीय देवाला विसरताहेत??

भारतीय देवाला विसरताहेत ??



३३ कोटी देवांना मानणाऱ्या हिंदू धर्मीयांबरोबरच मुस्लीम, ख्रिश्चन, शीख आदी धर्मीयांचा मोठा भरणा असलेल्या भारतात देवाला मानणाऱ्यांची संख्या घटतेय, असं कुणी म्हटलं तर सहजासहजी आपला विश्वास बसणार नाही. तो बसो अथवा न बसो. पण एका सर्वेक्षणातून असेच 'अविश्वनीय' वास्तव समोर आले आहे.

 


लंडन येथे जाहीर करण्यात आलेल्या धार्मिकता आणि निरीश्वरवाद वैश्विक निर्देशांकातून ही माहिती पुढे आली आहे. त्यानुसार धर्मावर विश्वास असलेल्यांची संख्या भारतात वेगाने कमी होत आहे. भारतात २००५ साली घेण्यात आलेल्या पाहणीत ८७ टक्के लोकांनी आपण धार्मिक असल्याचे म्हटले होते. मात्र, या वर्षी घेण्यात आलेल्या सर्वेक्षणात हा आकडा ८१ टक्क्यापर्यंत खाली घसरला आहे. मागील सात वर्षांत सहा टक्के लोक धार्मिक विचारसरणीपासून दूर गेल्याचे दिसून आले आहे. भारताबरोबरच अमेरिका, दक्षिण अफ्रिका, स्वित्झर्लण्ड व व्हिएतमानमध्ये धार्मिकता व आस्तिकता कमी झाल्याचे आढळून आले आहे.

 

पाकिस्तानात धार्मिकतेत वाढली-


पाकिस्तान हा धार्मिकता वाढलेल्या काही देशांपैकी एक असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. पाकिस्तानात धार्मिक असल्याचे सांगणाऱ्यांची संख्या ६ टक्क्यांनी वाढली आहे. तर सध्याचे पोप फ्रान्सिस यांच्या अर्जेंटिनातही धार्मिक लोकांची संख्या ८ टक्क्यांनी कमी झाली आहे.

 

अर्धा चीन नास्तिक-


या सर्वेक्षणामध्ये जगभरातील ५७ देशांमधील ५१ हजार ९२७ लोकांची मते नोंदवण्यात आली आहेत. प्रत्येक देशामधील अंदाजे एक हजार स्त्री आणि पुरुषांना प्रश्न विचारण्यात आले. चीनमध्ये सर्वात जास्त नास्तिक लोक राहत असल्याचे या सर्वेक्षणात दिसून आले आहे. या देशातील ५० टक्के लोकांचा देवावर विश्वास नसून हा आकडा जगभरातील नास्तिकांच्या १३ टक्के आहे.


संदर्भ- http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/20289387.cms

No comments:

Post a Comment

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...