डॉ आंबेडकरांचे विचारधन १४ भाषांत... लासूरच्या कार्यकर्त्याचा वेबसाइटच्या माध्यमातून मेगा-प्रोजेक्ट !!




अडचण लक्षात घेऊन आत्मभान संघटना आणि अभ्यासक सिद्धार्थ मोकळे यांनी www.thoughtsofambedkar.com
 
ही वेबसाइट हाती घेतली आहे. त्या माध्यमातून जगभरातील १४ भाषांत बाबासाहेबांचे विचारधन मोफत उपलब्ध करुन दिले जाणार आहे.


बाबासाहेबांचे इंटरनेटवर मोजकेच साहित्य वाचायला मिळते. त्यामुळे होणारी अभ्यासकांची गैरसोय टाळण्यासाठी, नऊ भारतीय आणि पाच विदेशी भाषांत बाबासाहेबांचे विचारधन विनाशुल्क उपलब्ध करुन दिले जाणार आहे. मुंबईत स्थायिक झालेले आणि मूळचे लासूर (जि. औरंगाबाद) येथील सिद्धार्थ मोकळे त्यासाठी प्रयत्न करीत आहेत. या कामात आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, प्रकाशक व लेखकांचा सहभाग आहे. 'जागतिकीकरणात जगण्याचे संदर्भ बदलले आहेत. या प्रक्रियेत बाबासाहेबांचे विचार नव्याने मांडण्याची गरज आहे. त्यांच्या प्रत्येक पैलूवर प्रकाशझोत टाकण्यासाठी वेबसाइट असेल' असे मोकळे यांनी सांगितले.


वेबसाइटवरील साहित्य मोफत डाउनलोड करता येणार आहे. तसेच ई-बुक सुविधाही आहे. आंबेडकरांवरील सर्व पुस्तकांचा परिचय हे वेबसाइटचे वैशिष्ट्य आहे. जगासमोर बाबासाहेबांचे सर्वच पैलू आणण्यासाठी ख्यातनाम लेखकांकडून लेख मागवण्यात आले आहेत. कामगार बाबासाहेब, कायदेमंत्री बाबासाहेब, कलावंत बाबासाहेब, अर्थतज्ज्ञ बाबासाहेब अशी वर्गवारी केली आहे. सर्व साहित्य युनिकोडमध्ये उपलब्ध राहणार आहे. शिवाय 'व्हिडिओ डॉक्युमेंट्री'ही असेल. बाबासाहेबांनी नाकारलेल्या मार्क्सवादावरील लिखाणही यात असेल. प्रबोधनकार ठाकरे या वेबसाइटसाठी सिद्धार्थ सहाय्यक होते. हा अनुभव पाठिशी असल्याने त्यांनी बाबासाहेबांवरील मोठा प्रोजेक्ट हाती घेतला.


या कामासाठी पाच वर्षांचा कालावधी आणि मोठा खर्च अपेक्षित आहे. सध्या विविध भाषिक लेखक व अनुवादकांशी चर्चा करुन कामाची आखणी केली जात आहे. येत्या सहा डिसेंबर रोजी मराठी-हिंदी-इंग्रजी भाषांतील साहित्य वेबसाइटवर उपलब्ध करण्यात येणार आहे. या संशोधनात्मक कामासाठी आंबेडकरी अनुयायांनी मदत करावी असे आवाहन संघटनेने केले आहे.



संदर्भ- http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/20391429.cms?fb_action_ids=473238872752884&fb_action_types=og.recommends&fb_source=aggregation&fb_aggregation_id=288381481237582

No comments:

Post a Comment

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...