युगपुरुष व महापुरुष हे त्यांच्या असामान्य कार्याने, लोकांकरवी त्या पदावर गेलेले असतात. त्यांना कोणत्याही पावतीची व प्रशस्तीपत्राची गरज नसते.

गोष्ट जुनीच पण नव्याने वाचा !!


 
एकदा चार आंधळ्या लोकांना एका हत्तीसमोर नेण्यात आलं... हत्ती हा प्राणी प्रत्यक्षात कसा असतो याची ओळख त्यांना व्हावी या हेतूने... पैकी एक आंधळा पुढे गेला आणि हत्तीच्या समोर उभा राहून त्याची सोंड चाचपू लागला आणि म्हणाला- " हत्ती हा एखाद्या नळकांड्यासारखा आहे.."

 

दुसरा आंधळा त्याच्या पायाला हाताने चाचपत म्हणाला- " हत्ती एखाद्या जाड खांबासारखा आहे.."

 

तिसऱ्या आंधळ्याच्या हाती हत्तीचे पोट लागले, त्यास चाचपत तो उद्गारला- " अरे हत्ती म्हणजे एखाद्या जाड भिंतीसारखा विशाल आहे..." चौथ्या आंधळ्याच्या हाती हत्तीचे शेपूट होते; त्यास हाताने चाचपत तो म्हणाला- " छे छे..तुम्ही सगळे चुकताय..अरे हा हत्ती तर एखाद्या सापाप्रमाणे लांबूळका अन छोटा प्राणी आहे..." अर्थात या सगळ्याचा त्या हत्तीवर काहीच परिणाम होत नव्हता..तो नेहमीप्रमाणे झुलत होता.

 

मित्र-मैत्रिणीनो, गोष्ट इथेच संपत नाही, खरेतर चूक पूर्णपणे त्या आंधळ्या व्यक्तींची नव्हती. त्यांच्या हाती हत्तीचा जो काही अवयव, भाग लागला, त्याचा आधार घेऊन ते "हत्ती कसा असावा..??" याबाबत आपले मत तयार करीत होते. पण त्यातील कोणत्याच आंधळ्याने त्या हत्तीस त्याच्या भोवती फिरून अगदी संपूर्णपणे चाचपून त्याचा आकार लक्षात घेऊन त्याबद्दल आपले मत बनवण्याची तसदी घेतली नव्हती आणि त्यांच्या आसपास असणाऱ्या डोळस लोकांनी सुद्धा त्यांना सत्य काय हे सांगण्याची खटपट केली नाही..आणि इथेच सगळी चूक झाली.

 

हे गोष्ट सांगण्याचे कारण म्हणजे आज असे बरेच आंधळी लोकं आपल्याला समाजात दिसतात; जे महापुरुषांचा, त्यांच्या कार्याचा, त्यांच्या साहित्याचा पूर्ण व सखोल अभ्यास न करताच हाती आलेल्या सह्त्या वरून व ऐकलेल्या तोंडी माहितीवरून त्यांच्या बद्दल आपले मत बनवीत, प्रदर्शित करीत असतात. त्यांच्या विषयी असणाऱ्या अर्धज्ञानापायी त्यांना दुषणे लावीत असतात. त्यांच्यात व वरील गोष्टीतल्या आंधळ्या लोकांत फारसा फरक नाही असे मला वाटते. त्याचबरोबर आजूबाजूचे डोळस लोक म्हणजे ज्यांना त्या महापुरुषांच्या कार्याची पूर्ण कल्पना आहे, अभ्यास आहे त्यांची सुद्धा जबाबदारी असते कि अशा लोकांस सत्य दृष्टी मिळवून देऊन त्यांचे अज्ञान दूर करावे.

 


शेवटी कोणी मानो न मानो...युगपुरुष व महापुरुष हे त्यांच्या असामान्य कार्याने, लोकांकरवी त्या पदावर गेलेले असतात. त्यांना कोणत्याही पावतीची व प्रशस्तीपत्राची गरज नसते.

 

आधी स्वतः डोळस बना नि मग जगाला दृष्टी प्रदान करा !!


लेखं-गौरव गायकवाड(सोबत प्रबोधन टीम)


No comments:

Post a Comment

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...