आज ६ जून छत्रपती शिवराय राज्याभिषेक दीन ३३९ व्या शिवराज्याभिषेक दिनाच्या शिवमय शुभेच्छा !!
तुमच्या नसण्याने राजे !!
स्वार्थाच्या माणसांनी , माणुसकीपण हरवलंय
चरित्र स्त्रीचं तीनच , विकायला ठेवलंय
निष्ठेला विकून लोकांनी, लबाडीन मन भरवलंय
तुमच्या नसण्याने राजे.... खुप काही हरवलंय.....
पैशाच्या बळावर श्रीमंतांनी , गरिबांना वाकवलय
जन्मणाऱ्या प्रत्येक पीढीला , त्यांनी खोटेपण शिकवलंय
अंतःकरणातला देव विसरून , त्याला मंदिरात बसवलंय
तुमच्या नसण्याने राजे.... खुप काही हरवलंय.....
सत्तेच्या मोहासाठी पुढारयाणी , जातीच साम्राज्य टीकवलंय
स्वतः निचपनाचा पुतळा होऊन , नियतीला लाजवलंय
घात केलाय स्वतःच्या इमानीचा , अन ईतिहासालाचं रडवलंय
तुमच्या नसण्याने राजे.... खरंच खुप काही हरवलंय !!
दाही दिशी गाजावाजा झाला, आज माझा शिवबा राजा झाला. ६ जून इ.स. १६७४ रोजी शिवाजीराजांना रायगडावर राज्याभिषेक करण्यात आला. त्या दिवसापासून छत्रपती शिवाजीराजांनी शिवराज्याभिषेक शक सुरू केले आणि शिवराई हे चलन जारी केले. ३९ व्या शिवराज्याभिषेक दिनाच्या शिवमय शुभेच्छा !!
जय जिजाऊ... जय शिवराय... जय शंभूराजे !!
No comments:
Post a Comment
धन्यवाद !!