माझ्या स्वता:च्या घरी मला बाबासाहेबांचा फोटोसुद्धा लावता येत नाही....

मी निलेश रजनी भास्कर कळसकर. मी जातीने चांभार समाजाचा आहे.... माझ्या चांभार जातीतील लोकं हेच बोब मारतात बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय केलं...???? ते आरक्षण बाबासाहेबाच्या जीवावर घेतात पण बाबासाहेबांचे नाव घ्यायला त्यांना लाज वाटते.... दूर कशाला जाता मी फेसबुक वर बाबासाहेबांचे विचार टाकतो तर माझ्या अनेक नातेवाईकांनी मला आपल्या फ्रेडलिस्ट मधून काढून टाकले... माझ्या स्वता:च्या घरी मला बाबासाहेबांचा फोटोसुद्धा लावता येत नाही.





मी ज्या कॉलनीत राहतो तिथे ९९ % चांभार समाजाचे लोकं आहेत ते कधीच बाबासाहेबांची जयंती साजरी करत नाही पण रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करतात खूप वाईट वाटते हे चित्र बघून कधी-कधी खूप रडतो मी माणसे कसे काय एवढे निष्ठुर असू शकतात यांचा धक्का बसतो.... बाबांनी चांभार समाजावर एवढे उपकार करून ठेवले आहे की ते उपकार मरेपर्यंत न फिटणारे आहेत... ७० % चांभार समाज बाबासाहेब आणि बुद्ध धम्मियांचा द्वेष करतो.... वाईट वाटते खूप.... खरं तर आपण २ सख्खे भाऊ आहोत पण चांभार समाजाला हे कधी कळेल....???




जे बाबा सांगतात तेच संत रोहीदासानी पण सांगितले आहे.... रोहीदासनी ब्राम्हणवाद.... वर्णवाद , वेद याला विरोध केला आहे पण चांभार लोकांनी रोहीदासानापण देव करून टाकले.... ही सर्व परिस्थिती बघून नकळत डोळ्यात पाणी येते पण.... मी हे बदलवण्यासाठी मरेपर्यंत प्रयत्न करत राहणार हे निश्चित....




"प्रिय मित्र-मैत्रिणीनो... आपल्या लढ्याची दक्षता घेणारा पुढारी क्वचितच सापडेल. लढ्यात स्वबांधवांची नाहक हत्या होऊ नये अगर त्यांच्यावर नाहक अत्याचार होऊ नये अशी तळमळ बाबासाहेबांकडे होती. कॉंग्रेसच्या व मुस्लिम लीगच्या संघर्षात हजारो लोकांची हत्या झाली, तशी हत्या बाबासाहेबांच्या चळवळीत कधीच झाली नाही."




मांतग , मेहतर , चर्मकार आणि हिंदू अस्पृश जातीतील सर्वांसाठी हा लेखं जळजळीत अंजन आहे. सर्वानी आपले आत्मपरीक्षण करावे.... अरे आता तरी सर्व आंबेडकरी अनुयांनी एक व्हा आपले नेते फक्त डॉ बाबासाहेब आंबेडकर आहेत चला बाबासाहेबांच्या विचारांवर जगूया.



मित्र-मैत्रिणीनो आपण सकारात्मक विचार करू हे नक्कीच बदलेल.... संत रोहिदास, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार बंधूभाव शिकवणारे आहे ते आपल्याला स्वीकारावेच लागतील. आपण मिळून हे बदलू आपल्याला विद्रोह हा प्रेमाने आणि बुद्ध विचाराने करायचा आहे. द्वेषाने बदल घडवता येत नाही.... बाबासाहेब म्हणतात समाज जागृतीचा विस्तव विझू देवू नका... हा बदल आपल्याला मिळून घडवायचा आहे.


तुमचाच मित्र- निलेश रजनी भास्कर कळसकर.


संपर्क फेसबुक प्रोफाइल- https://www.facebook.com/nilesh.kalaskar2


जय रोहिदास , जय भीम ,जय भारत !!

54 comments:

  1. yr realy Good think About chane of Socity... I also with u.....

    ReplyDelete
  2. good thinking .best of luck.

    ReplyDelete
  3. निलेशजी मला माहित नाही कि,तुम्ही तुमच्या समाजाच्या आजूबाजूला काय विदारकता पहिली...अनुभवली. एक मात्र ठामपणे सांगू शकतो,आता पर्यंत मी स्वतःच्या धर्माविषयी टीका करणारे अनेकजण पहिले मात्र,स्वतःच्या जातीविरुद्ध जाहीर लिहिण्याचे धाडस करणारा माईची लाल पहिल्यांदा पाहत आहे.खाजगीत अनेक जण आपल्या जातीविषयी बरे वाईट बोलतात.त्याबाबत मात्र,जाहीररित्या आपले मत कोणी प्रदर्शित करीत नाही.किंबहुना तेवढे धाडस कोणी दाखवीत नाही.ते तुम्ही दाखविले म्हणून तुमचे मनापासून अभिनंदन ! कदाचित समाज परिवर्तन करतांना तुम्हाला अनेक अडचणी येतील पण ...खरी मजा तर प्रवाहाच्या विरोधात पोहण्यातच आहे ना....परत एकदा अभिनंदन अन पुढील समाजकार्यास शुभेच्छा ...!

    ReplyDelete
    Replies
    1. चांगले विचार. चर्मकारांना योग्य नेते मिळाले नाही. स्वतःला उच्च समजुन आपल्या बांधवाबरोबर संबंध ठेवले नाहीत. चर्मकारांनीच पुढाकार घेउन एकत्र येण्याची आवश्यकता आहे. उत्तरप्रदेशात सुरुवात झालेली आहे

      Delete
    2. खरचं आपले विचार हे आरक्षण घेणा-या सर्व जातींना झणझणीत अंजन आहेत!
      बदल स्वत:मध्ये घडणे हेच खरे सामाजिक परिवर्तन आहे. नाहीतर बाबांना गद्द्ार होणा-यांची काही कमी नाही!

      Delete
    3. साहेब मी तुमच्या मताशी सहमत आहे.बाबासाहेबनी सर्वच समाज्यासाठी संविधानामध्ये तरतूद केली .परंतु सर्व आरक्षण घेतात.जर आजच्या सुशिक्षित तरुणांनी जर समाज हिताचे काम करण्यास सुरुवात केली तरी समाजाचा थोडा फार विकास होण्यास मदत होऊ शकते.

      Delete
    4. Good post,.,you are really doing great job. We are proud of u.

      Delete
  4. अशाच विचारांची समाजाला गरज आहे .
    best of luck.

    ReplyDelete
  5. आदरनिय निलेशजी आपले विचार खुप चांगलेव क्रांतीकारी आपल्या सारखे युवक जर समाजात निर्माण जाले तर खरोखर बाबासाहेबांच अपुर स्वप्न पुर्ण होईल.पुढील वाटचाली साठी आपनास मनपुर्वक सदिच्छा.
    आपला-रत्नदिप (भाऊ) वाघमारे

    ReplyDelete
  6. समाजामध्धे दोन प्रवाह हेआनादी अनंत काळापासुन आहेत.एक बौध्दवाद वदुसरा ब्राम्हण्यवाद.
    निलेश कळसकर मी तुला एक गोष्ट सांगतो.आपल्या हाताने सुर्य झाकणार स आपण वेडा म्हणतो.आसे वेडे चर्मकार,मातंग आणि बौधांमधेही इहेतच.
    हे खातात आरक्षणामुळे पण बाबासाहेबांचे नाव घ्यायला लाजतात.ह्याना लाज वाटण्याचेही कारच आहेच ,तेम्हणजे
    आपला मानस पिता कोण आहे.हेच माहीत नाही.
    निलेश हजारो वर्षांची आपली परंपरा(दगडावर डोके आपटायची)थोडीच लवकर संपणार?

    ReplyDelete
  7. तुला सांगतो बाबासाहेब,हे फोटो लावण्याचे नाहीत.त्यांचा जागा तुमच्या आमच्या साऱ्या बहुजन,मानवतावादी,लोकांच्या ऱ्हदयात आहे.ह्याना समजुन घेणेच फार महत्वाचे आहे.पण दुर्देव आपले ह्या पुरोगामी महाराष्ट्रात ह्याना समजुन घेणारे फारच कमी आहेत.,पण ह्याच्या नावावर मतांचा जोगवा मागणारे अनेक आहेत.ह्यांच्या नावे दुकाणदारी करणारे बडवे बरेच आहेत.हे आमचे,ते,तुमचे,ह्या वाटण्या मात्र सारेच करतात.
    निलेश तुला एक सांगतो समाजात डोळस पणा फार कमी आहे.ससंत रोहीदास,म.बसवेश्वर,छ.शिवाजी महाराज,म.ज्योतीबाजी फुले,डाँ.बाबासाहेब आंबेडकर ह्याना समजुन घेणे म्हणजे आपल्या जन्माचे सार्थक झाले.36कोटी देव आपल्या वशीभुत झाले.
    जय भिम जय रोहीदासजी,🙏🙏🙏🙏
    डी.टी.सोनटक्के बारडकर मो.न.7038889920.

    ReplyDelete
  8. बहुजन समाजाला धार्मिक थोतांडापासून अलिप्त राहून स्वतःची आणि समाजाची प्रगती करावयाची असेल तर त्यांना बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारश्रणीं नुसारच वागल्यास निश्चितच प्रगती झाल्याशिवाय पर्याय नाही आणि हेच अंतिम सत्य आहे .... जयभीम जय भारत..

    ReplyDelete
  9. Very good job you are doing.now no longer nobody can stop revolution because we are on the constructive path now.jay bhim

    ReplyDelete
  10. चांभार समाज अधिक दिवस हिन्दु बनून राहिला तर काही दिवस गुलामबनून जाईल पहिले आपण सारे बौद्ध च होतो आणि बौद्ध चे शुद्र झालो आणि ज्यांना गुलामी ची जाणीव झाली ते माणसे गुलामी मंधून मुक्त होण्यासाठी त्यांनी मुसलमान धर्म स्वीकारला त्या मंधून जे उरले त्यांनी इंग्रजांच्या काळात क्रिचन धर्म स्वीकारला आणि शेवटी जे उरले ते बौद्ध धम्म स्वीकारला आणि अंत शेवटी जे उरले ते समजा अजूनही गुलामी करून राहिले

    ReplyDelete
  11. हो अगदी बरोबर आहे

    ReplyDelete
  12. जय भीम सर , खूप छान काम करता तुम्ही, एक न एक दिवस तुम्ही तेवत ठेवलेल्या दिव्याचा प्रकाश त्यांना कळेल।

    ReplyDelete
  13. साथ देवू सर....

    ReplyDelete
  14. Great thought sir keep it on we support you always great work best wishes for your future planing awesome

    ReplyDelete
  15. Great thought sir keep it on we support you always great work best wishes for your future planing awesome

    ReplyDelete
  16. Very positive and realistic thoughts. Every young must understand these facts.... Very well initiative

    ReplyDelete
  17. Dear Nilesh,

    First of all the thoughts you have expressed are most valuable. Second why to afraid of people as to what they will say.The people neither allow you to walk nor sit on the horse. You start, spread thoughts of Babasaheb calmly, peacefully one or the other day they will follow you. Just start. We all are with you.

    ReplyDelete
  18. Good think.best of luck we all are with u.

    ReplyDelete
  19. जय भिम
    खूप चांगला विचार आहे.
    एक दिवस तूमचा विचार
    सर्वांना कळेल.
    wwwsomeshwar.blogspot.com

    ReplyDelete
  20. बाबासाहेबांनी जे कष्ट सोसून दलित, पिडीत, शोशीत, वंचित आणि महिलांच्या उत्थानासाठी अहोरात्र कार्य केले ते या देशातील कोणीच व्यक्ती करू शकला नाही. पण उलटपक्षी ज्यांच्यासाठी बाबासाहेब झटलेत ते च लोकं बाबासाहेबांना विसरलेत. आणि षडयंत्रकारी लोकांनी त्यांना विशिष्ट जातीत सीमीत करण्याचा उपदव्याप सातत्याने सुरू ठेवला आहे.

    ReplyDelete
  21. Atta dip bhav..... leave aside other get enlighten .be happy in life

    ReplyDelete
  22. Atta dip bhav..... leave aside other get enlighten .be happy in life

    ReplyDelete
  23. सर आपले विचार फार सुंदर आहेत,आणि एक दिवस त्यांना फार मोठे यश येईलच, आपण सगळे बुद्धाचा विचार पुढे नेऊ

    ReplyDelete
  24. जयभीम जयबुद्ध

    ReplyDelete
  25. Nilesh Your thoughts are very straight forward!!!
    I will tell you one thing --
    Can qualified bhramhin girl or normal bhramhin girl or any other cast for except chambhar marry to chambhar guy without any hesitation
    If not then your surrounding will automatically come to know !!!



    ReplyDelete
  26. खर म्हणजे फुले-शाहु-बाबासाहेबाच्या विचाराच्या प्रबोधनाची गरज आहे, ज्या समाजात होतोय तो समाज जागृत झालेला दिसतोय..ज्या समाजातील लोकानी बाबासाहेबाना मानल व जानल ते आज उच्च पदावर आहेत,किवा खुप चागल्या पदावर आहेत व प्रगतशिल आहेत.आणि बाकीचे कर्मकाडात बडून कोणी पुजारी झालेत तर कोणी भक्तीनी झाल्यात..हे वास्तव चित्र आहे..म्हणून आजचा सुशिक्षीत तरूणच समाजात नविन परिवर्तन व योग्य दिशा देऊ शकतो...

    ReplyDelete
  27. Great job,,,you are really working hard,,we r proud of u..

    ReplyDelete
  28. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  29. बौद्ध धम्मात ये ना मग भावा पटत नाही तर...

    ReplyDelete
  30. Great thoughts,Best bc wishes to his mission Babasaheb...!!

    ReplyDelete
  31. Babasaheb samjun sangnyacha sarvottam upay tyanna tyanchyach manyata ani itihas wachyala dya... Khara tar babasahebani khupch kami velet te sarva vachun, satya sarvan samor aanla.. Pan kahi beimaan auladi yetatach upwad mhanun janmala tyanna swata parkhu dya an mag swatachi chuk apoap lakshat yeyil... Jyanni swataha cha itihas wachla nahi te pudhe jau shakat nhi karan... Hyanchi pragati hi babane dakhavlelya rastyatch ahe:-) jai bhim

    ReplyDelete
  32. Mala asa vatate chambhar lok sale jai bhim bolayla lajtat. Bhosadichyano tumchi laykinkai ?chambhar .... Baba saheb aahet manun tumi aahat. Nahi tr jagale asata chapalshivat..

    ReplyDelete
  33. बाबासाहेब समजायला वेळ लागेल_
    पन समजल्या नंतर बाबासाहेबांचे वेड लागेल ___
    मित्रा तुला बाबासाहेब कळाले म्हनुन तु बाबासाहेबाच्या मार्गावर निघालास प्रबुद्ध मार्गावर_____
    सप्रेम जयभिम 🙏 नमो बुद्धाय जय रविदास🙏

    ReplyDelete
  34. Good luck we are with you go ahead.

    ReplyDelete
  35. आश्चर्य वाटते जेव्हा जातीच्या दाखला काढताना आपण मागास वर्गीय आहोत असे बोलतो
    आणि जेव्हा आपण बाबासाहेब यांच्या बद्दल विचारले की एकच ऐकावे लागत, ते महार होते आपण चांभार आहोत
    आपण त्यांचा धर्म स्वीकारला नाही आपण हिंदू चांभार आहोत
    आणि हे सांगायला त्यांना अभिमान वाटतो
    जराही लाज वाटत नाही
    खूप दया येते तेव्हा आपल्या लोकांवर
    अस वाटत ह्यांना पूर्वीची वागणूक मिळाली पाहिजे म आपण कोण आहोत हे समजेल
    असुद्यात
    मी अभिमानाने सांगतो मी माझ्या घरात दर्शनीय भागात बाबासाहेबांची मोठी प्रतिमा लावली आहे. आणि त्याचा मला अभिमान आहे.

    ReplyDelete
  36. सुंदर माहिती सर।। सर माझा एक प्रश्न आहे बिहार,पंजाब,गुजरात,उत्तर प्रदेशात चर्मकार समाज जसा आक्रमक, आंदोलन करणारे,चळवळ चालवणारे,झोतात(Focus मध्ये) राहणारे तसेंच त्या समाजातून अनेक राजकीय,सामाजिक नेते तयार होतात, होत असतात उदा.कांशीराम,बाबू जगजीवमराम,मायावती, रामनाथ कोविंद(सद्याचे राष्ट्रपती),चंद्रशेखर रावण(भिम आर्मी संस्थापक) व इतर चर्मकार व्यक्ती आहेत,झालेत.तसे महाराष्ट्रांत का नाही झाले?? तसेंच महाराष्ट्रात चर्मकार समाज शांत,सहनशील,अन्याय सहन करणारा,हिंदुवादी,सवर्णांना भीणारा असा का आहे??? कृपया काही(थोडी)माहिती द्या ।।जय भिम जय रोहिदास जय भारत।नमो बुद्धाय।

    ReplyDelete
  37. साहेब तुम्हाला आमच्यकडून खुप खुप शुभेच्छा,जयभिम.

    ReplyDelete
  38. Nileshji tumala khup shubhecha hay karya karita

    Jai bhim namo bhudhay jai sent rohidas jai shivrai

    ReplyDelete
  39. Chhan uttam likhan kelel ahe mi pan chambhar ahe parantu aple vichar he samast bahujanasathi khupch chhan ahet..on jo paryant span babasahebana atamdhe utarvat nhit to paryant apla uddhar hone kathinch ahe..jai bhim jai rohidas.

    ReplyDelete
  40. खरोखरच आपण सगळे मिळून एकञ एउन बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची देवाणघेवाण करून सर्वांना त्यांचे विचार सांगून एकञ येउन आपल्या सर्व संघटनांनी एकत्र येऊन बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांने जरका एकत्रित आलो तरच आपल्याला खरोखर स्वातंत्र्य मिळाले असे सिद्ध होईल आपण सगळे मिळून एकञ नाही आलो तर आपल्याला अशीच दुसर्‍याची गुलामगिरी करून जगावे लागेल म्हणूनच आता आपल्याला बाबा साहेबांच्याच विचारांची गरज आहे म्हणूनच एक व्हा.

    ReplyDelete
  41. मि बुध्दी स्ट एज्युकेशन रिसर्च सेंटर घोगांव संस्थापक व अध्यक्ष सचिन कांबळे. खरोखरच आपण सगळे मिळून एकञ एउन बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची देवाणघेवाण करून सर्वांना त्यांचे विचार सांगून एकञ येउन आपल्या सर्व संघटनांनी एकत्र येऊन बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांने जरका एकत्रित आलो तरच आपल्याला खरोखर स्वातंत्र्य मिळाले असे सिद्ध होईल आपण सगळे मिळून एकञ नाही आलो तर आपल्याला अशीच दुसर्‍याची गुलामगिरी करून जगावे लागेल म्हणूनच आता आपल्याला बाबा साहेबांच्याच विचारांची गरज आहे म्हणूनच एक व्हा. जय भिम

    ReplyDelete
  42. निलेशजी तुमच्या सारखा प्रत्यय बाबासाहेबांनाही आला होता त्यावेळी बाबासाहेबानी 7 कोटी जनते सह हिंदू धर्माचा त्याग करून विस्थापित शोषिता सह बुद्ध धर्म स्वीकारला आणि समाजाला एक वेगळी दिशा दिली मी आपणास धर्माणतर चा सल्ला देत नाहिये शेवटी कसं आहे जर एखाद्या ठिकाणी तुम्हला मान सन्मान किव्हा तुमची कदर होत नसेल तर ते ठिकाणाहून स्थलांतरित झालेलचं बरं.....

    जय रोहिदास जयभीम जय शिवराय 👍

    ReplyDelete
  43. लेख वास्तवदर्शी आहे, समाजातील मागासलेपण दाखवणारा आहे, अजून बराच पल्ला गाठायचा आहे सांगणारा आहे,
    पण माझा अनुभव वेगळा आहे मी माझ्या घरात बुद्ध प्रतिमा, बुद्ध वंदना तसेच बाबासाहेब यांचा फोटो व पुस्तके त्यांच्यावरील व्याख्याने अत्यंत अभिमानाने लावतो आणि घरातील इतर सदस्य देखील ती ऐकतात..
    मीच नाही तर माझे असे अनेक मित्र आहेत जे अशा पद्धतीने बिनधास्त करतात..
    एक सांगतो की मी किंवा माझे अनेक मित्र नवबौद्ध किंवा हिंदू धर्मातील तथाकथित मागास जातीतील नसलो तरी बाबासाहेब आम्हाला आमचे वाटतात..
    आणि त्याचे सर्व श्रेय आम्ही ज्या संस्थेत शिकलो मोठे झालो त्याला आहे..
    आम्हाला ब्राह्मणाने सांगितले बाबासाहेब यांचे महत्व आणि एका मराठ्याने शिकवला बाबासाहेब यांचा संघर्ष , एका मातंगाने शिकविली बुद्धवंदना तेव्हाच बाबासाहेब एका जातीचे नाही हे कळाले , ते आहे राष्ट्रीय ठेवा ..
    अभिमान वाटतो की आमच्या जाती वेगळ्या असून आम्ही आमचे महापुरुष वाटून घेतले नाही...
    संघटना हे एकच साधन मना मनातील दुवा साधण्या..

    ReplyDelete
  44. हा समाज जेव्हा स्वत:च्या बुध्दि चा उपयोग करित नाही तो पर्यंत त्यांच्या त काही ही परिवर्तन होईल असे वाटत ना

    ReplyDelete
  45. कसय माहीती का ..ज्यांना बाबासाहेबांचे वीचार कळले नाहीत ते लोक असे करतात .मंग ते चांभार असो वा दुसरे कोनते...अहो त्यांना कोन जाग्रत करण्याचा प्रयत्न नाय करत,एखादा शिकलेला असला तर तो त्या जनतेचा नूसता फायदा करून घेतो.
    स्वताच पोट भरतो ,मंग कसा समाज जाग्रत होईल..
    अरे तूमच्यात ज्ञान आहेना द्याना तूम्ही ,ज्ञान हे दील्याने वाढते .
    समाजाला फसवू नका.

    ReplyDelete
  46. नमस्कार, मी चर्मकार समाजातील आहे, मी आज जो काही उभा आहे, ते फक्त आणि फक्त डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच... शिक्षण, नोकरी, मान, सन्मान, प्रतिष्ठा हे केवळ डाॅ. बाबासाहेबांमुळेच मला मिळाले. प्रत्येकाला त्याच्या इच्छेनुसार पुजा अर्चा करण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यामुळे माझे विचार मी कुटुंबावर लादू शकत नाही, पण माझे प्रेरणास्थान डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आहेत, माझ्या घरात डाॅ. बाबासाहेबांचा फोटो आहे...

    ReplyDelete

  47. बहुत बढ़िया, महाराष्ट्र का चमार बौध्दिक दृष्टि से स्वतंत्र नहीं, सनातनी विचारों का गुलाम हैं। आप जागृति ला रहें हो आपका कार्य को सैल्यूट।
    इस बौद्ध देश की पवित्र भूमि में विश्वरत्न बाबासाहेब डॉ. भीमराव अम्बेडकर आधुनिक भारत के जनक है । विश्व गुरू तथागत गौतम बुद्ध और उनका धम्म साथ ही डॉ.अम्बेडकर के विचार और उनका भारतीय संविधान ही सत्य हैं । बुद्ध और अम्बेडकर पूरे विश्व को शांति और मानवता का संदेश देते रहेंगे ।

    ReplyDelete

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...