लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित "फकीरा" कादंबरी !!

मराठी साहित्यात मानाचे पान असलेले साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित "फकीरा" कादंबरी !!


मराठी साहित्यात "मानाचे पान" असलेले साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित "फकीरा" कादंबरी वाचून मन हेलावूनन गेले. अक्षरशः डोळ्यातून पाणी आले. अण्णाभाऊ साठे यांची पुस्तके म्हणजेच वास्तववादावर आधारित होय. त्यांचे लेखन म्हणजेच त्यांनी स्वतः अनुभवलेले आणि पाहिलेले जीवन होय.

 
‘ फकीरा ‘ ही पुढे अतिशय गाजलेली कादंबरी अण्णाभाऊनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केली. 


त्यांची शब्दरचना मराठी साहित्यात एक वेगळीच शैली ची जाणीव करून देते. समाज सुधारणेचे बीजारोपण करीत असलेला हा थोर असा महापुरुष केवळ महान लेखकच नसून तर सामान्य आणि तळागाळातील बहुजनांसाठी तारणहार आहे. महाराष्ट्रातील आणि या पृथ्वीतलावर अन्य कोणत्याही लेखकाला हे जमले नसेल असे तेजस्वी लेखन त्यांनी केले आहे. त्यातीलच एक हिरा म्हणजे "फकीरा" हि कादंबरी होय. त्यांची लेखणी तळपली आहे या फकिराच्या निमित्ताने. त्यांच्या १० पुस्तकांवर मराठी चित्रपट काढले गेले आणि त्या चित्रपटांनी जनतेच्या काळजालाच हात घातला होता हे सर्वांनाच परिचित आहे. " वारणेचा वाघ " हा चित्रपट "फकीरा " कादंबरीवरच आधारित आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे मराठी साहित्यातील योगदान अतुलनीय असे आहे. मराठीत असा साहित्यिक कधीच झाला नाही आणि होणारही नाही.


जगातील २७ भाषांमध्ये अनुवादित "फकीरा" हि कादंबरी खूपच लोकप्रिय ठरली आहे. आजवर या कादंबरीच्या लाखो प्रती विकल्या गेल्या आहेत आणि ओघ अजूनही वाढतच आहे. "शुद्र" म्हणून हिनावलेल्या आपल्या पूर्वजांच्या वर कोणते घोर संकट आलेले आणि त्यांचे जीवन किती दुखमय होते हे जाणून घ्यायचे असेल तर हे पुस्तक जरूर वाचा मित्र-मैत्रिणीनो. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे मराठी साहित्यात सर्वश्रेष्ठ स्थान आहे. त्यांची लेखनशैली मनाला एक दिशा देऊन जाते.

लेखं- शंकर माने.


12 comments:

  1. I read this book..... he is realy heart touching story on untouchebles....

    ReplyDelete
  2. एकमेवाद्वितीय

    ReplyDelete
  3. अण्णाभाऊचा फकीरा चित्रपटात सावळ्याच्या भुमिकेमध्ये असलेला चित्रपट कधी अपलोड करणार आहात?

    ReplyDelete
  4. khup chan lihilat sir, ani bharpur mahiti dili...

    ReplyDelete

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...