वटपौर्णिमेची एक थोतांड !!

वटपौर्णिमेची चिकित्सा !!



बरं झाले सावित्रीमाई फुलेने तुमच्या हाती लेखणी पाटी देऊन तुम्हास निरक्षरतेच्या खाईतून काढून साक्षर केले. पण तुमच्या डोक्यात उजेड पडायला ७ जन्म घ्यावे लागतील कदाचित...

 

वड हे ऑक्सिजन देणारे झाड आहे, सावित्रीचा पती बेशुद्ध झाल्यावर तिने त्याला ओढत आणून त्या वडाच्या झाडाखाली झोपवले होते आणि तेथे त्याला भरपूर प्रमाणात ऑक्सिजन मिळाल्यामुळे तो शुद्धीवर आला आणि तिला वाटले की तिने आपल्या भक्तीच्या जोरावर यमराजाकडून आपण सत्यवानाला परत बोलावले.

 

या गोड गैरसमजातून आज हि वडाला दोरा गुंडाळून सात जन्मी तोच पती मिळावा म्हणून यांची अर्चना सुरूच आहे. जर एखाद्या नवविवाहितेने सुरुवातीच्या एक-दोन वर्षात वटपौर्णिमेला वडाची पूजा करून सात जन्मी हाच पती मिळावा म्हणून अर्चना केली आणि तीन-चार वर्षानंतर जर त्याने तिला हुंड्यासाठी छळले आणि जाळले तर सात जन्मी त्याच्या हातून असेच अकाली जाळून घेणार का ???  वडाला दोरा गुंडाळूनही जर घटस्फोट होत असतील तर जात जन्म घटस्फोट घेण्याची तयारी आहे का ???  दारू पिऊन रोज मारहाण करणाऱ्या नवऱ्याची बायको देखील कसा काय सात जन्मी तोच नवरा मांगते ??? अनेक वर्ष न नांद्णारी बायको माहेरी वटसावित्रीची पूजा करावयास का जाते ???  इथे एका जन्मात दोन-तीन बायका व तीन-चार नवरे करणार्याची काही कमी नाही... हिंदू धर्मातील स्त्रिया आपल्या पतीचे आयुष्य वाढावे व सातही जन्मात हाच पती मिळावा, म्हणून वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला सूत गुंडाळतात,पण मला आश्चर्य वाटते की मुस्लीम , ईसाई,  बौद्ध धम्मातील स्त्रिया आपल्या पतीचे आयुष्य वाढावे म्हणून कुठल्याही प्रकारचे व्रत किंवा विधी करीत नाही मग त्या स्त्रियांचे पतीचे आयुष्य कमी होते का, किंवा ते लवकर मरतात का ??? जर सात जन्म हाच पती मिळणार असेल तर मग पुढचे सहा जन्म कुंडली बघून, ३६ गुण मिळवून लग्न करायची गरज काय ??? असेच समजायचे ना कि मागच्या जन्मात वटपौर्णिमा केली म्हणून हा आपला मागच्या जन्माचा पती आहे असे गृहीत धरून पंचांग वा कुंडली ना बघताच विवाह का करत नाही? उगाच भटा सारख्या भोंदू कडे जाण्याची काय गरज ???

 

खेड्यापाड्यात घरा जवळ एखादे वडाचे झाड मिळते पण शहरी भागात लवकर वडाचे झाड बघायला सुद्धा मिळत नाही, मग अश्यावेळी माझ्या शिकून अडाण्यासारखे वागणाऱ्या भगिनी कोसो दूर अणवानी पायाने सुत बांधायला जातात, मी असा हि ऐकलंय कि ह्या स्त्रियांनी मग दिवसभर उपाशी राहून रात्री उपवास सोडायचा असतो. अंधश्रधेचा पण कळस झाला... सांगा ना तुमच्या नवरोबाला एक दिवस हीच बायको सात जन्म मिळण्यासाठी उपवास करायला करेल का नवरोबा उपवास??


बघां प्रिय मैत्रिणीनो जगतगुरू तुकोबाराय आपल्या अभंगात पुनर्जन्माविषयी काय मांडतात....





पुनर्जन्म नाही - जगतगुरू तुकोबाराय !!

साखरेचा नव्हे ऊस |
आम्हा कैसा गर्भवास ||
बीज भाजुनी केली लाही |
जन्म मरण आम्हासी नाही ||
- संत तुकोबाराय.

 

अर्थ-
 


साखरेपासून पुन्हा ऊस तयार होत नाही... तर आमचा जन्म पुनर्जन्म कैसा ??? बिया भाजुनी लाही तयार होते... हि लाही आपण पेरू शकत नाही... तसेच एकदा मासून मेला की सर्व संपते... पुन्हां पुनर्जन्म नाही असे संतश्रेष्ठ तुकोबाराय आपल्या अभंगात सांगतात.


प्रिय मैत्रिणीनो...  परंतु आपल्याला पुढील जन्माचे आमिष दाखवून या जन्मातील दानाचे पुण्य पुढील जन्मात मिळेल असे सांगितले जाते... परंतु आजचे वास्तव जीवन आनंदाने आणि सुखीसंपन्न कसे जगावे असे सांगितले जात नाही... तुकोबाराय असे म्हणतात की  "जोडोनिया धन उत्तम व्यवहारे ,उदास विचारे वेच करी !" आणि ज्याच्या जवळ ज्ञान आहे ती जगातील सर्वात सुखी व्यक्ती असते. म्हणून पुढील जीवनातील अवास्तव स्वप्न रंगविण्यापेक्षा आजचे वास्तव जीवन निकोप व निर्भिडपणे जगून सृष्टीवर आनंदवन निर्माण करणे खूप महत्वाचे आहे... विचार करा...  निर्णय आपला.

 

गेल्या दोन दिवसांपासून आज आलेल्या अनन्यसाधारण महत्वामुळे 'वटवृक्षांच्या' फांद्याची जी कत्तल झालीये ते पाहून याचा अभिमान करावा..?? कि कीव...?? असा प्रश्न आम्हाला पडतोय. कधीकाळी कुठल्या सत्यवानाचे प्राण वडाच्या झाडावरून पडल्यामुळे यमाने नेले व सावित्रीने ते परत आणले अशी एक पुराणकथा (कि पुराणकाराच्या कल्पनाशक्तीच्या भरारीचे एक उदाहरण...??? ) आहे म्हणून आजही ती वेडी अशा बाळगून वडाच्या झाडाच्या फेऱ्या मारणे, आणि याच पतीची आणि पर्यायाने 'स्त्रीच्या जन्माची' जन्मोजन्माकरिता याचना करायची हि मानसिक गुलामगिरी निदान बहुजन स्त्रिया तरी कधी सोडणार...??

 


प्रिय मैत्रिणीनो... सत्यवानाच्या सावित्रीपेक्षा जोतीबाच्या सावित्रीनं सांगितलेल्या शिक्षणाचं, स्री स्वातंत्र्याचं आधुनिक विचारांचं व्रत स्विकारा. तुमच्या नवऱ्‍याचचं काय संपुर्ण कुटुंबाचचं कल्याण होईल.

 



आपल्या पतीच्या सत्यवादीपणामुळे त्या काळात त्यांना मिळत असलेल्या उपेक्षेमुळे आपल्या पतीच्या प्राणांची कुठेही भिक मागत न बसता ते सत्य पचवून, तत्कालीन रूढी-परंपरांना छेद देऊन आपल्या पतीच्या प्रेतासमोर 'मडके' घेऊन चालणारी आणि अंत्यसंस्कार करणारी बहुजन महानायिका 'सावित्री'माई फुले जोपर्यंत बहुजन स्त्री व पुरुषांची आदर्शस्थान होणार नाही तोवर असे भोळसट विश्वास ठेऊन अशा कित्येक वटवृक्षांच्या व पर्यायाने स्त्री अस्मितेच्या कत्तली होत राहतील यात वाद नाही.

म्हणून प्रिय मैत्रिणीनो... ताईनो... आयानो... मावश्यानो.... हे कर्मकांड आतां सोडा...  ही सर्व ब्राम्हणांनी आपले पोट भरण्यासाठी लावलेले थोतांड आहे... 



तुम्हा सर्वाना विनंती आहे जर खरी पुजा करायची असेलं तर प्रत्येकीने या दिवशी एक वडाचे झाड लावा... वडाच्या झाडांच्या फाद्या तोडू नका तुम्हा सर्वाना हात जोडून विनंती... तुम्ही जी पण पुजा कराल ती चिकित्सक बुद्धीने करा... बघां पटलं तर ??? अंधश्रधा सोडा !!
  


लेखं- शंकर घोरसे खापरखेडा, निलेश यशवंत ठेंगे , जयंत निकम(सोबत प्रबोधन टीम) , गौरव गायकवाड(सोबत प्रबोधन टीम) , निलेश रजनी भास्कर कळसकर(सोबत प्रबोधन टीम).


7 comments:

  1. आपले सण आणि उत्सव
    *वटपौर्णिमा
    अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री अतिशय सुंदर, नम्र व गुणी मुलगी होती. सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली.
    सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. सत्यवान हा शाल्व राज्याचा धृमत्सेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता. शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता. भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच माहित असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला.
    पण सावित्रीने ते मान्य केले नाही. तिने सत्यवानाशी विवाह केला. व जंगलात येऊन नवऱ्याबरोबर सासू सासऱ्याची सेवा करू लागली.
    सत्यवानाचा मृत्यू जेंव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेंव्हा तिने तीन दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले. सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्या बरोबर गेली. लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला. यमधर्म तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागली. सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली. यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले. पण तिने साफ नाकारले व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला. अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले. सावित्रीने सासूसासऱ्याचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला. यमराजाने गफलतीने तथास्तु म्हटले. तेंव्हा त्या वचनबध्द झाल्याची आठवण झाली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले म्हणून जेष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वट सावित्री व्रत आचरतात.

    *वटपौर्णिमेला स्त्रियांनी वटवृक्षाची पूजा करण्याचे महत्त्व
    वटवृक्ष हा शिवरूपी आहे. शिवरूपी वटवृक्षाची पूजा करणे, म्हणजे वटवृक्षाच्या माध्यमातून शिवरूपी पतीलाच एकप्रकारे स्मरून, त्याचे आयुष्य वाढून त्याची आयुष्यातील प्रत्येक कर्माला साथ मिळावी, यासाठी ईश्वशराची पूजा करणे. कर्माला शिवाची जोड असेल, तर शक्तीढ व शिव यांच्या संयुक्तव क्रियेने व्यवहारातील कर्म साधना बनून त्याचा जिवाला फायदा होतो.

    *वटवृक्षाला सूत गुंडाळण्याचे महत्त्व
    वटवृक्षाच्या खोडाच्या उभ्या छेदावर असणाऱ्या सुप्ती लहरी शिवतत्त्व आकृष्ट करून वायुमंडलात प्रक्षेपित करतात. ज्या वेळी वटवृक्षाच्या खोडाला सुती धाग्याने गुंडाळले जाते, त्या वेळी जिवाच्या भावाप्रमाणे खोडातील शिवतत्त्वाशी संबंधित लहरी कार्यरत होऊन आकार धारण करतात. सुती धाग्यातील पृथ्वी व आप या तत्त्वांच्या संयोगामुळे या लहरी जिवाला ग्रहण करण्यास सुलभ होतात.

    *वडाच्या पूजनामध्ये पाच फळे का अर्पण करावीत
    फळे ही मधुररसाची, म्हणजेच आपतत्त्वाची दर्शक असल्याने फळांच्या समुच्चयाकडे आकृष्ट व प्रक्षेपित होणाऱ्या देवतांच्या लहरी कमी कालावधीत जिवाच्या देहातील कोषांपर्यंत झिरपू शकतात.

    *प्रार्थना
    सर्व पवित्र वृक्षांत वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून पारंब्यांनी त्याचा विस्तारही खूप होतो. अशा वटवृक्षाचे पूजन करून स्त्रिया `मला व माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य व मुले-नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे', अशी प्रार्थना करतात.

    this is not any andhshraddha,, this our culture of unique relegion called " HINDUISM" n proud to be a " HINDU "

    ReplyDelete
    Replies
    1. शैलेश, मी कोणत्याही धर्माला वाईट म्हणत नाही, पण जे खर असत ते खरच असत. जो पर्यंत तुम्ही प्राचीन (खरा) इतिहास वाचत नाहीत किंवा शोध घेत नाहीत तोपर्यंत तुम्हाला ते कळणार नाही.. plz read a true history.. and observe ....

      Delete
  2. I agree "EK VED KINARA", Khara itihas hach ya sarva gosti na uttar aahe.

    ReplyDelete
  3. शैलेश i want to tell u pls read mahalakshmi katha Its same like अनेक वर्षापूर्वी भद्र देशात भद्रनावाचा राजा राज्य करीत होता. Shambala like but its all about story nothing is truth so go beyond old thought and make our self open

    ReplyDelete
  4. शैलेश काय सॉलिड लव्ह स्टोरी आहे सावित्री /सत्यवानाची वा .....पण नारायणाने तर कमालच केली राव ,त्याला सत्यवानाच आयुष्य माहित होत पण हा भारत देश चार हजार वर्षा पेक्षा जास्त गुलाम राहील हे त्याला माहित नव्हत ,त्यावर त्याने काही तिलस्मी उपाय शोधले नाही .होवू दिले देशाला गुलाम .

    ReplyDelete
  5. kahi rudhi an parapara samajun gheun phata dilach pahije,
    khandeahatil khanbhai(kanbai),ganesh utsav,varshabhar lokana lutun nantar ek divas patrak chhapun magitali janari kshamapan divasach pratha,devache navane kurbaichi prath,navaratritil garbhyache nimittane sadhali janari tawalaki,ambeakaranche nav gheun kele janare shoshan,jankalyanache navane keli janari shaskiy loot, dhandevaik doctari srwaa dharma, bhondu buvabajan pramanech bhondu doctor,shikshak v shaikshanik sanstha tasech bhondu rajyakarte,bhondu prasiddhi maddhuame,
    ase kititari galichh prakar suddha andha-wishwas mhanajech andhashraddhach aahet.
    yawar dekhil jahir prabodhan zale pahije.

    ReplyDelete
  6. हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा
    गूण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी
    न लगे मुक्ती, धन-संपदा, संत संग देई सदा
    तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी

    ReplyDelete

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...