आक्षेपार्ह छायाचित्रे तंत्रज्ञानाचा गैरवापर करून ती बनवून खुलेआमपणे पोस्ट करणारी, त्यांचा सुरी आनंद घेणारी, ती सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून पसरवणारी माणसे विकृत आहेत !!

आक्षेपार्ह छायाचित्रे तंत्रज्ञानाचा गैरवापर करून ती बनवून खुलेआमपणे पोस्ट करणारी, त्यांचा सुरी आनंद घेणारी, ती सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून पसरवणारी माणसे विकृत आहेत !!






केंद्रात पुरोगामी आघाडीचे सरकार आहे. देशातले अनेक लहान मोठे पक्ष एकत्रित येऊन हे सरकार बनलेले आहे. कॉंग्रेस त्यातला प्रमुख राजकीय पक्ष आहे. किंबहुना ते सरकार कॉंग्रेस सरकार म्हणूनच ओळखले जात आहे. अशा वेळी सरकारच्या असमाधानकारक कामगिरीचा राग कॉंग्रेस पक्षावर प्रामुख्याने निघणे स्वाभाविक आहे. तो पंतप्रधान या नात्याने मनमोहन सिंग आणि कॉंग्रेस पक्षप्रमुख म्हणून सोनिया गांधी यांच्यावर निघणेही स्वाभाविक आहे. याबाबत कुणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. पण मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी यांची वैयक्तिक बदनामी या विरोधाआड कशी काय केली जाऊ शकते. मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी यांची अत्यंत आक्षेपार्ह छायाचित्रे तंत्रज्ञानाचा गैरवापर करून ती बनवून खुलेआमपणे पोस्ट करणारी, त्यांचा सुरी आनंद घेणारी, ती सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून पसरवणारी माणसे विकृत आहेत, असे माझे स्पष्ट मत आहे.



अशी छायाचित्रे बनवून पोस्ट करणे हा संबंधित स्त्री वर एक प्रकारचा लैंगिक अत्याचारच, गैरवर्तणूक आहे. स्त्रीची अप्रतिष्ठा आहे. स्त्रियांच्या असुरक्षिततेचे खापर सरकारवर जरूर फोडले जाऊ शकते, पण आपल्या देशातल्या एका राजकीय पक्षाच्या प्रमुखपदी असलेल्या एका स्त्रीची इज्जत ज्या देशात अगदी सहजपणे चव्हाट्यावर मांडली जाऊन त्यावर हास्यविनोद होत राहतात आणि तथाकथित संस्कृतीरक्षक त्यात सामील असतात आणि इतर सोयीस्कर मौन बाळगून असतात, त्या देशात सरकारने किती जरी उपाययोजना करावयाच्या ठरवल्या तरी स्त्रियांच्या असुरक्षिततेचा प्रश्न कधीच सुटणार नाही.


 

अशा घाणेरड्या मनोवृत्तीचा मी तीव्र शब्दात धिक्कार करतो व माझ्या सर्व मित्र मैत्रिणींना आवाहन करतो कि जिथे जिथे अशी छायाचित्रे दिसतील मग ती कोणाशीही संबंधित असोत, ती facebook ला report करा. आवश्यकता वाटल्यास, जमल्यास पोलिसांत तक्रार करा.


लेखं - राज असरोन्डकर सर.

बाबासाहेब खरे अहिंसक नव्हते काय..??

बाबासाहेब खरे अहिंसक नव्हते काय..??





१९३२ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 'पुणे करारावर' सही करून हट्टी गांधींना जीवनदान दिले मात्र या जीवनदानाच्या तडजोडीत अस्पृश्य व पददलित समाजाला स्वतंत्र मतदारसंघ मिळावे यासाठी चाललेल्या धडपडीत त्यांना यश मिळवता आले नाही. फार कमी जागांवर त्यांना समाधान मानावे लागले. प्रसंगी स्वतःचे नुकसान पत्करून ज्या हिंदू समाजाने त्यांच्यावर इतके अन्याय केले त्याच समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बॅं. गांधीचा प्राण वाचवणे अधिक महत्वाचे मानणारे बाबासाहेब खरे अहिंसक नव्हते काय..?? महाकारुणिक नव्हते काय..??

 

पुणे कराराच्या बातम्यांत देखील बाबासाहेबांचे नाव चुकुनही येऊ नये याची दक्षता कटाक्षाने घेणारी "अखिल भारतीय' स्वरुपाची सनातनी दैनिक वृत्तपत्रे त्या काळातही होतीच. ज्याचा परिणाम अगदी आताच्या हॉलीवूडपट 'गांधी'मधून सुद्धा पाहायला मिळतो. गांधीच्या आयुष्यातील या अत्यंत महत्वाच्या घटनेचा साधा उल्लेखही गांधी चरित्रात किंवा त्यांच्या चित्रपटात येउन नये व पर्यायाने बाबासाहेब मोठे ठरू नयेत याची काळजी सनातनी टाळकी आजही घेत असताना दिसतात.



१९३२ ते १९३४ पर्यंत पुणे करारासंबंधीचे वादळ शमते न शमते तोच डॉक्टर साहेबांनी धर्मांतराचा अणुबॉम्ब टाकला आणि त्यासरशी सर्व सनातनी वर्तमान पत्रे आणि संस्था खडबडून जाग्या झाल्या. बाबासाहेबांची सर्व स्तरांतून चौकशी होऊ लागली. अनंत हरी गद्रे 'झुणका भाकर सत्यनारायण' करू लागले. त्यात प्र.के. अत्रे आदी सुधारक मंडळी भाग घेऊ लागली. मामा वारेकर आदी मंडळी उपनयन संस्कार करून अस्पृश्यांना जानवी घालू लागली. सावरकर अस्पृश्यांसाठी सार्वजनिक मंदिरे उभारण्याच्या तयारीत लागले तर दुसर्या बाजूस गांधीवाद्यांनी अस्पृश्यांच्या मंदिर प्रवेशाची योजना आखली.

 

बाबासाहेब मात्र होत असलेल्या या सगळ्या धावपळीकडे निरासक्त वृत्तीने पाहत आपल्या पुढील कार्याची योजना आखत होते. आजवर त्यांच्या कार्याची दाखल घ्यायची नाही असे ठरवलेल्या लोकांना सुद्धा त्यांनी अक्षरशः बचैन करून सोडले होते. याच काळत ते अस्पृश्यांची सभा-संमेलने भरवून त्यांच्यात स्वाभिमान व जागृती चेतवत होते. धर्मांतर हेच सर्वस्व नसून त्यासोबत कायदेमंडळतल्या मनाच्या जागा पटकवायला अस्पृश्य तरुणांना सांगत होते. पोटतिडकीने भौतिक सुखाचा व मानसिक स्वातंत्र्याचा मूलमंत्र या बाराद्लेल्या समाजाला देत होते.



लेखं- गौरव गायकवाड(प्रबोधन टीम)


आज खरंच बुद्धाने शिकवलेल्या प्रज्ञा आणि करुणेची या भारताला गरज आहे....

आज खरंच बुद्धाने शिकवलेल्या प्रज्ञा आणि करुणेची या भारताला गरज आहे....


 
उत्तराखंडात झालेल्या अतिवृष्टीमध्ये तब्बल १५ ते १७ हजार निष्पाप जीवांचा बळी गेलाय. या बळींमध्ये स्थानिकांपेक्षा अधिक संख्येने दर्शनास गेलेल्या भाविकांचा समावेश आहे. ज्या देवाच्या दर्शनाला हे भाविक गेले तोही या महाप्रलायापासून त्यांना वाचवू शकला नाही हे मोठे दुर्दैव..!!! पण हे सुद्धा काहीच नाही असे वाटावे इतका भयंकर दुर्दैवी प्रकार आज तिथे चालू आहे. त्या देवापेक्षाही कठोर अशी एक राक्षसी जमात आज तिथे अमानुषपणाचा थैमान घालत आहे..ती जमात आहे 'लोभी मनुष्याची'...!!!

 
नुकत्याच आलेल्या बातमीनुसार प्रलयाच्या ठिकाणी, अगदी मंदिरात सुद्धा प्रेतांचा खच पडलाय. ओलाखाण्यासही कष्ट पडावेत इतकी बिकट अवस्था त्या प्रेतांची सध्या आहे. बराच काळ पाण्यात राहिल्याने त्यांच्या सडण्याची प्रक्रिया सध्या चालू आहे...हेही कमी पडावे म्हणून कि काय..?? आता त्या प्रेतांच्या अंगावरील सोने-चांदीचे दागिने पळवून नेण्यासाठी माणसांची नव्हे लोभी कुत्र्यांची तिथे चढाओढ लागलेली आहे. मानसिक दृष्ट्या पूर्णतः मोहात अडकेलेले हे विकृत लोक अक्षरशः त्या सोन्यासाठी प्रेतांचे अवयव कापून नेत आहेत. त्यामुळे आधीच ओळखण्यास कठीण झालेली प्रेते आता अधिकच विद्रूप असलेली मदतकार्यास आलेल्या टीमला पाहायला मिळत आहेत.

 
लाजेलाही लाज वाटावी असे हे कृत्य..!! घृणा तरी कितपत करावी...??? प्रेताच्याही टाळूवरील लोणी खाणारी जमात हे आजवर केवळ नेत्यांना असलेले विशेषण या घटनेने हाणून पाडले आहे. माणूस इतक्या खालच्या थराला का गेला..?? त्याच्यातलं 'माणूसपण' कुठे हरवलं..?? त्याच्या या परिस्थितीला जबाबदार कोण..??

 
स्पर्धेच्या या युगात श्रीमंत-गरीब हा भेदभाव हा शिगेला पोहोचला आहे. श्रीमंत अधिकच श्रीमंत तर गरीब हा अगदी गरीब होत चाललाय. यात आपल्या यंत्रणेचा ( system) चा मोठा हातभार आहे. त्यात आपल्या संस्कृतीत सोन्याला दिलेल्या अवाजवी महत्वामुळे, त्याच्या केल्या गेलेल्या बाऊमुळे आज ते मिळवण्याकरिता माणूस इतका खालच्या थराला गेला आहे कि, माणसाला माणसाप्रती कसलीच करुणा (Love and Care ) आणि प्रज्ञा (मानसिक व बौद्धिक प्रगल्भता) राहिलेली नाही. त्याच्या समोर उभारलेल्या एका आभासी जगात जगायला येथील system नेच त्याला आज भाग पाडलंय.

 
हे प्रकार पाहिले कि जाणवतं कि, आज खरंच बुद्धाने सांगितलेल्या अत्तिउच्च मुल्यांची 'प्रज्ञा आणि करुणेची' जगाला गरज आहे. असे करणे म्हणजे आपला धर्म त्यागणे नव्हे... तर मानवी कुटुंबात जन्माला आलेल्या आणि आधी स्वयंप्रकाशित होऊन मग जगाला ही उच्च मुल्य प्रदान केलेल्या तुमच्या आमच्या सारख्याच एका 'महामानवाची' ही तत्वे आमलात आणणे म्हणजे स्वजीवन आनंदमयी करणे होय...माणूस बनणे होय..!!!

 
माणसातलं माणूसपणच आज इतक्या खालच्या पातळीवर गेलंय कि सध्या एक सच्चा 'माणूस' भेटण आज दुर्मिळ झालंय...तिथे मंदिरात व चारधाम फिरून देव काय भेटणार...???

लेखं - गौरव गायकवाड(सोबत प्रबोधन टीम)

संहारक स्वत: स्वस्थ, भवताल मात्र उद्ध्वस्त हा चमत्कार तर खरांच !!

संहारक स्वत: स्वस्थ, भवताल मात्र उद्ध्वस्त हा चमत्कार तर खरांच !!



हिन्दु धर्माच्या मान्यतेनुसार ब्रह्मा, विष्णु आणि महेश या त्रयीतील महेश म्हणजे शंकर सृष्टीचा संहारकर्ता असल्याने त्याने उत्तराखंड राज्यात जो हाहाकार माजवून सोडला त्याकडेही कदाचित काही लोक भक्तिभावाने पाहू शकतील. पापाचार वाढल्याने अखेर महादेवालाच आपला तिसरा नेत्र उघडावा लागला असे म्हटले जाईल वा होते ते बर्‍याकरिता अशीदेखील याची संभावना केली जाईल.


 
त्याउलट परमेश्‍वराच्या दर्शनाला गेलेल्या भाववेड्या आणि भक्तिवेड्या पापभीरुंचे प्राणहरण करणारा, सारे काही होत्याचे नव्हते करुन सोडणारा आणि स्वत: मात्र नामानिराळा राहून कलियुगातील मानवजातीनुसार स्वत:च्याच पायापुरता पाहणारा असा कसा तुमचा देव आणि अशी कशी तुमची अंधश्रध्दा असाही एक युक्तिवाद जाज्वल्य बुध्दिप्रामाण्यवादी करु शकतील. पण या दोन्ही तर्कांमध्ये आणि तर्कटांमध्ये तसा काहीही अर्थ नाही. पाप-पुण्याच्या भाषेतच बोलायचे झाल्यास ही सारी तुमचीच म्हणजे मानवजातीचीच पापे आहेत व ती आता तुमच्या अंगाशी आली आहेत असे म्हणण्यावाचून गत्यंतर नाही.


हिन्दु धर्मियांच्या दृष्टीने अत्यंत पवित्र मानल्या जाणार्‍या चार धाम यात्रेचा अवघा प्रवास हिमालयाच्या कुशीतून होतो. तो सुखद, सुखकारक आणि सुरक्षित नाही हे एक प्राचीन सत्य असल्यानेच पूर्वीच्या काळी या यात्रेवर निघताना गडीमाणसे म्हणे आपापल्या बायकांचे कुंकु पुसूनच घराबाहेर पाऊल टाकीत असत. ठायीठायी आणि पावलापावलांवर धोका दबा धरुन बसलेला असतो हे जितके खरे तितकेच या धोक्याला अधिक धोकेदायक बनविण्याचे काम मात्र परमेश्‍वराने वा निसर्गाने केलेले नाही तर ते केले आहे मानवजातीने हेहि तितकेच खरे.


 
द्वादश ज्योतिर्लिंगांच्या वर्णनातील श्लोकामध्ये ‘हिमालये तु केदारं’ असा ज्याचा उल्लेख येतो त्या केदारनाथाचे मंदीर हे या चार धाम यात्रेतील एक धाम. सदर मंदीर कधी, कोणी, का आणि कसे बांधले याविषयीचा कोणताही दस्तावेज उपलब्ध नाही. आहे त्या केवळ आख्यायिका. त्यातील एका आख्यायिकेनुसार पाच पांडवांपैकी मधल्या म्हणजे भीमाने हे मंदीर बांधले असे सांगितले जाते. महाभारताचा काळ सनपूर्व तीन ते पाच हजार वर्षांचा गृहीत धरला तर तब्बल पाच ते सात हजार वर्षे जे मंदीर अनेक प्रपात आणि उत्पात सहन करुन आजही दिमाखाने उभे आहे त्या जागी जर ते तसेच स्थिर राहत असेल तर तो दैवी चमत्कार मानायचा की या मंदिराच्या निर्माणकर्त्या अभियंत्यांचे मनोमन कौतुक करायचे? इतक्या प्राचीन काळात आजच्या तुलनेत कोणतेही तंत्रज्ञान उपलब्ध नसताना (?) हजारो वर्षे जशीच्या तशी टिकून राहील अशा वास्तूची निर्मिती करण्याचे कौशल्य जर अवगत असेल तर हा आजच्या काळातील तथाकथित अत्याधुनिक अभियांत्रिकीचा, वास्तुशास्त्राचा आणि पर्यावरण तसेच हवामान तज्ज्ञतेचा पराभवच नाही का?


 
निसर्गाशी म्हणजेच आजच्या परिभाषेत पर्यावरणाशी खेळ करु नका, अंती तो तुमच्याच अंगलट येईल असे कितीही सांगितले तरी हा खेळ थांबत नाही. निसर्गाच्या आणि पर्यावरण रक्षणाच्या विरुध्द म्हणून जे जे असेल ते केले जाते हा एक भ्रष्टाचार आणि आजच्या काळात सर्वमान्य झालेला दुसर्‍या प्रकारचा भ्रष्टाचार यांचा एकत्र परिणाम म्हणजे उत्तराखंडातील उत्पात आहे. पंडुपुत्राने निर्माण केलेल्या केदारनाथ मंदिरातील शिवलिंगावर म्हणे दुधाचा वा पाण्याचा अभिषेक केला जात नाही तर त्या लिंगावर तुपाचे गोळे थापले जातात (भारतीय संस्कृती कोश). कुणी निर्माण केली ही (कु)प्रथा? थापलेले हे धृत कुठे जाते, ते सडून त्याचे काय होते, त्यापासून कोणती हानी होते याचा कुणीतरी विचार केला आहे?


पण हेच कशाला. अतिरेकी हिन्दु धर्माभिमान्यांना कटू वाटेल (नव्हे, ते वाटलेच पाहिजे) पण जी जी म्हणून हिन्दु देवालये आहेत ती अत्यंत गलिच्छ (किंचित अपवाद दक्षिणेकडच्या देवालयांचा) अस्वच्छ, कोंदट आणि निसर्गनियमांशी पूर्णत: फारकत घेणारीच असतात. वाढविलेल्या व त्यातही पुन्हा पावलेल्या म्हणजे नासक्या नारळाची दुर्गंधी, पाण्याचे आणि नारळपाण्याचे वाहणारे पाट, फुले आणि कालांतराने झालेले त्याचेच निर्माल्य, प्रसादाच्या वा अन्य सामुग्रीच्या पुड्या बांधलेले कागद, मंदिरांच्या गाभार्‍यात लटकणारी कोळीष्टके ही सारी हिन्दु देवालयांची आजची व्यवच्छेदक लक्षणे मानली जातात. तुलनेत मशिदी, चर्चेस, गुरुद्वारे, अग्यारी, पॅगोडा, जैन मंदिरे अशा अन्य धर्मियांच्या प्रार्थनागृहांमध्ये नेहमीच अत्यंत स्वच्छ आणि प्रसन्न वातावरण असते. या सर्व ठिकाणची स्वच्छता नजरेत भरत असते तर हिन्दु देवालयांमधील अस्वच्छता सतत नजरेला टोचत असते. तिचा पर्यावरणाच्या र्‍हासाशी अगदी निकटचा संबंध असतो.


 
पर्यावरणाचे संतुलन ढासळायला लावणारा आणखी एक कारक वा पर्यावरणाचा शत्रू म्हणजे आवाज! ‘शांतीतुल्यं तपो नास्ती’ असे शास्त्रवचनच आहे. शांततेसारखे दुसरे तप नाही. पण हिन्दु देवालयांना जसे स्वच्छतेचे वावडे तसेच ते शांततेचेही वावडे. ‘मी तुझ्या दर्शनासाठी आलो आहे तेव्हां निजला असशील तर उठ’ असे बजावणारा घंटानाद केल्याशिवाय एकही ‘भावभोळा हिन्दु’ मंदिरात प्रवेश करीत नाही. गोंगाट, कलकलाट, घंटानाद, चित्रविचित्र आवाजातील श्लोकपठण यापायी जे ध्वनी प्रदूषण सतत आसमंत छेदीत असते त्याचाही पर्यावरणाच्या असंतुलनाशी निकटचा संबंध असतो. पर्यावरणाचे संतुलन ढासळले तर त्याच्या परिणामी कोणते आणि कसे अरिष्ट ओढवते हे जाणून घ्यायचे असेल तर ज्यांनी अगोदरच पाहिला असेल त्यांनी ग्रेगरी पेकचा ‘मॅकानाज गोल्ड’ हा इंग्रजी सिनेमा आठवावा आणि ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी तो जरुर पहावा.


 
इत्यर्थ इतकाच की उत्तराखंड राज्यात जी हानी झाली आहे तिची व्याप्ती केवळ त्या राज्यापुरतीच र्मयादित नसल्याने ती नि:संशय अपरिमित अशीच आहे. पण अनुभवांती माणूस शहाणा होतो असे जे म्हटले जाते ते खरे असेल तर या हानीपासून काही बोध घेतला जातो वा नाही हेच आता महत्वाचे.


 
महाराष्ट्राला असा बोध घेण्याची संधी लवकरच उपलब्ध होणार आहे. अरबी समुद्रात शिवछत्रपतींचे अतिभव्य स्मारक उभारण्याला केन्द्रीय पर्यावरण मंत्रालयाने नुकतीच परवानगी दिली आहे. पण ही परवानगी विनाशर्त नाही. एक शर्त आहे. ती म्हणजे स्मारकाच्या परिसरात कोणतीही दुकाने, व्यावसायिक आस्थापना व संकीर्ण बांधकामे येता कामा नयेत. तशी काळजी घेतली गेली तरच पर्यावरणाचे रक्षण होणार आहे. तथापि आघाडीतील राष्ट्रवादी आणि युतीमधील शिवसेना या दोहोंकडे ‘उद्यमशील’ कार्यकर्त्यांच्या झुंडीच्या झुंडी असल्याने त्यांच्या स्वयंरोजगाराची हळूहळू तिथेही व्यवस्था होऊ लागली तर काय होईल याचा विचारही तूर्तास न केलेलाच बरा.
 
लेखं- हेमंत कुलकर्णी

 
संदर्भ- http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNews-All.php?nid=NashikEdition-6-1-23-06-2013-19dde&ndate=2013-06-23&editionname=nashik

 
धन्यवाद- दै.लोकमत

वटपौर्णिमेची एक थोतांड !!

वटपौर्णिमेची चिकित्सा !!



बरं झाले सावित्रीमाई फुलेने तुमच्या हाती लेखणी पाटी देऊन तुम्हास निरक्षरतेच्या खाईतून काढून साक्षर केले. पण तुमच्या डोक्यात उजेड पडायला ७ जन्म घ्यावे लागतील कदाचित...

 

वड हे ऑक्सिजन देणारे झाड आहे, सावित्रीचा पती बेशुद्ध झाल्यावर तिने त्याला ओढत आणून त्या वडाच्या झाडाखाली झोपवले होते आणि तेथे त्याला भरपूर प्रमाणात ऑक्सिजन मिळाल्यामुळे तो शुद्धीवर आला आणि तिला वाटले की तिने आपल्या भक्तीच्या जोरावर यमराजाकडून आपण सत्यवानाला परत बोलावले.

 

या गोड गैरसमजातून आज हि वडाला दोरा गुंडाळून सात जन्मी तोच पती मिळावा म्हणून यांची अर्चना सुरूच आहे. जर एखाद्या नवविवाहितेने सुरुवातीच्या एक-दोन वर्षात वटपौर्णिमेला वडाची पूजा करून सात जन्मी हाच पती मिळावा म्हणून अर्चना केली आणि तीन-चार वर्षानंतर जर त्याने तिला हुंड्यासाठी छळले आणि जाळले तर सात जन्मी त्याच्या हातून असेच अकाली जाळून घेणार का ???  वडाला दोरा गुंडाळूनही जर घटस्फोट होत असतील तर जात जन्म घटस्फोट घेण्याची तयारी आहे का ???  दारू पिऊन रोज मारहाण करणाऱ्या नवऱ्याची बायको देखील कसा काय सात जन्मी तोच नवरा मांगते ??? अनेक वर्ष न नांद्णारी बायको माहेरी वटसावित्रीची पूजा करावयास का जाते ???  इथे एका जन्मात दोन-तीन बायका व तीन-चार नवरे करणार्याची काही कमी नाही... हिंदू धर्मातील स्त्रिया आपल्या पतीचे आयुष्य वाढावे व सातही जन्मात हाच पती मिळावा, म्हणून वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला सूत गुंडाळतात,पण मला आश्चर्य वाटते की मुस्लीम , ईसाई,  बौद्ध धम्मातील स्त्रिया आपल्या पतीचे आयुष्य वाढावे म्हणून कुठल्याही प्रकारचे व्रत किंवा विधी करीत नाही मग त्या स्त्रियांचे पतीचे आयुष्य कमी होते का, किंवा ते लवकर मरतात का ??? जर सात जन्म हाच पती मिळणार असेल तर मग पुढचे सहा जन्म कुंडली बघून, ३६ गुण मिळवून लग्न करायची गरज काय ??? असेच समजायचे ना कि मागच्या जन्मात वटपौर्णिमा केली म्हणून हा आपला मागच्या जन्माचा पती आहे असे गृहीत धरून पंचांग वा कुंडली ना बघताच विवाह का करत नाही? उगाच भटा सारख्या भोंदू कडे जाण्याची काय गरज ???

 

खेड्यापाड्यात घरा जवळ एखादे वडाचे झाड मिळते पण शहरी भागात लवकर वडाचे झाड बघायला सुद्धा मिळत नाही, मग अश्यावेळी माझ्या शिकून अडाण्यासारखे वागणाऱ्या भगिनी कोसो दूर अणवानी पायाने सुत बांधायला जातात, मी असा हि ऐकलंय कि ह्या स्त्रियांनी मग दिवसभर उपाशी राहून रात्री उपवास सोडायचा असतो. अंधश्रधेचा पण कळस झाला... सांगा ना तुमच्या नवरोबाला एक दिवस हीच बायको सात जन्म मिळण्यासाठी उपवास करायला करेल का नवरोबा उपवास??


बघां प्रिय मैत्रिणीनो जगतगुरू तुकोबाराय आपल्या अभंगात पुनर्जन्माविषयी काय मांडतात....





पुनर्जन्म नाही - जगतगुरू तुकोबाराय !!

साखरेचा नव्हे ऊस |
आम्हा कैसा गर्भवास ||
बीज भाजुनी केली लाही |
जन्म मरण आम्हासी नाही ||
- संत तुकोबाराय.

 

अर्थ-
 


साखरेपासून पुन्हा ऊस तयार होत नाही... तर आमचा जन्म पुनर्जन्म कैसा ??? बिया भाजुनी लाही तयार होते... हि लाही आपण पेरू शकत नाही... तसेच एकदा मासून मेला की सर्व संपते... पुन्हां पुनर्जन्म नाही असे संतश्रेष्ठ तुकोबाराय आपल्या अभंगात सांगतात.


प्रिय मैत्रिणीनो...  परंतु आपल्याला पुढील जन्माचे आमिष दाखवून या जन्मातील दानाचे पुण्य पुढील जन्मात मिळेल असे सांगितले जाते... परंतु आजचे वास्तव जीवन आनंदाने आणि सुखीसंपन्न कसे जगावे असे सांगितले जात नाही... तुकोबाराय असे म्हणतात की  "जोडोनिया धन उत्तम व्यवहारे ,उदास विचारे वेच करी !" आणि ज्याच्या जवळ ज्ञान आहे ती जगातील सर्वात सुखी व्यक्ती असते. म्हणून पुढील जीवनातील अवास्तव स्वप्न रंगविण्यापेक्षा आजचे वास्तव जीवन निकोप व निर्भिडपणे जगून सृष्टीवर आनंदवन निर्माण करणे खूप महत्वाचे आहे... विचार करा...  निर्णय आपला.

 

गेल्या दोन दिवसांपासून आज आलेल्या अनन्यसाधारण महत्वामुळे 'वटवृक्षांच्या' फांद्याची जी कत्तल झालीये ते पाहून याचा अभिमान करावा..?? कि कीव...?? असा प्रश्न आम्हाला पडतोय. कधीकाळी कुठल्या सत्यवानाचे प्राण वडाच्या झाडावरून पडल्यामुळे यमाने नेले व सावित्रीने ते परत आणले अशी एक पुराणकथा (कि पुराणकाराच्या कल्पनाशक्तीच्या भरारीचे एक उदाहरण...??? ) आहे म्हणून आजही ती वेडी अशा बाळगून वडाच्या झाडाच्या फेऱ्या मारणे, आणि याच पतीची आणि पर्यायाने 'स्त्रीच्या जन्माची' जन्मोजन्माकरिता याचना करायची हि मानसिक गुलामगिरी निदान बहुजन स्त्रिया तरी कधी सोडणार...??

 


प्रिय मैत्रिणीनो... सत्यवानाच्या सावित्रीपेक्षा जोतीबाच्या सावित्रीनं सांगितलेल्या शिक्षणाचं, स्री स्वातंत्र्याचं आधुनिक विचारांचं व्रत स्विकारा. तुमच्या नवऱ्‍याचचं काय संपुर्ण कुटुंबाचचं कल्याण होईल.

 



आपल्या पतीच्या सत्यवादीपणामुळे त्या काळात त्यांना मिळत असलेल्या उपेक्षेमुळे आपल्या पतीच्या प्राणांची कुठेही भिक मागत न बसता ते सत्य पचवून, तत्कालीन रूढी-परंपरांना छेद देऊन आपल्या पतीच्या प्रेतासमोर 'मडके' घेऊन चालणारी आणि अंत्यसंस्कार करणारी बहुजन महानायिका 'सावित्री'माई फुले जोपर्यंत बहुजन स्त्री व पुरुषांची आदर्शस्थान होणार नाही तोवर असे भोळसट विश्वास ठेऊन अशा कित्येक वटवृक्षांच्या व पर्यायाने स्त्री अस्मितेच्या कत्तली होत राहतील यात वाद नाही.

म्हणून प्रिय मैत्रिणीनो... ताईनो... आयानो... मावश्यानो.... हे कर्मकांड आतां सोडा...  ही सर्व ब्राम्हणांनी आपले पोट भरण्यासाठी लावलेले थोतांड आहे... 



तुम्हा सर्वाना विनंती आहे जर खरी पुजा करायची असेलं तर प्रत्येकीने या दिवशी एक वडाचे झाड लावा... वडाच्या झाडांच्या फाद्या तोडू नका तुम्हा सर्वाना हात जोडून विनंती... तुम्ही जी पण पुजा कराल ती चिकित्सक बुद्धीने करा... बघां पटलं तर ??? अंधश्रधा सोडा !!
  


लेखं- शंकर घोरसे खापरखेडा, निलेश यशवंत ठेंगे , जयंत निकम(सोबत प्रबोधन टीम) , गौरव गायकवाड(सोबत प्रबोधन टीम) , निलेश रजनी भास्कर कळसकर(सोबत प्रबोधन टीम).


व्रत-वैकल्य कशासाठी ??

 व्रत-वैकल्य कशासाठी??

 आपल्या प्रबोधन परिवारातील अश्विनी साटव-डोके ताई यांचा दैनिक कृषीवल मध्ये वटसावित्री पौर्णिमेनिमित्त प्रकाशित झालेला "व्रत-वैकल्य कशासाठी??" या विषयावर एक सुंदर वैचारिक लेख. सर्वानी वाचवा... 

 

हा लेखं स्त्रियांनी आवर्जुन वाचवा !!!

धन्यवाद- अश्विनी ताई

संभाजी राज्यांविषयी फार कमी माहिती लोकांना असते, हे सर्वश्रुत आहे. या थोडं सत्य जाणून घेऊ या महान व्यक्तीमत्वाबद्दल…!!

@ नक्की वाचा… वाचावयास द्या… छत्रपती संभाजी राज्यांविषयी फार कमी माहिती लोकांना असते, हे सर्वश्रुत आहे. या थोडं सत्य जाणून घेऊ या महान व्यक्तीमत्वाबद्दल…!!



छत्रपती शिवाजी राजेंच्या गूढ मृत्युनंतर आता ‘स्वराज्याचा’ डोलारा सांभाळणार कोण..?? असा प्रश्न महाराष्ट्राला कधी पडलाच नाही..कारण अजूनही ६ फुट उंचीची एक अभेद्य भिंत स्वराज्याच्या रक्षणाकरिता उभी होती...’संभाजीराजे शिवाजीराजे भोसले’ नामक..!! इतिहासाच्या पुस्तकात कुठेतरी गुप्त झालेलं पण त्याकाळात धार्मिक व राजकीय दुश्मनांना कापरं भरवणार हे नाव..!! हा राजा कोण होतं..?? कसा होतं..?? काय खरेच त्याने धर्मासाठी बलिदान दिले होते..?? कि होतं पुन्हा एक कापती डाव..आणखी एका सुधारकला संपवण्याचा..?? काय झाले होते नक्की तेव्हा..?? या एक नजर मारू.


शंभूराजे खेळण्या-पळण्याच्या वयापासून जिजाऊ मांसाहेबांच्या कुशीत बसून राजकीय घडामोडींचे वास्तव चित्र पाहत होते.स्वराज्यासाठी प्राणपणाने लढणारे, शिवरायांवर प्रगाढ विश्वास असणारे मावळे, स्वराज्यावर प्राण अर्पण करणाऱ्या मावळ्यांच्या लढायांवर भेदक नजरेने बाळ राजे पाहत होते. युद्ध कुणासाठी?? कुणा विरुद्ध?? असे प्रश्न विचारून ते जिजाउंना भंडावून सोडत होते.


शिवरायांप्रमाणेच जिजाउंनी शंभूराजांना बौद्धिक शिक्षण दिले होते. त्याचबरोबर राजकीय, कला, संस्कृ, मराठा व इतर भाषांचे शिक्षण दिले. शंभूराजांचे संस्कृतवर विशेष प्रभुत्व होते. त्यांनी त्या अनुषंगाने लहान वयातच बुद्धभूषण, हिंदीमध्ये सातसतक, नायिकाभेद, नखशिख ई. ग्रंथ लिहिले होते. शम्भूराजेंच्या या बुद्धिचातुर्यामुळे आपल्यावर गदा येईल म्हणून मनुवाद्यांनी त्याकाळी त्यांना त्रास द्यावयास सुरुवात केली, कारण त्यांनी संस्कृतचा अभ्यास, वाचन आणि लेखनही केले होते, ज्याची परिणीती त्यांच्या खुनात झाली..होय खून..!! निर्दयी खूनच..!!


१ फेब्रुवारी १६८९ ला संभाजीराजांना रामदासिंच्या फितूरीपणाच्या माध्यमातून पकडण्यात आले. मुकारर्बखानाने संभाजी राजे व कवी कलशास घेऊन औरंगेजबापुढे उभे करण्यात आले तेव्हा औरंगजेबाने राजांना फक्त दोन प्रश्न विचारले-


१.तुमचे खजिने, जडजवाहीर आणि इतर संपत्ती कुठे आहे..??

२.बादशाही सरदारांपैकी तुमच्याशी कोण-कोण पत्रव्यवहार करून संबंध ठेवीत होते..??


या दोन्ही प्रश्नांची राजांनी उत्तरे दिली नाहीत. स्वतःचे प्राण धोक्यात असताना सुद्धा शत्रूला स्वराज्याचा खजिना न देणारे संभाजी राजे महान राष्ट्रपुरुष होते.

त्यानंतर १ फेब्रुवारी ते ११ मार्च पर्यंत राजांचा अमानुषपणे छळ करण्यात आला. प्रथम त्यांची जीभ, नंतर अनुक्रमे डोळे, कान व त्वचा सोलून काढणात आली आणि त्यातच या वीर पुरुषाचा ११ मार्च १६८९ रोजी अंत झाला. त्यांची हत्या व छळवणूक कोरेगाव, तुळापुर आणि वढू बुदृक याठिकाणी करण्यात आली. पण वरील जे प्रकार संभाजी राजेंना छळण्यासाठी केले गेले त्यात केवळ औरंग्जेबाचाच हात होता काय..?? चला याचे उत्तर शोधूयात.


कलियुगात केवळ ब्राह्मण आणि शुद्र हे दोनच वर्ण आहेत असे मनुवादी धर्मग्रंथ सांगतात, ज्यानुसार शिवरायांना भरदरबारात आणि अलीकडे राजर्षी शाहू महाराजांना शुद्र म्हणून हिणवले गेले, व त्यांच्या क्षत्रीयात्वावर सवाल उठवले गेले होते. तोच प्रकार संभाजी राजेंच्या खुनाच्या बाबतीत दिसून येतो.


ब्रह्मसुत्रावरील आपल्या भाष्यात शंकराचार्य म्हणतात-


“वेदांचा उच्चार केला असता शुद्राच्या जिभेचा छेद करावा आणि वेदाचे धारण केल्यास शरीर भग्न करावे.,”


संभाजी राजांचे संस्कृतवर जबरदस्त प्रभुत्व होते, त्यांनी सर्व संस्कृत ग्रंथ वाचले होते, एवढेच नव्हे तर त्यांनी ‘बुद्धभूषण’ हा संस्कृत ग्रंथही लिहिला होता, त्यामुळे त्यांना जीवे मारण्याचे अनेक वेळा प्रयत्न झाले होते. त्यांनी संस्कृत व पर्यायाने वेदांचे वाचन केले म्हणून त्यांची जीभ कापण्यात आली. संस्कृत श्रावण केले म्हणून त्यांच्या कानात गरम शिश्याचा रस ओतण्यात आला. संस्कृतचे लेखन केले म्हणून त्यांचे शरीर छिन्न-विछिन्न (भग्न) करण्यात आले, व हे सर्व प्रकार औरंगजेबाच्या हाताखाली असणार्या मनुवादी ब्राह्मणांनी घडवून आणले होते, ज्याचा संदर्भ सुचिता भार्गव नावाच्या भृगु वैदिकाने लिहिलेल्या मनुस्मृती मध्ये आढळतो.


संभाजीराजांच्या स्वराज्य निष्ठतेपुढे औरंगजेब हतबल झाला होता, पण ब्राह्मण इतिहासकारांनी धर्मासाठी संभाजीराजांनी बलिदान दिले म्हणून खोटेच लिहिले आहे. त्यांनी बलिदान दिले जे येथील भूमिपुत्रांच्या स्वराज्यासाठी, स्वराज्याला मदत करणाऱ्या शत्रुपक्षातील सरदारांची नावे स्वतःचा प्राण धोक्यात असूनही न सांगणारे माझे संभाजी राजे तत्वनिष्ठ आणि प्रेमळ अंत:करणाचे होते यात शंका नाही.


तेव्हा मित्रानो खरा इतिहास जाणून घ्या...लोकं काय म्हणतील याचा विचार करत बसने म्हणजे लांडग्याच्या पोटाची बकरीने काळजी घेण्यासारखे आहे..जागे व्हा..सत्यवादी बना..!!


जय जिजाऊ ! जय शिवराय !! जय संभाजीराजे !!!

संदर्भ पुस्तकं-  प्रतीइतिहास - चंद्रशेखर शिखरे सर.



लेखं-गौरव गायकवाड(सोबत प्रबोधन टीम)

'मर्द' महाराष्ट्रात महिला बनल्या असुरक्षित.... अत्याचारांच्या प्रकरणांत वर्षाच्या प्रारंभीच हजारांहून अधिक तक्रारी !!


'मर्द' महाराष्ट्रात महिला बनल्या असुरक्षित.... अत्याचारांच्या प्रकरणांत वर्षाच्या प्रारंभीच हजारांहून अधिक तक्रारी !!



गेल्या चार वर्षांच्या तुलनेत यंदा जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्यांतच महाराष्ट्राने महिला अत्याचारांच्या प्रकरणात "बाजी' मारली आहे. लैंगिक अत्याचार आणि विनयभंगाच्या हजारांहून अधिक तक्रारी अवघ्या दोन महिन्यांतच नोंदविल्या गेल्याने "मर्द' महाराष्ट्रातच महिला असुरक्षित असल्याची भावना बळावत चालली आहे. याशिवाय ज्या महिला बलात्काराच्या शिकार ठरल्या त्यांच्या मानसिक, आर्थिक पुनर्वसनाची जबाबदारी सरकारची असली तरीही सरकारकडून त्यांना पैदेखील न दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

भारतीय दंडविधान कलम 509 च्या अंतर्गत लैंगिक अत्याचाराच्या 2009 मध्ये 1099; तर 2010 मध्ये 1180, 2011 मध्ये 1071, 2012 मध्ये 2202 तक्रारींची नोंद करण्यात आली होती. या आकडेवारीशी तुलना करता यंदा जानेवारी व फेब्रुवारी या दोनच महिन्यांत हा आकडा 1006 वर पोहोचला आहे. त्यात अधिकाधिक भर पडत असल्याचे माहितीच्या अधिकारातून हाती मिळालेल्या माहितीत स्पष्ट झाले आहे; तर भारतीय दंडविधान कलम 354 अन्वये विनयभंगाच्या 2009 मध्ये 3196, 2010 मध्ये 3661, 2011 मध्ये 3794, 2012 मध्ये 3878 तक्रारी नोंदविल्या गेल्या असून, फेब्रुवारी 2013 मध्ये 1178 तक्रारींची नोंद झाली आहे. महिला अत्याचाराचे प्रमाण कमी व्हावे यासाठी महिला दक्षता समितीची नियुक्ती, पोलिसांविषयी सर्वसामान्यांना विश्‍वास निर्माण व्हावा याकरिता सातत्याने प्रयत्न सुरू असले तरीही ही आकडेवारी पाहता अधिक सक्षम प्रयत्नांची निकड असल्याचे जाणवते.

 

माहिती अधिकार कार्यकर्ते विहार दुर्वे यांनी मागविलेल्या या माहितीमध्ये बलात्कार झालेल्या महिलांच्या सामाजिक, आर्थिक पुनर्वसनासाठी कोणत्याही प्रकारची आर्थिक तरतूद न केल्याचे निराशाजनक वास्तव पुढे आले आहे. या लैंगिक अत्याचार, छेडखानी, बलात्कार अशा कोणत्याही प्रकारच्या अत्याचारामध्ये पीडितेस किती रक्कम मिळाली याची कोणतीही अधिकृत माहिती नसल्याचे गृह विभागाने माहिती देताना स्पष्ट केले आहे. पीडित महिलेच्या पुनर्वसनाची जबाबदारी घेऊन तिला आयुष्याची नवी सुरवात करता यावी यासाठी आर्थिक; तसेच मानसिक पाठबळ देण्याची नितांत आवश्‍यकता असते. ही रक्कम महिला बालकल्याण विभागाने केंद्र शासनाकडून संमत केलेल्या निधीतून द्यावी, असे निर्देश असले तरीही प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही. गरीब कुटुंबांतील मुली, तसेच महिलांना कायद्याच्या कक्षेत न्याय मिळाला तरीही प्रत्यक्ष जगण्याची लढाई मात्र त्यामुळे बिकट होते, हे कटू वास्तव आहे.


 


दहा वर्षांत राज्यात झालेले बलात्कार-

 

2000- 1310
2001- 1302
2002- 1352
2003- 1276
2004- 1392
2005- 1549
2006- 1506
2007- 1457
2008- 1567
2009- 1493

 

पीडित महिला संस्था, संघटना वा स्थानिक कार्यकर्त्यांच्या पाठबळावर तक्रार करते, कायद्याची लढाईही लढते. यात समाजाची साथ मिळतेच असे नाही. अनेकदा घर, राहता परिसर सोडून जाण्याची वेळ येते तेव्हा तिचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी घेतली जात नाही, ही निराशाजनक बाब आहे.
- ऍड. श्रद्धा जामखेडे

 

महिलांमधील पोलिसांबद्दलचा विश्‍वास वाढत असल्याने आता तक्रारींची नोंद केली जात आहे, असा युक्तिवाद पोलिस कायम करतात; पण गुन्हेगारांना पोलिसांविषयीचा दरारा वाटून अत्याचारांचे प्रमाण कमी का होत नाही, यावर विचार करण्याची गरज आहे.


लेखं - अंजली पवार (सदस्य, महिला कृती समिती)


संदर्भ- http://goo.gl/wUdVZ


धन्यवाद- सकाळ.





डॉ.आंबेडकर हे स्वाभीमानाचा एक जळता ज्वालामुखी होते - आचार्य अत्रे

डॉ.आंबेडकर हे स्वाभीमानाचा एक जळता ज्वालामुखी होते - आचार्य अत्रे



आंबेडकर म्हणजे बंड. मूर्तिमंत बंड. त्यांच्या देहांतील कणाकणातून बंड थैमान घालीत होते. आंबेडकर म्हणजे जुलमाविरुध्द उगारलेली वज्राची मूठ होय. आंबेडकर म्हणजे ढोंगाच्या डोक्यावर आदळण्यास सदैव सिध्द असलेली 'भीमा'ची गदा होय. आंबेडकर म्हणजे जातीभेदावर आणि विषमतेवर सदैव सोडलेले सुदर्शन चक्र होय. आंबेडकर  म्हणजे धर्ममार्तंडांच्या वर्णवर्चस्वाचा कोथळा फोडून त्याची आतडी बाहेर काढणारे वाघनख होय. आंबेडकर म्हणजे समाजातील वतनदार सत्ताधाऱ्यांच्या विरुध्द सदैव पुकारलेले एक युध्दच होय.





महात्मा फुले, कबीर आणि भगवान बुध्द हे तीन गुरुच मुळी आंबेडकरांनी असे केले की, ज्यांनी देवाचे, धर्माचे, जातीचे आणि भेदांचे थोतांड माजविणाऱ्या समाजव्यस्थेविरुध्द बंड पुकारले. पतित स्त्रियांच्या उध्दाराचा प्रयत्न करणाऱ्या महात्मा फुल्यांवर हिंदु समाजाने मारेकरी घातले, कबीराला हातपाय बांधून पाण्यात टाकण्यात आले. हत्तीच्या पायी देण्यात आले. आणि मग तो मेल्यानंतर हिंदु-मुसलमानांना त्याच्याबद्दल एवढे प्रेम वाटू लागले की, त्याच्या प्रेताचा ताबा घेण्यासाठी ते एकमेकांचा खून करावयास सिध्द झाले. बुध्दधर्माचा भारतामधून उच्छेद करण्यासाठी भगवान बुध्दाच्या अनुयायांच्या कत्तली करण्यात आल्या. हालअपेष्टा आणि छळ ह्याचे हलाहल ज्यांना हयातीत आणि मेल्यानंतरही प्राशन करावे लागले, अशा बंडखोर गुरुंचे आंबेडकर हे सच्चे चेले होते.


जुलूम आणि अन्याय म्हटला की आंबेडकरांच्या तळपायाची आग मस्तकाला जाई. धमन्या- धमन्यांमधून त्यांचे रक्त उसळया मारुं लागे. म्हणूनच 'लोकसभे' त काल पंडित नेहरु म्हणाल्याप्रमाणे, 'हिंदु समाजाच्या प्रत्येक जुलूमाविरुध्द पुकारलेल्या बंडाचे ते प्रतीक बनले.' हिंदु समाजाने आणि सत्ताधारी काँग्रेसने आंबेडकरांची जेवढी निंदा केली, जेवढा छळ केला, जेवढा अपमान केला, तेवढा कोणाचाही केला नसेल. पण ह्या छळाची आणि विटंबनेची त्यांनी लवमात्र पर्वा केली नाही. धर्माच्या आणि सत्तेच्या जुलमाला ते कधीही शरण गेले नाहीत. शरणागती हा शब्दच मुळी आंबेडकरांच्या शब्दकोशांत नव्हता. मोडेन, मार खाईन, मरेन पण वाकणार नाही, अशी त्यांची जिद्द होती. आणि ती शेवटपर्यंत खरी करुन दाखविली. जो तुमचा धर्म मला कुत्र्यामांजरापेक्षाही हीन रीतीने वागवतो, त्या धर्मात मी कधीही रहाणार नाही, असे कोटयवधी हिंदुधर्मियांना कित्येक वर्षापासून ते बजावत होते.माणसासारख्या माणसांना 'अस्पृश्य' मानणारी ती तुमची 'मनुस्मृति'मी जाळून टाकणार, असे त्यांनी सनातनी हिंदूना छातीवर हात मारुन सांगितले होते.
 


यामुळे हिंदुधर्मीय लोक त्यांच्यावर फारच संतापले. त्यांना वाटले की, आंबेडकर हे गझनीच्या महंमदापेक्षांहि हिंदू धर्माचे भयंकर दुश्मन आहेत. धर्मातराची घोषणा केल्यानंतर आंबेडकरांचा खून करण्याची योजना घेऊन एक हिंदू पुढारी डॉ. कुर्तकोटी यांच्याकडे गेले होते. तेव्हा डॉ. कुर्तकोटींनी त्यांना सांगितले की आंबेडकरांना तुम्ही मारलेत तर त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबामधून दहा आंबेडकर बाहेर पडतील ! आंबेडकरांची धर्मातराची घोषणा ही हिंदुधर्माच्या नाशाची घोषणा नव्हती. ते हिंदुधर्माच्या सुधारणेचे आव्हान होते. चातुर्वण्याने हिंदुधर्माचा आणि हिंदुस्थानाचा नाश झाला आहे असे डॉ. आंबेडकरांचे मत होते. म्हणून चातुर्वण्याची चौकट मोडून हिंदू समाजाची रचना समतेच्या आणि लोकशाहीच्या पायावर करा असे टाहो फोडून ते सांगत होते.



धर्मांतराच्या प्रश्नावर आमच्याशी बोलताना एकदा ते म्हणाले की, ''हिंदुधर्मावर मला सूड घ्यायचा असता तर पाच वर्षांच्या आत मी या देशाचे वाटोळे करुन टाकले असते. पण या देशाच्या इतिहासात विध्वंसक म्हणून माझे नाव नोंदले जावे अशी माझी इच्छा नाही !'' हिंदुधर्मांप्रमाणेच महात्मा गांधी आणि काँग्रेस यांच्यावर आंबेडकर हे नेहमी प्रखर टीका करीत त्यामुळे जनाब जींनाप्रमाणेच साम्राज्यवाद्यांशी संगनमत करुन हिंदी स्वातंत्र्यांचामार्ग ते रोखून धरीत आहेत अशीच पुष्कळ राष्ट्रवादी लोकांची समजूत झाली. अस्पृश्यतानिवारणाकडे बघण्याचा काँग्रेसचा दृष्टिकोन हा निव्वळ भुतदयावादी आणि भावनाप्रधान होता. आंबेडकर त्या प्रश्नाकडे केवळ न्यायाच्या आणि हक्काच्या दृष्टीने पहात असत. पारतंत्र्य नष्ट करण्यासाठी ब्रिटिशांविरुध्द गांधीजींनी असे बंड पुकारले, तसे अस्पृश्यता नेस्तनाबूद करण्यासाठी त्यांनी स्पृश्य समाजाविरुध्द का बंड पुकारु नये, असा आंबेडवरांचा त्यांना सवाल होता.
 

 अस्पृश्यतानिवारणा बाबत: गांधीजी आणि आंबेडकर ह्यांच्यात अशा तऱ्हेने मतभेद होते. म्हणून साम्राज्याशाहीविरोधी पातळीवर क्रांग्रेसची आणि आंबेडकरांची एकजूट होऊ शकली नाही. तथापि, गांधीजीबद्दल मनांत विरोधाची एवढी भावना असताना केवळ त्यांचे प्राण वाचविण्यासाठी म्हणून अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची आपली मागणी त्यांनी मागे घेतली. आणि पुणे 'करारा' वर सही केली. गोडशासारख्या एका ब्राम्हणाने गांधीजींचा प्राण घ्यावा आणि आंबेडकरांसारख्या एका महाराने गांधीजींचा प्राण वाचवावा ह्याचा अर्थ हिंदूसमाजाला अगदी उमजू नये ह्यांचे आम्हास दु:ख होते. 'पुणे करारा'वर आंबेडकरांनी सही करून गांधीजींचे प्राण वाचवीले, पण स्वत:चे व अस्पृश्य समाजाचे फार मोठे नुकसान करून घेंतले. कारण ज्या उमद्या दिलाने आणि खेळाडू भावनेने आंबडकरांनी 'पुणे करारा' वर सही केली तो उमदेपणा आणि तो खेळाडूपणा कांग्रसने मात्र आंबेडकरांशी दाखवला नाही.आपल्याला कनिष्ठ असलेल्या महारेतर अस्पृश्याना हाती धरून कांग्रेसने आंबेडकरांचा आणि त्यांच्या अनुयायांचा सावर्त्रिक निवडणूकींत पराभव केला आणि देशाच्या राजनैतिक जीवनातून त्यांना उठवून लावले.
 



आंबेडकर त्याबद्दल नेहमी विशादाने म्हणत कि, ''स्पृश्य हिंदूच्या बहुमताच्या आधारावर माझे आणि माझ्या पक्षाचे राजकिय जीवन गांधीजी आणि कांग्रेस ह्यांनी ह्या देशामधून नेस्तनाबूत करून टाकले!'' नऊ कोटी मुसलमानांना खुष करण्यासाठी काग्रेसने ह्या सुवर्ण भूमीचे तीन तुकडे करून टाकले. पण सहा कोटी अस्पृश्यांचे प्रेम मिळवण्यासाठी कागदी कायदे करण्यापलिकडे काँग्रेसने काहीही केले नाही असे असता देशाला स्वातंत्र्य मिळताच घटना समितीत अखंड हिंदूस्थानची आणि जातीय ऐक्याची प्रचंड गर्जना करून आंबेडकरानी आपल्या विरोधकांना चकित करून टाकले. आंबेडकर म्हणाले, 'जगातील कोणतीही सत्ता या देशातील ऐक्याचा भंग करू शकणार नाही. आणि अखंड हिंदुस्थानातच आपले कल्याण आहे असे आज ना उद्यां मुसलमानांना कळून आल्या वाचुन राहणार नाही!' आंबेडकरांचे हे उद्गार हा त्यांच्या दैदिप्यमान देशभक्तीचा ज्वलंत पुरावा होय. काँग्रेसशी पूर्वीचे असलेले सर्व वैर विसरुन आंबेडकरांनी सहकार्यासाठी नेहरुंच्या हातात हात दिला. आणि 'स्वातंत्र भारता'ची घटना तयार करण्याची सर्व जबाबदारी त्यांनी पत्करली. 'मनुस्मृति जाळा म्हणू सांगणारे आंबेडकर भारतीय स्वातंत्र्याचे पहिले स्मृतिकार व्हावेत हा काय योगायोग आहे!'  घटना मंजूर झाल्यानंतर त्यांनी हिंदूकोड तयार करण्याचे महान कार्य हाती घेतले. पण काँग्रेसमधल्या सर्व प्रतिगामी आणि सनातनी शक्ति आंबेडकरांना विरोध करण्यासाठी एकदम उफाळून बाहेर आल्या; आणि त्यामुळे आपल्या जागेचा राजीनामा देऊन मंत्रिमंडळामधूनबाहेर पडल्यावांचून आंबेडकरांना गत्यंतरच उरले नाही.

  


आंबेडकरांचे 'हिंदू कोड बिल' जर मान्य झाले असते, तर हिंदु समाजातील सर्व भेद, अन्याय आणि विषमता नष्ट होऊन हिंदु समाज हा अत्यंत तेजस्वी आणि बलशाली झाला असता. आणि भारताच्या पाच हजार वर्षांच्या इतिहासात जी क्रांती आजपर्यंत कुणी घडवून आणली नाही ती घडून आली असती. पण दुदैव भारताचे! दुर्भांग्य हिंदुसमाजाचे! देवासारखा आंबेडकरांनी पुढे केलेला हात त्यांनी झिडकारला आणि स्वतःचा घात करुन घेतला. राजकर्त्यांनी बहिष्कारले, हिंदु समाजाने लाथाडले, तेव्हा अखेर स्वतःचा आणि आपल्या सात कोटी असहाय नि हीनदीन अनुयायांचा उध्दार करण्यासाठी त्यांना मानवजातीला संमतेचा, दयेचा आणि शांतीचा संदेश देणाऱ्या त्या परम कारुणिक भगवान बुध्दाला शरण जाण्यांवाचून गत्यंतर उरले नाही.

  
 

डॉ. आंबेडकरांच्या विद्वतेबद्दल तर त्यांच्या शत्रूला देखील कधी संशय वाटला नाही. त्यांच्याएवढा प्रचंड बुध्दिचा, विद्वत्तेचा आणि व्यासंगाचा एकही माणूस महाराष्ट्रांत नव्हे, भारतात याक्षणी नव्हता. रानडे, भांडारकर, तेलंग  यांच्या ज्ञानोपासनेची महान परंपरा पुढे चालविणारा महर्षि आज आंबेडकरांवांचून भारतात दुसरा कोण होता? वाचन, चिंतन आणि लेखन ह्यांवाचून आंबेडकरांना दुसरे जीवनच नव्हते. महार जातीत जन्माला आलेला हा माणूस विद्येच्या आणि ज्ञानाच्या बळावर एकाद्या प्राचीन ऋषीपेक्षांही श्रेष्ठपदाला जाऊन पोहोचला होता. धर्मशास्त्रापासून ती घटना शाखा पर्यंत असा कोणताही एक कठीण विषय नव्हता की ज्यामध्ये त्यांची बुध्दि एकाद्या गरुडासारखी वाटेल त्या उंचीपर्यंत बिहार करु शकत नव्हती. तथापि, आंबेडकरांची धर्मांवर अंत्यतिक निष्ठा होती ही गोष्ट फार थोडया लोकांना माहित होती. आंबेडकर कितीही तर्ककर्कश आणि बुध्दिवादी असले तरी त्यांचा पिंड हा धर्मनिष्ठाचा होता. भाविक आणि श्रध्दाळू पित्याच्या पोटी जन्म झाला होता.

   


 

शूचिर्भूत धार्मिक वातावरणांत त्यांचे सारे बालपण गेले होते. सर्व धर्माचा त्यांनी तौलनिक अभ्यास केला होता. आत्म्याच्या उन्नतीसाठी धर्माची आवश्यकता आहे असे त्यांचे ठाम मत होते.धर्मावरील त्याच्या श्रद्वेमुळेच त्यांचे नैतिक चारित्र्य निरपवाद राहिलें. कोणतेच आणि कोणतेही त्यांना व्यसन नव्हते. त्यामुळेच त्यांच्या अंगात विलक्षण निर्भयता आणि आत्मविश्वास निर्माण झाला होता. आपण जे बोलतो किंवा लिहितो ते खोटे आहे असे म्हणण्याची प्रत्यक्ष परमेश्वराची प्रज्ञा नाही, असा आवेश आणि आत्मबल त्यांच्या व्यक्तिमत्वांत सदैव संचारले असे आध्यात्मिक चिंतनाने शेवटी आंबेडकर भगवान बुध्दाच्या चरणापाशी येऊन पोहोचले होते. बुध्दाला शरण गेल्यावाचून केवळ अस्पृश्यच नव्हेत, तर साऱ्या भारताला तरणोपाय नाही, असा आंबेडकरांचा ठाम निश्चय झाला होता. म्हणूनच चौदा ऑक्टोबरला नागपूर येथे तीन लाख अस्पृश्यांना त्यांनी बुध्द धर्माची दीक्षा दिली, तेव्हा 'साऱ्या भारताला मी बौध्द करीन!' अशी गगनभेदी सिंह गर्जना केली. पुढील आठवडयात मुंबईमधल्या दहा लाख अस्पृश्यांना ते बुध्दधर्माची दीक्षा देणार होते. पण अदृष्टात काही तरी निराळेच होते. अन्यायाशी आणि जुलमाशी सबंध जन्मभर झगडून त्यांचे शरीर जर्जर झाले होते. दुर्लब झाले होते. विश्रांर्तींसाठी त्यांच्या शरीरातला कण न् कण आसूरला होता. भगवान करूनेचा जेव्हा त्यांना अखेर आराम मिळाला, तेव्हा त्यांच्या अंतकरणात जळणारा वन्हि शीत झाल्या. आपल्या कोट्यवधि अनुयायांना अतां आपण उद्वाराचा मार्ग दाखवून ठेवला आहे, आता आपले अवतार कार्य संपले, अशी त्यांना जाणीव झाली. आणि निद्रामाऊलीच्या मांडीवर डोके ठेवून अत्यंत शांत आणि तृप्त मनानें त्यांनी आपली प्राणज्योति निर्वाणात कधी विलीन करून टाकली, त्यांच्या जगाला दुसरे दिवशी सकाळी ते जागे होईपर्यत गंधवार्तासुध्दालागली नाही.'मी हिंदु धर्मात जन्माला आलो, त्याला माझा नाईलाज होता,पण ही हिंदुधर्मात कदापि मरणार नाही!' ही आंबेडकरांची घोषणा हिंदुधर्माविरूध्द रागाची नव्हती. सूडाची नव्हती. झगडा करून असहाय्य झालेल्या विनम्र आणि श्रध्दाळू साधकाचे ते तळमळीचे उद्गार होते.

  
 

आंबेडकरांचे चरित्र ही एक शूर आणि बंडखोर समाजसुधारकथा वीरकथा आहे, शोककथा आहे. गरीबांनी, दिनांनी आणि दलितांनी ही रोमहर्षक कथा वाचून स्फूर्ति घ्यावी आणि आंबेडकरांचा त्यांनी जन्मभर छळ केला आणि उपहास केला त्या प्रतिगामी राज्यकर्त्यानी आणि सनातनी हिंदूनी त्यांची ही शोककथा वाचून आता पश्चातापाने अवनतमस्तक व्हावे. आंबेडकरांच्या जीवनावर आणि कार्यावर जसा जसा अधिक प्रकाश पडेल तसे तसे त्यांचे अलौकिकत्व प्रकट होईल आणि मग आंबेडकर हे हिंदू समाजाचे शत्रु नसून उद्वारकर्तेच होते अशी भारताची खात्री पटेल. भारतातील जें जें म्हणून काही उज्ज्वल आणि उदात्त आहे त्यांचे आंबेडकर हे एक ज्वलंत भांडार होते. आंबेडकर हा स्वाभीमानाचा एक जळता ज्वालामुखी होता. भारताच्या ऐक्याचे आणि महाराष्ट्राच्याअस्मितेचे ते महान् प्रणेते होते.

  



महाराष्ट्र आणि मुंबई ह्यांचे नाते जे देवाने जोडले आहे. हे कोंणाच्या बापालाही तोडता येणार नाही असे ते म्हणत. बाबाचे कोण कोणते गुण आता आठवायचे आणि कोणकोणत्या उद्गारांचे स्मरण करायचे? सात कोटि अस्पश्यांच्या डोक्यावरचे जणू आभाळच कोसळले आहे!  भगवान बुध्दाखेरीज त्यांचे समाधान कोण करू शकणार? आणि त्यांच्या डोळयातले अश्रू तरी कोण पुसणार? त्यांनी ध्यानात धरावें की, भारताच्या इतिहासात आंबेडकर नि त्यांचे कार्य अमर आहे! त्यांनी जो मार्ग आखला आणि तो प्रकाश दाखविला त्याच्याच अनुरोधानं जाऊन त्यांच्या कोटयावधी अनुयायानी आपला उध्दार करून घ्यावा! आंबेडकरांच्या प्रत्येक अनुयायांचे हृदय हे त्यांचे जीवंत स्मारक आहे. म्हणून आंबेडकरांची विद्वता त्यांचा त्याग, चारित्र्य आणि त्यांची निर्भयता प्रत्येकाने आपापल्या जीवनांत निर्माण करण्याचा जर आटोकाट प्रयत्न केला तरच आंबेडकरांचे अपूर्ण राहीलेले कार्य पूर्ण होईल आणि साऱ्या भारताचा उध्दार होईल. तीन कोटि मराठी जनतेच्या वतीनं व्याकूळ हृदयाने आणि अश्रपूर्ण नेत्रानीं आम्ही आंबेडकरांच्या पार्थिव देहाला अखेरचे अभिवादन करतो


लेखं  - आचार्य अत्रे.

"लोकशाहीर अण्णाभाऊ साठे" यांचा एक दुर्मिळ फोटो !!

"लोकशाहीर अण्णाभाऊ साठे" यांचा एक दुर्मिळ फोटो !!






आपल्या कार्यक्रमाची सुरवात शिवरायांच्या नावाने सुरवात करणारे आपले अण्णाभाऊ.... शिवचरित्र जगभर पोहचवुन आपले सर्वस्व उपेक्षितांसाठी अर्पिनारे मराठी साहित्याचे सर्वोच्च मानबिँदु "लोकशाहीर अण्णाभाऊ साठे" यांचा एक दुर्मिळ फोटो... रशिया वरुन परत आल्यावर लोकशाहीर आण्णाभाऊ साठे याँचे airport च्या बाहेर स्वागत करण्यात आले, तो क्षण !!








जोतीरावांच्या मृत्यूची हकीगत !!

जोतीरावांच्या मृत्यूची हकीगत !!


 




जोतीरावांच्या मृत्यूची हकीगत हि काहींच्या आठवणींमध्ये आलेली आहे. शेवटची तीनएक वर्षे जोतीरावांना लकवा झाल्यानं उजवा हात चालत नव्हता. तरी डाव्या हातानं त्यांनी ' सार्वजनिक सत्यधर्म ' हे पुस्तक लिहिलं. शेवटी ते पडूनच असत. त्यांनी अन्न कमी केलं. मृत्युच्या तीन दिवस आधी मुंबई व इतरत्रच्या सहकाऱ्यांना बोलावून घेतल. पुण्यातले लोकही बोलावले. ' आता माझ्या निरोपाची वेळ आली आहे. माझ्यानंतर सत्यशोधक समाज चालवा… ' या अर्थाचं बोलले. पण ते जातील असं कुणालाच वाटलं नव्हतं. सगळे पांगले. तोच ओतूरचे भाऊ कोंडाजी व इतर कार्यकर्ते आले. त्याचं समवेत बोलले. त्यांना जेवायला बसवलं. स्वतः न जेवता शांत झोपले. रात्री दोन वाजून वीस मिनिटांनी जोतीरावांनी एक मोठा श्वास सोडला. आणि सगळं संपलं.


या महापुरुषांच्या बाबतीत सगळचं वेगळ घडत गेलं. त्यांच्याशी न पटणारे, आयुष्यभर भांडणारे, बहिष्कार टाकणारे भाऊबंद पुढं आले आणि हे शरीर उचलायचा अधिकार फक्त आमचा आहे, कोणी हात लावायचा नाही असं म्हणू लागले. पोलिस आणून त्यांना बाजूला केलं. जोतीरावांच्या अंत्ययात्रेत पुढं गाडगं धरून चालल्या सावित्रीबाई !



एवढा युगप्रवर्तक विचारवंत, समाजसुधारक गेला, तरी पुण्याच्या ' केसरी ' व 'सुधारक ' या प्रसिद्ध वर्तमानपत्रांमध्ये दोन ओळींची बातमीही आली नाही. नंतर काही ठिकाणी स्फुटं आली, तीही हात राखून., ख्रिस्ती न झालेल्या फुल्यांवर रागावलेल्या एका ख्रिस्ती नियतकालिकात ' हे चांगले गृहस्थ होते, पण वाट चुकलेले होते, ' या अर्थाचं चापून आले. जे काल्प्रवत आज टिकलेत, त्यांची समकालीनांकडून हि उपेक्षा ! का असेल ? ते स्वातंत्र्यचळवळीपासून फटकून राहिले म्हणून ? जोतीरावांचा सवाल होता की,' ब्रिटीश सत्ता गेल्यावर परत पेशवाईतल्यासारख आमच्या गळ्यात मडकं अडकवणार नाही कशावरून ? ' तो रास्त नव्हता का ? आणि 'सुधारक'नही या उपेक्षित सामील व्हावं ?



आज फुल्यांना जाऊन शंभराहून अधिक वर्षं होऊन गेली. त्यांनी शेतकऱ्यांचे, स्त्रियांचे, जातीभेदाचे प्रश्न उठवले. ते आजही वेगळ्या स्वरुपात आहेतच. त्यासाठी त्या प्रश्नांवर फुल्यांची भूमिका समजूनच पुढं जावं लागतं. जोतीरावांची समकालीनांनी उपेक्षा केली, आणि शिष्यांनी त्याला स्वार्थी राजकारणच स्वरूप दिलं, तरी फुल्यांनी महाराष्ट्राला हे दिलं ते मी विसरू शकत नाही. खेड्यापाड्यांतल्या बहुजन समाजाला त्यांनी गदागदा हलवलं. त्याची चुणूक जिथं ती चुणूक रुजली तिथं आजही पाहायला मिळते.



मला जुन्नर भागातल्या आदिवासी खेड्यांमध्ये चळवळ बघायला मिळाली. महादेव कोळी जमातीची वस्ती होती. आम्ही गेलो त्या घरी जख्ख म्हातारी चक्क पेपर वाचत बसली होती. मी विचारलं " तुम्हाला वाचायला कुणी शिकवलं ? " ती म्हणाली, " माझा आज सत्यशोधक होता, त्याला मुलींना शिकवायची फार हौस." पण घरातील सून मात्र निरक्षर होती.



दुसरं दृश्यं, त्याच भागातलं, साखरपुडा होणार होता. मुलगा मुंबईचा. त्यानं ताटं, भांडी, साड्या, सफरचंद असं काय काय मांडून ठेवलेलं. एक म्हातारा उठला आणि त्यांना म्हणाला, "उचला सगळी घाण. तुम्ही एक दिवस याल आणि पद्धत पाडून जाल. नंतर गरिबाला कठीण होऊन बसंल. आपली पद्धत सव्वा रुपया, नारळाची. तेवढं दया आणि चालू पडा. लग्नानंतर मुलीला सोन्यानं मढवा हवं तर ! " त्या म्हाताऱ्यानं ते सगळं उचलायला लावलं.



जोतीरावांची धडपड, ध्यास कुठंतरी पोहोचलेला होता आणि तो शिल्लक होता, हे पाहून खूप बरं वाटलं...



- डॉ. अनिल अवचट ( शिकविले ज्यांनी या पुस्तकातून )

तयास मानव का म्हणावे??- सवित्रीआई ज्योतिबा फुले.

तयास मानव का म्हणावे ??- सवित्रीआई ज्योतिबा फुले.



ज्ञान नाही विद्या नाही
ते घेणेची गोडी नाही
बुध्दी असुनि चालत नाही
तयास मानव का म्हणावे ?||१||

दे हरी पलंगी काही
पशुही ऐसे बोलत नाही
विचार ना आचार नाही
तयास मानव का म्हणावे ? ||२||

बाईल काम करीत राही
ऐतोबा हा खात राही
पशू पक्षात ऐसे नाही
तयास मानव का म्हणावे ? ||३||

दुसर्‍यास मदत नाही
सेवा त्याग दया माया ही
जयापाशी सदगुण नाही
तयास मानव का म्हणावे ? ||४||

 पशुपक्षी माकड माणुसही
जन्ममृत्यु सर्वानाही
याचे ज्ञान जराही नाही
तयास मानव का म्हणावे ?||५ ||


कवियत्री- सवित्रीआई ज्योतिबा फुले.

राष्ट्रपिता क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले यांनी रचलेला छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा !!

छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा




कुळवाडी - भुषण पवाडा गातो भोसल्याचा |
छत्रपती शिवाजीचा ||
लंगोट्यास देई जानवी पोषींदा कूणब्यांचा |
काळ तो असे यवनांचा ||
शिवाजीचा पिता शाहाजी पुत्र मालोजीचा |
असे तो डौल जाहागिरीचा ||
पंधराशे एकूणपन्नास साल फळले |
जुन्नर तें उदयास आले ||
शिवनेरी किल्ल्यामध्ये बाळ शिवाजी जन्मले |
जिजाबाईस रत्न सापडले ||
हातापायांची नख़े बोट शुभ्र प्याजी रंगीले |
ज्यांनी कमळा लाजविले ||
वर ख़ाली टिर्‍या पोटर्‍या गांठी गोळे बांधले |
स्पटिकापरी भासले ||
सानकटी सिंहापरी छाती मांस दुनावले |
नांव शिवाजी शोभले ||
राजहौंसी उंच मान माघे मांदे दोंदीले |
जसा का फणीवर डोले ||
एकसारखे शुभ्र दांत चमकू लागले |
मोती लडी गुंतविले ||
रक्‍तवर्ण नाजूक होटी हासू छपविले |
म्हणोन बोबडे बोल ||
सरळ नीट नाक विशाळ डोळ्यां शोभले |
विषादें म्रुग वनी गेले ||
नेत्र तिखे बाणी भवया कामठे ताणिले |
ज्यांनी चंद्रा हाटविले ||
सुंदर विशाळ भाळवटी जावळ लोंबले |
कुरळे केस मोघीले ||
आजानबाहू पायांपेक्षा हात लांबलेले |
चिन्ह गादिचे दिसले ||
जडावाची कडी तोडे सर्व अलंकार केले |
धाकट्या बाळा लेविवले ||
किनखांबी ठंकोचे मोती घोसाने जडले |
कलाबतुचे गोंडे शोभले ||
लहान कुंची पैरण बिरडी बंद लावले |
डाग लाळीचे पडलेले ||
हातापायांचे आंगठे चोखी मुखामधी रोळे |
पायी घुंगरू खुळखुळे ||
मारी लागोपाठ लाथाबुक्या आकाश शोभले |
ख़ेळण्यावर डोळे फिरविले ||
मजवर हा कसा ख़ेळणा नाही आवडले |
चिन्ह पाळणी दिसले ||
टाहीपेटे रडूं लागला सर्व घाबरले |
पाळण्या हालवू लागले ||
धन्य जिजाबाई जिने जो जो जो जो जो केले |
गातों गीत तिने केले ||
||चाल ||
जो जो जो जो जो जो गाऊं, जी जी जी जी जी जी गाऊं |
चला वेरूळांस जाऊ, दौलताबादा पाहू ||
मूळ बाबाजींस ध्याऊ, किर्ती आनंदाने गाऊ |
सरदारांत उमराऊ, सोबतीस जाधराऊ ||
पाटिल होते गांवोगाऊ, पुत्रावरी अती जीऊ |
थोर विठाजी नाव घेऊ, सान मालोजी त्याचा भाऊ |
दिपाबाई त्यास देऊ, छंदाजोगा गिती गाऊं ||
|| चाल ||
मालोजी राजा | तुझा बा आजा ||
यवनी काजा | पाळिल्या फौजा ||
लाविल्या ध्वजा | मारिल्या मौजा ||
वेळेस मुक्का | साधल्या बुक्का ||
विचारी पक्का | जाधवा धक्का ||
शेशाप्पा नायका | ठेविचा पैका ||
द्रव्याची गर्दी | चांभारगोंदी ||
देवळे बांधी | तळी ती खांदी ||
आगळी बुध्दी | गुणाने निधि ||
लिहीले विधि | लोकांस बोधी ||
संधान साधी | जसा पारधी ||
भविषी भला | कळले त्याला ||
सांगोनी गेला | गादी बा तुला ||
उपाय नाही जाणोन चाकर झाला यवनाचा |
शिपाई होता बाणीचा ||
खोट्या दैवा कोण खोडी बेत देवाजीचा |
पवाडा गातो शिवाजीचा ||
कुळवाडी - भुषण पवाडा गातो भोसल्याचा |
छत्रपती शिवाजीचा || १||

वडील बंधु संभाजीने लळे पुरविले |
धाकट्यासवे ख़ेळले ||
उभयतांचे एकचित तालमीत गेले |
फरीगदग्या शिकले ||
आवडीने खमठोकी कुस्ती पेचाने खेळे |
पवित्र दस्तिचे केले ||
द्वादशवर्षी उमर आली नाही मन धाले |
घोडी फिरवू लागले ||
अट्टल घोडेस्वार भाला बोथाटी शिकले |
गोळी निशाण साधले ||
कन्या वीर जाधवाची जिने भारथ लावले |
पुत्रा नीट ऐकविले ||
अल्पवयांचे असता शिकार करू लागले |
माते कौतुक वाटले ||
नित्य पतीचा आठव डोंगर दुखाःचे झाले |
घर सक्‍तिने घेतले |
छाती कोट करून सर्व होते साठविले|
मुखमुद्रेने फसविले ||
चतुर शिवाजीने आईचे दुःख ताडिले |
पित्यास मनी त्यागिले ||
पुत्राचे डोळे फिरले माते भय पडले |
हीत उपदेशा योजिले ||
मनी पतिभक्‍ती पुता बागेमधी नेले |
वृक्षाछायी बसविले ||
पुर्वजांचे स्मरण करून त्यास न्याहाळिले |
नेत्री पाणी टपटपले ||
या क्षेत्राचे धनी कोण कोणी बुडविले |
सांगते मुळी कसे झाले ||
क्षेत्रवासी म्हणोन नाव क्षत्रिय धरले |
क्षेत्री सुखी राहीले ||
अन्य देशिंचे दंगेखोर हिमालयी आले |
होते लपुन राहीले ||
पाठी शत्रुभौती झाडी किती उपासी मेले |
गोमांसा भाजून धाले ||
पाला फळे खात आखेर ताडपत्रा नेसले |
झाडी उल्लघून आले ||
लेखणीचा धड शीपाया सेनापती केले |
मुख्य ब्रम्हा नेमले ||
बेफाम क्षेत्रिय होते अचूक टोळ उतरले |
कैदी सर्वास केले ||
सर्व देशी चाल त्याचे गुलाम बनविले |
डौलाने क्षुद्र म्हणाले ||
मुख्य राजा झाला ज्याने कायदे केले |
त्याचे पुढे भेद केले ||
ब्रम्हा मेल्यावर परशराम पुंड माजले |
उरल्या क्षत्रिया पिडीले ||
माहारमांग झाले किती देशोधडी केले |
ब्राम्हण चिरंजीव झाले ||
देश निक्षत्रीय झाल्यामुळे यवना फावले |
सर्वास त्याही पिडीले ||
शुद्र म्हणती तुम्हा ह्रुदयी बाण टोचले |
आज बोधाया फावले ||
गाणे गाते ऐक बाळा तुझ्या आजोळी शिकले |
बोली नही मन धाले ||
||चाल ||
क्षेत्र क्षत्रियांचे घर,तुझे पित्रु महावीर |
सुखा नसे त्यांच्या पार, आल्यागेल्याचे माहेर||
शीखराकार डोंगर, नानावल्ली तरूवर ||
दरी खोरी वाहे नीर खळखळे निरंतर |
झाडा फुले झाला भार, सुगंधी वाहे लहर |
पक्षी गाती सोळा स्वर, मंजूळ वाणी मनोहर ||
नदी नाले सरोवर, शोभे कमळांचा भार |
भूमी अती काळसर, क्षेत्र देई पीक फार ||
धाव घेती दंगेखोर, दिला क्षेत्रियांस मार |
दास केले निरंतर, ब्रम्हा झाला मनी गार ||
लोभी मेले येथे फार, विधवा झाल्या घरोघर |
उपाय नाही लाचार, स्त्रिया बंदी पाटावर ||
दुसरा झाला शिरजोर, परशा तोबा कठोर ||
मार त्याचा अनिवार, केला क्षत्रिया संव्हार ||
क्षत्रिय केले जरजर, भये कांपे थरथर |
दुःखा नाही त्यांच्या पार, ठाव नाही निराधार ||
बहू केले देशापार, बाकी राही मांगमाहार |
निक्षेत्री झाल्यावर, म्लेच्छे केले डोके वर ||
आले सिंधू नदीवर, स्वार्‍या केल्या वारोंवार |
गाते काटांवात सार, लक्ष देई अर्थावर ||
||चाल ||
काबुला सोडी | नदांत उडी ||
ठेवितो दाढी | हिंदूस पिडी ||
बामना बोडी | इंद्रिये तोडी ||
पीडिस फोडी | देऊळे पाडी ||
चित्रास तोडी | लेण्यास छेडी ||
गौमांसी गोडी | डुकरांसोडी ||
खंड्यास ताडी || जेजुरी गडी ||
भुंग्यास सोडी | खोडीस मोडी ||
मुर्तीस काढी | काबूला धाडी||
झादीस तोडी | लुटली खेडी ||
गडांस वेढी | लावली शिडी ||
हिंदूस झोडी | धर्मास खोडी ||
राज्यास बेडी | कातडी काढी ||
गर्दना मोडी | कैलासा धाडी ||
देऊळे फोडी | बांधीतो माडी ||
उडवी घोडी | कपाळा आढी ||
मीजास बडी | ताजीम खडी ||
बुरखा सोडी || पत्नीस पीडी ||
गायनी गोडी || थैलिते सोडी ||
माताबोध मनी ठसतां राग आला यवनांचा |
बेत मग केला लढण्याचा ||
तान्हाजी मालुसरे बाजी पासलकराचा |
स्नेह यशाजी कंकाचा ||
मित्रा आधी ठेवी जमाव केला मावळ्याचा |
पूर करी हत्यारांचा ||
मोठ्या युक्‍तीने सर केला किल्ला तोरण्याचा |
रोविला झेंडा हिदूंचा ||
राजगड नवा बांधिला उंच डोंगराचा |
भ्याला मनी विजापूराचा ||
दुसरा भ्याला मेला बेत नव्हता पूर्वीचा |
दादोजी कोंडदेवाचा ||
मासा पाणी खेळे गुरू कोण असे त्याचा |
पवाडा गातो शिवाजीचा ||
कुळवाडी- भूषण पवाडा गातो भोसल्याचा |
छत्रपती शिवाजीचा ||२||

जाहागिरचा पैसा सारा लावी खर्चात |
चाकरी ठेवी लोकांस ||
थाप देऊन घेई चाकण किल्ल्यास |
मुख्य केले फिर्डोजीस ||
थोड्या लोकांसहीत छापा घाली सुप्यास |
कैद पाहा केले मामांस ||
सुप्या सोबत हाती घेतले तीनशे घोड्यास |
करामत केली रात्रीस ||
मुसलमानां लांच देई घेई कोडाण्यास |
सिंहगड नाव दिले त्यास ||
पुरंधरी जाई जसा भला माणूस न्यायास |
कैद पाहा केले सर्वांस ||
गांव इनाम देऊन सर्वां ठेवी चाकरीस |
मारले नाही कोणास ||
वाटेमधी छापा घालून लूटी खजिन्यास |
साठवी राजगडांस||
राजमाची लोहगडी लढे घेई तिकोण्यास ||
बाकी चारा किल्ल्यास ||
मावळ्यांस धाढी कोकणी गाव लुटायांस |
धूर्त योजी फितुरास ||
सन्मान कैद्या देई पाठवी वीजापूरास |
मुलान्या सुभेदारांस ||
विजापूरी मुसलमाना झाला बहू त्रास |
योजना केली कपटांस ||
कर्नाटकी पत्र पाठवी बाजी घोरपड्यास |
कैद तुम्ही करां शहाजीस ||
भोजनांचे निमित्त केले नेले भोसल्यास |
दग्याने कैद केले त्यास ||
थेट शहाजी कैदी आणिला विजापूरास |
खुशी मग झाली यवनांस ||
चिरेबंदी कोठडीमध्ये बंद केले त्यास |
ठेविले भोक वार्‍यास ||
शाहाजीला पिडा दीली कळाले शिवाजीस |
ऐकून भ्याला बातमीस ||
पिताभक्‍ती मनी लागला शरण जायास |
विचारी आपल्या स्त्रियेस ||
साजे नाव सईबाई स्त्री सुचवी पतीस |
ताडा दंडी दुसमनास ||
स्त्रीची सुचना सत्य आसली लिहीले पत्रास |
पाठवी दिल्ली मोगलांस ||
चाकर झालो तुमचा आता येतो चाकरीस |
सोडवा माझ्या पित्यास ||
मोगल थैली गेली थेट मुसलमानास |
ठेविले किल्ल्यावर त्यास ||
बाजी शामराज का लाजला जात सांगायास |
धरू पाही शिवाजीस ||
धेड म्हणावा नाक नाही द्यावा कोणांस |
आडचण झाली बखरीस ||
सिध्दीस बेत गेला नाही अंती भ्याला जिवास |
काळे केले महाडास ||
शाहाजीचा बाजी आखेर घेईल बक्षीस |
हा पाजी मुकला जातीस ||
करनाटकी आज्ञा झाली शाहाजीस |
यवन भ्याला सिंहास ||
वर्षे चार झाली शिवला नाही कबजास |
पिताभक्‍ती पुत्रास ||
चंद्रराव मोर्‍यास मारी घेई जावळीस |
दुसरे वासोट्या किल्ल्यास ||
प्रतापगड बांधी पेशवा केला एकास |
नवे योजी हुद्यास ||
आपली बाकी काढी धाढी पत्र तगाद्यास |
चलाखी दावी मोगलांस ||
रात्री जाऊनी लुटी जुन्नरास |
पाठवी गडी लुटीस ||
आडमार्ग करी हळूच गेला नगरांस |
लुटी हत्तिघोड्यांस ||
उंच वस्त्रे, रत्ने होन कामती नाही द्रव्यास |
चाकरी ठेवी बारगिरास ||
समुद्रतिरी किल्ले घेई पाळी गलबतास |
चाकरी ठेवि पठाणास ||
सिद्दि पेशव्या आपेश देई घेई यशास |
उदासी लाभ शिवाजीस ||
आबजूलखान शूर पठाण आला वाईस |
शोभला मोठा फौजेस ||
हत्ती बारा हजार घोडा त्याचे दिमतीस |
कमी नाही दारूगोळिस ||
कारकुनाला वचनी दिले हिवरे बक्षिस |
फितवीले लोभी ब्राम्हणास ||
गोपीनाथ फसवी पठाणा आणी एकांतास |
चुकला नाही संकेतास ||
माते पायी डोई ठेवी, लपवी हत्यारास |
बरोबर आला बेतास ||
समीप येता शिवाजी जसा भ्याला व्याघ्रास |
कमी करी आपल्या चालीस ||
गोपीनाथ सुचना देई भोळ्या यवनांस |
भ्याला तुमच्या शिपायांस ||
त्या अधमांचे एकून शिपाई केला बाजूस |
लागला भेटू शिवाजीस ||
वर भेटभाव वाघनख मारी पोटास |
भयभित केले पठाणास ||
पोटी जखम सोसी केला वार शिवाजीस |
झोंबती एकमेकांत ||
हातचलाखी केली विंचवा मारी शत्रूस |
पठाण मुकला प्राणास ||
स्वामीभक्‍ती धाव घेई कळले शिपायास |
राहिला उभा लढण्यास ||
त्याची धोप घेई शिवाजी बचवी आपल्यास |
तान्हाजी भिडे बाजूस ||
दांती दाढी चावी तोडी घेई धनी सूडास |
घाबरे केले दोघांस ||
नाव सय्यद बंडू साजे शोभा आणी बखरीस |
लाथाळी जीवदानास ||
तान्हाजीला हूल देई मारी हात शिवाजीस |
न्याहाळी प्रेती धन्यास ||
उभयतांसी लढता मुकला आपल्या प्राणास |
गेला जन्नत स्वर्गास ||
छापा घाली मारी करी कैद बाकी फौजेस |
पठाणपुत्र खाशा स्त्रियेस ||
चार हजार घोडा लूट कमी नाही द्रव्यास |
दुसर्‍या सरंजामास ||
अलंकार वस्त्रे देई सर्व कैदी जखम्यास |
पाठवि विजापूरास ||
वचनी साचा शिवाजी देई हिवरे बक्षीस |
फितुर्‍या गोपीनाथास ||
नाचत गात सर्व गेले प्रतापगडास|
उपमा नाही आनंदास || ||चाल ||
|| शिवाचा गजर जयनामाच झेंडा रोविला ||
||क्षेत्र्याचा मेळा मावळ्यांचा शिकार ख़ेळला ||
माते पायी ठेवी डोई गर्व नाही काडीचा |
आर्शिवाद घेई आईचा ||
आलाबला घेई आवडता होता जिजीचा |
पवाडा गातो शिवाजीचा ||
कुळवाडी - भूषण पवाडा गातो भोसल्याचा |
पवाडा गातो शिवाजीचा ||३||

लढे रांगणी विशाळगडी घेई पन्हाळ्यास |
केले मग सुरू खंडणीस ||
रुस्तुल जमाना आज्ञा झाली विजापूरास |
नेमिला कोल्हापुरास |
स्वार तिन हजार घेई थोड्या पायदळास |
आला थेट पन्हाळ्यास ||
मार देत शिवाजी पिटी कृष्णा पैलतडीस |
अति जेर केले त्यास |
खंडणी घेत गेला भिडला विजापुरास |
परत मग आला गडास ||
राजापुर दाभोळ लूटी भरी खजिन्यास |
मात गेली विजापुरास ||
सिध्दीजोहरा नेमी मोठी फौज दिमतीस |
सावंत सिद्दी कुमकेस ||
बंदोबस्त करी शिवाजी राही पन्हाळ्यास |
करी मग जमा बेगमीस ||
वारंवार छापे घाली लुटी भौती मुलखास |
केले महाग दाण्यास ||
त्रासाने खवळून वेढा घाली शिवाजीस |
कोंडिले गडी फौजेस ||
चार मास लोटले शिवाजी भ्याला वेढ्यास |
योजनां करी उपायास ||
कोकणांमधी सिध्दी झोडी रघुनाथास|
उपद्रव झाला रयतेस ||
पासलकर बाजीराव पडाले वाडीस |
दुःख मग झाले शिवाजीस ||
सिध्दी जोहरा निरोपाने गोवीं वचनास |
खुशाल गेला भेटीस||
वेळ करून गेला उरला नाही आवकास |
कच्चा मग ठेवी तहास ||
सिद्दिस लाडी गोडी मधी मान डुकलीस |
गेला थाप देऊन गडास ||
सिद्द्या पोटी खुष्याली जाई झोपी सावकाश |
हयगय झाली जप्तीस ||
तो शिवाजी पळून गेला घेई पाथी रात्रीस |
सविले मुसलमानांस ||
सिद्दि सकाळी खाई मनी लाडू चुरमुर्‍यास |
स्वारदळ लावी पाठीस ||
चढत होता खिंड शिवाजी गांठले त्यांस |
बंदुका लावी छातीस |
बाजीप्रभु मुख्य केला ठेवि मावळ्यास |
एकटा गेला रांगण्यास ||
स्वस्वामीला वेळ दिला बाजी भिडला शत्रुस |
हरवी नित्य मोगलास ||
दोन प्रहर लढे वाट दिली नाही त्यास|
धन्य त्याच्या जातीस ||
मोठी मोगल फौज दाखल झाली साह्यास |
खवळला बाजी युध्दास ||
अर्धे लोक उरले सरला नाही पाउलास |
पडला प्रभू भूमीस ||
तो शिवाजी सुखी पोहचला कान सुचनेस |
अंती मनी हाच ध्यास ||
बार गडी ऐकून सुखी म्हणे आपल्यास |
निघून गेला स्वर्गास ||
सय्यद मागे सरे जागा देई बाजीरावास |
पाहून स्वामीभक्‍तीस ||
विजापुरी मुसलमान करी तयारीस |
खासा आला लढण्यास ||
कराडास डेरे दिले घेई बहू किल्ल्यांस |
वश करी चाचे लोकांस ||
दळव्यासी लढून घेई श्रुंगारपुरास |
मारले पाळेगारांस ||
लोकप्रितीकरीता करी गुरू रामदासास |
राजगडी स्थापी देवीस ||
मिष्ट अन्नभोजन दिले सर्वा बक्षिस |
केली मग मोठी मजलस ||
तानसैनी भले गवय्या बसवी गायास |
कमी नाही तालस्वरास ||
||चाल ||
जीधर उधर मुसलमानी | बीसमिलाहि हिमानी ||
सचा हरामी शैतान आया | औरंगजीब नाम लिया ||
छोटे भाईकू हूल दिया | बडे भाईकी जान लिया ||
छोटे कूंबी कैद किया | लोक उसके फितालीया ||
मजला भाई भगादिया | आराकानमे मारा गया ||
सगे बापकूं कैद किया | हुकमत सारी छिनलीया ||
भाईबंदकू कैद किया | रयत सब ताराज किया ||
मार देके जेर किया | खाया पिया रंग उडाया ||
आपण होके बेलगामी | शिवाजीकू कहे गुलामी ||
आपण होके ऐषारामी | शिवाजीकू कहे हरामी ||
बेर हुवा करो सलामी | हिंदवाणी गाव नाभी ||
||चाल ||
आदी आंतन | सर्वा कारण ||
जन्ममरण | घाली वैरण ||
तोच तारण | तोच मारण ||
सर्व जपून | करी चाळण ||
नित्य पाळण | लावी वळण ||
भूती पाहून | मनी ध्याईन ||
नाव देऊन | जगज्जीवन ||
सम होऊन | करा शोधन ||
सार घेऊन | तोडा बंधन ||
सरनौबती डंका हुकूम पालेकराचा | घेई मुजरा शाई(रा)चा ||
सुखसोहळे होता तरफडे सावंत वाडीचा |
पवाडा गातो शिवाजीचा ||
कुळवाडी - भुषण गातो भोसल्याचा |
छत्रपती शिवाजीचा || ४||

सावंत पत्र लिही पाठवी विजापुरास |
मागे फौज कुमकेस ||
बाजी घोरपडा बल्लोळखान येती सहाय्यास |
शिवाजी करी तयारीस ||
खरा करून गेला छापा घाली मुधोळास |
मारिले बाजी घोरपड्यास ||
भाऊबंद मारिले बाकी शिपाई लोकांस |
घेतले बापसूडास ||
सावंताची खोड मोडून ठेवी चाकरीस |
धमकी देई पोर्तुगीस ||
नवे किल्ले बांधी डागडुजी केली सर्वांस ||
बांधिले नव्या जहाजास |
जळी सैनापती केले ज्यास भिती पोर्तुगीस |
शोभला हुद्दा भंडार्‍यास ||
विजापुरचा वजीर गुप्त लिही शिवाजीस |
उभयता आणिले एकीस ||
व्यंकोजी पुत्रा घेई शाहाजी आला भेटीस |
शिवाजी लागे चरणास ||
शाहाजीचे सदगुण गाया नाही आवाकाश |
थोडेसे गाऊ अखेरीस ||
सुखसोहळे झाले उपमा लाजे मनास |
उणे स्वर्गी सुखास ||
अपूर्व वस्तू घेऊन जाई विजापूरास |
भेट मग देई यवनास ||
पराक्रमी शिवाजी पाळी पाऊन लक्षास |
साजे यवनी स्नेहास ||
विजापुरचा स्नेह होता लढे मोगलास |
घेतले बहूता किल्ल्यास ||
सर्व प्रांती लूट धूमाळी आणिले जेरीस |
घाबरे केले सर्वांस ||
संतापाने मोगल नेमी शाइस्तेखानेस |
जलदि केली घेई पुण्यास ||
चाकणास जाऊन दावी भय फिर्डोजीस |
फुकट मागे किल्ल्यास ||
मास दोन लढला घेऊन सर्व फौजेस |
खान खाई मनास ||
आखेर दारू घालून उडवी एका हुकूमास |
भीति आंतल्या मर्दास ||
लागोपाठ मार देत हटवि पठाणास |
खचला खान हिंमतीस ||
प्रातःकाळी संतोषाने खाली केले किल्ल्यास |
देई मुसलमानास ||
फिर्डोजीला भेट देता खुषी झाली यवनास |
देऊन मान सोडी सर्वास ||
शिवाजीची भेट देता खुषी झाली यवनास |
वाढवी मोठ्या पदवीस ||
फिर्डोजीचे नाव घेता मनी होतो उल्हास |
पीढिजाद चाकरीस ||
येशवंतसिंग आले घेऊन मोठ्या फौजेस |
मदत शाईस्तेखानेस ||
सरनौबत भौती लुटी नगरी मुलखास |
जाळून पाडिला ओस ||
पाठी लागून मोंगल मारी त्याच्या स्वारांस |
जखमा केल्या नेताजीस ||
राजगड सोडून राहीला सिंव्हगडास |
पाहून मोगलसेनेस ||
जिजीबाईचे मुळचे घर होते पुण्यास |
खान राही तेथे वस्तीस ||
मराठ्यास चौकी बंदी गावात शिरण्यास |
होता, भित शिवाजीस ||
लग्नवर्‍हाडी घुसे केला पुण्यात प्रवेश |
मावळे सोबत पंचवीस ||
माडिवर जाऊन फोडी एका खिडकीस |
कळाले घरांत स्त्रीयांस ||
शाइस्त्यास कळता दोर लावी कठड्यास |
लागला खाली जायास ||
शिवाजीने जलदी गाठून वार केला त्यास |
तोडिले एका बोटास ||
स्त्रिपुत्रा सोडून पळे पाठ दिली शत्रूस |
भित्रा जपला जिवास ||
आपल्या पाठिस देणे उणे शिपायगिरीस |
उपमा नाही हिजड्यास ||
सर्व लोकांसहीत मारीले खानपुत्रास |
परतला सिंहगडास |
डौलाने मोगल भौती फिरवी तरवारीस |
दावी भय शिवाजीस ||
समीप येऊ दिले हुकूम सरबत्तीस |
शत्रू पळाला भिऊन मारास ||
करनाटकी बदली धाडी शाइस्तेखानास |
मुख्य केले माजमास ||
राजापुरी जाई शिवाजी जमवी फौजेस |
दावी भय पोर्तुगास ||
सर्व तयारी केली निघाला नाशिक तिर्थास |
हुल कसी दिली सर्वास ||
मध्यरात्री घेई बरोबर थोड्या स्वारांस |
दाखल झालो सुर्तेस ||
यथासांग सहा दिवस लुटी शहरास |
सुखी मग गेला गडास ||
बेदनूराहून पत्र आले देई वाचायास |
आपण बसे ऐकायास ||
शिपायाचे बच्चे शाहाजी गेले शिकारीस |
लागले हरणापाठीस ||
घोड्या ठेंच लागे उभयता आले जमीनीस |
शाहाजी मुकला प्राणास ||
पती कैलासा गेले कळाले जिजीबाईस |
पार मग नाही दुःखास ||
भुमी धडपडे बैसे रडून गाई गुणांस |
घेई पुढे शिवाजीस ||
||चाल ||
अतिरूपवान बहु आगळा | जैसा रेखला चित्री पूतळा ||
सवतीवर लोटती बाळा |
डाग लाविला कुणबी कुळा ||
सवतीला कसे तरी टाळा |
कज्जा काढला पती मोकळा ||
खर्‍या केसाने कापि का गळा |
नादी लागला शब्द कोकीळा || मुख दुर्बळ राही वेगळा |
अती पिकला चिंतेचा मळा ||
झाला शाहाजी होता सोहळा |
मनी भूलला पाहूनी चाळा ||
बहुचका घेती जपमाळा |
जाती देऊळा दाविती मोळा ||
थाट चकपाक नाटक शाळा | होती कोमळा जशा निर्मळा ||
खर्‍या डंखिणी घाली वेटोळा |
विषचुंबनी देती गरळा ||
झाला संसारी अती घोटाळा |
करी कंटाळा आठी कपाळा ||
मनी भिऊन पित्याच्या कुळा |
पळ काढला गेले मुताळा ||
छातीवरी ठेवल्या शिळा |
नाही रुचला सवत सोहळा ||
कमानीवर | लावले तीर ||
नेत्रकटार | मारी कठोर ||
सवदागर | प्रीत व्यापार ||
लावला घोर | सांगते सार ||
शिपाई शूर | जुना चाकर ||
मोडक्या धीर | राखी नगर ||
आमदानगर | विजापूरकर ||
मंत्रि मुरार | घेई विचार ||
वेळनुसार | देई उत्तर ||
धूर्त चतुर | लढला फार ||
छाती करार | करी फीतूर ||
गुणगंभीर | लाविला नीर ||
होता लायक | पुंडनायक ||
स्वामीसेवक | खरा भाविक ||
सिंहगडावर गेला बेत केला क्रियेचा |
बजावला धर्म पुत्राचा ||
रायगडी जाई राही शोक करी पित्याचा |
शत्रु होता आळसाचा ||
दुःखामधी सुख बंदोबस्त करी राज्याचा |
पवाडा गातो शिवाजीचा ||
कुळवाडी - भूषण पवाडा गातो भोसल्याचा |
छत्रपती शिवाजीचा ||५||

सर्व तयारी केली राजपद जोडी नावास |
शिक्का सुरू मोर्तबास ||
अमदानगरी नटून फस्त केले पेठेस |
भौती औरंगाबादेस ||
विजापूरची फौज करी बहुत आयास |
घेई कोकणपटीस ||
सावध शिवाजी राजे आले घेऊन फौजेस |
ठोकून घेई सर्वास ||
जळी फौज लढे भौती मारी गलबतास |
दरारा धाडी मक्केस ||
मालवणी घेऊन गेला अवचित फौजेस |
पुकारा घेतो मोगलास ||
जहाजावर चढवी फौज गेला गोव्यास |
लुटले बारशिलोरास ||
जलदी जाऊन गोकर्णी घेई दर्शनास |
लुटले मोगल पेठांस ||
पायवाटेने फौज पाठवी बाकी लुटिस |
आज्ञा जावे रायगडास ||
स्वतां खासी स्वारी आज्ञा लोटा जहाजास |
निघाला मुलखी जायास ||
मोठा वारा सुटला भ्याला नाही तुफानास |
लागले अखेर कडेस ||
औरंगजेब पाठवी राजा जयशिंगास |
दुसरे दिलीरखानास ||
ठेवले मोगल अमीर येऊन पुण्यास |
वेढिले बहुता किल्ल्यास ||
मानकरी शिवाजी घेई बसे मसलतीस |
सुचेना काही कोणास ||
बाजी प्रभू भ्याला नाही दिलीरखानास |
सोडिले नाही धैर्यास ||
हेटकरी मावळे शिपाई होते दिमतीस |
संभाळी पुरंधरास ||
चार्तुयाने लढे गुंतवी मोगल फौजेस |
फु्रसत दिली शिवाजीस ||
फार दिवस लोटले पेटला खान इर्षेस |
भिडला किल्ला माचीस ||
बुर्जाखाली गेला लागे सुरंग पाडण्यास |
योजी अखेर उपायास ||
हेटकरी मावळे जाती छापे घालण्यास |
पिडीले फार मोगलास ||
मोगलाने श्रम केले बेत नेला सिध्दिस |
काबीज केले माचीस ||
यशस्वी भासले लागले निर्भय लुटीस |
चुकले सावधपणास ||
हेटकर्‍यांचा थाट नीट मारी लुटार्‍यास |
मोगल हटले नेटास ||
बाजी मावळ्या जमवी हाती घेई खांड्यास |
भिडून मारी मोगलांस ||
पळ काढी पाठ दिली मावळ्यास |
मर्द पाहा भ्याले उंदरास ||
लाजे मनी दिलीरखान जमवी फौजेस |
धीर काय देई पठाणास ||
सर्व तयारी पुन्हा केली परत हल्ल्यास |
जाऊन भिडला मावळ्यास ||
बाजी मार देई पठाण खचले हिंमतीस |
हटती पाहून मर्दास ||
पराक्रम बाजीचा पाही खान खोच मनास |
लावीला तीर कमानीस ||
नेमाने तीर मारी मुख्य बाजी प्रभुस |
पाडिला गबरू धरणीस ||
सय्यद बाजी ताजीम देती घेती बाजूस |
सरले बालेकिल्ल्यास ||
मोगल चढ करती पुन्हा घेती माचीस |
धमकी देती मावळ्यास ||
हेटकरी मारी गोळी फेर हटवि शत्रूस |
पळवी इशानी कोणास ||
वज्रगडाला शिडी लावली आहे बाजूस |
वरती चढवी तोफांस ||
वरती मोगल मारी गोळे बालेकिल्ल्यास |
आणले बहु खराबीस ||
हेटकरी मारी गोळे बालेकिल्ल्यास |
आणले बहु खराबीस ||
हेटकरी मावळे भ्याले नाही भडिमारास |
मोगल भ्याला पाऊसाअ ||
मोगल सल्ल करी शिवाजी नेती मदतनीस |
घेती यवनी मुलखास ||
कुलद्रोही औरंगजेब योजी कपटास |
पाठवी थैली शिवाजीस ||
शिवाजीला वचन देऊन नेई दिल्लीस |
नजरकैद करी त्यास ||
धाडी परत सर्व मावळे घोडेस्वारांस |
ठेविले जवळ पुत्रास ||
दरबार्‍या घरी जाई देई रत्न भेटीस |
जोडीला स्नेह सर्वास ||
दुखणे बहाणा करी पैसा भरी हाकीमास |
गूल पाहा औरंगजेबास ||
आराम करून दावी सुरू दानधर्मास | देई खाने फकीरास ||
मोठे टोकरे रोट भरी धाडी मशीदिस |
जसा का मुकला जगास ||
दानशूर बनला हटवी हातिमताईस |
चुकेना नित्यनेमास ||
औरंगजेबा भूल पडली पाहून वृत्तीस | विसरला नीट जप्तीस ||
निरास कैदी झाला शिवाजी भास मोगलास | चढला मोठ्या दिमाखास ||
पितापुत्र निजती टोकरी बदली रोटांस |
बाकी सोपी चाकरास ||
जलदी करीती चाकर नेती टोकरांस | करामत केली रात्रीस ||
दिल्ली बाहेर गेले खुले केले शिवाजीस |
नेली युक्‍ती सिध्दीस ||
मोगल सकाळी विचकरी दांत खाई होटांस |
लावि पाठी माजमास ||
|| चाल ||
औरंगजेबीचा धूर दीला | पुत्रासवे घोडा चढला ||
मधीच ठेवी पुत्राला | स्वताः गोसावी नटला ||
रात्रीचा दिवस केला | गाठले रायगडाला ||
माते चरणी लागला | हळूच फोडी शत्रूला ||
स्नेह मोगलांचा केला | दरारा देई सर्वाला ||
||चाल ||
हैद्राबादकर | विजापूरकर ||
कापे थरथर | देती कारभार ||
भरी कचेरी | बसे विचारी ||
कायदे करी | नीट लष्करी ||
शिवाजीचा बेत पाहून जागा झाला गोव्याचा |
बंदोबस्त केला किल्ल्याचा ||
वेढा घालून जेर केला सिद्दी जंजिर्‍याचा |
पवाडा गातो शिवाजीचा ||
कुळवाडी - भूषण पवाडा गातो भोसल्याचा |
छत्रपती शिवाजीचा ||६||

शिवाजी तो मसलत देई मित्र तान्हाजीला |
बेत छाप्याचा सुचवीला ||
तान्हाजीने भाऊ धाकटा सोबत घेतला |
मावळी हजार फौजेला ||
सुन्या रात्री सिंहगड पायी जाऊन ठेपला |
योजिले दोर शिडिला ||
दोरीची शिडी बांधली शिपाई कमरेला |
हळूच वर चढवीला ||
थोडी चाहूल कळली सावध उदेबानाला |
करी तयार लोकाला ||
थोड्या लोकांसवे तान्हाजी त्यावर पडला |
घाबरा गढकरी केला ||
रणी तान्हाजी पडे मावळे पळती बाजूला |
सुर्याजी येऊन ठेपला |
धीर मोडक्या देई परत नेई सर्वाला |
उगवी बंधु सुडाला ||
उदेबान मारिला बाकिच्या रजपुताला |
घेतले सिंहगडाला ||
गढ हाती लागला तान्हाजी बळी घेतला |
झाले दुःख शिवाजीला ||
संहगडी मुख्य केले धाकट्या सुर्याजीला |
रुप्याची कडी मावळ्याला ||
पुरंधर माहूली घेई वरकड किल्ल्याला |
पिडा जंजिरी सिद्द्याला ||
सुरत पुन्हा लुटी मार्गी झाडी मोगलाला |
मोगल जेरदस्त केला ||
कैद करी शिवाजी बाकी उरल्या फौजेला |
त्यामधी अनेक स्त्रियांला ||
सुंदर स्त्रिया परत पाठवी ख़ानदेशाला |
सुरू केले चौथाईला ||
जलदी मोगल धाडी मोहबतखानाला |
देई मोठ्या फौजेला ||
औंढापट्टा घेऊन वेढी साल्हेर किल्ल्याला |
धिंगाणा दक्षिणेत केला ||
गुजर उडी घाली सामना शत्रुचा केला |
मोरोबा पठाण पंक्‍तीला ||
लढता पळ काढी दावी भ्याला मोगलाला |
जसा खरा मोड झाला ||
तो मराठे पळती मोगल गर्वाने फुगला |
आळसाने ढिला पडला ||
गुजर संधी पाहून परत मुरडला |
चुराडा मोगलाचा केला ||
बेवीस उमराव पाडले रणभूमीला |
नाही गणती शिपायाला ||
लहान मोठे कैदी बाकी सर्व जखम्याला |
पाठवी रायगडाला ||
मोगल वेढा झोडून मार देत पिटीला |
खिदाडी औरंगाबादेला ||
रायगडी नित्य शिवाजी घेई खबरीला |
गोडबोल्या गोवी ममतेला ||
एकसारखे औषध पाणी देई सर्वाला |
निवडले नाही शत्रूला ||
जखमा बर्‍या होता खुलासा सर्वांचा केला |
राहिले ठेवी चाकरीला ||
शिवाजीचू किर्ती चौमुलखी डंका वाजला |

शिवाजी धनी आवडला ||
मोगल यवनी शिपायी सोडी चाकरीला |
हाजरी देती शिवाजीला ||
पोर्तुग्यास धमकीही देई मागे खंडणीला |
बंदरी किल्ला वेढीला ||
मधीच इंग्रज भ्याला जपे मुंबै किल्ल्याला |
बनया धर्मा आड झाला ||
दिल्लीस परत नेले सुलतान माजूमाला |
दुजे मोहबतखानाला ||
उभयतांचा बदली खानजहान आला |

मुख्य दक्षीणेचा केला ||
मोगलाला धूर देऊन लुटले मुलखाला |
गोवळकुंडी उगवला ||
मोठी खंडणी घेई धाकरी धरी निजामाला |
सुखे मग रायगडी गेला ||
मोगलाचे मुलखी धाडी स्वार लुटायाला |
लुटले हुबळी शहराला ||
समुद्रकाठी गावे घेई जाहाजाला |
केले खुले देसाईला ||
परळी सातारा किल्ले घेई पांडवगडला |
आणिक चार किल्ल्यांला ||
|| चाल ||
हुकूम विजापुरी झाला | सोडिले बहुत फौजेला ||
द्यावा त्रास शिवाजीला | घ्यावे त्याचे मुलखाला ||
शिवाजी सोडी गुजराला | कोंडी आबदुल करीमाला ||
केला महाग दाण्याला | शत्रू अती जेर केला ||
आर्जव करणे शिकला | भोंदिले सैनापतीला ||
निघून विजापुरी गेला | क्रोध शिवाजीस आला ||
रागाऊन लिहीले पत्राला | निषेधी प्रतापरावाला ||
गुजर मनात लाजला | निघून वर्‍हाडात गेला ||
||चाल ||
आबदुल्याने | बेशर्म्याने ||
फौज घेऊन | आला निघून ||
राव प्रताप | झाला संताप ||
आला घाईने | गाथी बेताने ||
घुसे स्वताने | लढे त्वेषाने ||
घेई घालून | गेला मरून ||
प्रतापराव पडता मोड फौजेचा झाला |
पाठलाग मराठ्यांचा केला ||
तोफ गोळ्या पोटी पोटी दडती भिडती पन्हाळ्याला |
गेले नाही शरण शत्रूला ||
अकस्मात हंसाजी मोहीता प्रसंगी आला |
हल्ला शत्रूवर केला ||
गुजर दळ मागे फिरून मारी यवनाला |
पळिवले विजापुरला ||
शिवाजीने हंसाजीला सरनौबत केला |
शिवाजी मनी सुखी झाला ||
सेनापतीचे गुण मागे नाही विसरला |
पोशी सर्व कुटूंबाला ||
प्रतापराव – कन्या सून केली आपल्याला |
व्याही केले गुजराला ||
काशीकर गंगाभट घाली डौल धर्माचा |
केला खेळ गारूड्याचा ||
लुटारू शिवाजी लुटला धाक गृहफौजेचा |
खर्च नको दारूगोळीचा ||
बहुरूपी सोंग तूलदान सोने घेण्याचा |
पवाडा गातो भोसल्याचा ||
कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा |
छत्रपती शिवाजीचा ||७||

विश्वासू चाकर नेमी मुलखी लुटायाला |
शिवाजी कोकणांत ||
छोटे मोठे गड घेई बांधी नव्या किल्ल्याला |
जमाव फौजेचा केला ||
गोवळकुंडी जाई मागून घेई तोफाला |
फितीवले कसे निजामाला ||
करनाटकी गेला भेटे सावत्रभावाला |
वाटणी मागे व्यंकोजीला ||
लोभी व्यंकोजी हिस्सा देईन बळासी आला |
आशेने फिरवी पगडीला ||
बंधू आज्ञा मोडून गर्वाने हट्टी पेटला |
बिर्‍हाडी रागाऊन गेला ||
शिवाजीला राग आला कोट छातीचा केला |
कैदी नाही केले भावाला ||
तंजोर बाकी ठेवी घेई सर्व मुलखाला |
खडा कानाला लावला ||
दासीपुत्र संताजी बंधू होता शिवाजीला |
करनाटकी मुख्य केला ||
हंबीरराव सेनापती हाताखाली दिला |
निघाला परत मुलखाला ||
वाटेमध्ये लधून घेई बिलरी किल्ल्याला |
तेथे ठेवी सुमंताला ||
शिवाजीचे मागे व्यंकोजीने छापा घातला |
घेतले स्वःता अपेशाला ||
जेर झाला व्यंकोजी देई उरल्या हिश्याला |
शिवाजी रायगडी गेला ||
विजापूराचा साह्य नेई राजे शिवाजीला |
मोगल मुलखी सोडला ||
मुलखी धिंगाणा धुळीस डेश मिळवीला |
सोडिला नाही पिराला ||
वाटेमधी मोगल गाठी शिवाजीला |
ग़्हाबरा अतिशय केला ||
भिडला शिवाजी मोगल मागे हाटीवला |
वाट पुढे चालू लागला ||
दुसरी फौज आडवी माहारज राजाला |
थोडेसे तोंड दिले तिजला ||
काळ्या रात्री हळूच सुधरी आडमार्गाला |
धूळ नाही दिसली शत्रूला ||
फौजसुध्दा पोहचला पटा किल्ल्याला |
फसविले आयदी मोगलाला ||
विजापुरचा आर्जव करी धडी थैलीला |
आश्रय मागे शिवाजीला ||
हांबीरराव मदत पाठवी विजापुरला |
बरोबर देई फौजेला ||
नऊ हजार मोगलांचा पराभव केला |
ज्यानी मार्ग अडीवला ||
विजापुरी जाऊन जेर केले मोगलाला |
केला महाग दाण्याला ||
शत्रुला पिडा होता त्रासून वेढा काढला |
मोगल भिऊन पळाला ||
दिल्लीचा परत बोलवी दिलीरखानाला |
पाठवी शाहजहानाला ||
जलदी करून शिवाजी वळवी पुत्राला |
लाविला नीट मार्गाला ||
तह करून शिवाजी नेती विजापुरला |
यवन घेती मसलतीला ||
शिवाजीचे सोवळे रुचले नाही भावाला |
व्यंकोजी मनी दचकला ||
निरस मनी होऊन त्यागी सर्व कामाला |
निरा संन्यासी बनला ||
शिवाजीने पत्र लिहीले बंधु व्यंकोजीला |
लिहीतो पत्र अर्थाला ||
वीरपुत्र म्हणविता गोसावी कसे बनला |
हिरा का भ्याला कसाला ||
आपल्या पित्याचा ठसा कसा जलदी वीटला |
मळावाचून काटला ||
कनिष्ठ बंधु माझ्या लाडकी पाठी साह्याला |
तुम्ही का मजवर रुसला ||
बोध घ्या तुम्ही माझा लागा प्रजापालनाला |
त्यागा ढोंगतोर्‍याला ||
मन उत्तम कामी जपा आपल्या फौजेला |
संभाळा मुळ आब्रुला ||
किर्ती तुझी ऐकू यावी ध्यास माझ्या मनाला |
नित्य जपतो या जपाला ||
कमी पडता तुम्ही कळवा माझ्या लोकांला |
सोड मनच्या आधीला ||
सुबोधाचे पत्र ऐकता शुध्दीवर आला |
व्यंकोजी लागे कामाला ||
शिवाजीला रायगडी गुडघी रोग झाला |
रोगाने अती जेर केल ||
त्याचे योगे नष्ट ज्वर फारच खवळला |
शिवाजी सिसी दुःखाला ||
यवनी विरास भिडता नाही कुचमला |
शिवाजी रोगाला भ्याला ||
सतत सहा दिवस सोसी तापदहाला |
नाही जरा बरळला ||
सातव्या दिवशी शिवाजी करी तयारीला |
एकटा पुढे आपण झाला ||
काळाला हूल देऊन स्वःता गेला स्वर्गाला |
पडले सुख यवनाला ||
कुळवाडी मनी खचले करती शोकाला |
रडून गाती गुणाला ||
||चाल ||
महाराज आम्हांसी बोला | धरल का तुम्ही आबोला ||
मावळे गडी सोबतीला | शिपाई केले उघड्याला ||
सोसिले उन्हातान्हाला | भ्याला नाही पावसाला ||
दोंगर कंगर फिरला | यवन जेरीस आणला ||
लुटले बहूत देशांला | वाढवी आपुल्या जातीला ||
लढवी अचाट बुध्दीला | आचंबा भुमीवर केला ||
बाळगी जरी संपत्तीला | तरी बेताने खर्च केला ||
वाटणी देई शिपायाला | लोभ द्रव्याचा नाही केला ||
चतुर सावधपणाला | सोडिले सोडिले आधी आळसाला ||
लहान मोठ्या पागेला | नाही कधी विसरला ||
राजा क्षेत्र्यांमध्ये पहिला | नाही दुसरा उपमेला ||
कमी नाही कारस्तानीला | हळूच वळवी लोकांला ||
युक्‍तीने बचवी जीवाला | कधी भिईना संकटाला ||
चोरघर्ती घेई किल्ल्याला | तसेच बाकी मुलखाला ||
पहिला झटे फितुराला | आखेर करी लाढाईला ||
युध्दी नाही विसरला | लावी जीव रयतेला ||
टळेना रयत सुखाला | बनवी नव्या कायद्याला ||
दाद घेई लहानसानाची | हयगय नव्हती कोणाची ||
आकृती वामनमुर्तीची | वळापेक्षा चपळाईची ||
सुरेख ठेवण चेहर्‍याची | कोंदिली मुद्रा गुणरत्नाची ||
||चाल ||
भिडस्त भारी | साबडा घरी ||
प्रिय मधुरी | भाषण करी ||
मोठा विचारी | वर्चड करी ||
आस सोयरी | ठेवी पदरी ||
लाडावरी | रागाचे भारी ||
इंग्लीश ज्ञान होता म्हणे मी पुत्र क्षेत्र्याचा |
उडवी फट्टा ब्रम्हाचा ||
जोतिराव फु्ल्याने गाईला पुत क्षुद्राचा |
मुख्य धनी पेशव्याचा ||
जिजीबाईचा बाळ काळ झाला यवनाचा |
पवाडा गातो शिवाजीचा ||
कुळवाडी - भूषण पवाडा गातो भोसल्याचा |
छत्रपती शिवाजीचा ||८||


धन्यवाद- http://mahatmaphule.info/main.html

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...