मी आणि माझे सतत बदलणारे फालतू अभिमान !!


मी आणि माझे सतत बदलणारे फालतू अभिमान !!





वाचा आणि बघा पटतंय का...??? खूप दिवस डोक्यात घोळत होता हा विषय... आज धीर करून शब्दात मांडण्याचा प्रयत्न करतोय...


 


मी मुंबईत जन्मलो म्हणून मी 'मुंबईकर', मग मला बाकी सगळे उपरे वाटणार... गाव रत्नागिरी म्हणून मी 'रत्नागिरीकर', मग मला खालचे चिपळूणवाले आणि वरचे सिंधुदुर्गवाले पण लांबचे वाटणार..., रत्नागिरी कोकणात म्हणून मग मी 'कोकणी', मग मला कोकणातले सगळे आपले वाटणार आणि पुण्या पासून ते पार नागपूर पर्यंतचे सगळे परके वाटणार... मी त्यांना 'घाटी' म्हणणार..., कोकण महाराष्ट्रात म्हणून मी 'महाराष्ट्रीयन', मग इतर सगळे म्हणजे भय्ये, गुजराती, बंगाली माझे दुश्मन..., आता मी राहतो डोंबिवलीत म्हणून मी 'डोम्बिवलीकर', मग मी डबल फास्ट गाडीत चढल्यावर कल्याण वाल्यांचा आणि ठाणेवाल्यांचा राग करणार... त्यांना नडणार...


 


मी बर्यापैकी सोसायटीत राहतो मग मी चाळीत-झोपडपट्टीत राहणार्याना नाक मुरडणार... मी मराठी लिहितो-वाचतो-बोलतो म्हणून मी 'मराठी' व इतर भाषांचा द्वेष करणार..., मग कधी मला माझ्या निरर्थक 'आडनावाचा' अभिमान वाटणार, आणि इतरांच्या आडनावाकडे संशयाने पाहणार... कधी मी 'मराठा' असल्याचा अभिमान, मग मराठेतर सगळे माझे शत्रू..., कधी ९६ कुळी असल्याचा अभिमान... कधी 'open' मध्ये असल्याचा अभिमान... मग कधी मोठा राडा झाला कि मी 'हिंदू' असतो, अगदी गर्व से कहो... मग वरचे सगळे माझे मित्र आणि फक्त 'ते' माझे शत्रू..., मग कधीतरी, २ महत्वाच्या दिवशी व 'त्यांच्या' बरोबर चेंडू-फळीचा सामना असला कि मग मात्र मी पक्का 'भारतीय'... मेरा भारत महान... :(पण मेंदू माझा लहान


 


इतर असेच अनेक लहान मोठे अभिमान आहेतच... जसे कि आपापल्या विचारसरणीचा अभिमान... आपापल्या राजकीय पक्षांचा अभिमान... पदव्यांचा अभिमान... पेशाचा अभिमान... पदांचा अभिमान... विचारवंत असल्याचा अभिमान... पुरोगामी असल्याचा अभिमान... समाजवादी असल्याचा अभिमान... डावे असल्याचा अभिमान... धार्मिक असल्याचा अभिमान... सनातनी असल्याचा अभिमान... पर्यावरणवादी असल्याचा अभिमान... स्त्रीवादी असल्याचा अभिमान... कवी-लेखक-साहित्यिक असल्याचा अभिमान... मी ज्या पंथाचा साधक असतो त्या पंथाचा आणि माझ्या श्री सद्गुरूंचा अभिमान... हि यादी वाढतच जाईल... ह्याच अभिमानाच रुपांतर इगो मध्ये होउन तू-तू-मै-मै ला सुरुवात होते... ठिणगी पडते... भांडणं होतात... मारामाऱ्या होतात... दंगली होतात... खून-खराबे होतात... माणुसकीचा मुडदा पडतो... हेच तर होत आलय जगात... बघा इतिहास... छे... इतिहास कशाला... FACEBOOK बघा...


 


नाही, अभिमान असावा... पण मग तो आपल्या सत्कृत्याचा असला तर हे जग किती सुंदर होईल... किंवा आपण 'माणूस' असल्याचा अभिमान देखील न बाळगला तर हे जगण किती आनंदी होईल... एक खराखुरा माणूस... कोणताही खोटा मुखवटा न घालणारा... कोणताही भाषेचा, प्रांताचा, अस्मितेचा, जातीचा, धर्माचा अभिमान न बाळगणारा... प्रत्येक माणसाशी माणुसकीने वागणारा माणूस... क्या बात है? आहे का हे शक्य...?


 

BE HUMAN... B+


लेखं- Nilesh BePositive.


No comments:

Post a Comment

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...