खरे समाजसुधारक आई सावित्री आणी बा ज्योतिबा !!
इ.स.१८५१ मध्ये त्यांच्या शाळेतल्या मुलीँची परिक्षा झाली त्यावेळी मेजर कँडी यांनी शेरा दिला की "शाळेतल्या मुलीँची बुद्धीमत्ता पाहुन फार समाधान वाटले" नुसत्या शिक्षणाच्या शाळा उघडण्याने सावित्रीमाई आणि तात्यासाहेब (क्रांतीबा फुले) यांना समाधान वाटत नव्हते. समाजातल्या बालविधवांचे जिणे,कुमारीमातांची परिस्थिती त्यांना अस्वस्थ करत होती.
एके दिवशी रात्रीच्यावेळी तात्यासाहेब लाकड पुलावरुन जात असताना पुलाच्या काठावरुन नदित उडी घेण्याचा प्रयत्न कुणीतरी करत असल्याचे दिसले. तात्यांनी घाई करुन त्या व्यक्तीस रोखले. पाहतात तर काय ती एक पुरषाच्या वासनेची शिकार बनुन गरोदर राहिलेली विधवा काशीबाई आहे. तात्यांनी तिची समजुत काढुन तिला घरी आणले आणि सावित्रीमाईच्या हवाली केले माईनी तिची नीट काळजी घेतली आणि काशीबाईचे बाळंतपण ही केले. जन्मलेल्या मुलाची नाळ स्वतःकापुन १२ व्या दिवशी त्याचे नावं यशवंत असे ठेवले. बालविधवांची जी केविलवाणी स्थिती होती त्यावर विचार करुन सावित्रीमाईनी व तात्यांनी २८ जानेवारी.१८५३ रोजी बालहत्या प्रतिबंधक ग्रहाची स्थापना केली. कोणा विधवेचे अज्ञातपणात वाकडे पाऊल पडुन ती गरोदर राहिली तर तिने या गृहात येवुन गुपचुप बाळंत व्हावे अशी जाहीरात करण्याचे धैर्य माई आणि तात्यांसारखे सुधारकच दाखवु शकतात या कार्यासाठी त्यांना घराजवळच्या उस्मान शेख यांची मदत मिळाली. या गृहातिल मुलांची माई खुप काळजी घ्यायच्या.
हे पुढिल उताऱ्यावरुन स्पष्ट होते माई त्या गृहातल्या मुलांची अविरत वात्सल्याने सेवा करीत लालन पालन करीत तथापी माईनीँ आपल्या दयाळु, उदार स्वभावाला अनुसरुन त्या अर्भकाचे अत्यंत प्रेमाने वात्सल्याने संगोपन केले. ज्या काशीबाईला वाचवले तिच्या पोटी जन्मलेल्या मुलास दत्तक घेवुन सामाजिक कार्याचा वारसा पुढे चालु रहावा म्हणुन त्यास डाँक्टर केले. आपल्या यशवंताचा विवाह जातीबाहेरच्या मुलीशी लावला आणि समाजात नवे पर्व उभारले, संबंधित उतारा हा फुले यांचा जात, पात, धर्म, वर्ण, पंथ, प्रांत पाहत नसून फक्त माणुसकी पाहतो हे सिद्ध करणारा आहे.
लेखं- अमोल गायकवाड.
No comments:
Post a Comment
धन्यवाद !!