इडा पीडा जावो आणि बळीचे राज्य येवो !!

इडा पीडा जावो आणि बळीचे राज्य येवो !!




बळीराजा हा शेतकऱ्यांचा राजा होता. आजही शेतकऱ्याला बळीराजा असे म्हंटले जाते. ग्रामीण भागात दर दिवाळी-दसऱ्याला आमच्या माता-बहिणी "इडा पीडा जावो आणि बळीचे राज्य येवो" असे म्हणून घरातील पुरुषांना ओवाळतात. चार हजार वर्षापूर्वी बळीराजाचं राज्य संपूर्ण आशिया खंडात होते. परकीय आक्रमक असलेल्या आर्य वामन याने बळीराजाशी युद्ध पुकारले. या युद्धात आमचे जे शूर सरदार हुतात्मे झालेत ते आमचे पूर्वज होते. हे युद्ध भाद्रपद महिन्यात झाले म्हणून भाद्रपद महिन्याच्या पित्तरपाटामध्ये श्राद्ध घालून श्रद्धांजली वाहिली जाते. शेणाचा भालदेव बसवतात. १५ दिवस सुतक पळून बळीराजाच्या शूर सैनिकांना श्रद्धांजली वाहतात. भालदेव म्हणजे बळीराजा. खंडोबा, म्हसोबा, मल्हार, मार्तंड हे बळीराजाच्या मंत्रिमंडळातील हुशार व कार्यक्षम मंत्री होत.


 

बळीराजाचे राज्य नऊखंडी होते. आजच्या अफगाणिस्तानापासून ते मलेशियाच्या बाली बेटापर्यंत बळीराजाचे साम्राज्य पसरलेले होते. प्रत्येक खंडाच्या प्रमुखाला खंडोबा म्हंटले जात असे. आज जसे भारतात अनेक राज्य आहेत व प्रत्येक राज्याच्या प्रमुखाला मुख्यमंत्री म्हंटले जाते, त्याचप्रमाणे खंडाचा प्रमुख खंडोबा होय. प्रत्येक खंडात छोटे-छोटे सुभे असायचे. अनेक सुभ्यांचे मिळून एक महासुभा असायचा. या महासुभ्याचा प्रमुख तो महासुभेदार म्हणजेच म्हसोबा होय. त्याचप्रमाणे सुभ्याचा प्रमुख जोतिबा, मल्हार व मार्तंड हे सुरक्षा अधिकारी होत. आज केवळ बळीराजाचीच पूजा होते असे नाही तर त्याच्या या मंत्री व अधिकाऱ्यांचीही पूजा होते. यावरून बळीचे राज्य प्रजेला किती सुखी व संपन्न ठेवत होते याची कल्पना येते. अशा सुखी व संपन्न राज्यावर परकीय आक्रमक नेहमीच वाईट नजर ठेवत असत. गझनीच्या महंमदाने सोरटी सोमनाथ मंदिर जसे लुटले, तसेच आर्यांचे दहा अवतारांपैकी असलेल्या वामन-परशुराम वगैरेनी या बळीच्या देशाला लुबाडले.

 



सात काळजाच्या आत जपून ठेवावा, असा निरागस 'माणूस'... आपल्या प्रजेतील प्रत्येक व्यक्तीला तिच्या कष्टाचे व हक्काचे फळ सम्यक रीतीने विभागून देणारा संविभागी नेता... भारतीयांचे वास्तव आणि विधायक पूर्वसंचित असलेला कृती, प्रकृती आणि संस्कृती यांचा तजेलदार मोहर.... बळी- हिराण्याकाशिपुचा पणतू, प्रल्हादाचा नातू, विरोचानाचा पुत्र, कपिलाचा पुतण्या आणि बाणाचा पिता. भारताच्या सांस्कृतिक इतिहासातील एक अत्यंत उत्तुंग व्यक्तिमत्व... सुमारे साडे तीन ते पाच हजार वर्षापूर्वी होवून गेलेला भारतीय बहुजन समाजाचा एक महानायक, एक महासम्राट, एक महातत्ववेत्ता... या बळीचा वंश तो बळीवंश. या बळीवंशातील माणसे-आपली माणसे, आपल्या रक्तामासाची माणसे आणि मुख्य म्हणजे आपल्या विचारांची माणसे... ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आपले प्राण गमावणे पत्करले, पण तत्वांशी द्रोह केला नाही, आपल्या श्वासोच्छवासावर दडपणे लादून घेणे मान्य केले नाही, अशी माणसे.


 


आपण मात्र असे धन्य, कि आपण आपल्या डोळ्यादेखत त्यांच्या स्मृतीना खुशाल करपू-कोमेजू दिले; त्यांना आपल्या हृदयापासून सात तटांच्या आणि मस्तकापासून सात उंबरठ्याच्या बाहेरच रोखून धरले. या सगळ्याला थोडे अपवाद असतील, पण इतरापैकी काही जनानी त्यांना विसरून जाण्यात आपले सुख शोधले आणि काही जनानी तर त्यांची निंदा करण्यात पुण्याचा मार्ग पहिला. या लोकांना आज ना उद्या आपल्या अंतर्यामी असलेले त्यांचे अस्तित्व जाणवेल आणि त्या जाणीवेने त्यांचा स्व अक्षरशः मोहरून-बहरून येईल, असा विश्वास आहे. ज्यांनी त्यांचे महात्म्य आधीच ओळखले आहे, त्यांच्यापुढे मात्र आपण नतमस्तक व्हायलाच हवे.



विषमता, वर्णव्यस्था आणि जातीव्यवस्थेचे कट्टर धर्माध समर्थक, बहुजन समाजाचे शत्रु शोषक असणाय्रा सर्व आर्यांनी कट रचून आमच्या आदर्श राजा बळीराजाची हत्या केली. बळीराजाची हत्या करणाय्रा वामणाला विष्णूचा अवतार घोषित करुन मनुवाद्यानी आमच्या माथी मारला. हे मनुवाद्याचे कावे, षढयंत्र हजारो वर्षापासुन चालत आले आहे व आजही चालत आहे. परंतू जेव्हा हे मनुवाद्याचे प्रचारक, प्रसारक, बहुजन विरोधी षढयंत्र तमाम भारतीय येथील मुळ वास्तव्य असणाऱ्या बहुजन समाजाच्या लक्षात येईल. बळीराजा हे एक कतृत्ववान आदर्श राजे होते. ज्यांनी आपले राज्य बहुजन हिताय, बहुजन सुखायसाठी समर्पित केले होते. आपल्या राज्यातील प्रजेचे हित लक्षात घेता त्यांनी प्रजेचा विकास आणि संरक्षणांकडे अधिक लक्ष दिले. त्यांनी कोणताही वर्ण, जात, धर्म पंथ पाहीला नाही. न्याय करताना कधीही भेदभाव केला नाही. म्हणूनच ते उदारमतवादी, मोठ्या मनाचे. शुर पराक्रमी, अनेक गुणसंपन्न, बलवान, मितभाषी, शत्रु आर्य ब्राम्हणांना रणांगणात पाठ न दाखविणारे, समान विभागणी करणारे, योग्य काळाची वाट पहाणारे, सत्य शील, सर्वावीषयी सावध असे महान राजे होते. बळीराजा हे शेतकऱ्यांवरती आर्याद्वारे कुठे अन्याय अत्याचार घडत असतील तर लगेच ते शत्रु आर्यास कठोर शासन करीत होते. या त्यांच्या आदर्श कार्य कतृत्वामुळेच भयभीत झालेल्या आर्यानी कपटाने त्यांची हत्या केली. बळी राजा हे गोर गरीबांना न्याय, हक्क देणारे होते म्हणूनच आजही आपल्या समाजामध्ये एक प्रचलित म्हण आहे 'बळी तो कान पिळी'.
 




आर्य वामन हा आपल्या. टोळ्या घेवून बळीराज्याच्या प्रदेशात घुसला आणि त्याने लुटमार सुरू केली. बळीला छलकपट करून बंदी बनविले. त्याचे शस्त्र, संपती व राजसत्ता हिरावून घेण्यात आली. बाहेरून आलेल्या आर्यानी कपटाने बळीराजाला ठार मारले व राज्य बळकावले. युद्धात जिंकता येत नाही म्हणून आर्यांचा सेनापती असलेला वामन(विष्णूचा अवतार?) याने बळीराजाला कपटाने मारले. दशावतारातील वामन अवताराने तीन पावले जमीन मागून बळीराजाला पाताळात गाडले, ही भाकडकथा आपणास पुराणातून सांगितली जाते. परंतु शिक्षणावर बंदी घातल्याने आपले पूर्वज हा सर्व इतिहास लिहून ठेवू शकले नाहीत. म्हणून पाताळात गाडण्याचा खोटा इतिहास आम्ही खरा मानू लागलो. आपल्या हिताची प्रत्येक गोष्ट ते गाडून टाकतात.  

बा ! बहुजन समाजा, तुला एकच प्रार्थना...




बळीराजा... सात काळजात जपून ठेवावा असा ’जिवलग’ सुमारे तीन-चार हजार वर्षांपुर्वी बळीराजाच्या पूर्वजांनी केलेल्या उत्तम शेतीमुळे पिकलेल्या धान्याने सिंधुसंस्कृतीमधील धान्याची कोठारे भरली होती. बळीराजानेही आपल्या पूर्वजांचे अनुसरण करीत, पण त्यांच्यापेक्षा अधिक कौशल्याने,पेरणी सुरू केली.पेरणी धान्याची होती. पेरणी संस्कृतीचीही होती. पेरणी जीवनमुल्यांची होती, पेरणी जगण्याच्या कलेची होती. पेरणी रक्तमांसाची होती आणि माणसासाठी नव्या नव्या स्वप्नांचीही होती. तेव्हापासून बळीराजा प्रत्येक पिढीच्या श्वासोच्छवासात वसत आहे, रक्तवाहिन्यांतून वहात आहे, बहुजनांच्या उराउरांतून धडधडत आहे. घराघरातून बहरत आहे, रक्तवाहिन्यांतून वाहत आहे, उत्कट जिज्ञासेने सृष्टीच्या आणि जीवनाच्या नव्या-नव्या रहस्यांचा शोध घेत आहे. बहुजन समाजाच्या दृष्टीने बळीवंश आणि त्याच्या प्रवाहातील असंख्य व्यक्ती जमिनीत अदृश्य असलेल्या मुळांसारख्या आहेत. बा ! बहुजन समाजा, तुला एकच प्रार्थना-आपल्या या मुळांस विसरू नकोस, नाकारू नकोस, झिडकारू नकोस. जर असा वागलास तर तुझे असणे आणि नसणे सारखेच होईल !!


संदर्भ- बळीवंश , लेखक डॉ. आ. ह. साळुंखे सर.





बळी हा कुलस्वामी -क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले.




क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले यांनी दस्युचा पोवाडा म्हणून जो पोवाडा लिहिला आहे, त्याच्या तिसऱ्या कडव्याची सुरुवातच त्यांनी ‘बळी राज्यादी कुळस्वमिला’ या शब्दांनी केली आहे. येथे ‘राज्यादी’ हा शब्द ‘राजादी’ या अर्थाने आला आहे. कारण, बळीच्या राज्याला कुळस्वामी म्हणणे, हे आशयाच्या दृष्टीने जुळत नही. याउलट बळीराजाचा तसं निर्देश करणे हे मात्र पूर्णपणे सुसंगत ठरते. क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले बळीराजाला कुलस्वामी मानतात, याचाच अर्थ ते त्याला आपला अत्यंत आदरणीय पूर्वज मानतात. या उल्लेखाद्वारे ते एक प्रकारे बळीराजाबरोबरचे आपले नातेच सांगून टाकतात. कुळस्वामिकडे हल्ली देवता म्हणून पहिले जात असले, तरी कुळस्वामी म्हणजे मूळ पुरुष, हाच खराखुरा अर्थ आहे, हे आपण ध्यानात घेतले पाहिजे.


 


|| बळीराजा ||

 

आमुच्या देशीचे अतुल स्वामी वीर ||
होते रणधीर ||मरुत्यास ||
बळीस्थानी आले शूर भैरोबा ||
खंडोबा,जोतिबा || महासुभा ||१||

सद् गुणी पुतळा राजा मुळ बळी ||
दशहरा,दिवाळी ||आठविती ||२||

क्षत्रिय भार्या "इडा पीडा जाओ ||
बळी राज्य येवो "||अशा का बा ?||३||

आर्य भट आले,सुवर्ण लुटिले ||
क्षत्री दास केले ||बापमत्ता ||४||

वामन का घाली बळी रसातळी ||
प्रश्न जोतीमाळी ||करी भटा ||५||

 

- क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले.


 


बळीराजा हा बहुजन असल्यामुळे वामनाने त्याला पाताळात घातले म्हणजेच कपटाने ठार केले. आणि आपणही वामनाची पूजा करून बळी चा धिक्कार करतो. उठा बहुजानानो, जागे व्हा आणि बळीच्या स्मृतीना पालवी फुटू द्या. आज ही बहुजन समाजातील स्रिया प्रत्येक बलीप्रतीपदे दिवशी आपल्या पुरुषांना ओवळताना इडा पिडा टळो बळीचे राज्य येवो असे का म्हणत आहेत? परंतू अजून पर्यंत आपल्या देशातील पुरुषांना हा प्रश्न पडला नाही कि आपल्या स्त्रीया इडा पिडा टळो बळीचे राज्य येवो असे का बोलत आहेत?? मित्रांनो याची उत्तरे आम्हास च शोधावी लागणार आहेत. आज बळीपूजनाच्या निमित्ताने बळीराजाचे स्मरण करुया व बळीराष्ट्राच्यानिर्म­तीचा निर्धार करुया. 



इडा पिडा टाळू दे ! बळी राज्याचं राज्य येऊ दे !!



संदर्भ- बळीवंश- अ.वा.साळुखे सर.


लेखं संपादन- निलेश रजनी भास्कर कळसकर(प्रबोधन टीम) 

5 comments:

  1. बळीराजाचा वापर ब्राह्मणद्वेषासाठी वापरण्यास सुरुवात केली ती ज्योतिबा फुले यांनी त्यापूर्वी बळीराजाचा प्रसार फार नव्हता स्त्रिया इडापिडा टळो व बळीचे राज्य येवो असे म्हणायच्या पण हा बळी कोण आणि बळीचे राज्य म्हणजे काय याची फारशी कल्पना नसायची एक कर्मकांड म्हणून त्या तसे म्हणायच्या बळी हा राक्षसांचा राजा आणि वामन हा विष्णूचा अवतार म्हणजे ब्राह्मण या कल्पनेतून ज्योतिबा फुले आणि तथाकथित सत्यशोधकानी बळीला ब्राह्मणद्वेषाचे प्रतिक म्हणून वापरण्यास सुरुवात केली
    वास्तविक बळी आणि वामन या दोघांचाही पूर्वज एकच तो म्हणजे कश्यप ऋषी प्रजापती दक्षाने आपल्या १३ मुली कश्यप ऋषीला दिल्या त्यातील कश्यप व अदिती यांची मुले म्हणजे देव (विष्णू) कश्यप व दिती यांची मुले म्हणजे राक्षस कश्यपास इतर बायकांपासून झालेली मुले म्हणजे नाग गरुड दानव इ म्हणजे देव राक्षस नाग गरूड दानव वैगेरे म्हणजे हिंदू धर्मातील सर्वजण प्रथम ब्राह्मण
    कश्यप व आदिती यांची वंशावळ विष्णू त्याचे अवतार मत्स्य कूर्म वराह नारसिंव्ह वामन परशुराम इ
    कश्यप व दिति यांची वंशावळ हिरण्यकश्यपु व हिरण्याक्ष हिरण्यकश्यपु, प्रल्हाद विरोचन बळी
    हिरण्याक्षचा वध केला वराह अवताराने हिरण्यकश्यपुचा केला नारसिंव्ह अवताराने आणि बळीला पाताळामध्ये ढकलले ते वामनने हि जी काही लढाई होती ती एकाच घराण्यातील दोन शाखांची शिवाजी महाराजंच्या सातारा व कोल्हापूर घराण्यातील लढाईप्रमाणे त्यामुळे तुम्ही बळीचे जरूर गोडवे गा पण तो जन्माने ब्राह्मण होता हे लक्षात घेवून ब्राह्मण्द्वेशाचे प्रतिक म्हणून वापरणे मुर्खपनाचे आहे .

    ReplyDelete
    Replies
    1. DNA of Manuwadi not matching with Bali vanvshaj

      Delete
    2. सत्य मान्य करायला शिका जरा

      Delete
  2. लेखकाचे नांव चुकले आहे. डॉ.आ.ह.साळुंखे असं आहे.

    ReplyDelete

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...