शिवप्रतापदिन !!

शिवप्रतापदिनाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा... पराक्रमाच्या अखंड परंपरेला मानाचा मुजरा !!




जगाच्या इतिहासात अनेक राजे - महाराजे, सुलतान होऊन गेले आहेत. अर्थात यामध्ये मोठ्या प्रमाणात वंश परंपरा किंवा दगाबाजी करून झालेलेही अनेक जण होते. मात्र या सर्व राजे - महाराजे, आणि सुलतानांची आज आठवण ठेवली जाते. कोणत्या राजाची जयंती उत्साहात साजरी केली जाते ? अनेक राजे, सुलतान हे इतिहासात गडप झाले आहेत. मात्र एक जाणता राजा असा आहे की, ज्याची अनेक वर्षांपासून उत्साहात जयंती साजरी केली जाते. आणि तो राजा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज. कारण शिवाजी महाराज हे काही वंश परंपरेने राजे झाले नव्हते. इतिहास हा त्यांच्या शिवाय अधूरा आहे, कारण स्वत: शिवाजी महाराजांनीच इतिहास घडवलेला आहे.


 



मोघलशाही, आदिलशाहीमुळे खचून गेलेल्या इथल्या रयतेला लढायला शिकवलं ते शिवाजी महाराजांनी. चार शतकांपूर्वी आपल्या देशात खऱ्या अर्थानं जन्म झाला तो लोकशाहीचा. शिवाजी महाराजांचा शिवकाल हीच खरी लोकशाही. मावळ्यांच्या मदतीनं त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. शिवाजी महाराजांची दूरदृष्टी अफाट होती. स्वराज्य प्रबळ करण्यासाठी किल्ले आणि सागरी किल्ले महत्वाचे आहेत. हे त्यांनी हेरलं होतं. मात्र या सर्वांपेक्षा त्यांच्यातली जिद्द आणि गनिमी कावा आजही प्रेरणा देणारा आहे.


 


संपूर्ण शिवचरित्र हेच विविध पराक्रमांनी भारलेलं आहे. मात्र यात मैलाचा दगड ठरावा तो प्रतापगडच. कारण याच प्रतापगडाच्या पायथ्याशी जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारा इतिहास घडला. शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य चिरडून टाकण्यासाठी अफजल खान हजारो सैन्य, मोठं घोडदळ, अजस्त्र हत्ती, दारूगोळा घेऊन चालून आला होता. मात्र शिवाजी महाराजांनी युद्ध कलेचं मोठं उदाहरण इथं जगाला दाखवून दिलं. महाराजांनी मोठ्या चातूर्यानं खानाला निरोप पाठवून बोलणीसाठी प्रतापगडाच्या पायथ्याशी बोलावलं. अफजल खानाला वाटलं की, शिवाजी महाराज घाबरले. पण त्याच्या हे लक्षात आलं नाही की, तो आता महाराजांनी जो भाग कायम पायदळी तुडवलेला आहे, तिथंच तो चालला होता. एवढंच नव्हे तर हजारोंचे सैन्य घेऊन आलेल्या अफजल खानाला शेवटी दहा जण घेऊन महाराजांबरोबर बोलणी करण्यासाठी यावं लागलं. शिवाजी महाराजही दहा जणांसह खानाच्या भेटीला गेले.


 



राजे शामियान्यात आले बातचीत झाली आणि गळाभेटीसाठी राजे आणि खान पुढे सरसावले. जकडले राजांना आपल्या बाहुत. झाला दगा. मारला खानने खंजीर राजांच्या पाठीत, सदरा फाटला. चिलखत असल्यामुळे राजांना इजा झाली नाही. पुढे राजांनी चाल केली. घातला बिचवा पोटात आणि पापणी लवायच्या आत काढला खानचा कोथळा बाहेर. खान कलंडला. सय्यद बंडा राजांवर चाल करून आला पण जीवाजी महालेने त्याचा अचूक वेध घेतला.

 



खान स्वतःला सावरत शामियान्याच्या बाहेर जाऊन त्याच्या पालखीत पडला. खानाच्या भोयांनी पालखी उचलून पळण्याची लगबग सुरु केली पण... खानाला तोडीस तोड अशा धिप्पाड अंगाचा, एकाच वेळी अर्ध बकरं जागीच बसवणारा, चार पाय धरून घोडा उचलणारा, चिखलात रुतलेली तोफ एकटाच काढणारा, असा संभाजी कावजी समोर ठाकला. ओढले त्याने वार भोयाच्या पायावर, पालखी पडली. पुढचा वार झाला तो खानच्या मानेवर आणि स्वराज्यावर चालून आलेल्या संकटास गर्दीस मिळवले.


 


खानाचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णी खानाची तलवार धरून जवळच उभा होता तो शिवरायांवर वार करता झाला. वार राजेंच्या डोक्याला चाटून गेला. महाराज थोडक्यात बचावले. आणि महाराजांनी एकाच वारात त्यालाही गर्दीस मिळविले ही राजेंच्या आयुष्यतील त्यांच्यावर झालेली एकवेम जखम होती.

 



ही घटना म्हणजे महाराजांनी अफजल खानाचा वध केला, मोघलांची सगळी शक्ती शिवाजी महाराजांच्या विरोधात खर्ची पडली. मोघल साम्राज्य भारतातच अडकून पडलं. शिवाजी महाराज नसते तर मोघल साम्राज्याचा श्रीलंका, म्यानमार आणि त्याच्या पुढेही विस्तार झाला असता. मात्र शिवाजी महाराजांच्या शौर्यामुळं ही हिरवळ दूरवर पसरू शकली नाही.

 



वैरी मेला वैर संपले, या न्यायानं महाराजांनी अफजल खानाची प्रतापगडाच्या पायथ्याशी कबर बांधली. मात्र एकदा अफजल खानाचा वध केल्यानंतर त्याची कबर बांधण्याचा दिलदारपणा इतिहासात कुठे सापडणं शक्यच नाही. मात्र ही कबर म्हणजेही एक इशाराच होता. या स्वराज्यावर जर चालून आलात तर तुमचीही अशीच कबर खोदली जाईल, असा इशाराच महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी घालून दिला.

 



शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात मुस्लिमांनाही दुय्यम वागणूक नव्हती. सैन्यात आणि महाराजांच्या अंगरक्षकांमध्येही मुस्लिम होते. लढाईच्या वेळी महिला आणि त्यांच्या अब्रूचं रक्षण करण्याचा दंडकच घालून देण्यात आला होता. या मुळंच सर्व रयतेला हे आपलं राज्य वाटत होतं. हा राजा जनतेला जाणून घेणारा होता. जनतेलाही राजाचं प्रेम जाणवत होतं. त्यामुळंच हा राजा ‘जाणता राजा’ म्हटला

 


छञपती शिवरायांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला पण त्याच बरोबर छञपती शिवरायांवर उभ्या आयुष्यात पहिला वार करणार्या कृष्णा भास्कर कुलकर्णाचा पण शिरच्छेद केला !!

शिवप्रतापदिनाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा... पराक्रमाच्या अखंड परंपरेला मानाचा मुजरा !!





धन्यवाद- राज जाधव सर


संदर्भ- जीवन म्हस्के.

No comments:

Post a Comment

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...