फटक्यावर जो खर्च करता तो गरिब अनाथ व्यक्तीवर खर्च करा आणि त्याची दिवाळी साजरी करण्यासाठी तुम्ही मदत करा- सत्यशोधक सत्यपाल महाराज !!

फटक्यावर जो खर्च करता तो गरिब अनाथ व्यक्तीवर खर्च करा आणि त्याची दिवाळी साजरी करण्यासाठी तुम्ही मदत करा - सत्यशोधक सत्यपाल महाराज !!




लहानपणी चौथीला असताना दिवाळी च्या सुट्टी मध्ये मी सत्यपाल महाराज यांचे कीर्तन ऐकण्यास गेलो होतो. आज जसे लहान मुले एकदम पुढे जाऊन बसायचा प्रयत्न करतात तसा मी पण महाराजाच्या समोरच जाऊन बसलो. पारंपारिक कीर्तन प्रवचन यांच्या पेक्षा हे कीर्तन खूपच नवीन होते महाराज सात खंजिरी वाजवतात सर्व नवल होते माझ्यासाठी. सत्यपाल महाराज हे तुकडोजी महाराज यांचा प्रबोधनाचा वारसा चालवणारे महाराज.


 



कीर्तन सुरु झाले तुकाराम महाराज गाडगेबाबा तुकडोजी महाराज यांचे प्रबोधनाचे विचार महाराज समोर जमलेल्या तीस चाळीस हजार लोकांना विनोदी पद्धतीने आणि गावरान भाषेत सांगत होते. विषय दिवाळीचा आला मला महाराजांनी उठवले आणि विचारले ये पोऱ्या दिवाळी ला फटाके किती रुपयाचे आणले आहेस?? मी सांगितले २५० रुपयाचे आणले. त्यांनी विचारला फटाके फोडून किती वेळ मज्जा येते?? मी उत्तर दिले फटका फोडला आवाज झाला किंवा रॉकेट वर जाऊन फुटला कि तेव्हढी मज्जा येते. महाराजांनी मला सांगितले दिवाळी मध्ये अनेक घरात खायला अन्न नसत आणि तुम्ही लोक मोठा खर्च फटाक्या वर करता. तुझ्या २५० रुपये मध्ये ४ घराची दिवाळी साजरी झाली असती. या फटाक्याच्या आनंदात आपण आपल्या बाजूच्या गरीब शोषित लोकांच्या कडे लक्ष दिलेच नाही अशी मला तेव्हा भावना झाली. फटक्यावर जो खर्च करता तो गरिब अनाथ व्यक्तीवर खर्च करा आणि त्याची दिवाळी साजरी करण्यासाठी तुम्ही मदत करा... कोणाच्या घरात चूल पेटत नाही आणि बाबानो तुम्ही मोठा खर्च करून फटाके उडवता हा कुठला सण साजरा करतात??


 


मला ती गोष्ट त्या वयात खूप मनाला लागली मी फटके वाजविणे बंद केले....कोणाच्या घरात दिवाळीला गोडधोड बनत नाही कोण उपाशी असते याकडे माझी नजर तेव्हा पासून लागलेली असायची तेव्हा मी काही मोठी मदत करू शकायचो नाही पण आपल्या घरातील जे काही गोडधोड बनायचे त्या माझ्या मित्रासोबत वाटून घ्यायचो... सत्यपाल महाराज यांनी माझा दृष्टीकोन बदलून टाकला गरीब वंचित शोषित लोकांच्या कडे माझ्या मनात आत्मीयता निर्माण झाली.. मुख्य म्हणजे वायफळ खर्च टाळून आपल्या आनंदात या लोकांना सामावून घेण्याची वृत्ती तयार झाली.


 


आज दिवाळी मध्ये हजारो लाखो रुपयाची फटके आणून वाजवल्या जातात हे वाजवणारे लोक कोण आहेत त्यांनी एकदा आपल्या आनंदात दुसर्याला सहभागी करून घेतल्यावर जे काही समाधान आणि आनद भेटतो त्याचा अनुभव घ्यावा... आपल्या अवतीभवती अनेक उपाशी लोक आहेत आणि आपण गोडधोड खाचा खरच पटते का ?? अनावश्यक खर्च टाळून अनाथ गरीब मुलांच्या शिक्षणासाठी त्यांच्या कपड्या साठी खर्च करावा.. नक्कीच खूप वेगळा आनंद आपल्याला मिळेल... त्या वयात मला या गोष्टी ज्यांनी गावरान भाषेत विनोदी शैली आणि खऱ्या तळमळीने सांगितल्या त्या तुकडोजी महाराज यांच्या विचाराच्या वारसास म्हणजे सत्यपाल महाराज यांना मी कधी विसरू शकत नाही... त्यांनी माझ्या मधील माणुसकी अत्यंत लहान वयात जागी केली... महाराज खूप खूप धन्यवाद आज तुम्हाच्या मुळे मला हि दृष्टी आली !!



लेखं- भैया पाटील.

No comments:

Post a Comment

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...