आमच्या सर्व मुस्लिम तथा भारतीय बांधवांना रमजान ईदच्या मनापासून शुभेच्छा !!

आमच्या सर्व मुस्लिम तथा भारतीय बांधवांना रमजान ईदच्या मनापासून शुभेच्छा !!

 



 

पूर्वी 'ईद मुबारक' करायला गेलो कि अनेकांच्या भुवया उंचावायच्या पण आज-काल मला चांगले ओळखणारे (जन्माने हिंदू, बौद्ध व इतर बांधव) तसे करत नाहीत, उलट हसून "same to you" किंवा 'ईद मुबारक भाई..' म्हणत मिठी मारतात तेव्हा बरे वाटते. आपण लोकमानसिकतेत थोडाफार तरी बदल करू शकलो याचा आनंद होतो. आज एकाला 'ईदच्या' शुभेच्छा दिल्या तर तो कुत्सिततेने म्हणाला- "हा आपला सण नाही..." हे आपलं-तुपलं च गणित मला कधी समजलंच नाही, समजून घ्यायचंही नाही. समोरच्याने डोक्यावर 'गोल टोपी' घातलीये कि 'गांधी टोपी'? यापेक्षा त्या टोपीखाली असलेल्या डोक्यातील मेंदूने तो किती 'भारतीय' आहे, 'माणूस' आहे हे पाहणं मला जास्त आवडतं. आणि त्यालाच मी सलाम करतो.



 

वैचारिक प्रगल्भतेची पायरी चढताना मी कुण्या राजकीय नेत्याचे विखारी बोल समोर ठेऊन आज आज मुस्लिम समाजाकडे पाहत नाही, कारण मला त्या नेत्यांचे तसे करण्याचे मर्म समजलेले असते. मी माझ्या नजरेने आज 'मुस्लिम' या संकल्पनेकडे बघताना मला त्यात शिवरायांसोबत स्वराज्यासाठी लढलेला 'मावळा' दिसतो, भारताचे लोकप्रिय माजी राष्ट्रपती आणि थोर शास्त्रज्ञ ए.पी.जे.अब्दुल कलाम दिसतात, ज्याच्यामागे धावताना आणि ज्याचे चित्रपट पाहण्यासाठी कुठलीही धडपड करायला तयार असणाऱ्या तरुणपिढीचे नायक सलमान खान, शाहरुख खान दिसतात, नेहमी 'हा इस्लामचा' म्हणून ज्याच्याकडे पाठ फिरवली, नाकं मुरडली जातात तोच 'हिरवा' रंग आज पावसाळी वातावरणात मला आपलासा वाटतो, याच 'हिरवळीत' मी आणि माझा अवघा मित्र परिवार हरवून जातो, नजरेत आणि कॅमेरात त्याला बंदिस्त करायला आमचे वीकेंड्स पणाला लावतो..कारण सर्वशक्तिमान निसर्गाने हा रंग वा मुस्लिम स्त्री-पुरुषाला जन्माला घालताना कोणताच भेदभाव केलेला नसतो, मग आम्ही तो करणारे कोण ??



 

धर्म अन जातीचा बुरखा फाडून आत जो उरतो तो फक्त माणूस असतो.. त्याला फक्त 'माणूस' म्हणूनच ओळखले जाते.. गरज आहे हे बुरखे फाडण्याची आणि आतल्या माणसाला जवळ करण्याची !!


 

फेसबुकचा वापर समाज-देश हितासाठीही किती चांगला होवू शकतो, ते आज पहायला मिळतंय. तमाम अन्य धर्मीय बांधव मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देताहेत.. आता दिवाळी-नाताळला फेसबुकवरील मुस्लिम बांधवांनी याची परतफेड करावी.. देशातील जातीय-धार्मिक एकोपा-सलोखा यातूनच तर कायम राहणार आहे !!



लेखं- गौरव गायकवाड(सोबत प्रबोधन टीम), रविंद्र पोखरकर.

No comments:

Post a Comment

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...