छत्रपती शिवाजीराजे शहाजीराजे भोसले !!

छत्रपती शिवाजीराजे शहाजीराजे भोसले !!




छत्रपती शिवाजी राजे हे स्वतः त्यांच्या हयातीत देखील कुण्या एका जातीचे कधीच झाले नाहीत. त्यांनी स्वतःला तसे कधी होऊ दिले नाही. याला कारण म्हणजे जिजाऊ मांसाहेबांचे त्यांच्यावर तसे संस्कारच होते. जिजाउंच्या स्वप्नातील 'स्वराज्य' म्हणजे केवळ मुगल, आदिलशाही वा निजामांच्या विरोधातील लढाई नव्हतीच; तर त्यासोबत आपलं एक असं राज्य असावं जिथे समाजाने व धर्मग्रंथांनी झिडकारलेल्या प्रत्येकाला मान असावा. प्रत्येकाकडे पाहताना त्याची जात-धर्म पाहून नव्हे तर त्याच्यातील प्रामाणिकपणा, निष्ठा आणि कौशल्य व सर्वांत आधी तो आपल्यासारखाच एक 'माणूस' आहे म्हणून पहावे हे ते संस्कार होत. आणि याचेच कारण कि शिवरायांनी आपल्या मावळ्यांत जाती-पातीचा भेद ठेवला नव्हता. त्यांच्या मावळ्यांत ब्राह्मण, मराठा,कुणबी यांसारख्या हिंदू धर्मग्रंथानुसार उच्च जातींसोबतच महार(जिवा महार ज्याचा पुढे जाणूनबुजून 'जिवा महाला' केला गेला) ,मातंग, चांभार, ढोर यांसारख्या तत्कालीन अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जातीतील लोक सुद्धा मानाने जगत होते, ज्यात कित्येक मुस्लिम मावळे सुद्धा होते. (शिवरायांच्या अंगरक्षकांत ३४% मावळे हे मुस्लिम असत). हे सगळे मानाने जगत होते कारण त्यांच्या डोक्यावर मानवतेचं, माणूसकीच एक प्रेमळ छत्र होतं आणि त्या छत्राचा पती होता एक कनवाळू लोकराजा.. तोच खरा 'छत्रपती'.. शिवाजीराजे शहाजीराजे भोसले.




 

मग प्रत्यक्ष मनुस्मृतीला आवाहन देणारं हे महाराजांचं 'स्वराज्य' मनुवाद्यांना पचनी कसे बरे पडेल..?? आणि म्हणूनच शिवइतिहासकार वा 'शिवशाहिरा'चा बुरखा पांघरून अनेकांनी शिवरायांचे स्वराज्य हे 'हिंदू विरुद्ध मुस्लिम' असे होते किंवा शिवाजीराजे हे एक 'मराठा' राजे होते अशी आवई उठवून जाती-जातीत तेढ निर्माण करण्याची धडपड केली आणि नेहमीप्रमाणे खरा इतिहास झाकण्याचा प्रयत्न केला, पण 'सूर्य आणि सत्य कितीही झाकले तरी प्रकाशमान होणारच' या उक्तीप्रमाणे आज खरा इतिहास बाहेर येतोय..लोक जागे होतायत.




 

'मराठा तितुका मेळवावा' म्हणताना महाराजांच्या डोळ्यापुढे 'मराठा' जात कधीच नव्हती तर "स्वराज्यातील' महाराष्ट्र निर्मिताना जो प्राणपणाने त्यासाठी लढू शकेल असा 'मराठी मातृभाषा असणारा महाराष्ट्रीय' मावळा होता, ज्याला जातीचं बंधन कधीच नव्हतं आणि म्हणूनच स्वराज्यासाठी बाजीप्रभू देशपांडे यांसोबत जिवा महार सुद्धा प्राणपणाने लढू शकला होता हे लक्षात घ्यावे.


 


महापुरुष हा सबंध मानवजातीचा असतो. मानवाने कुत्सित बुद्धीने व वर्चस्वाच्या भावनेने निर्माण केलेल्या कुण्या एका 'जातीचा' कधीच नसतो हे ध्यानात असू द्यावे.








 


बाकी आम्हाला एका बाबासाहेबांचं statement चांगले आठवते, कि - 'शिवाजी हा भारतातील पहिला बहुजनांचा राजा होता, आम्हाला त्यांचा आदर वाटतो." आणि हे बाबासाहेब कुणी साधे वा स्वघोषित बाबासाहेब नव्हते तर ते विश्ववंदनीय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर होत.


 


तेव्हा खरा इतिहास जाणून घ्या.. कारण इतिहास जर चांगल्या प्रकारे माहित असेल तर भविष्य चांगल्याप्रकारे घडवता येईल.



 

लेखं- गौरव गायकवाड(सोबत प्रबोधन टीम)

No comments:

Post a Comment

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...