परिवर्तनाच्या चळवळीत काम करणाऱ्यासाठी मित्रत्वाचा संदेश !!

परिवर्तनाच्या चळवळीत काम करणाऱ्यासाठी मित्रत्वाचा संदेश !!




आपल्या परिवर्तनवादी विचारांच्या तरुणांचा मला प्रचंड आदर वाटतो. पण बर्याचदा काही जण भरकटलेली विधानं करतात. आपला लढा वैचारिक आणि कृतीशील आहे की कट्टरवादी आणि बालिश आहे यात गल्लत करतात. अशी गल्लत माझीही होते. पण मग ती आपण सुधारायला हवी का नको ??


मागे मी एक विधान वाचलं,





'बाबासाहेबांनी दाखवलं एकच बोट,
भटबामणं सगळी भिकारचोट !'




मी त्याला मेसेज केला, असलं कायतरी खुळचट टाकू नकोस, तर तो म्हणाला, असल्यांना असच हाणलं पाहिजे. बराच वितंडा झाला.


 

अशाने आपण आपल्याचबद्दल गैरसमज पसरवतो. निष्कलंक जगण्याच्या दोन पध्दती, एक कुणाला आपल्यावर बोट ठेवायला जागा द्यायची नाही, आणि दोन कुणी विनाकारण बोट उचललं तर त्याला सोडायचं नाही.


निरंजन लांडगे, डॉ. सुनील यादव, गौरव गायकवाड, निलेश कळसकर, शंकर माने आणि असे अनेक परिवर्तनवादी तरुण संदर्भपूर्ण मांडणी करतात, जिथे निकोप चर्चा होते. वाद झाले तरी ते सत्याग्रही असतात. पण विनाकारण उपरोक्त विधानांसारखी विधानं करुन आपण आपल्याबद्दल अपमान का निर्माण करुन घ्या?






बाबासाहेबांनी असं कधीच कुठे म्हटलेले नाही. सगळेच ब्राम्हण परिवर्तनाच्या विरोधात नाहीत. ब्राम्हणत्वाच्या वर्णवर्चस्वाने मनुवाद जन्मला हे सत्य बुध्दिवादी ब्राम्हण नाकारत नाहीत. पण मनुवाद जास्त कुणी पोसला असेल तर तो ब्राम्हणेतरांनीच. आपण ब्राम्हण पुजार्यांना ज्योतिषांना विरोध करतो तेव्हा त्यांच्या या व्यवसायांना शरण गेलेले ब्राम्हणेतरच मी जास्त दोषी ठरवेन. परिवर्तन म्हणजे आपल्याला अशा लोकांच्या मानसिकतेत बदल करणं अपेक्षित आहे. अन्याय सहन करणारा जास्त दोषी असतो हे बाबासाहेबांचं प्रतिपादन खूप काही शिकवतं.


 

मला एवढच वाटतं की आपण आपली प्रतिमा विनाकारण खराब करु नये, हिंदुत्ववाद्यांची समस्त मुस्लिमद्वेषाची भूमिका आणि अशा विधानांना दुजोरा देत समस्त ब्राम्हणद्वेषाची भूमिका यात फरक काय उरतो मग?


 

कारण मनुवादी किंवा वर्णवर्चस्ववादी फक्त ब्राम्हणच आहेत असे नाहीये.


 

ध्येयवेडं असणं ही चांगली गोष्ट आहे, पण ध्येयापोटी वेडगळ विधानं आणि कृती ही ध्येयाला बाधक ठरते.




 

विचार - डॉ आशिष तांबे(सोबत प्रबोधन टीम)

No comments:

Post a Comment

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...