प्रत्येक अतिरेकी कारवाईवेळी मुसलमानांनाच दोषी ठरवणं हा देखील अतिरेकच आहे !!
कधी नव्हे ते पवारसाहेबांचं पटलं आपल्याला, आता ती मतांची राजकीय खेळी वगैरे असणं ओघाने आलच, पण मुद्दा काय? त्यांनी मांडलेला मुद्दा !
शुक्रवार या दिवशी कुठला मुसलमान अतिरेकी मशिदीत बॉम्बस्फोट करेल का ? देशात कुठेही अतिरेकी कारवाई झाली की संशयित म्हणून जे पकडले जातात ते मुसलमानच! मग तो स्फोट शुक्रवारी मशिदीत का झाला असेना. अतिरेक हा वाईटच ! कुणाचा का असेना ! अगदी माझाही ! प्रत्येकाचा ! अतिरेकाला मापदंड नसतो, नसावाच.
म्हणूनच. प्रत्येक अतिरेकी कारवाईवेळी स्फोटावेळी मुसलमानांनाच दोषी ठरवणं हा देखील अतिरेकच आहे.
मागे कुणीतरी पोस्ट केलं होतं. मलाही तेच वाटतं. माझं कुणीतरी एखाद्या रेखाचित्रकाराकडे वर्णन करावं आणि मला न पाहता, माझं वर्णन सांगणार्याची बुध्दी पातळी आणि रेखाचित्रकाराची बुद्धीपातळी कमाल मर्यादेवर एकत्र येऊन माझं डिट्टो चित्र काढावं, मी म्हणाल ती पैज हारेन.
स्फोट झाला रे झाला की अशी रेखाचित्र प्रसिद्ध होतात, यांची उपयुक्तता तपासायला हवी. बरं लगेच दोघांना चौघांना अटक होते. मग संपूर्ण तपासाला दोनपासून वीसपर्यंत किती वर्ष लागतील याची खात्री नाही. मग अशावेळी एखाद्या निरपराध्याला केवळ त्याच्या धर्मामुळे सजा भोगावी लागली तर तो एका अतिरेकाच्या प्रतिक्रियास्वरुप अतिरेक आहे असे मी मानेन.
मला जर अशी विनाकारण प्रदीर्घ शिक्षा झाली तर मला एकेकाला गोळ्या घालून ठार करावं वाटणं मी अतिशय स्वाभाविक मानतो.
अतिरेकाला जात धर्म नसतो. आपण अतिरेकाला एक धर्म चिकटवलाय, मुळात हा आपलाचा अतिरेक आहे. एका कृष्णा भास्कर कुलकर्णीमुळे मी संपूर्ण ब्राम्हणांना पिंजऱ्यात उभं करणार नाही. तो माझ्या बुध्दीचा अतिरेक ठरेल, तसच सीमेपारच्या काही कट्टरवाद्यांमुळे मी आख्खा इस्लाम दोषी ठरवणार नाही.
मी कुठल्याही दहशतवादाचा पाठीराखा नाही. मुस्लिम मदरश्यांमधून जसे कट्टरवादाचे धडे दिले जातात तसे आपणही कट्टरवादाचे धडे घेतोच की. आपण काय फक्त कट्टरवाद कट्टरवाद खेळत राहायचं का? यामागचं राजकारण तुमच्या का लक्षात येत नाही? तुमची नेमकी भूमिका काय आहे? तुम्ही इस्लामी दाम्पत्त्याच्या पोटी जन्मलेल्या नवजात अर्भकाचाही द्वेषच करणार का? तुम्ही अभिमान हा शब्द वापरलात. जावेद शेख नावाचा माझा एक मित्र पंजाब बॉर्डरवर आहे, मला त्याचा अभिमान आहे. आता तुम्ही विचाराल असे किती? तर पहा मला टक्केवारीशी काही घेणं देणं नाही. सैन्यात एकही मुस्लिम नाही का? आझाद हिंद सेनेचे बहुतांशी रेजिमेंटप्रमुख मुस्लिम होते. अब्दुल हमीद अब्दुल कलाम हे भारतीय नाहीत का? काही मुस्लिम दहशतवादी आहेत तसे काही हिंदूही आहेत, वर त्यातील काहींची नावेही आलीत. मुस्लिम कट्टरवादी म्हणणार हिंदू मुस्लिमांवर जुलूम करतायत, हिंदू कट्टरवादी मुस्लिमांबाबत हे बोलणार, मग आपण काय आजन्म कट्टरवाद कट्टरवादच खेळत राहायचं का? शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न.
वर्णव्यवस्था कायम टिकवून उच्चवर्णीय छुपा आतंकवाद खेळत आहे त्याबद्दल तुमचे मत काय आहे?? हे कृत्य तर आतंकावादाच्या कृत्यापेक्षाही भयंकर कृत्य आहे. काही फ़क्त नालायक लोकांमुळे सर्वानाच वाईट ठरवीता येत नाही. आम्ही जर आमच्याच भारताच्या ईतिहासात ढुंकुन पाहीले तर उचचवर्णीयासारखे अतिरेकी आम्हाला जगात कुठेच पहायला आणि वाचायला मिळनार नाही.
अत्यंत दुर्दैव आहे.असं चित्र उभं केलं जातं की मुसलमान म्हणजे अतिरेकी मग मालेगाव मधील पांडे, नांदेड मधील पुरण्याला सापडलेले अतिरेकी मुसलमान होते काय ? इंदिरा गांधींना कोणी मुसलमानाने मारले काय ? महात्मा गांधींना कोणी मुसलमानाने मारले काय ? राजीव गांधींना कोणी मुसलमानाने मारले काय ? काय चाललंय काय ? अरे अतिरेकींना जात- धर्म नसतो. जे मुसलमान अतिरेकी असतील त्यांना भर चौकात ठेचुन मारा पण या देशावर प्रेम करणार्या सर्वसामान्य मुसलमानांचा त्या अतिरेक्यांशी काय संबंध ? हि भुमिका आपन समजुन घेतली पाहिजे.
प्रिय मित्र-मैत्रिणीनो एक धर्मांधता दुसर्या धर्मांधतेला जन्म देते. अतिरेक्यांना जन्म घालते. देशातील तरुणांनी धर्मांधतेकडे वळू नये. धर्मनिरपेक्षवाद हाच आपल्या देशाचा मुख्य पाया आहे.
नोट- उपरोक्त मत सर्वांना पटावं असा माझा अजिबात आग्रह नाही. ज्याला योग्य वाटतं त्याने स्वीकारा ज्याला अयोग्य वाटतं त्याने सोडून द्या. मी माझ्या मतांवर ठाम आहे.
IT IS RALITY
ReplyDelete