डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या मृत्यूने महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचा आवाज हरवला !!

 डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या मृत्यूने महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचा आवाज हरवला !!





काल अंधश्रधेच्या विरोधात कार्य करणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून झाला. ज्याने त्यांचा खून केला असेल त्याला सुद्धा माहित नसेल कि तो काय करतोय आणि त्यामागे नक्की काय तर्क आहे. दुर्दैवाने त्यांच्या मारेकर्यांची जी बौद्धिक स्थिती आहे तीच बहुसंख्य अशा स्वता:ला धार्मिक म्हणून घेणाऱ्या लोकांची दिसून येते. अंधश्रद्धानिर्मूलनाच्या संदर्भातील डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे कार्याने खरे पाहता हिंदू धर्मावरील लोकांची आस्था वाढवण्याचेच काम केले असते कारण अंधश्रधा आणि इतर निरर्थक गोष्टी वजा करून राहिलेला हिंदू धर्माचे रूप नक्कीच लोकांना भावले असते आणि शिकलेल्या आणि कार्यकारणभावाने जीवन जगणाऱ्या लोकांना सुद्धा आकर्षित किवा जोडून ठेवण्याचे काम आपोआप झाले असते. परंतु हे माहित असून सुद्धा त्यांचा खून झाला हे लक्षात घेण्यासारखे आहे. आणि म्हणून वेळ आली आहे देव, धर्म, श्रद्धा सारख्या गोष्टींमध्ये बावळट मेंढरानसारखे राहून चालणार नाही.




धर्माचे ठेकेदार मग ते कोणत्याही धर्माचे असोत उदा. पुजारी, धर्मगुरू, पदरी ज्यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून घडून आणला यांना खरे पाहता तुमच्या श्रद्धा, देव, अध्यात्मिक उन्नती सारख्या गोष्टींशी खरे तर काहीही घेणे देणे नसते. त्यांचा स्वार्थ असतो तो दोन गोष्टीत. १. तुमचा पैसा, २. धर्माच्या नावाखाली आपोआप मिळणारी सत्ता आणि दहशतवाद. पैसा - हा मुद्दा समजण्यासाठी सोपा आहे. धार्मिक स्थळे उदा. मंदिर, मस्जिद इ. ठिकाणी असणारी दुकाने, पूजा अर्चा द्वारे निर्माण होणारी आर्थिक उलाढाली, संस्थानाला मिळणारी प्रचंड अशी देणगी. या गोष्टी सर्वसामान्य वाचनातून जास्त विचार न करताहि समजू शकतो.

 



धर्माच्या नावाखाली आपोआप मिळणारी सत्ता आणि दहशतवाद - हा मुद्दा बरेच वेळा भोळ्या भाबड्या लोकांना समजत नाही. किवा समजून येण्यासाठी जी लागणरा दृष्टीकोन प्राप्त होत नाही. विविध कर्मकड, अनुष्ठानद्वारे विशिष्ठ समाजाला किवा समूहाला एक प्रकारचे गुलामच बनवले जाते. असे गुलाम कि जे स्वता:च्या बुद्धीचा किवा कार्यकारणभावाचा वापर न करता या धर्मगुरूंच्या किवा पुरोहितवर्गाच्या प्रत्येक गोष्टीला हो ला हो करतात. या गुलामांत भावनिक लोक, स्त्रिया, निरक्षित किवा कमी शिक्षित लोक जास्त असतात ज्यांची संख्या भारतासारख्या विकसनशील देशात अजूनही जास्त आहे. एकदा अशा प्रकारे लोकांच्या बुद्धीचा दोर हातात आला कि मग तो वर्ग नेहमी आपल्या हातातच कसा राहील (Control) याचा विचार या धर्मागुरुना असतो तुमचाच पैसा मग तुम्हाला आणखी आणखी मानसिक गुलाम बनवण्यासाठी वापरला जातो. नवनवीन कल्पना शोधून तुमचा कष्टाने मिळवलेला पैसा गोळा केला जातो आणखी अशा मानसिक गुलामाची संख्या कशी वाढवता येईल या साठी प्रयत्न केला जातात. हे करताना देवाचे, धर्माचे आणि अध्यात्मिक जीवनाचे दाखले देऊन गुलाम बनवण्याची प्रक्रियाला सुखाच्या साखरेचा मुलामा दिला जातो जो एकतर कधी लक्षात येत नाही किवा लक्षात आल्यावर बरीच वेळ निघून गेलेली असते.

 



मग दाभोलकर सारख्या सामाजिक जाणिवेचे भान असलेल्या लोकानी या विरुद्ध आवाज उठवला तर मग त्यांना दाबण्यासाठी धार्मिक दहशदवाद निर्माण केला जातो. लोकांच्या भावनांना भडकावले जाते, धर्म धोक्यात आहे असे सांगून दहशतवादी निर्माण केलेलं जातात दहशत निर्माण केली जाते. आणि एकमेकांचा खून करण्यासाठी परावृत्त केले जातात. लक्षात घेतले पाहिजे कि हे धर्मगुरू स्वत कधीच लढत नाहीत ते त्यांनी बनवलेले असे दहशतवादी लढतात ज्यांचे विचार परिपक्व नसतात किवा अध्यात्माचा खरा अर्थ त्यांना समजण्याआधीच त्यांच्या विचारांना एकाच विशिष्ट पद्धतीने विकसित केले जाते ज्याला मानसशास्त्रात Brain Wash म्हणतात. मित्रानो, आपल्या श्रद्धेप्रमाणे परमेश्वराचे चिंतन करणे वाईट नाही परंतु हे करत असताना आपल्या बुद्धीच्या दोऱ्या इतर कोणाकडेही देऊ नयेत तथाकथित धर्मगुरूंकडे देऊ नयेत. कळत नकळत त्या गुलाम मेंढर होऊ नयेत, ज्यांना हे माहित असते कि आपला मेंढपाळ कधी न कधी आपल्याला खाटिकाकडे नेणार आहे परंतु तरीही त्याच्च्या मागेच जात असतात. देवाच्या प्राप्तीसाठी तुम्हाला मेंढपालची गरज नाही कि कोणत्या मंदिराची कि तीर्थस्थानाची. आपले शरीर हे मंदिर आणि आपला आत्मा हाच देव. (BY-Kiran Shinde)


 


महाराष्ट्रातील सांस्कृतिक दहशतवादाचे केंद्र असलेल्या पुण्यात डॉ नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करण्यात आली! भारतामध्ये पुरोगामी नावलौकिक असलेल्या महाराष्ट्रात विचारवंताची आणि समाजसुधारकांची हत्या होणे हे काही नवीन नाही ! महाराष्ट्रात पुणे हेच कटकारस्थानाचे केंद्र बनलेले आहे असेच चित्र दिसत आहे.

 



राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (R.S.S) आणि सनातनी वैदिकांना विरोधाला न जुमानता  डॉ नरेंद्र दाभोलकर यांनी नेहमीच अंधश्रद्धा निपटून काढण्यासाठी आपले प्रयत्न चालूच ठेवले. त्यांचे कार्य खरे तर शोषित, दिन-दुबळ्या गरीब लोकांना अंधश्रद्धधेपासून वाचविण्यासाठी चालले होते. त्याला धर्मांद सनातनी लोकांचा नेहमीच विरोध होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्लेही चढवले होते हे आपण विसरता कामा नये ! जेव्हा जेव्हा महाराष्ट्रातील समाजसुधारकांनी आणि विचारवंतांनी  प्रयत्न केले तेव्हा त्यांच्यावर प्राणघातक हल्ले करण्यात आले. मग महात्मा गांधी, महामानव डॉ आंबेडकर, क्रांतिसूर्य महात्मा फुले, सावित्रीआई फुले, राजर्षी शाहू यांची संघर्ष कहाणी आणि उदाहरणे आपल्याला हेच दर्शवितात. काही इतिहासकारांनी छत्रपती शिवरायांना आणि आद्य समाजसुधारक संत तुकाराम यांना याच सनातन्यांनी मारले असे संशोधन पुढे आणले आहे. हेच वास्तव आहे मित्रानो !

 



दाभोलकर यांच्या मृत्युने आणि या गंभीर अश्या घटनेने पुन्ह एकदा आपल्या सर्वांना इतिहास पड़ताळनि करण्यास भाग पाड़ले आहे ! ऐतिहासिक पुरावे आणि महत्वपूर्ण असे घडामोडी आपन इथे पाहुयात !

 



राजर्षि शाहूमहाराज यांच्यावरील हल्ले-


 



राजर्षि शाहूमहाराज जे शोषित जनतेसाठी आणि त्यांच्या उन्नतीसाठी आपले सर्व जीवन जगले यांच्यावर सुद्धा याच प्रवृत्तिच्या सनातन्यानी अनेक प्राणघातक हल्ले चढवले होते ! वेदोक्ताच्या संघर्षत फेरिस यांनी शाहू महाराजांना साथ दिली म्हणून कोल्हापुर मधील अणि पुण्यातील वैदिक धर्मीय ब्रम्हनानी १६ एप्रिल १९०८ रोजी, फेरिस रेल्वेने प्रवास करीत असताना दामू जोशी नावाच्या दहशत वाद्याने पिस्तूल रोखून गोळ्या झाडल्या. या घटनेनंतर तीनच महिन्यांनी खुद्द शाहू महाराजाणा रस्त्यात बोंम्ब ने उडवून देण्याचा आणखी एक प्रयत्न करण्यात आला ! अंगावर काटा येतो मित्रानो आशा गोष्टी वाचून ! महापुरुषाना काटेरी मार्ग पत्करावे लागतात ! पुढेही महाराजांच्या जीवनाच्या अंतापर्यंत त्यांचा जिव घेण्यासाठी सनातनी वैदिक दहशात्वाद्यानी त्यांचा पिच्चा पुरावालेला दिसून येतो ! जिव घेणे हे सनातनी वैदिकांचे अगदी सोपे कामच होते हेच यावरून दिसते !

 

महात्मा फुले आणि सावित्रीआई फुले यांच्यावरील हल्ले-


 



महात्मा फुले यांचे समाजप्रबोधनाचे आणि समाज सुधारणेचे काम पाहून त्यांचा विरोधक आणि सनातनी दहशतवादी चिपळूणकर याने  राष्ट्रपिता फुलेँना मारण्यास व त्यांचा जिवघेण्यास मारेकरीना पैसे दिले.  म्हणजे यांचे मनसूबे भयंकर होते, आहेत आणि राहणार !


 


जेव्हा स्त्री-शिक्षणाची सुरवात सावित्रीआई फुले आणि महात्मा फुले यांनी केली तेव्हा देखील सावित्रीआई वर दगड धोंडे आणि चिखल फेकून याच सनातन्यानी जखमी केले. यांना आजही सावित्रीआई ची महती कळलेली नाहीये ! सावित्रीआई मुळेच आज आपली कल्पना चावला अंतराळत गेली आहे याचा विसर यांना पडत आहे ! शेवटी मनुचिच पिल्ले ही !

  

गांधीहत्या आणि नाथूराम गोडसे -


 




महात्मा गांधी यांची हत्या भरदिवसा गोळी मारून नथूराम गोडसे नामक एक माथेफिरुने केलि. मित्रहो वरील उदाहरणे काय दर्शवितात ? कुठे आहोत आपण ? विसाव्या शतकाच्या सुरवातीस हीच परिस्थिती होती. त्यावेळीही मनुचीच पिल्ले होती ! आणि आताही तेच आहेत . पुरोगामी महाराष्ट्राची लचके तोडत आहेत ! भरदिवसा खून करीत आहेत ! थांबणार कधी हे ?

  

डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या पत्नी डॉ. शैला दाभोलकर यांच्या प्रतिक्रिया-






डॉ. दाभोलकर यांच्यासोबत मी गेली अनेक वर्षे सहकारी म्हणून काम केले. मी कधीच त्यांच्यासोबत फोटोसेशनसाठी उभी राहिले नाही. आज तुम्ही आला आहात तर फक्त फोटोसेशन होईल. अंधश्रद्धा निर्मूलनाचे जादूटोणा विरोधी विधेयक मंजूर व्हावे, यासाठी डॉ. दाभोलकर हे तुमच्या दालनासमोर तासन्‌-तास ताटकळत बसत होते तरी तुमची भेट होत नव्हती. सामाजिक हितासाठी जीवनभर तळमळीने आणि समर्पितपणे कार्य करणाऱ्या माझ्या पतीला व्यक्तिगत काहीच नको होते. डॉ. दाभोलकर यांच्या अकाली जाण्याने पुरोगामी चळवळीची मोठी हानी झाली आहे. निदान आता तरी त्यांची अखेरची इच्छा म्हणून जादूटोणा विरोधी विधेयक मंजूर करून महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचाच असल्याचे आपल्या कृतीतून दाखवा.


 

-  डॉ. दाभोलकर यांच्या पत्नी डॉ. शैला दाभोलकर यांचा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण , गृहमंत्री आर. आर. पाटील, संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील व सातारचे पालकमंत्री शशिकांत शिंदे यांना हा निरोप आहे.


 



आज डॉ दाभोलकर यांच्या खुनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेते मगरीचे अश्रू रडून दाखवत आहेत. पण जेव्हा नरेंद्र दाभोळकर सर आणि श्याम मानव सर अंधश्रद्धा विरोधी विधयेक लागू करा म्हणून या राजकीय नेत्यांच्या कडे जाऊन त्यांची मनधरणी करत होते तेव्हा हे राजकीय लोक अंधश्रद्धा विधयक लागू करत नव्हते. महाराष्ट्रात ६ महिने ते १० वर्ष पर्यंतच्या मुलाचा बळी मुलप्राप्ती आणि धनप्राप्तीसाठी करण्यात येत होता तरीही सरकार बुवा बाबाच्या बाजूने उभे राहिले होते?? शिवसेनेचे नेते दिवाकर रावते हे तर अत्यंत घाणेरड्या भाषेत दाभोळकर यांच्यावर टीका करायचे. भाजपा हि भोंदूगिरी आणि अंधश्रद्धेच्या सोबत राहिली तिने हि दाभोळकर ला त्रास दिला. राष्ट्रवादी कॉंग्रेस स्वता:ला पुरोगामी म्हणायची पण अंधश्रद्धा विरोधी विधयक म्हटले कि ते सनातनी होऊन हा कायदा करायचे नाहीत कॉंग्रेस चे पण तेच होते. आज राज ठाकरे जादूटोणा विरोधी विधयक सरकार ने का लागू केले नाही असा प्रश्न करत आहे पण त्यांना त्यांच्या पक्षाने विधानसभेत काय भूमिका घेतली होती हे माहिती आहे का ?? मनसे ने अंधश्रद्धा विरोधी विधयकाला विरोध केला होता.. सर्व पोपटपंची आहे सरकार ला आणि विरोधी पक्षांना राज्यात अंधश्रद्धा हवी आहे यांनी जी लोकांची वाट लावली आहे हि लोकांना समजू नये त्यांना आपली प्रगती झाली नाही कारण देवाची आपल्यावर कृपा नाही असे वाटावे आणि यांनी जे लोकांना खड्यात घातले आहे ते लोकांनी समजू नये. हिंगोली जिल्ह्यात ७ लहान मुलांची हत्या गेल्या वर्षी अंधश्रद्धेतून झाली होती अशाच शेकडो हत्या होत राहतील कारण भोंदू बुवांचे शिष्य सध्या सरकार आणि विरोधी पक्षात आहेत.


 


आता या महाराष्ट्राच्या राजकारण्यांना माझे एकच सांगणे आहे, थोडीशी जरी लाज शिल्लक असेल ना  आणि महाराष्ट्रात सुद्धा इतर मागास राज्यांप्रमाणे प्रमाणे वैचारिक लढाई बंदुकीच्या गोळ्यावर जिंकता येते हा चुकीचा संदेश जर जायला नको असेल तर ज्यासाठी डॉ नरेंद्र दाभोळकरांनी आपले आयुष्य वेचले ते जादूटोणा विधेयक वारकऱ्यानां विश्वासात घेऊन त्वरित मंजूर करून टाका तीच डॉ. नरेंद्र दाभोळकरांना खरी आदरांजली ठरेल.

 




शम्बुकापासून- तुकाराम महाराजांपर्यंत आणि गांधींपासून- डॉ. नरेंद्र दाभोलकरांपर्यंत झालेल्या हत्याकांडाने त्यांचे विचार न मरता ते इतिहासात अमर झालेले आहेत आणि हाच या परिवर्तनवादी चळवळीचा विजय आहे. अस्सल संविधानप्रेमी, अंधश्रद्धेंचा नायनाट करण्याचा विडा उचलणाऱ्या या खऱ्याखुऱ्या क्रुसेडरला आमचा हा अखेरचा वंदन. __/\__

 


लेखं- किरण शिंदे , वैभव मोरे , शंकर माने , AJ Karde.

No comments:

Post a Comment

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...