लोकसत्तामधील 'शरद जोशी' यांचे लिखाण पुर्वग्रहदूषित !!

लोकसत्तामधील 'शरद जोशी' यांचे लिखाण पुर्वग्रहदूषित !!




लोकसत्ता मध्ये दिनांक ७ ऑगस्ट २०१३ मधील कोरडवाहू शेतकऱ्यांचे एकेकाळचे तथाकथित आणि स्वयंघोषित नेते आणि आणि अर्थतज्ञ (?) शरद जोशी यांचा "दारिद्ररेषेखालील राजकारण" हा लेख आलेला होता. लेखाच्या सरतेशेवटी लेखक डॉ आंबेडकर यांच्या सामाजिक आणि आर्थिक धोरणांबद्दल आपली मते मांडली आहेत. थोडक्यात अचानक महामानव आंबेडकर यांच्यावर फिरून फिरून कसे आले हे समजले नाही. तो झोकून दिलेला उतारा इथे सर्वप्रथम नमूद करणे गरजेचे आहे.

 



"डॉ आंबेडकर यांनी "शिका, संघटीत व्हा आणि लढा द्या" असा कार्यक्रम आपल्या अनुयायांना दिला. शिक्षणक्षेत्रातील आजचा भ्रष्टाचार हा मोठ्या प्रमाणावर डॉ आंबेडकर यांच्या लढ्याच्या आदेशातील त्रुटींमुळे तयार झाला नसेल न , हि शक्यता तपासून पाहावे लागेल. त्यामुळे शिकले शिकले म्हणजे नोकरी आणि नोकरी म्हणजे पैसा हि सर्व समीकरणे समाजवाद बरोबर उध्वस्त झाली. डॉ आंबेडकर यांनी पुस्तकी शिक्षणापेक्षा बलुतेदारांच्या व्यावसायिक शिक्षणावर भर दिला असता तर जाती नष्ट करण्याचे त्यांचे उद्दिष्टहि साधले गेले असते आणि देशाचेही भले झाले असते"


 


स्वयंघोषित कोरडवाहू शेतकऱ्यांचे नेते म्हणवणारे शरद जोशी यांनी स्वतःला अर्थतज्ञ म्हणवत असताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्थशास्त्रीय योगदानाचा विसर पडला आहे कि काय असा प्रश्न आपल्याला पडतो. सामाजिक, राजकीय आणि आर्थिक बाजूना एकत्रित करून भारतीयांनच्या प्रगतीत हातभार लावणारे महामानव आंबेडकर यांचे योगदान अतुलनीय आहे. अमेरिका, इंग्लंड, रशिया मधील नामवंत अर्थशास्त्रज्ञानी महामानवाचे हे काम नावाजले आहे. मग शरद जोशी यांच्यासारख्या माणसाने त्यांच्याबद्दल असे का बोलावे असा प्रश्न आपणास पडतो.


 


डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्रातील योगदान आणि अभ्यास-



 

अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून महामानवाने अर्थशास्त्र, समाजशास्त्र आणि राज्यशास्त्र इत्यादी विषयाचे अध्ययन केले, त्यात प्राविण्य मिळवले. १९१५ मध्ये "प्राचीन भारताचा व्यापार" या विषयावर प्रबंध लिहून त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून एम. ए. हि पदवी संपादन केली. तसेच १९१६ मध्ये त्यांनी "National Divident of India: A historical and analytical study" या प्रबंधाबद्दल त्यांना कोलंबिया विद्यापीठाने Ph. D. हि पदवी प्रदान केली या प्रबंधाची मांडणी, संशोधन आणि चिकित्सक दृष्टीची अर्थशास्त्रातील विद्वानांनी मुक्तकंठाने स्तुती केली. संपूर्ण अमेरिकेत त्यांचे नाव गाजले.


 


म्हणजेच "प्राचीन भारताचा व्यापार" आणि "National Divident of India: A historical and analytical study" हे दोन्हीही प्रबंध महामानवाने केवळ भारत देश समोर ठेऊन आणि त्याचे अर्थशास्त्रीय संशोधन करून त्यांची मांडणी केली होती हे आपल्याला लक्षात येते. म्हणजे प्राचीन आणि तत्कालीन भारताचा अर्थशास्त्राचा गाढा अभ्यास डॉ आंबेडकर यांनी केलेला होता. वयोमानाने वृद्ध असलेले आणि अनुभवी असलेले शरद जोशींना या गोष्टींचा विसर पडला आहे काय ? अज्ञानाची परिसीमाच या वृद्धाने गाठलेली आहे असे दिसत आहे किवा जाणूनबुजून महामानवावर शंका घेण्याचे काम हे गृहस्त करीत आहेत! वाढत्या वयोमानाचा हा परिणाम आहे कि काय ? कि मती खुंटली आहे यांची ?


 


पुढे डॉ आंबेडकर यांनी अर्थशास्त्र मध्ये आणखी संशोधन करण्याची व लंडन विद्यापीठातून अर्थशास्त्रीय पदाची संपादन करण्याची महत्वकांक्षा महामानवाने ठेवली. १९२१ मध्ये "Problem of Rupee" हा प्रबंध त्यांनी "London School of Economics " मध्ये मांडला. त्यांना D.Sc. हि पदवी संपादन करण्यात आली. आज जेव्हा आपण याच विद्यापीठात पाउल ठेवतो तेव्हा तेथील त्यांच्या प्रतिमे खाली "Symbol of Knowledge" असे लिहून ठेवलेले आहे. म्हणजेच या विध्यापिठला डॉ आंबेडकर यांच्या सारखे विद्यार्थी लाभले याचा गर्व आहे. आणि आपली लोकसत्ता सारखी भारतीय वृत्तपत्रे मात्र महामानवाचे मोल जनात नाहीत याचेच आश्चर्य वाटते. हि "लोकसत्ता" आहे कि "भटसत्ता"??????? संताप होतो असे दृश्य आणि बेजबाबदार लिखाण पाहून !


 

लोकसत्ता वृत्तपत्राचा इतिहास आणि खरे स्वरूप-


 



लोकसत्ता हे वृत्तपत्र गेले कित्येक दशके केवळ एका ठराविक लोकांच्यासाठी काम करीत आहे असे दिसून येत आहे. एकेकाळचे तथाकथित उच्चवर्णीय आणि अकाली जन्माला घातलेले लेखकांची पिलावळे पोसणारे हे वृत्तपत्र आहे असेच दिसून येते. या वृत्तपत्राचे सनातनी लोकांना पुढे आणण्यासाठीचे आणि त्यांचे प्रतिनिधित्व करण्याचे हे काम अत्यंत खोडसाळजनक आहे.


 


उदाहरणच द्यायचे तर कुमार केतकर प्रवृत्ती यांच वृत्तपत्राची महाराष्ट्राला देण आहे. जेम्स लेन प्रकरणात कुमार केतकर याने जेम्स लेन आणि त्याच्या पाठीराख्यांना पाठींबा दिला होता त्यांना समर्थन दिले होते. महाराष्ट्रातील महापुरुषांची बदनामी करणे हे काही या वृत्तपत्राला नवीन नाही.


 


दुसरे उदाहरण द्यायचे तर काही आठवड्यापूर्वी याच वृत्तपत्राने महाराष्ट्रातील शाहू-फुले-आंबेडकर यांच्या चळवळीला "दहशत वादाची चळवळ" असे संबोधून समाजात गैरसमज पसरवण्याचे षडयंत्र पसरवण्याचा प्रयत्न केला होता. यावर संजय सोनवणी यांच्यासारख्या नामवंत विचारवंताने लोकसत्तेचा खारपसून समाचार घेतला होता व सडेतोड प्रतिक्रिया त्यांनी दिलेली होती. जातीय तेढ निर्माण करण्याचे आणि महाराष्ट्रातील खर्या महापुरुषांना बदनाम करण्याचे काम लोकसत्ता सारखे वृत्तपत्र करीत आहे. भयंकर संतापजनक आहे हे !


 


लोकसत्ता हे वृत्तपत्र असे का करीत आहे ? जाहीर आहे, हे वृत्तपत्र सनातनी वैदिक लोकांचे दहशतवादाचे एक केंद्रबिंदू बनू पाहत आहे. कुमार केतकर आणि शरद जोशी सारखी समाजकंटक प्रवृत्ती जन्माला घालून या वृत्तपत्राने काय मिळवले ?


 

ज्या महापुरुषाने सर्व भारतीय समाजाला ज्ञाय मिळवून दिला. त्यांच्याबद्दल व त्यांच्या कार्याबद्दल असे बेजबाबदार बोलणार्यांना पाठीशी घालणारे विकृत्त आहेत. डॉ आंबेडकर यांनी अन्यायग्रस्त सर्व भारतीय लोकांना "शिका, संघटीत व्हा आणि लढा करा" असा नारा देऊन त्यांच्यामधील आत्मविश्वास जागृत केला. आणि शरद जोशी बुवा म्हणत आहेत "हा कार्यक्रम राबवला" याचा अर्थ शरद जोशी नावाच्या माणसाला भारतीयांचे खरे "बाबासाहेब" समजले नाहीत ! केवढे हे अज्ञान... किवा सर्व जगणे "विद्वत्तेचे आणि ज्ञानाचे प्रतिक" असे संबोधलेल्या महामानव आंबेडकर यांना जाणून बुजून शरद जोशी दुर्लक्षित करून त्यांची बदनामी करीत आहेत. भारताचा आणि महाराष्ट्राचा इतिहास शरद जोशी विसरले आहेत कि काय ?

 


जोशी बुवा मते "शिक्षणातील भ्रष्टाचार आंबेडकर यांच्यामुळे वाढला !"

 




व्वा ! काय जावईशोध लावला आहे जोशी बुवांनी ! जो महामानव शिक्षणाची दारे सर्व भारतीयांसाठी खुले करतो त्यासाठी लढा देतो आणि सनातनी वैदिक ब्राह्मणांची शिक्षणातील मक्तेदारी मोडून काढतो त्यांनाच दुषणे देत आहेत हे जोशी बुवा ? शरद जोशी यांच्याकडे पाहून अजूनही सनातनी वैदिकांची पिलावळे पुरोगामी महाराष्ट्रात वळवल करीत आहेत असेच चित्र दिसत आहे! आम्हा भारतीयांकडे असलेले शिक्षण आणि आत्मविश्वास हिरावून घेण्याची परिभाषाच हे जोशी करीत आहेत असे स्पष्ट दिसत आहे ! लोकसत्ता नावाचे वृत्तपत्र अशा सनातन्यांना उत्तेजन देत आहे आणि हे वृत्तपत्र त्यामुळेच बदनाम आहे हे बंद पडलेलेच बरे ! अशी वृत्तपत्रे धर्मनिरपेक्ष भारतास आणि पुरोगामी महाराष्ट्रास कलंक आहेत .


 


शरद जोशी प्रवृत्तींना भारतीयांचे उद्धार करते आणि कल्याणकारी राजवट निर्माण करणारे आंबेडकर नको आहेत ! परंतु हे विसरत आहेत कि सूर्यावर थुंकणारे स्वतःच जळून खाक होतात ! पुरोगामी महाराष्टात अशी प्रवृत्ती वेळीच ठेचून टाकली पाहिजे नाहीतर "भटसत्ता" उदयास यायला वेळ लागणार नाही ! आणि सर्व भारतीयांना वेगळ्याच प्रश्नांना सामोरे जावे लागेल! पुरोगामी महाराष्ट्रातील महापुरुषांवर शंका घेणारे आणि आग ओकणारे जोशी योगायोगाने भटच आहेत !


 


जोशी बुवांच्या मते "बलुतेदारांना त्यांच्याच व्यवसायात प्राविण्य मिळवायचे होते ". बलुतेदारी म्हणजे काय माहित नाही काय जोशी बुवा यांना ? अहो गावाबाहेर राहून कित्येक समाज बलुतेदारी करीत तथाकथित उच्चवर्णीय (म्हणजेच हेच भट ) लोकाकडून आपली पिळवणूक व गुलामगिरी मध्ये अडकले होते. तुमची गुलामगिरी करण्यातच धन्यता मानायची होती काय ? किती नालायक विचार आहेत यांचे ?


 


महामानवाने हे सर्व बंद केले आणि भारतीयांना सनातन्याच्या पाशातून, गुलामगिरीतून मुक्त केले यात यांना तृटी दिसत आहेत. भारतीय लोक आज प्रगतीशील आणि सुसह्य जीवन जगत आहेत हे केवळ आंबेडकर यांच्यामुळेच ! हे बघवत नाहीये या लोकांना !

 


जय भारत !

 


लोकसत्ता लेखं संदर्भ- http://www.loksatta.com/sampadkiya-news/politics-over-poverty-line-167348/




लेखं- शंकर माने.

No comments:

Post a Comment

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...