आपल्या भारतीय राष्ट्रध्वजाला तिरंगा नव्हे चौरंगा बोला !!
आपला राष्ट्रीय ध्वज हा तिरंगा वास्तविक हा ध्वज तिरंगा नसून तो चार रंगाचा म्हणजे चौरंगा आहे. आपण अशोक चक्राचा रंग विचारात न घेतल्यामुळे आपण त्याला तिरंगा म्हणतो. मात्र भारताचे केंद्रीय सांस्कृतीक मंत्रालय राष्ट्रीय ध्वजाचा उल्लेख तिरंगा असा करत नाही तर चौरंगा असाच करते. तशी नोंद त्या मंत्रालयाने केलेली आहे.
या तिरंगा ध्वजातील सर्वात पहिला रंग वरच्या बाजूचा ज्याला आपण लाल, केशरी, कोणी भगवा, कोणी नारंगी म्हणतो. या रंगाला आपल्या भारतीय संविधानाने एका विशेष अशा नावाने वर्णित केले आहे. ते म्हणजे इंग्रजीत या रंगाला ओशर असे म्हटलेले आहे. ओशर म्हणजे लालसर पिवळ्या अशा आपल्या कोकणी मातीचा रंग जो तांबड्या व पिवळ्या रंगाचे मिश्रण असतो. हा रंग आपल्या धम्मगुरुंच्या म्हणजेच बौध्द भिक्खूंच्या चिवराचा रंग असतो. चिवर हे बौध्द भिक्खूंचे वस्र आहे. ते वस्र त्यागाचे प्रतिक आहे.
दुसरा म्हणजेच मधला रंग हा पांढरा असून या रंगाला सुध्दा बुध्द धम्मात महत्त्वाचे असे स्थान आहे. पांढरा रंग हा शांती व सत्याचा प्रतिक आहे. हा रंग शांती व सत्याचा प्रतिक असल्याने बौध्द उपासक आणि उपासिका शील ग्रहण करीत असताना नेहमी पांढरया रंगाचे वस्र परिधान करतात.
ध्वजातील तिसरा रंग म्हणजेच शेवटचा खालचा रंग हा हिरवा असून हा रंग निसर्गावर व प्राणीमात्रांवर प्रेम करायला सांगतो. हा निसर्गावर व प्राणीमात्रांवर प्रेम करण्याचा बुध्द धम्माच्या पंचशीलेची शिकवण देणारा रंग आहे. शिवाय तिरंग्याच्या मधोमध बुध्द धम्माचे प्रतिक असलेले निळ्या रंगातील अशोकचक्र म्हणजेच धम्मचक्र असून ते सा-या विश्वाला बुध्द धम्माची ओळख करुन देते. असा हा सर्वांगीन बुध्द धम्माची प्रचिती देणारा आपला राष्ट्रीय ध्वज तिरंगा, राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्ण विचारांती व अभ्यासाने आपल्या देशाला म्हणजेच भारताला दिला.
थोडक्यात बुध्द धम्माशी निगडित असणारे तिनही रंग व धम्मचक्र हे आपल्या राष्ट्रीय ध्वजात असल्याने या ध्वजावरुन भारत हा बौध्दमय देश असल्याची जाणीव होते. प्रत्येक देशाच्या राष्ट्रध्वजावरुन तो देश कोणत्या धर्माचा पुरस्कार करणारा आहे हे ओळखले जाते. कींवा त्या देशाचा प्रमुख धर्म कोणता हे सांगीतले जात असल्याने आपल्या राष्ट्रीय ध्वजातूनही भारत हा बौध्दमय देश असल्याचे स्पष्ट होते.
संदर्भ ग्रंथ-
१. राष्ट्रीय प्रतिक- राष्ट्रध्वज व भारतीय ध्वज संहिता, भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने प्रकाशित केलेल्या पुस्तिका.
२. जाधव केशर आर (२०११) भारतीय राष्ट्रध्वजाचा इतिहास आणि त्यातील अशोकचक्राचे महत्त्व, 'शुभाय प्रकाशन मुंबई-२८
३. सम्मासम्बुध्द , ऑगस्ट २०१३
छायाचित्र धन्यवाद- संदीप गायकवाड.
लेखं धन्यवाद- देव भिवसने सर.
ह्या ब्लॉगच्या सर्व वाचकांना ६७ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त खूप-खूप शुभेच्छा !!!!!!!!!!!!!!!!
ReplyDeleteHAPPY INDEPENDENCE DAY !!!!!!!!!!